✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिवसेनेचे हे काय चाललय

व
विजुभाऊ यांनी
Wed, 09/09/2020 - 13:12  ·  लेख
लेख
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
108950 वाचन

💬 प्रतिसाद (293)

प्रतिक्रिया

केवळ कोणी एक व्यंगचित्र काढले

विजुभाऊ
Sat, 09/12/2020 - 12:42 नवीन
केवळ कोणी एक व्यंगचित्र काढले तर त्यासाठी एका ६५ वर्षाच्या नौदल अधिकार्‍यास मारहान करणॅ हे सेनेच्या कोणत्या संस्कारात बसते. बाळासाहेब ठाकर्‍यांनी मार्मीक मधे अशी अनेक व्यंगचित्र काढली असतील याचाही सेनेला विसार पडलाय. दुसरे म्हणजे ज्याला मारले तो नौदल अधिकारी होता हे लगेच समजणे शक्य नाही. पण एखाद्या ६५ वर्षाच्या माणसाला मारहाण करणे म्हणजे सेनेच्या लोकांनी त्याम्च्या अहंगंडामुळे साधी माणूसकीही सोडली आहे याचे ठळक उदाहरण आहे. आता यावर सेना म्हणू शकेल की ज्यानी त्या अधिकार्‍याला मारले ती सेनेची अधिकृत भूमीका नव्हती. दुसरे म्हणजे राऊत कोणालाही काहिही बोलले तरी ते चालते. अजितदादांना " मुतर्‍या तोंडाचे ' गटारातला कीडा असले शेलके शब्द वापरतात त्यावर राउतांना काय न्याय लावायचा. राउताना अक्कल नाही असे एकवेळ समजले तरी राउताचा धनी उद्धव ठाकरे यानीही त्या विरोधात कधी चकार शब्द काढला नाही. कम्गना हा विषय सम्पला असे म्हणताना सामना मधे राऊत लिहीतात " उखाड दिया" . म्हणजे यानी जीभ उचलून टाळ्यालाच काय अगदी पायाच्या तळव्याला लावायची मात्र इतर कोणी त्यावर काही बोलले की म्हणायचे की हा विषय आमच्यासाठी सम्पलाय. पूर्वी बाळासाहेब असताना सेने बद्दल ममत्व होते. मराठी माणसाचा आवाज अशी एक आशा वाटायची ( तीही फोल ठरवली गेली होती ) त्याम्च्या नंतरची इतकी भेक्कड भित्री असेल असे कधीच वाटले नव्हते
  • Log in or register to post comments

सेनेचे चुकलंच

Rajesh188
Sat, 09/12/2020 - 13:48 नवीन
कंगना ल प्रती उत्तर देवून सेने चे चुकलंच. कंगना च्या ऑफिस वर आता कारवाई करणे सेने च्या अंगलट आले. सुशांत सिंग केस तपास जलद गती नी न करून bjp ल हात घालायला जागा दिली हे पण हुकलेच असे आताची स्थिती बघून वाटणे साहजिक आहे. पण एक गोष्ट सर्व विसरत आहेत. राडा करण्यासाठी ,टीका करणाऱ्या लोकांना दम देवून गप्प बसवण्यासाठी प्रतेक पक्ष कडे एकादी बेनामी संघटना असते वरवर तिचा संबंध पक्ष शी नसतो पण ती कार्य त्याच पक्षाचे करत असते. राष्ट्रवादी कडे अशा बेनामी संघटना आहेत हे पण जवळ जवळ सर्व लोकांना माहीत आहे ते राडे करायचे काम करतात पण राष्ट्रवादी चे त्या मध्ये नाव येत नाही. Bjp कडे पण बजरंग दल,हिंदू महासभा आहे ते गौरक्षक म्हणून bjp चेच काम करतात. काँग्रेस कडे अनेक संघटना आहेत . फक्त राडे करण्यासाठी सेने कडे अशी सुविधा नाही सर्व त्यांनाच करावे लागते मग ते बदनाम होतात.
  • Log in or register to post comments

...

