Skip to main content

शिवसेनेचे हे काय चाललय

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 09/09/2020 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत

वाचने 110649
प्रतिक्रिया 302

प्रतिक्रिया

हे जुन्या पिढी मधील नेते आहेत.तेव्हाच्या नेत्यांचे एक वैशिष्ट होते त्यांचा लोकांशी संपर्क असायचा. आपल्या मतदार संघात किंवा राज्यात कोणत्या गोष्टी च गरज आहे. विविध क्षेत्रात प्रगती करायची असेल तर प्रतेक क्षेत्राची गरज काय आहे . ह्याची उत्तम जाणीव त्या नेत्यांना होती. महाराष्ट्रात असंख्य दिग्गज नेते त्या काळात आणि अगोदर होऊन गेले. त्या मधील एक म्हणजे शरद पवार. आज कोणत्या ही नेत्याचे उदाहरण घ्या राजकारण हा धंदा केला आहे. त्यांना कोणत्याच प्रश्नांची जाण नाही. विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास नाही. विरोधी विचार पण ऐकून घेण्याची कुवत नाही. सर्व उथळ,लोक नेते म्हणून मिरवत आहेत. त्या मुळे शरद पवार सर्वात उठून दिसतात. ते राजकारण कसे करतात,डावपेच कसे खेळतात तो विषय पूर्ण वेगळा आहे. अभ्यासू,प्रामाणिक,कष्टाळू, राजकीय नेत्यांचा काळ निघून गेला आहे.

In reply to by sunil kachure

शरद पवार सर्वात उठून दिसतात. उठूनच काय बसूनही दिसत नाहीत. ज्यांना स्वबळावर एकदाही मुख्यमंत्री होता आले नाही. एकदाही कारकिर्दीची ५ वर्षे पूर्ण करता आली नाहीत. एकदाही पूर्ण १० खासदार निवडून आणता आले नाहीत एकदाही २८८ पैकी ७५ आमदार निवडून आणता आले नाहीत केवळ सर्वाना ( पत्रकार पोलीस बाबू इ लोकांना) सरकारी कोट्यात घर, भूखंड, बारचा परवाना सारख्या खिरापती वाटून त्यानी मिंधे करून ठेवलेले आहे. यामुळे सहसा पत्रकार आणि इतर त्यांच्याविरुद्ध बोलताना दिसत नाहीत. (खाल्ल्या मिठाला जागणे) ( हे श्री स्वामिनाथन अंकलेसारिया अय्यर या ख्यातनाम पत्रकाराने हिंदू वृत्तपत्रात लिहून ठेवले आहे. यांचे कनिष्ठ बंधू एके काळी भाजप चे स्टार प्रचारक होते श्री मणिशंकर अय्यर) ) त्यामुळे साहेब काहीही करू शकतात सारखे पालुपद त्यांचे चेले, चमचे, गुलाम, सदा सर्वकाळ आळवत असतात. सत्याचा आणि त्याचा दूरत्वाने सुद्धा संबंध नाही

In reply to by सुबोध खरे

पवारांचा बोट धरून राजकारणात आलो असं मोदी बोलले होते ना??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आणि ते उपरोधिक बोलणे, माननीय शरद पवार यांना देखील समजले असेलच. कारण, खुद्द शरद पवार देखील कधीकधी उपरोधिक बोलतात.. आपण जसे एखाद्याला, "विद्वान", म्हणतो, तसेच आहे... मोदींची भाषा समजून घ्या... ते योगी, तेजस्वी सुर्या, हुकुमदेव नारायण यादव, यांच्या सारखे कधीकधी स्पष्ट बोलतात तर कधी उपरोधिक .... राजकारणी लोकांच्या भाषा समजून घेतल्या तरच, तारतम्यता अंगी बाणवता येते...

