मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्या कर्अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय.
एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली.
कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना.
मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत.
मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही.
शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का?
शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते.
या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत.
बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय
शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही.
ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत
वाचने
110649
प्रतिक्रिया
302
मिसळपाव
प्रतिक्रिया
शरद पवार साहेब
शरद पवार सर्वात उठून दिसतात.
In reply to शरद पवार साहेब by sunil kachure
पवारांचा बोट धरून राजकारणात
In reply to शरद पवार सर्वात उठून दिसतात. by सुबोध खरे
हो नक्कीच
In reply to पवारांचा बोट धरून राजकारणात by अमरेंद्र बाहुबली
आणि ते उपरोधिक बोलणे
In reply to हो नक्कीच by मुक्त विहारि
आणि ते उपरोधिक बोलणेते ऊपरोधीक वगैरे असं काहीही बोलले नव्हते.मुवि
In reply to आणि ते उपरोधिक बोलणे by अमरेंद्र बाहुबली
खिक्क. सर मी ज्येष्ठ नाही नी
In reply to मुवि by प्रदीप
यामुळे सहसा पत्रकार आणि इतर
In reply to शरद पवार सर्वात उठून दिसतात. by सुबोध खरे
एक चलचित्र
भारी आहे....
In reply to एक चलचित्र by धर्मराजमुटके
ह्या प्रश्नाचे उत्तर विजुभाऊ
धागा काढून जवळजवळ दोन वर्षे
In reply to ह्या प्रश्नाचे उत्तर विजुभाऊ by Trump
राष्ट्रवादी अधीकच आपमतलबी
In reply to धागा काढून जवळजवळ दोन वर्षे by विजुभाऊ
कंगना राणावतचे शाप भोवले…
कंगना राणावतचे शाप भोवले सेनेला.
आज तूने मेरा घर तोडा है. कल तेरा घमम्ड भी टूटेगा....
सहा वर्षापूर्वीचा लेख आणि प्रतिक्रीया आज खऱ्या होताना दिसताहेत
२०१९ मधील विश्वासघात
In reply to कंगना राणावतचे शाप भोवले… by विजुभाऊ
२०१९ मध्ये विश्वासघात केल्याबद्दल उधोजींचा पक्ष संपूर्ण खतम होणे आणि ठाकरे हे नाव राजकारणातून पूर्ण संपणे हाच काव्यागत न्याय असेल.
सहमत
In reply to २०१९ मधील विश्वासघात by चंद्रसूर्यकुमार
सहमत
असहमत.छगन भुजबळांनी पक्षांतर…
In reply to २०१९ मधील विश्वासघात by चंद्रसूर्यकुमार
असहमत.
छगन भुजबळांनी पक्षांतर केल्यानंतर एकदा कधी तरी म्हटले होते कि शिवसेना अस्तित्वात राहणे हे महाराष्ट्रातील राजकारणासाठी आवश्यक आहे.
जास्तीत जास्त पक्ष नेतृत्वात बदल व्हावा अशी अपेक्षा करु शकतो.
नाही/नेतृत्वबदल
In reply to असहमत.छगन भुजबळांनी पक्षांतर… by कानडाऊ योगेशु
छगन भुजबळांनी जे काही म्हटले असेल/होते ते त्यांचे मत झाले. ते काही ब्रह्मवाक्य नाही आणि त्याच्याशी सगळ्यांनी सहमत व्हायलाच पाहिजे असे अजिबात नाही.
नेतृत्वबदलाचेच म्हणाल तर २०२२ पूर्वीच्या शिवसेनेतील बरेचसे लोक शिंदेंबरोबर गेले तर इफेक्टिव्हली ठाकरे बाजूला पडून नेतृत्वबदलच झाला की.