Gk
Sat, 09/12/2020 - 13:58 नवीन
कसले कार्टून होते म्हणे ? ठाकरे कुटुंब चांगल्या कार्टूनवर चिडेल असे वाटत नाही घरात 2 कार्टुनिस्ट आहेत , बाळासाहेब आणि राज
  • Log in or register to post comments

कंगना आणि शिवसेना

Suraj Mane
Sat, 09/12/2020 - 16:21 नवीन
कंगना आणि शिवसेना सत्ता आलेल्या आणि सत्ता न आलेल्या पक्षांची भांडणे वाटतात. Click Here
  • Log in or register to post comments

कुठल्या ही पक्षातील नेते कसे

प्रसाद_१९८२
Sat, 09/12/2020 - 17:33 नवीन
कुठल्या ही पक्षातील नेते कसे का असेनात. मला ते नाशिकचे आर्मस्ट्रॉंग काका फार आवडतात. मला हेच खाते हवे, तेच खाते हवे यासाठी कधीही ते भांडताना दिसत नाहीत. मिळेल त्या खात्यात, 'खायच्या' संधी ते बरोबर शोधून काढतात. आता करोना काळात झालेला 'तांदूळ घोटाळा' पाहा.
  • Log in or register to post comments

भक्त..

गोंधळी
Sat, 09/12/2020 - 21:23 नवीन
भक्त लोकांना विचारायच आहे की त्यांना विकासाच राजकारण पाहीजे की असे मुर्ख भावनिक राजकारण पाहीजे आहे. कारण हे सर्व तुमच्या सपोर्टवर चालु आहे. दिल्ली निवड्नु़कांच्या वेळी असेच केल गेल होत पण दिल्लीकरांनी विकासाला निवडल. भक्त लोकांना विनंती आहे की चुकीच्या गोष्टींना डोक्यावर घेउ नका. मी कोण्त्याही पक्षाचा समर्थक नाही आहे.
  • Log in or register to post comments

बरोबर आहे तुमच, लोकांनी

रात्रीचे चांदणे
Sat, 09/12/2020 - 22:00 नवीन
बरोबर आहे तुमच, लोकांनी विकासलाच निवडलं पाहिजे. देशात २०१४ आणि २०१९ साली लोकांनी विकासा लाच निवडून दिलंय. राज्यात पण विकासलाच निवडलं होतं पण धोका दिला ती गोष्ट वेगळी. ज्या दिल्लीत लोकांनी विधानसभे साठी विकासाला निवडून दिल त्याच लोकांनी लोकसभे साठी ही विकासलाच निवडून दिलंय पण ते कदाचित दिसत नसावं. आपल्या आवडीचा पक्ष जिंकला की विकास जिंकला आणि ना आवडता जिंकला की भावनिक मुद्दे जिंकले हे बरोबर नाही. आपला तो बाबू दुसऱ्याच ते कार्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

छान

Gk
Sat, 09/12/2020 - 22:06 नवीन
दुसऱ्या पक्षांना निवडून दिले तरी तात्या विंचू ओम भग भुगे करत शिरतो व परत तात्या विंचूचेच सरकार येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

२०१९ साली लोकांनी विकासा लाच निवडून दिलंय ???

गोंधळी
Sun, 09/13/2020 - 11:33 नवीन
मी कोण्त्याही पक्षाचा समर्थक नाही आहे. मी एक सामान्य नागरीक म्हणुन जे वाटते ते लिहील आहे. मल वाटत आपण कुठल्या पक्षाचे समर्थक म्हणुन नाही तर तटस्थ नागरीक म्हणुन विचार केला पाहीजे तरच आपल्याला वस्तुस्थीति कळेल. जर विकास राजकारणा चा मुद्दा असेल तर बकिचे अनावश्यक भावनीक मुद्द्यांना महत्वच मिळाल नसत. भारतीय जनतेने आता emotional होन सोडुन logical व्ह्ययला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

आत्ताच बातमी वाचतोय. माजी

विजुभाऊ
Sat, 09/12/2020 - 22:29 नवीन
आत्ताच बातमी वाचतोय. माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण प्रकरणी संजय राउतांनी " ती एक स्वाभाविक प्रतिक्रीया आहे" असे मत प्रदर्शीत केले आहे. ही अशी प्रतिक्रीया इतरांनी व्यक्त केली तर ? स्वतःचा मुख्य मंत्री असूनही सेना केवळ दंगा राडे यातून बाहेर येताना दिसत नाहिय्ये. एकूणच सेनेचे राजकारण पाहिले तर राजकारण कमी आणि टपोरीगिरी जास्त असेच दिसतय.
  • Log in or register to post comments

...