In reply to by मुक्त विहारि

आणि ते उपरोधिक बोलणे ते ऊपरोधीक वगैरे असं काहीही बोलले नव्हते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अलिकडेच तुम्हाला मिपावरील ज्येष्ठ व अर्थातच, एमिमंट वगैरे विचारवंत अ.बा. ह्यांनी 'विचारांतील गोंधळ कमी करा' अशा अर्थाचा सल्ला दिलाच होता. आता येथे पहा, त्यांना मोदी उपरोधिक वगैरे काही बोलले नव्हते, हे ठामपणे कसे सांगता आले? त्यामगे त्यांचा प्रखर अभ्यास, मनन व चिंतन आहे. ते येतेहे जे काही पिंकतात, त्यामागे हे सर्व काही आहे. तेव्हा हे लक्षांत घ्या त्यांच्याशी प्रतिवाद करतांना.

In reply to by प्रदीप

खिक्क. सर मी ज्येष्ठ नाही नी एमीमंट तर आजिबात नाही. :) पण मुवि काकांचे एका बाजूला झूकलेले विचार दाखवतो. ईतर पक्षाना घराणेशाही वरून बोलायचे पण जय शहा, राणे, विखे, फडणवीस ह्या कुटूंबातील घराणेशाहीबद्दल मुवीकीका मूग गिळून गप्प बसतात. सेनेने भाजपला सोडले म्हणजे हिंदूत्व सोडले प्रकारचे महान विचार :) भाजप म्हणजे हिंदूत्व ख्या ख्या. पुणे महापालिकेतील काहीतरी भ्रष्टाचारामुळे राज्य सरकारला जबाबदार धरणे. आता मोदी पवाराना गुरू मानताहेत पण मुवीकाकाना मोदींचे गुरू पवार म्हणून स्विकारले जात नाहीत. : ) ऊद्या ह्याच पवारांचेया पाठींब्याने भाजप सत्तेत परतली तर पवार मोदींचेच नाही तर बायडन, पुतीन ह्यांचेही गुर आहेत असं मुवीकाका ईथेच जाहीर करतील. :)

In reply to by सुबोध खरे

यामुळे सहसा पत्रकार आणि इतर त्यांच्याविरुद्ध बोलताना दिसत नाहीत. (खाल्ल्या मिठाला जागणे)
तो निळू दामले बऱ्याच दिवसांनी टीव्ही वर मोदींविरुद्ध गरळ ओकताना दिसला. लवासा नावाचं पुस्तक त्यानेच लिहिलं होतं ना?

In reply to by Trump

धागा काढून जवळजवळ दोन वर्षे झाली. पण काही प्रतिसाद वाचताना हा धागा कालच काढल्यासारखा वाटतोय. सेनेच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. राऊत अधीकच बरळत चाललेत. राष्ट्रवादी अधीकच आपमतलबी झालेली आहे

In reply to by विजुभाऊ

राष्ट्रवादी अधीकच आपमतलबी झालेली आहे हा आपला स्पष्ट गैरसमज आहे १०० % गोष्टीत अधिक काही कसं मिळवता येईल.

कंगना राणावतचे शाप भोवले सेनेला.

आज तूने मेरा घर तोडा है. कल तेरा घमम्ड भी टूटेगा....

सहा वर्षापूर्वीचा लेख आणि प्रतिक्रीया आज खऱ्या होताना दिसताहेत


In reply to by विजुभाऊ

२०१९ मध्ये विश्वासघात केल्याबद्दल उधोजींचा पक्ष संपूर्ण खतम होणे आणि ठाकरे हे नाव राजकारणातून पूर्ण संपणे  हाच काव्यागत न्याय असेल.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

असहमत.

छगन भुजबळांनी पक्षांतर केल्यानंतर एकदा कधी तरी म्हटले होते कि शिवसेना अस्तित्वात राहणे हे महाराष्ट्रातील राजकारणासाठी आवश्यक आहे.

जास्तीत जास्त पक्ष नेतृत्वात बदल व्हावा अशी अपेक्षा करु शकतो. 

 


In reply to by कानडाऊ योगेशु

छगन भुजबळांनी जे काही म्हटले असेल/होते ते त्यांचे मत झाले. ते काही ब्रह्मवाक्य नाही आणि त्याच्याशी सगळ्यांनी सहमत व्हायलाच पाहिजे असे अजिबात नाही.