मुंबई महापालिकेचे बजेट ८०…
मुंबई महापालिकेचे बजेट ८० हजार कोटी आहे. त्याच्या १० टक्के जरी मिळाले तरी ते ८ हजार कोटी होतात. आता तुमच्या लक्षात येते का?
a ) मुंबई महापालिकेची निवडणूक एवढी अटीतटीने का लढवली गेली? अमित शाह यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एवढा जोर का लावला? पोपटाचा प्राण कशात असतो ते त्यांना माहिती आहे.
b ) शिवसेनेचे खासदार आमदार नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे साहेबाना जाऊन का मिळाले? आणि राष्ट्रवादीचे खासदार आमदार नगरसेवक शरद पवार याना सोडून अजित पवार साहेबाना जाऊन का मिळाले?
पाच वर्षे नुसती जनतेची सेवा करायची? ज्या पक्षांना कोणतीही विचारसरणी नाही त्यांचे आमदार खासदार कसे टिकणार?
शिवसेनेने जेंव्हा हिंदुत्वाला तिलांजली दिली तेंव्हाच त्यांचा शेवट जवळ आल्याचे स्पष्ट झाले. सोनिया गांधींशी साटे लोटे करण्याऐवजी मी शिवसेना बंद करून टाकीन हे बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य प्रसिद्ध आहे. अजान स्पर्धा भरवणे, जनाब बाळासाहेब अशा गोष्टी मुळे तळागाळातील शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणावर वैचारिक गोंधळ आणि घुसमट झाली. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांचा पुत्र दाढी कुरवाळू लागला हे सामान्य शिवसैनिकाला पटले नव्हते. या घुसमटीला श्री एकनाथ शिंदे यांनी वाट काढून दिली. यामुळे त्यांच्या मागे अगोदर २/३ आणि मग शिल्लक राहिलेल्यातील २/३ आमदार खासदार शिवसेना सोडून गेले.
मिपा वरील एका ज्येष्ठ पत्रकारांनी १५ वर्षांपूर्वी केलेलं विश्लेषण आजही आठवते.
राष्ट्रवादी काँग्रेस ला कोणतीही (काँग्रेस पासून) वेगळी विचारधारा नाही. केवळ निवडून येऊ शकतील अशा प्रभावशाली माणसांची ती स्वार्थासाठी बांधलेली मोट आहे. त्यामुळे जिथे मलिदा खाता येईल तिथे ते जातील. गेली काही वर्षे हि गोष्ट सत्य होताना परत परत दिसते आहे.
शिंदे सेने मुळे भाजपाचा…
शिंदे सेने मुळे भाजपाचा लॉन्ग टर्ममध्ये फायदा होईल. भाजपा विरोधी लोकांना शिंदे मुळे एक पर्याय तयार झाला. NCP सध्या भाजप म्हणजेच फडणवीस चालवत आहेत असेच चित्र आहे.
शिंदे सेना आणि NCP ला काही भविष्य वाटत नाही.
ठाकरेंची थोडी फार उरली सुरली ताकत आहे तो पर्यंत भाजप शिंदेचे लाड करेल. अर्थात शिंदेना हे कळत नसेल असं नाही पण त्यांचा पण राजकीय स्वार्थ पूर्ण होतच आहे.
शिंदेना हे कळत नसेल असं नाही…
शिंदेना हे कळत नसेल असं नाही
शिंदेंना हे माहिती असणारच.
मुळात अडीच वर्षे मुख्यमंत्री पद उपभोगायला मिळाले, जे शिवसेनेत असताना कधीच मिळाले नसते.
आता श्री श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकेल.
श्री नारायण राणे यांच्या मुलां सारखी त्यांच्या मुलाची राजकीय कारकीर्द मार्गाला लागली तर त्याहुन अधिक काय हवे असेल?
करियर मार्गी लागणे ....
In reply to शिंदेना हे कळत नसेल असं नाही… by सुबोध खरे
फक्त मराठी मानसाची ( माणसाची नव्हे मानसाची ) करियर मार्गी लागणे तेव्हढे बाकी आहे.
असो.
-गा.पै.