Gk
Sat, 09/12/2020 - 22:36 नवीन
हल्ली गोमांस संशयावरून माणसाच्या हत्या बंद झाल्या की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

.

Gk
Sat, 09/12/2020 - 22:58 नवीन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांना बदनाम करण्याच्या बातम्या प्रसारित होत असल्याने ‘रिपब्लिक टीव्ही’ व ‘रिपब्लिक टीव्ही भारत’ या दोन वाहिन्या दाखवणे सुरू ठेवल्यास लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा आशयाचे म्हणणे मांडत केबल चालकांना या वाहिन्या दाखवण्यास मनाई करणारे पत्र शिव केबल सेना या संघटनेने १० सप्टेंबर रोजी अनेक केबल चालकांना पाठवल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, या दोन वाहिन्या चालवत असलेल्या ‘एआरजी आऊटलाय प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने ज्येष्ठ वकील निखिल साखरदांडे यांच्यामार्फत तातडीच्या रिट याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘अशा वादांविषयी दाद मागण्याचा मंच हा टेलिकॉम डिस्प्युट्स सेटलमेंट अँड अॅपलेट ट्रिब्युनल (टीडीसॅट) हा आहे. मात्र १८ सप्टेंबरपर्यंत कामकाज बंद असल्याचे या मंचाने अधिसूचनेद्वारे नुकतेच स्पष्ट केले आहे. म्हणून आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमच्या वाहिन्या दाखवणे बंद होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकारला निर्देश द्यावेत’, अशी विनंती कंपनीतर्फे अॅड. साखरदांडे यांनी न्या. नितीन जामदार व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या सुनावणीत केली. तर ‘याचिकादारांचे गाऱ्हाणे हे खासगी संस्थेविरोधात असल्याने त्याविषयी रिट याचिकेद्वारे दाद मागता येऊ शकत नाही. त्यांना अन्य मार्ग असून ते दिवाणी दावा दाखल करू शकतात’, असे म्हणणे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मांडले. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-high-court-rejected-the-plea-of-the-company-operating-republic-tv/articleshow/78080805.cms
  • Log in or register to post comments

शिवसेना आता सत्तेत नेहमीच राहणार

Rajesh188
Sun, 09/13/2020 - 02:55 नवीन
शिवसेना आता सत्तेत नेहमीच राहणार आणि विरोधी पक्षाची भूत जी सर्व व्यापी आहेत ते सेने ला त्रास देणार कधी अर्णव च्या रुपात,कधी कंगना च्या रुपात. सेने नी पण आता भूत निर्माण करावी आपल्या लोकांना वेगवेगळ्या नावाच्या संघटना निर्माण करण्यास बळ देवून त्यांना उभ करावे. आणि शिवसेनेची भूत निर्माण करावी वेगवेगळ्या नावांनी भुतं शी भुताच लढतील आपण नाम निराळे. काश्मीर मध्ये पाकिस्तान सैनिकांची भुतं च अतिरेकी बनून भारताशी सर्व नियम मोडून लढतात. ते अतिरेकी नसतात तर पाकिस्तान चे सैनिक च असतात. सर्व जग च हा फॉर्म्युला वापरात आहे. तेव्हा सेने नी तोडफोड,मारझोड,मोर्चे,ही सर्व काम भुतांकडे सोपवावित आणि स्वतः माणूस राहवे.
  • Log in or register to post comments