 

नेतृत्वबदलाचेच म्हणाल तर २०२२ पूर्वीच्या शिवसेनेतील बरेचसे लोक शिंदेंबरोबर गेले तर इफेक्टिव्हली ठाकरे बाजूला पडून नेतृत्वबदलच झाला की. 


मुंबई महापालिकेचे बजेट ८० हजार कोटी आहे. त्याच्या १० टक्के जरी मिळाले तरी ते ८ हजार कोटी होतात. आता तुमच्या लक्षात येते का?

a ) मुंबई महापालिकेची निवडणूक एवढी अटीतटीने का लढवली गेली? अमित शाह यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एवढा जोर का लावला? पोपटाचा प्राण कशात असतो ते त्यांना माहिती आहे.

b ) शिवसेनेचे खासदार आमदार नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे साहेबाना जाऊन का मिळाले? आणि राष्ट्रवादीचे खासदार आमदार नगरसेवक शरद पवार याना सोडून अजित पवार साहेबाना जाऊन का मिळाले?

पाच वर्षे नुसती जनतेची सेवा करायची? ज्या पक्षांना कोणतीही विचारसरणी नाही त्यांचे आमदार खासदार कसे टिकणार?

शिवसेनेने जेंव्हा हिंदुत्वाला तिलांजली दिली तेंव्हाच त्यांचा शेवट जवळ आल्याचे स्पष्ट झाले. सोनिया गांधींशी साटे लोटे करण्याऐवजी मी शिवसेना बंद करून टाकीन हे बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य प्रसिद्ध आहे.  अजान स्पर्धा भरवणे, जनाब बाळासाहेब अशा गोष्टी मुळे तळागाळातील शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणावर वैचारिक गोंधळ आणि घुसमट झाली. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांचा पुत्र दाढी कुरवाळू लागला हे सामान्य शिवसैनिकाला पटले नव्हते. या घुसमटीला श्री एकनाथ शिंदे यांनी वाट काढून दिली. यामुळे त्यांच्या मागे अगोदर २/३ आणि मग शिल्लक राहिलेल्यातील २/३ आमदार खासदार शिवसेना सोडून गेले.            

मिपा वरील एका ज्येष्ठ पत्रकारांनी १५ वर्षांपूर्वी केलेलं विश्लेषण आजही आठवते.

राष्ट्रवादी काँग्रेस ला कोणतीही (काँग्रेस पासून) वेगळी विचारधारा नाही. केवळ निवडून येऊ शकतील अशा प्रभावशाली माणसांची ती स्वार्थासाठी बांधलेली मोट आहे. त्यामुळे जिथे मलिदा खाता येईल तिथे ते जातील. गेली काही वर्षे हि गोष्ट सत्य होताना परत परत दिसते आहे.       

 

 


शिंदे सेने मुळे भाजपाचा लॉन्ग टर्ममध्ये फायदा होईल. भाजपा विरोधी लोकांना शिंदे मुळे एक पर्याय तयार झाला. NCP सध्या भाजप म्हणजेच फडणवीस चालवत आहेत असेच चित्र आहे. 

शिंदे सेना आणि NCP ला काही भविष्य वाटत नाही.

ठाकरेंची थोडी फार उरली सुरली ताकत आहे तो पर्यंत भाजप शिंदेचे लाड करेल. अर्थात शिंदेना हे कळत नसेल असं नाही पण त्यांचा पण राजकीय स्वार्थ पूर्ण होतच आहे.


शिंदेना हे कळत नसेल असं नाही

 

शिंदेंना हे माहिती असणारच.

मुळात अडीच वर्षे मुख्यमंत्री पद उपभोगायला मिळाले, जे शिवसेनेत असताना कधीच मिळाले नसते. 

 

आता श्री श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकेल.

श्री नारायण राणे यांच्या मुलां सारखी त्यांच्या मुलाची राजकीय कारकीर्द मार्गाला लागली तर त्याहुन अधिक काय हवे असेल?       
 


In reply to by सुबोध खरे

फक्त मराठी मानसाची ( माणसाची नव्हे मानसाची ) करियर मार्गी लागणे तेव्हढे बाकी आहे.

असो.

-गा.पै.