अस्सल मराठी मध्ये भुता ना भज्जी खावू म्हणतात

Rajesh188
Sun, 09/13/2020 - 03:20 नवीन
अर्णव,कंगना ही भज्जी खाव आहेत ज्यांची plate त्यांचे गुणगान. सेनेचा भज्जी खाव लोक जवळ बळगवित. बिल त्यांचे पैसे आमचे. आपले फक्त पैसे जातील पण बिल त्यांचे फाडले जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 09/13/2020 - 08:18 नवीन
शिवसेनेकडे शिकलेला-मध्यममार्गी मतदार नाही हे त्याचे कारण आहे रे राजेशा . सुरुवातीच्या काळात तो होता- म्हणजे ८७-८८ सालापर्यंत पण सेनेने मराठी झूल फेकली व हिंदुत्वाची झूल पांघरून राजकारण सुरु केले. मग हा मतदार हळुहळु भाजपाकडे वळला. शिवसेनेला जर भाजपा/कॉन्ग्रेसशी टक्कर द्ययची असेल तर आधी विकासाचे राजकारण त्यानी चालु करावे. 'सामना'/भाषणातून खंजिर्/कोथळा/किल्ल्ला असली भाषा बंद करावी. लोकाना ईतिहासात रममाण होण्यापासुन परावृत्त करावे. 'आम आदमी' पक्षाचे उदाहरण घ्या. फक्त आठ वर्षे झाली आहेत त्या पक्षाला. त्यानीही चुका केल्या पण त्या त्याना समजल्या व त्यानी आपली धोरणे आखली. आज त्यांचे विरोधकही त्यानी केलेली कामे मान्य करतात. महाराष्ट्रापुरते असाल तर राज्याच्या समस्यांपुरतेच बोला. द्रमुक पक्षाचे नेते कधी कश्मिर्/अयोध्या प्रकरणावर बोलताना दिसतात का ? उद्धव्/संजय राउत 'सामना'तून ईमरान खान/ट्रम्प ह्याना ईशारे का देतात? प्रत्येक समस्येसाठी मुस्लिम्/उत्तर भारतीय लोकाना जबाब्दार ठरवण्याचे सोडुन द्या. स्थानिक लहान उद्योग राज्य सरकार का निर्माण करू शकत नाही? हे जे काही कथित लोंढे म्हणता ते कॉन्ग्रेसने आखलेल्या चुकीच्या ओद्योगिक धोरणांमुळेच आले ना ? मग त्यासाटी काँग्रेसला/राष्ट्र्वादीला जाब कधी विचारणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कसले लोंढे आले ?

Gk
Sun, 09/13/2020 - 08:21 नवीन
कुर्डुवाडीतून येऊन मुंबईत पाणीपुरीचा ठेला घालायला काँग्रेसने बंदी घातली का ? बांधकामे बंद पडलीत , कामगार नाहीत म्हणे , मग मराठी कामगार भेटत का नाहीत ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मोगा खान

सुबोध खरे
Sun, 09/13/2020 - 13:12 नवीन
मोगा खान बिहार पश्चिम बंगाल मधील गरिबी पाहिली आहे का तुम्ही? बिहार मध्ये मैलोगणती केवळ शेती आणि गावं. उद्योग नाहीतच. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले लोक मुंबईत येऊन 10 x 10 च्या खोलीत 15 जण राहतात. इतकी वाईट परिस्थिती कुर्डुवाडीत नाही. 1998 साली बिहार मध्ये शेतमजुराला दोन वेळचे जेवण आणि 1800 रुपये मिळत. महिन्याला नव्हे वर्षाला. मी स्वतः तेथील भयानक परिस्थिती पाहिली आहे. ओडिशा मध्ये दुष्काळ पडल्यावर लोक उंदीर खाउन जगताना पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

...

Gk
Sun, 09/13/2020 - 14:14 नवीन
एका खोलीत 15 रहातात , कारण त्यांच्या कामातून , चहा विकणे , पाणीपुरी , द्रायव्हर वगैरे कामात त्यांना पगारच तितका मिळतो , पण असे ते जन्मभर रहात नाहीत , हळूहळू भाड्याचे घर , मग उपनगरात घर वगैरे घेतात , पुढची पिढी सामान्य मराठी कुटुंबाइतके सुखात रहाते , कुठल्याही सोसायटीत आज 20 ते 30 % लोक मराठीच असतात ह्या सगळ्याला काही काँग्रेसच जबाबदार आहे , असे नाही आणि लोंढे तर गुजरातवरूनही येतात , मग त्याला मोदी , गुजरात भाजप जबाबदार का ? स्वतः मोदींनी स्वतःची खासदारकी वारांनशीतून घेतली अन गुजरातची एक सीट वाचवली , पंतप्रधानकी सांभाळताना मतदार संघ फाफलला तर फाफलला , आणि भक्ताडे म्हणतात माँ गंगा ने बुलाया है, मग माँ साबरमती , माँ नर्मदा ह्या काय जिनपिंगला हाक मारतात काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दुरुस्ती

Gk
Sun, 09/13/2020 - 14:15 नवीन
कुठल्याही सोसायटीत आज 20 ते 30 % लोक अमराठीच असतात ------ युज इट ऑर लूज इट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

पंतप्रधानकी सांभाळताना मतदार

सॅगी
Sun, 09/13/2020 - 15:08 नवीन
पंतप्रधानकी सांभाळताना मतदार संघ फाफलला तर फाफलला
पण नाही ना फाफलला? झालं तर मग....
मग माँ साबरमती , माँ नर्मदा ह्या काय जिनपिंगला हाक मारतात काय ??
हे नाही माहित...पण रागा किंवा सोगांना नक्कीच हाक मारत नसाव्यात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

मोगा खान

सुबोध खरे
Sun, 09/13/2020 - 13:12 नवीन
मोगा खान बिहार पश्चिम बंगाल मधील गरिबी पाहिली आहे का तुम्ही? बिहार मध्ये मैलोगणती केवळ शेती आणि गावं. उद्योग नाहीतच. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले लोक मुंबईत येऊन 10 x 10 च्या खोलीत 15 जण राहतात. इतकी वाईट परिस्थिती कुर्डुवाडीत नाही. 1998 साली बिहार मध्ये शेतमजुराला दोन वेळचे जेवण आणि 1800 रुपये मिळत. महिन्याला नव्हे वर्षाला. मी स्वतः तेथील भयानक परिस्थिती पाहिली आहे. ओडिशा मध्ये दुष्काळ पडल्यावर लोक उंदीर खाउन जगताना पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

मुळात मतदार म्हणजे कोण??

शेर भाई
Sun, 09/13/2020 - 19:33 नवीन
रात्री बाईकवरून जाताना ऐरोलीच्या / मानखुर्दच्या खारफुटीमुळे पूर्वी ज्या प्रमाणात थंडी वाजायची ती आता जाणवत देखील नाही. या मागची गंमत अशी आहे कि प्रत्येक नगरसेवकाने, आमदाराने खारफुटीमध्ये आपापल्या नावाने झोपडपट्ट्या निर्माण करून ठेवल्या आहेत. या झोपडपट्ट्या अनधिकृत असून सुद्धा त्यांना वीज, पाणी वगैरे सगळे फायदे देऊन प्रत्येक नगरसेवकाने, आमदाराने आपली जागा पक्की करून ठेवली आहे. या सगळ्यांना आपल्या सारख्या सर्वसामान्य मतदाराची गरजच आता नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

२०१९ साली लोकांनी विकासा लाच निवडून दिलंय ???

गोंधळी
Sun, 09/13/2020 - 11:32 नवीन
मी कोण्त्याही पक्षाचा समर्थक नाही आहे. मी एक सामान्य नागरीक म्हणुन जे वाटते ते लिहील आहे. मल वाटत आपण कुठल्या पक्षाचे समर्थक म्हणुन नाही तर तटस्थ नागरीक म्हणुन विचार केला पाहीजे तरच आपल्याला वस्तुस्थीति कळेल. जर विकास राजकारणा चा मुद्दा असेल तर बकिचे अनावश्यक भावनीक मुद्द्यांना महत्वच मिळाल नसत. भारतीय जनतेने आता emotional होन सोडुन logical व्ह्ययला पाहिजे.
  • Log in or register to post comments

तुमचं हे म्हणणं मान्य आहे की

रात्रीचे चांदणे
Sun, 09/13/2020 - 13:06 नवीन
तुमचं हे म्हणणं मान्य आहे की लोकांनी विकासा साठीच मतदान करायला पाहिजे. पण दिल्लीत केजरीवाल जिंकले की विकासाला मतदान आणि त्याच दिल्लीत लोकसभेत भाजपा चे खासदार जिंकले की भावनिक मुद्दे, हे योग्य नाही. मद्यप्रदेश, राजस्थान मध्ये पण हेच झालं. विधानसभेला लोकांनी काँग्रेस ला आणि लोकसभेला भाजपा ला मतदान केलं. त्यामुळे जेवढे तटस्थ आपण आपल्याला हवा असलेला पक्ष जिंकला की असतो तेवढेच तटस्थ आपण आपल्याला नको असलेला पक्ष जिंकला तरी असायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

२०१४

गोंधळी
Sun, 09/13/2020 - 15:20 नवीन
२०१४ ला मलाही वाट्ल होत की चला वाजपेयीं नंतर कोणीतरी चांगला पं.प्र. देशाला मिळाला. पण दोनच वर्षात त्यांची फेकाफेकी बाहेर यायला लागली. मोठ्या प्रमाणात मार्केटींग करणे व भावनीक मुद्दे हेच मोदी सरकार्चे USP आहेत नाहितर मोदींच्या गुजरात मधे विकास वेडा झाला नसता. आणि २०१९ निवडनुक ही पुलावामा च्या मुद्द्यावर लढवली. २०१४ नंतर भाजपा चा मोदीपा झाला आहे. पण यात मोदींना काय दोष देणार आपली लोकशाहीच तेव्हडी परीपक्व झालेली नाही. त्यामुळे जनतेला अनावश्यक कंगना सार्ख्या मुद्द्यांवर नाचवल जात आहे. आता त्या निवृत्त नौदल अधिकार्‍यास मारहाण झाली. यामध्ये परत सामान्य जनतेलाच त्रास. त्या कंगना ने मुद्दाम शिवसेनेला उचकावल आहे.या मध्ये सामान्य जनतेला पडायची काहिच गरज नव्हती. हे सगळ बिहार निवड्नुकी च्या वातावरण निर्मिती साथी केल जात आहे. कारण विकास आहे कुठे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

भाजपाचे काय चालले होते ? खरे आहे का ?

Gk
Sun, 09/13/2020 - 11:48 नवीन
Image removed. अहमदाबाद आयपीएस संजीव भट्ट ह्यांचे घर मोदी सरकारने 4 तासाची नोटीस देऊन पाडले होते म्हणे खरे आहे का ?
  • Log in or register to post comments

अन्याय

सॅगी
Sun, 09/13/2020 - 11:56 नवीन
त्यांनी अन्याय केला म्हणुन आपणही अन्याय करायचा....मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक?? काय? खरे आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

सुप्रिम

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 09/13/2020 - 14:46 नवीन
सुप्रिम कोर्टाने परवानगी दिल्यावरच ते बांधकाम तोडले होते रे जिक्या. https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/illegal-portion-of-sanjiv-bhatts-house-demolished/articleshow/65204743.cms दुसरे म्हणजे अनधिक्रुत बांध्कामाची तक्रार अहमदाबाद पालिकेकडे २०१२ साली होती. २०१६ मध्ये नोटिस् दिली होती. व जुले २०१८ मध्ये बांधकाम तोडले. तेव्हा मोदी पंतप्रधान होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

.

Gk
Sun, 09/13/2020 - 14:56 नवीन
कंगनालाही 2018 ला नोटीस दिली होती अन प्रत्येक हगल्या मुतल्याला सुप्रीम कोर्ट पाहिजे तर मग सगळीकडे सुप्रीम कोरटेच काढावीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

४

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 09/13/2020 - 16:59 नवीन
४ तासाची नोटिस देउन पाडले ही थापेबाजी होती. हे सांगतेय. ड्रग्ज मुंबईत गेले अनेक वर्षे मिळतात.. हाय प्रोफाईल पार्ट्यंमध्ये ती वाटलीजातात. ही त्याना मिळवून देण्यात मुंबई पोलिसाना 'आपला वाटा' मिळतो. पोलिस-अंडरवर्ल्ड-बोलिवूड अशी ही अभद्र युती आहे. ती मोडून काढण्याचे काम होताना दिसत आहे. त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. सुशांत मृत्यु प्रकरणात मुंबई पोलिसानी काय दिवे लावले ते आपण पाहिले. तपास चोख असता तर हे सगळे टळले असते. ह्या अशा संस्था हगल्या मुतल्यासारखा तपास करतात म्हणून सुप्रिम कोर्टात जायची वेळ येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

काय दिवे नक्की ?

शा वि कु
Sun, 09/13/2020 - 17:34 नवीन
सुशांत मृत्यु प्रकरणात मुंबई पोलिसानी काय दिवे लावले ते आपण पाहिले.
काय ? हे ड्रग्ज संबंधित मुळात नव्हतंच. त्यामुळे मुंबई पोलिसांवर कितपत दोष मढता येईल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

कंगना चे बांधकाम तोडल्याबद्दल

सुबोध खरे
Sun, 09/13/2020 - 17:00 नवीन
कंगना चे बांधकाम तोडल्याबद्दल आक्षेप नाही तर मुंबईत 60000 अनधिकृत बांधकामे आहेत त्याबद्दल महापालिकेने इतकी तत्परत दाखवली नाही आणि येथे 24 तासाच्या आत जे सी बी बुलडोझर आणून बांधकाम तोडल्याबद्दल आहे. हे उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम निकालात स्पष्टपणे म्हटले आहे म्हणजे आम्हाला विरोध कराल तर आम्ही काय करू शकतो याचे शक्तिप्रदर्शन आहे. विरोधाचा आवाज दाबून टाकण्याच्या या वृत्तीबद्दल आक्षेप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

छान

Gk
Sun, 09/13/2020 - 17:08 नवीन
एकदा 2018 ला नोटीस दिली की जेसीबी मुन्शीपालतीच्या वेळेनुसार कधीही येईल, तुमच्या मर्जीने जेसीबी यायला ती काय एमबुलन्स आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उच्च न्यायालयाने काय म्हटलंय

सुबोध खरे
Sun, 09/13/2020 - 17:10 नवीन
उच्च न्यायालयाने काय म्हटलंय ती नीट वाचून घ्या. उगाच वाय बार काढू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

छान

Gk
Sun, 09/13/2020 - 17:24 नवीन
कंगना चे बांधकाम तोडल्याबद्दल आक्षेप नाही 60000 बांधकामे पाडायची असताना हिचेच का पाडले ? मग आता 60000 जेसीबी एकाच वेळी पाठवायचे ? आणि हा आक्षेप कोर्टाने घेणे हास्यस्पद आहे , कोर्टातही 60000 बलात्कार , फसवणुकीच्या अन पाडापाडीविरोधात कोर्ट केसेस पेंडिंग असतीलच की, मग हिची केस ताबडतोब का घेतली म्हणे ? जशी ही डिस्करीशनरी पॉवर कोर्टाला आहे तशीच बीएमसीलाही असेलच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हं

सॅगी
Sun, 09/13/2020 - 17:41 नवीन
एक जेसीबीने एका महिन्यात कमीत कमी १० तरी अनधिक्रुत बांधकामे पाडता येतील. . . . या न्यायाने आतापर्यंत मुंबईतली सारी (किंवा किमान अर्धी तरी) अनधिक्रुत बांधकामे पाडली जायला हवी होती...नै का??? डिस्क्रिशनरी पॉवर जरी असली तरी कामाच्या वेळेत कामच झाले पाहीजे...झोपा काढण्यासाठी डिस्क्रिशनरी पॉवर दिलेली नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

.

Gk
Sun, 09/13/2020 - 20:17 नवीन
बिंधास्त अतिक्रमण करा. आणि कारवाई झाला की राज्यपालाला भेटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

नाही नाही

सॅगी
Sun, 09/13/2020 - 21:46 नवीन
माजी सैनिकांना ठोका...आणि ४ तासांत जामिन घ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

आणि हा आक्षेप कोर्टाने घेणे

सुबोध खरे
Sun, 09/13/2020 - 22:07 नवीन
आणि हा आक्षेप कोर्टाने घेणे हास्यस्पद आहे. रिट अर्ज किंवा रिट अधिकारकक्षा हा उच्च न्यायालयाचा घटनात्मक अधिकार आहे असा अधिकार इतर कोणत्याही संस्थेला नाही अगदी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा. एकदा वाचून पहा Discretionary power तर साध्या वाहतूक पोलिसालासुद्धा असते पण ती पूर्णपणे अधोरेखित आणि मर्यादित असते. अभ्यास वाढवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

Pok

Rajesh188
Sun, 09/13/2020 - 14:44 नवीन
कंगना मुंबई ला pok म्हणली तर म्हणू ध्या. Pok हा भाग भारतील किती राज्यांपेक्षा सुंदर आहे.निसर्ग रम्य आहे.
  • Log in or register to post comments

कंगना अभिनंदन

Rajesh188
Sun, 09/13/2020 - 15:14 नवीन
मुंबई महाराष्ट्र ला उपमा दिल्या बद्द्ल. Pok म्हणजे आझाद काश्मीर. आझाद काश्मीर ला स्वतःच पंतप्रधान असतो, आझाद काश्मीर ला स्वतःचे सर्वोच्च न्यायालय आहे. 3.2 billion dollar ची gdp aahe त्यांची. तेथील लोक 100 वर्ष जगतात. कंगना महाराष्ट्र pok बोलली च आहे तर मोदी ना सांगून एवढं बदल करायला सांग. महाराष्ट्र ला पण स्वतःचे सर्वोच्य न्यायालय, महाराष्ट्र च्या मुख्य मंत्री हा महारष्ट्र चा पंतप्रधान असेल अशी सुविधा द्यायला सांग.
  • Log in or register to post comments

निरक्षर राजा आणि अडाणी जनता

Gk
Sun, 09/13/2020 - 17:16 नवीन
नेव्हीमधल्या माणसाला मारले म्हणून नाचत होते, तो इंडियन आर्मी नाही मर्चंट नेव्हीतला आहे. पोस्टमनाला बीएमसीवाला मर्चंट नेव्हीला नेव्हीवाला गांजेडी बाईला वीर राणी इथे कुणाला काय करतील नेम नाही राहिला
  • Log in or register to post comments

निरक्षरपणा

सॅगी
Sun, 09/13/2020 - 17:30 नवीन
इंडियन आर्मी नाही मर्चंट नेव्हीतला आहे.
आर्मी = जमीनीवर युध्द करणारे नेव्ही = पाण्यात/समुद्रात युध्द करणारे फरक समजुन घ्या हो Gk काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

माफ करा

Gk
Sun, 09/13/2020 - 17:41 नवीन
इंडियन नेव्ही नाही मर्चंट नेव्हीतला आहे असे लिहीत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

मर्चंट नेव्ही चा नव्हे तर

सुबोध खरे
Sun, 09/13/2020 - 22:10 नवीन
मर्चंट नेव्ही चा नव्हे तर भारतीय नौदलातून निवृत्त झालेले पेटी अधिकारी आहेत ते CHELP(Chief petty officer electrical power) हा हुद्दा होता. त्यांना बेदम मारहाण केल्यामुळे डोळ्यात रक्तस्त्राव झाला आहे. Subconjunctival hemorrhage. त्यासाठी ते नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात भरती झालेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

निरक्षर राजा आणि अडाणी जनता

मामाजी
Mon, 09/14/2020 - 08:33 नवीन
निरक्षर राजा आणि अडाणी जनता हे आपण आपले स्वत: बद्दल चे केलेले वर्णन एकदम योग्य आहे.आपले कंपांउडरप्रेमी राजे बेताल वक्तव्य करतात आणि आपल्या सारखे अडाणी पाठीराखे कोणताही शहानिशा न करता नाचायला लागतात व नंतर तोंडावर आपटले की पळून जातात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

हा हा

मिसळलेला काव्यप्रेमी
Sun, 09/13/2020 - 17:18 नवीन
शिवसेनेला सत्ता कधीही पचत नाही. सत्ता आली की ते माजतात. हे वास्तव आहे, इतिहास आहे. त्यात ही ओरबाडून घेतलेली सत्ता मग काय विचारता.. दोष द्यायला आहेच कॉन्ग्रेस, भाजपा. राष्ट्रवादी नाही ते सध्या अन्नदाते आहेत. पाच वर्ष (किंवा यांनी स्वतः राजकिय आत्महत्या करे पर्यंत) हा तमशा बघण्याव्यतिरिक्त जनता काहीही करु शकत नाही
  • Log in or register to post comments

सत्ता

सॅगी
Sun, 09/13/2020 - 17:32 नवीन
त्यात ही ओरबाडून घेतलेली सत्ता
चोरलेली सत्ता असा एक माफक बदल सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

चोरीत लपवाछपवी असते, इथे

मिसळलेला काव्यप्रेमी
Sun, 09/13/2020 - 17:36 नवीन
चोरीत लपवाछपवी असते, इथे यांनी राजरोसपणे ढकलाढकली करुन जाऊन बसलेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

छान

Gk
Sun, 09/13/2020 - 17:39 नवीन
ऑपरेशन लोचटचा दुसरा प्रकार आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा