Skip to main content

शिवसेनेचे हे काय चाललय

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 09/09/2020 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत

वाचने 109686
प्रतिक्रिया 293

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

युती मध्ये जपर्यंत आमूलाग बदल होत नाही तोपर्यंत धाकटा भागीदार मोठा भहगीदार हे असणारच १९२३ पासून असलेली एक युती मला माहित आहे ती कधी देशाच्या सत्तेत आली कधी नाही पण फुटली नाही आणि असा तमाशा करून तर नाहीच पण ती भारताबाहेरील आहे त्यामुळे उगाच " भारताशी काय संबंध" हे ऐकायला नको म्हणून सोडून देऊ... अर्थात जगातील संसदीय लोकशाही या व्याप्तीत बोलायचे तर ते उदाहरण बघू शकतो जाऊदे याचा परिणाम दोन्ही पक्षांवर होणार (राऊतांसारख्यांची दिव्य विधाने ऐकून सेनेचा सच्चा विचारवंत पाठीराखा सुद्धा तोंड लपवून बसलेला असेल ) आणि फायदा पवार कुटुंबाचा होणार हेच दिसतंय.. नशीब राज्याचं

ज्या पक्षाकडे बहुमत त्याची सत्ता हाच नियम आहे. ज्या उमदेवराला निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार पेक्षा जास्त मतं मिळतील तो आमदार. मग ती मत कशी मिळवली हे बघितल जात नाही ओरबाडून घेतली की दम देवून की खोटे बोलून. आपल्या आमदार होण्याच्या पद्धतीत च दोष आहे . त्या मुळे ओरबाडून सत्ता मिळवली असे नाही म्हणता येणार.

In reply to by Rajesh188

खरे आहे, कायदा हे बघत नाही, पण मतदार बघतो, त्यामुळे दूरगामी राजकारण करणारे तात्कालिक फायद्यासाठी इतके रसातळाला जात नाहीत.. आज सत्ता आहे, 5 वर्षांनी काय? राष्ट्रवादीकडे त्यांचे बालेकिल्ले आहेत, तुमच्याकडे आहेत का? आता बदलत्या परिस्थितीत एकटे लढून मनसेपेक्षा अधिक जागा तरी येणार का तुमच्या?

In reply to by आनन्दा

He सत्य तिन्ही पक्षाला माहीत आहे. तिन्ही पक्षा ना सामान मुद्ध्य वर एकमत घडवून सामान कार्यक्रम ठरवून निवडणुकी ला सामोरे जावे लागेल. सेने ला हिंदुत्व सोडून देण्या शिवाय पर्याय नसेल. आणि हिंदुत्व च सोडले तर सेनेत वेगळे असे काही राहणार नाही.भूमिपुत्र च्या भूमिकेला राष्ट्रवादी पाठिंबा देईल पण काँग्रेस देणार नाही. Bjp barobar यूती होती तेव्हा सेने नी भुमिपत्र फर्स्ट ही भूमिका सोडून दिली होती..

https://youtu.be/dTXVy-84XMA यु ट्यूबवर अनेक ज्योतिषी महाराअष्टर सरकार पडावे अशी इचछा व्यक्त करून सरकार पडणार अशी भविष्यवणीही करत आहेत गम्मत म्हणजे हे बहुतांश भविष्य पंडित महाराष्ट्राबाहेर रहात असावेत असे वाटते

In reply to by Gk

सरकार पडण्याची शक्यता कमी पण शिवसेना नेते असाच मूर्खपणा करत राहिले तर सरकार पडायला वेळ लागणार नाही. ह्याचे सर्वात टेन्शन आहे ते कॉन्ग्रेसला. ज्या पक्षाला 'कम्युनल' म्हणत आलो त्याच पक्षाशी युती करावी लागली. सोनिया गांधींचा सेनेशी युती करायला अगदी टोकाचा विरोध होता पण नाईलाजाने त्यानी मान्यता दिली. गेल्या महिन्याभरात सोनियानी थोरात्/पृथ्विराज वगैरे नेत्यांची शाळा घेतली असणार हे नक्की.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

जास्त च संकट आली तर मुख्यमंत्री राजीनामा देतील मुख्यमंत्री चा राजीनामा म्हणजे सरकार चा राजीनामा . तेव्हा केअर taker म्हणून उद्धव जी मुख्यमंत्री राहतील जो पर्यंत नवीन निवडणुका होत नाहीत. किती आमदार आपली आमदारकी पणाला लावायला तयार आहेत? आता निवडणुका झाल्या तर bjp निवडून येण्याची शक्यता किती आहे. तशी शक्यता नसेल तर bjp च सरकार पडून देणार नाही. किंवा मुख्यमंत्री राजीनामा देतील इथ पर्यंत तानानार नाहीत.

अगोदर च मुख्यमंत्री राजीनामा देवून पेच निर्माण करतील. जाणता राजा असलेले पवार साहेब सर्व खेळी खेळण्यात आणि योग्य वेळ ओळखण्यात तरबेज आहेत. त्या मुळे सरकार ची चिंता करू नका. राहील का जाईल ते.

In reply to by Rajesh188

सगळं पवारसाहेबच करणार असतील तर शिवसेनेचे स्वतःचे अस्तित्व (हिंदीमधेय वजूद) ते काय उरले.? असेच चालु राहिले तर शिवसेना राष्ट्रवादीची बी टीम ठरेल. आताही तेच होते आहे. स्वतःचा फायदा जिथे आहे तिथेच सल्ले द्यायचे व जिथे आवश्यक आहे पण फायदा नाही तिथे मीठाची गुळणी धरायची असेच धोरण पवारसाहेबांचे राहिलेले आहे. राऊतांनी घेतलेल्या हास्यास्पद मुलाखती पाहिल्यावर तर हे प्रकर्षाने जाणवतेय.

गणेशा,
मग ज्या राष्ट्रवादीला, काँग्रेस ला भ्रष्ट म्हणताना हयात घालवली, त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने जूने bjp समर्थक दुखावलेत असे का नाही?
अगदी नेमका प्रश्न आहे. मी कट्टर शिवसैनिक असूनही माझ्या मते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रास लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत. पण महाराष्ट्र भाजप विषयी लोकांना विश्वास वाटंत नाही. खडसे भ्रष्ट व तोंडाळ आहेत म्हणून त्यांना घरी बसवलं. ठीके. मग अजित पवार काय धुतल्या तांदळासारखे आहेत काय? अजित पवारांचं जाउद्या. चंद्रशेखर बावनकुळे तर भाजपचे एकनिष्ठ, स्वच्छ व कार्यक्षम मंत्री होते ना? त्यांना का घरी बसवलं? गडकरींशी जवळीक म्हणून? चंद्रकांत पाटील पुण्यात कशाला उभे राहिले? कोल्हापुरात भाजपविरोधी लाटबिट अजिबात नव्हती. या अशा कारणांपायी महाराष्ट्र भाजप विषयी मला भरवंसा वाटंत नाही. आ.न., -गा.पै. तळटीप : शिसेनेनेही भाजपप्रमाणे स्वकीयांचं खच्चीकरण केलंय. प्रताप सरनाईक व विजय शिवतरे ही नावं चटकन आठवली. या दोघांना (व अशांसारख्या इतरांना) उद्धव ठाकऱ्यांनी जाहीर दिलासा द्यावा अशी एक आरामखुर्चीतील कट्टर शिवसैनिक या नात्याने मी मागणी करतो.

In reply to by गामा पैलवान

माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे बावनकुळेंनी शहांच्या मर्जीतल्या व्यक्तीचं घोडं अडवलं. त्यामुळे मग वेळ आली तेव्हा स्कोर सेटल करण्यात आलेत.

प्रशासकीय सेवेतील मित्र न बरोबर च्या चर्चेत काही मुध्ये माहीत पडले. त्यांच्या मता नुसार. Bjp सरकार निर्णय घेताना विचारपूर्वक पूर्वक घेत नव्हती. एकदा निर्णय घेतला तो निर्णय आमलात आणण्यासाठी नियम ठरले की सरकार अमलबजावीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देत असे. नियमाची पूर्तता करून अमलबजाणी ची वेळ वेळ आली नी नियमात बदल करून प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी सोडले जायचे परत नवीन नियम परत फिरून सर्व नवीन नियमात बसवणे चालू असले प्रकार bjp च काळात खूप झाले. सत्ता कशी रबाबवावी ह्या विषयी mature पना नसणे किंवा अनुभव नसणे त्या मुळे असा प्रकार घडत असाव. काँग्रेस ,राष्ट्रवादी अनेक वर्ष satte वर असल्यामुळे त्यांच्या कडून हा प्रकार घडत नाही. सेना तर फर्स्ट टाइम lead rol मध्ये आहे सरकार मध्ये त्या मुळे थोडे बावरत आहेत . चुका करत आहेत.

In reply to by Rajesh188

असे काही नसते रे राजेशा. बाकीच्या राज्यांत सरकारे चालतातच की. आणि १९४७ साली नेहरूना काय अनुभव होता ? आंबेडकराना काय अनुभव होता ? लाल बहादूर शास्त्रिना काय अनुभव होता ? लोकप्रतिनिधी आहात, निवडून आला आहात. हाताशी सुविधा आहेत. बदलणारे वातावरण समजत नसेल,लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे समजत नसेल तर सरळ राजीनामा द्यावा. कोणत्याही पक्षाचा असो मग तो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मी प्रशासन ला सरकार कसे अडचणीत आणत होते हे सांगितले आहे. त्या मुळे सरकारी निर्णयाची अंमबजावणी ला वेळ लागला . देवेंद्र जी च्या काळात. आत्ताचे ताजे उदाहरण देतो. कर्ज चे हफ्ते corona काळात स्थगित ठेवले जातील असे आदरणीय पंतप्रधान जाहीर पण म्हणजे तसे घडले का ? कारण तसे सरकारी आदेश निघाले नाहीत. जे भाड्या नी राहतात त्यांचे भाडे मालकांना मागता येणार नाही असे आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले त्या नुसार त्यांनी योजना बनवून मालकांना आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले का? कंपन्यांनी कामगार ना corona काळात पगार द्यावा आणि कोणाला ही नोकरी वर काढू नये असे आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले. सर्रास लोकांना कामावरून काढले गेले.लोकांना पगार दिले गेले नाहीत. आपले आदरणीय पंतप्रधान आहेत राजकीय नेत्यांसरखे त्यांना बोलता येणार नाही त्यांचे वाक्य ,वाचन हा सरकारी निर्णय समजलं जातो मग ते सर्रास खोटे का बोलले ...ते जे बोलले त्याची अंमलबावणी सरकार म्हणून नियमात बसते का ,सरकार ला तो अधिकार आहे का . हे त्यांना एकतर माहीत नाही किंवा ते खोटे बोलण्यात mahir आहेत.

In reply to by Rajesh188

खरे तर या धाग्यावर प्रतिसाद लिहायचा नव्हता पण वरील प्रतिसादातली काही विधाने खटकली म्हणून लिहिणे भाग पडले...
कर्ज चे हफ्ते corona काळात स्थगित ठेवले जातील असे आदरणीय पंतप्रधान जाहीर पण म्हणजे तसे घडले का ? कारण तसे सरकारी आदेश निघाले नाहीत.
अशा सुचना आल्या आहेत, व त्याची अंमलबजावणी सुध्दा झाली आहे ( मी स्वतः आमच्या कंपनीतल्या काही कामगारांना हप्ते स्थगित करुन घेण्या साठी मदत केली आहे.
कंपन्यांनी कामगार ना corona काळात पगार द्यावा आणि कोणाला ही नोकरी वर काढू नये असे आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले. सर्रास लोकांना कामावरून काढले गेले.लोकांना पगार दिले गेले नाहीत
. सरकार ने अशा प्रकारच्या सुचना सुध्दा जारी केल्या होत्या (माझ्या माहितीतल्या सर्व कंपन्यां मधे याची अंमलबजावणी झाली आहे) कोरोनाच्या आधी किती कामगार होते व आता किती आहेत अशा प्रकारची माहिती सुध्दा कामगार आयुक्तांनी मागितली होती. घरभाड्या बद्दल माहित नाही, कदाचित असतीलही. साधारण अशा प्रकारचे आदेश कायदा करुन / बदलुन देता येत नसावेत म्हणून ते मार्गदर्शक सुचनांच्या स्वरुपात दिले गेले होते. पैजारबुवा,

In reply to by कपिलमुनी

Bjp चे मुख्यमंत्री योगी ह्यांनी नवीन force तयार केली आहे.. आणि बिना warrant , Bina चोकशी ,कोणत्या ही व्यक्ती ला अटक करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत. तिकडे जरा लक्ष ध्या हिटलर पण वर स्वर्गात लाजला असेल योगी चे निर्णय ऐकून.

In reply to by कपिलमुनी

त्रिपुराचे भाजपा प्रवक्ते नंबेदु भट्टाचार्य यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी या घटनेचा निषेध केला असून पोलीस योग्य तपास करत आहेत, असं सांगितले.
मारहाणीचा निषेधच आहे, पण प्रवक्त्यांनी "स्वाभाविक प्रतिक्रीया" म्हणून हात झटकलेले नाहीत हेही नसे थोडके......

डोलकर शर्मा भाजपात सामील मर्चंट नेव्ही म्हणजे मराठीत डोलकर ना ?

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दिल्लीमधील तीन व्यक्तींकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तसंच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलंच फटकारलं आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळताना तुम्ही राष्ट्रपतींकडे विचारणा करु शकता असं सांगितलं. “देशाचे एक नागरिक म्हणून तुम्हाला राष्ट्रपतींकडे अर्ज करण्याचं स्वातंत्र्य आहे,” असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. यावेळी त्यांनी “तुम्हाला माहित तरी आहे का, महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे?,” अशा शब्दांत याचिकाकर्त्यांना फटकारलं. वकील रिषभ जैन, गौतम शर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता. याचिकाकर्त्यांकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू, कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई आणि माजी नौदल अधिकारी मदनलाल शर्मा यांना झालेली मारहाण या घटनांचा उल्लेख करण्यात आला होता. https://www.loksatta.com/maharashtra-news/supreme-court-dismisses-plea-…

In reply to by Gk

न्यायालयाने योग्य निर्णय दिला. आणि त्याचे स्वागत. पण काही सदस्य (जसे राजेश188) इथे बोंब मारतात कि न्यायालय निष्पक्ष नाहीत, अराजक माजले आहे वगैरे वगैरे ते कुठल्या बिळात लपलेयत?? आपल्याला नावडता निर्णय आला कि लगेच न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवून ढोल बडवायचे?? हा कोणता अजेंडा?

Shivsena शिवसेना सरकार राज्यात चांगले काम करीत आहे,. कोविड सारख्या भयंकर आजारावर नियंत्रण आणण्याचे काम प्रामुख्याने शिवसेनेने केले आहे.
Latest Marathi News Live

In reply to by Ajit Gunjal

कोविड सारख्या भयंकर आजारावर नियंत्रण आणण्याचे काम प्रामुख्याने शिवसेनेने केले आहे. ह ह पु वा विनोद चांगला होता अजून येऊ द्या

धागा काढून दीड वर्ष झाले. दरम्यानच्या कालात पुलाखालून आणि डोक्यावरून बरेच पाणी वाहून गेले. सेनेचे आणि राष्ट्रवादीचे काय झाले आहे ते जाहीर आहे. मात्र त्या दोघांपैकी कोणालाही काहीही फरक पडलेला नाहिय्ये.

“अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते”, गोरखपूरमधील प्रचारसभेत संजय राऊतांनी सांगितलं उत्तर प्रदेशसोबतचं ‘नातं’! https://www.loksatta.com/elections/shivsena-sanjay-raut-in-gorakhpur-up…
शिवसेना कोठे पोचली बघा.

In reply to by Trump

पूर्ण पक्ष जर स्थानि कात यावर निर्माण झाला असेल तर त्याला पुढेच जाऊन राष्ट्रीय पक्ष होणे अवघड असते ! उदा द्रविड मुन्नेत काझघम ला हिमाचल मध्ये कोणी विचारेल का ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणी ओडिशात स्थान देईल का ! आणि सेनेची सध्याची केविलवाणी लाचारी दुसरे काय पूर्वी ऐकलेली म्हण शिवसेनेचाच वाघ ऐनवेळी आपली शेपटी कुठे घालेल सांगता येत नाही !

In reply to by चौकस२१२

ऐनवेळी आपली शेपटी कुठे घालेल मुळात आघाडी केली तेंव्हा पासून शेपटीदोन पायातच आहे. बाकी गुरगुरणे चालू असले तरी त्याला कोणीच भीक घालत नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याची हिम्मत श्री उद्धव ठाकरे दाखवतील काय?

In reply to by चौकस२१२

राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढण्याचे कारण च नाही.राज्य पातळीवर चे प्रश्न राज्याचा विचार करूनच सोडवणे आणि राज्यातील लोकांस त्यांच्या होताच राजकीय पर्याय देणे . हाच मूळ हेतू स्थानिक पक्षाचा असतो. केंद्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी राष्ट्र पातळीवर निवडणुका लढण्याचे काही कारण नाही स्वतःच्या राज्यातील सर्व लोक सभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकल्या तरी . केंद्र सरकार मधील अत्यंत महत्वाची बलाढ्य ताकत म्हणजे हे स्थानिक पक्ष च असतात. सेने नी राज्यात च लक्ष द्यावे. हिंदुत्व चा नाद सोडून द्यावा ते आरक्षण फक्त bjp लाच असू ध्या.

In reply to by sunil kachure

सेनेने हिंदूत्वाचा नाद सोडला तर हिंदूंनी कुणाकडे पहायचे?? हिंदूंच्या हितीचं रक्षण करनारा दुसरा कुठलाही पक्ष भारतात नाही. भाजपचं म्हणाल तर त्यांचं हिंदूत्व फक्त सत्ता मिळवण्यासाठी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सेनेने हिंदूत्वाचा नाद सोडला तर हिंदूंनी कुणाकडे पहायचे?? हिंदूंच्या हितीचं रक्षण करनारा दुसरा कुठलाही पक्ष भारतात नाही.
खो खो खो. दाऊद इब्राहिमच्या सहकार्‍यांना मंत्रीमंडळात ठेवणारा पक्ष म्हणे हिंदुत्ववादी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे कुणी ठरवले आता?? नाही म्हणजे पुरावे वगैरे पाहून ह्या आधी कोर्ट ठरवायचे. आता तुम्ही स्वतः कोर्ट बनलात का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग राफेल प्रकरणी काहीही पुरावा नसताना थयथयाट करणार्‍या रागाचे नाक कोर्टाने कापले तरी त्याला तुमची टिपूसेना डोक्यावर घेतच आहे ना? त्याचे काय? तेव्हा हे तत्वज्ञान कुठे जाते?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाकी अर्णब गोस्वामीला कोर्टाने दोषी ठरविले आहे का? त्याबद्दल काय? म्हणजे कसे असते की यांच्याविरोधात कोणी बोलले की खराखोटा कोणताही मुद्दा हे उकरून काढणार आणि स्वतःच न्यायनिवाडा करणार. पण यांच्या अंगाशी आले की मात्र कोर्ट ठरवू दे हे तत्वज्ञान पाजळणार. असले ढोंग क्षणभरही आता टिकणार नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

प्रकरण केरिटात आहे दोघांचे ही. कोर्ट ठरवेल काय ते. पण तुम्ही तर स्वत जज बनून नियायनिनाडा करायला लागलात.

In reply to by चौकस२१२

मुळातच शिवसेना मराठी माणसांना न्याय ह्या मुद्द्यावर स्थापन झाली होती. त्या पक्षाने राष्टीय स्वप्ने पाहणे म्हणजे किती शहाणपणाचे? असल्या उद्योगामध्ये आहे तो हक्काचा मराठी मतदार सोडुन जायचा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शिवसेने सारख्या पक्षाने काय करावे हे तुम्ही ठरवनार का?
ह्यावर काय उत्तर अपेक्षित आहे?
मुळातच शिवसेना मराठी माणसांना न्याय ह्या मुद्द्यावर स्थापन झाली होती. त्या पक्षाने राष्टीय स्वप्ने पाहणे म्हणजे किती शहाणपणाचे? असल्या उद्योगामध्ये आहे तो हक्काचा मराठी मतदार सोडुन जायचा.
ह्याबद्दल बोला.

In reply to by Trump

शिवसेने सारख्या पक्षाने काय करावे हे तुम्ही ठरवनार का? शिवसेनेने जे करायचे ते करावे निदान दुटप्पी पणा करू नये एवढेच म्हणणे आहे. श्री बाळासाहेबांची असंख्य भाषणे उपलब्ध आहेत त्या सर्वाला हरताळ फासून आजची शिवसेना सत्तेत आली आहे. उदा. शिवसेना कधीही सोनिया गांधींच्या बरोबर जाणार नाही तसे झाले तर मी माझी संघटना बंद करून टाकीन किंवा “हिजड़े झुकते हैं सोनिया के सामने” (Eunuchs now down to Sonia) This is what Balasaheb Thackeray thought about the Congress & Sonia Gandhi! पहा गुगलून जर बाळासाहबांच्या मार्गावर चालायचे नसेल तर निदान त्यांचे नाव घेऊन मते मागू नका किंवा त्यांना वचन दिले म्हणून येन केन प्रकारेण काँग्रेस / रा कॉं च्या कुबड्या लावून मुख्यमंत्री पद घेऊ नका एवढेच म्हणणे आहे

In reply to by सुबोध खरे

ही bjp ला प्रिय होती,bjp सेना युती खूप वर्ष होती.सेना नालायक होती तर bjp नी त्यांच्या शी युती च का केली. ती पण अनेक वर्ष. आता पण सेने नी युती तोडली नाही तर आज पण bjp नी सेनेच्या गळ्यात गळे च घातले असते. युती कोणी तोडली? असा प्रश्न जाहीर रीत्या bjp च्या कोणत्या ही मोठ्या नेत्याला विचार . तो उत्तर देईल सेने नी. पण कोणताच bjp नेता जाहीर पने असे आक पण बोलू शकतं नाही की. सेना नालायक पक्ष होता म्हणून आम्हीच युती तोडली. बाकी शिवसेना नी मुंबई मधील मराठी लोकांसाठी खूप काही केले आहे. मराठी कलाकार,मराठी दुकान दार,रिक्षावाले,टॅक्सी वाले. गरीब कष्टाळू मराठी लोकांना सेने नी आधार दिला आहे. ते प्रामाणिक पना असेल तर कोणी ही मान्य करेल. ९३ च्या दंगलीत शिवसेना होती म्हणून हिंदू वाचले हे पण सत्य च आहे. Bjp चे सर्व कार्यकर्ते गायब होते जेव्हा हिंदू संकटात होते तेव्हा. त्या मुळे bjp नी तरी सेने वर टीका करू नये. ठाकरे नी फक्त डोळा मारला तरी फडणवीस सकाळी सकाळी सरकार स्थापन करायला येतील. अजून त्यांना आस आहे.

In reply to by sunil kachure

हाच प्रश्न उलटाही विचारता येऊ शकेल. इतकी वर्षे भाजपशी युती होती मग अचानक भाजप वाईट कसा दिसायला लागला? कसं असतं काही लोकांची एक वाईट सवय असते- आपलं ठेवायचं झाकून आणि इतरांचं बघायचं वाकून. आधी या प्रश्नाचे काय ते बघा आणि मग इतरांना प्रश्न विचारायला जा. त्यावर तुमचे उत्तर असेल की वाजपेयी-अडवाणींचा भाजप वेगळा होता आणि मोदी-शहांचा भाजप वेगळा आहे तर त्याचप्रमाणे आम्ही पण म्हणतो की बाळासाहेब असतानाची शिवसेना वेगळी होती आणि आताची शिवसेना वेगळी आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अडवाणी ,वाजपेयी जी चा bjp आणि मोदी जी ,आणि अमित शह जी. ज्यांचा bjp एकच आहे. तेव्हा प्रमोद महाजन आणि मुंडे जी होते ते दोन्ही पक्षात समन्वय ठेवत होते. आज फडणवीस आणि चंद्रकांत जी आहेत त्यांना तो समतोल राखता आला नाही. युती तुटण्याच्या पाठी हेच कारण असावे. फडणवीस मुख्य मंत्री असताना सेने च्या आमदार च्या भागातील काम होवू न देणे. लोकप्रिय योजना राबवताना युती चा धर्म न पाळणे. असले राजकारण करत होते . आणि असे राजकारण राष्ट्रवादी करते. सेने चा समज होणे साहजिक आहे की फडणवीस ऐन वेळी राष्ट्रवादी शी युती करवून . सेने ला तोंडावर पाडतील. त्याचा परिणाम म्हणून आज जी स्थिती आहे ती आहे

In reply to by सुबोध खरे

शिवसेनेने जे करायचे ते शिवसेनेने दुटप्पीपणा केलेला नाही, कोंग्रेस बरोबर जानार नाही ह्याचा अर्थ भाजप बरोबरच राहू असाही नाही, २०१४ ते २०१९ सेनेला सत्तेत डावलणे, केंद्रात दुय्यम दर्जाचे मंत्रीपद देणे वगैरे प्रकार भाजपने केले, २०१९ ला युती असुनही सेने विरोधात भाजपने ठिकठिकाणी बंडखोर ऊभे केले होते. ह्याचा वचपा सेनेने वेळ आल्यावर बरोबर घेतला. भाजपची साथ सोडणे हा ठाकरेंच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम निर्णय होता. सेनेने भाजपला संधीदिली होती पण भाजपने पहाटेच्या शपथेने माती खाल्ली, नी सेनेला नाईलाजाने काॅंग्रेस बरोबर जावे लागले. ईतकीच जर भाजपला हिंदूत्व नी सेनेची काळजी होती तर द्यायचं होतं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद. आताही बाहेरून पाठींबा देऊ शकतात सेनेला. पण नाही भाजपला हवी आहे फक्त नी फक्त सत्ता. त्यासाठी कुठलंही कपट करायला भाजपेई तयार असतात. मग सत्तेसाठी पहाटे अजित दादांबरोबर शपथ घ्यायची असो की मातोश्री पुढे नतमस्तक व्हायचे असो. थोडक्यात “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा“ “कपटी भाजप पेक्षा दिलदार काॅंग्रेस पक्ष कधीही चांगला.”

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोंग्रेस बरोबर जानार नाही ह्याचा अर्थ भाजप बरोबरच राहू असाही नाही सेनेला नाईलाजाने काॅंग्रेस बरोबर जावे लागले

श्री बाळासाहेबांची असंख्य भाषणे उपलब्ध आहेत त्या सर्वाला हरताळ फासून आजची शिवसेना सत्तेत आली आहे. उदा. शिवसेना कधीही सोनिया गांधींच्या बरोबर जाणार नाही तसे झाले तर मी माझी संघटना बंद करून टाकीन किंवा “हिजड़े झुकते हैं सोनिया के सामने”

शिवसेनेने काँग्रेसच कशाला हवं तर दाऊद इब्राहिम /ओवैसींशी सुद्धा युती करावी. पण निदान बाळासाहेबांच्या आत्म्याला त्रास होउ नये म्हणून त्यांच्या नावाची ग्वाही देणे, त्यांना वचन दिले होते म्हणून मुख्यमंत्री झालो सांगणे आणि त्यांच्या नावाने मते मागणे असले दुटप्पीपणा करणे बंद करावे इतकेच म्हणणे आहे. अर्थात तुमचे एकंदर प्रतिसाद पाहून तुम्ही या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार हे माहिती होतेच पण तुमचाही दांभिकपणा उघड करावा म्हणून हा प्रतिसाद होता

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मराठी मतदार सेनेच्या पाठी नेहमी राहील फक्त मराठी माणूस सेनेच्या पाठी जोडे घेऊन (मारायला) राहील असे काही करू नका म्हणजे झाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सहमत. मराठी मतदार नेहमीच आपल्या पाठीशी असेल ही खात्री असल्यानेच का महापालिका निवडणुक वेळेत घेतली जात नाहीये? मुंबई महापालिकेची मुदत निदान फेब्रुवारी २०२२ मध्ये तरी संपत आहे. इतर काही महापालिकांच्या (नवी मुंबई वगैरे) सप्टेंबर २०२० मध्येच संपली तरी अजून निवडणुक घेण्यासाठी कोणतीही हालचाल दिसत नाही. विधानपरिषदेची निवडणुक अप्रत्यक्ष होणार होती म्हणजे स्थानिक जिल्हा परिषद, महापालिका वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य त्यात मत देणार होते तरीही ती निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. म्हणजे प्रत्यक्ष मतदार तर सोडाच आपल्याच महाभकास आघाडीचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यही आपल्यामागे नसतील ही खात्री असल्याने निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते का? त्यात महापालिका निवडणुक वगैरे स्थानिक मुद्द्यांवर लढवली जाते. तरीही या सरकारची कामगिरीच इतकी दिव्य आहे की महापालिका निवडणुकांमध्येही त्याचा त्रास आपल्याला होईल याची खात्री आहे म्हणून निवडणुका टाळल्या जात आहेत का? बघू. घोडामैदान फार लांब नाही. कधीतरी निवडणुक घ्यावीच लागेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पर प्रांतीय लोकांची संख्या खूप वाढत आहे रोजगार मिळण्याचे एक मेव ठिकाण म्हणजे महाराष्ट्र मधील शहर हे सूत्र च देश पातळीवर आहे. महाराष्ट्र नी आयुक्त ना जास्त अधिकार देवून नगरसेवक चे अधिकार कमी करण्यासाठी कायदेशीर तरतुदी चा वापर करावा मुंबई महानगर पालिका निवडणूक म्हणजे राज्य सरकार च्या कामाची पोच पावती नसते.

In reply to by sunil kachure

मुंबई महानगर पालिका निवडणूक म्हणजे राज्य सरकार च्या कामाची पोच पावती नसते.
नसतेच की. मी कधी म्हटले आहे? पण मग तरीही मुंबई महापालिका निवडणुक घेण्याच्या दृष्टीने काहीच पावले का नाहीत? नवी मुंबई महापालिकेची मुदत संपून दीड वर्ष झाले तरी तिथे निवडणुक घेण्यासाठी काहीही का केले जात नाहीये? राज्य सरकार नक्की कशाला घाबरले आहे?
पर प्रांतीय लोकांची संख्या खूप वाढत आहे महाराष्ट्र नी आयुक्त ना जास्त अधिकार देवून नगरसेवक चे अधिकार कमी करण्यासाठी कायदेशीर तरतुदी चा वापर करावा
बोंबला. कालपरवाच कोणीतरी उत्तर प्रदेशात जाऊन मुंबईतील अर्धे लोक हिंदी बोलतात असे म्हटले होते ना? मुंबई तुमचे घर आहे असे पण कोणीतरी बोलले होते ना? मग परप्रांतीय म्हणजे नक्की काय? कुठून आले ते?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कुठं त्यांच्या नादाला लागताय डाव्या मेंदूला माहिती नाही उजवा मेंदू काय करतोय आणि तसेच उलटे. (ACC) हा एक आजार आहे. ज्यात मेंदूच्या दावा आणि उजव्या भागाला जोडणाऱ्या नसा ( केबल्स) नीट तयारच होत नाहीत. Agenesis of the corpus callosum (ACC) is a birth defect that affects the brain when the development of the corpus callosum, the band of white matter connecting the two hemispheres in the brain, in the embryo is disrupted. The corpus callosum is a thick bundle of nerve fibers that connects the right and left hemispheres (halves) of the brain.

In reply to by सुबोध खरे

माझ्या पोस्ट समजायला तुम्हाला वेळ लागेल.आणि लागतो पण. 1)मी कॉमेंट महानगर पालिका निवडणुकीवर दिली होती २) निवडणुका पुढे नेल्या जात आहेत .राज्य सरकार उस्तुक नाही असे चंद्र सूर्य कुमार ह्यांची पोस्ट होती. ३) त्याचे उत्तर म्हणून मी जे लिहलेले आहे त्याचा अर्थ लपलेला असा आहे. ," मुंबई किंवा नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत परप्रांतीय लोकांचे बहु मतं आहे.हे परप्रांतीय लोक सेना किंवा महाराष्ट्र वादी लोकांस मत देत नाहीत.त्यामुळे ह्या महानगर पालिका bjp परप्रांतीय यूपी,बिहारी,गुजराती ह्यांच्या जोरावर जिंकेल. तेव्हा राज्य सरकार नी त्यांच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून नगर सेवक आणि महापौर ह्यांचे अधिकार कमी करावेत आणि तो अधिकार आयुक्तांना द्यावा" मर्जी मधील मराठी आयुक्त तिथे नियुक्त करून मराठी लोकांचीच सत्ता महानगर पालिकेत पण राहील. अशी खेळी खेळता येईल आणि असे अधिकार राज्य सरकार ला आहेत. असा सर्व अर्थ आहे त्याचा. खरे तुम्हाला राजकीय पोस्ट वरचे खाच खळगे कळत नाहीत चंद्रसूर्य कुमार ह्यांना माझ्या पोस्ट चा अर्थ समजला पण तुम्हाला नाही समजला.

In reply to by sunil kachure

परप्रांतीय लोक सेना किंवा महाराष्ट्र वादी लोकांस मत देत नाहीत.त्यामुळे ह्या महानगर पालिका bjp परप्रांतीय यूपी,बिहारी,गुजराती ह्यांच्या जोरावर जिंकेल. तेव्हा राज्य सरकार नी त्यांच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून नगर सेवक आणि महापौर ह्यांचे अधिकार कमी करावेत आणि तो अधिकार आयुक्तांना द्यावा"
म्हणजे लोक आपल्याला मते देत नाहीत हे लक्षात आल्यावर निर्वाचित प्रतिनिधींचे अधिकार कमी करावेत? वा वा.

अजुन एक मुक्तफळ राऊतांना शिवसेना बरबाद करुन बहुदा आप किंवा काँग्रेसमध्ये जायची योजना दिसते आहे.
२०२४ साली केंद्रातून मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते असंही यावेळी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी बोलताना देशात यापेक्षा वेगळं वातावरण दिसत नाही असं म्हटलं आहे. https://www.loksatta.com/mumbai/shivsena-sanjay-raut-saamana-editorial-…

In reply to by Trump

म्हणूनच संजय राऊत मला जाम आवडतात. शिवसेनेच्या १०० कट्टर विरोधकांना जे जमले नसते ते सहजपणे संजय राऊत एकहाती करत आहेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेना मराठी माणसांच्या हितासाठी, मुळ उद्देशासाठी टिकुन राहावी असे वाटते. पण हल्लीचे माकडचाळे आणि कोंलाटउड्या बघुन हळु हळु तीही इच्छा कमी होउ लागली आहे.

“शिवसेनेचा आवाज तोच आहे. त्यातला खणखणीतपणाही तोच आहे. पण पिढीप्रमाणे थोडा बदल व्हायला हवा. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही. जनतेची सेवा करणारी आमची आदित्यला धरलं तर सहावी पिढी आहे. त्याच्या आधीही आमचे पूर्वज धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात. माझ्यावर सुरुवातीला टीका झाली की याला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही. मला नाहीच येत. मी भाषण करतो असं मला अजूनही वाटत नाही. मला भाषण करताच येत नाही हे तुम्ही लोकांनीच ठरवून टाकलं हे बरंच झालं. प्रत्येक काळ वेगळा असतो. बाळासाहेबांचा काळ दगडाची मूर्ती तयार करण्याचा होता. आता मूर्ती बनल्यानंतर देखील त्या शिल्पकाराचा पोरगा त्या शिल्पावर घण घालत बसला, तर ती मूर्ती तुटेल. दगडाचीच मूर्ती होते. त्यानंतर तिच्यावर फुलं वाहायची असतात ! ” - उद्धव ठाकरे (लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक किरीश गुबेर यांनी उद्धव ठाकरेंची छोटेखानी घेतली त्यातील उद्गार )

In reply to by चौथा कोनाडा

हटाव लुंगी और बजाव पुंगी... ते.... भय्ये पण आपलेच .... व्हाया .... केम छो वरली आणि जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा.. आणि तरीही काही मागुघपा जनतेला, शिवसेना मराठी माणसांना न्याय देणारी वाटते... इतकेच जर शिवसेनेला मराठी आणि हिंदू माणसांचा कळवळा होता तर, गिरणी कामगारांना घरे का नाही दिली?

In reply to by मुक्त विहारि

सेने न च नाही तर कोणत्याच पक्षांनी गिरणी कामगार ना घरे देण्यात इंटरेस्ट दाखवला नाही त्या मध्ये bjp पण आहे. आर्थिक फायदा जिथे असेल तिथे पक्षा मधील सीमा रेषा नष्ट होवून ते एक होतात. हजारो उदाहरण आहेत.

In reply to by सुबोध खरे

नुसती फुलं नाही तर भिंतीला फोटो टांगून हार देखील घालू ! हा .... हा .... हा .... ! जय मराठी, जय शिवसेना, जय महाराष्ट्र !

- उद्धव ठाकरे (लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक किरीश गुबेर यांनी उद्धव ठाकरेंची छोटेखानी घेतली त्यातील उद्गार ) तुम्हाला "मुलाखत" म्हणायचे असावे असे गृहीत धरतो. :))

राउत आणि नबाब हे एकाच माळेचे मणी आहेत. एकूणातच राऊत बहुतेक सेनेचे दुसरे मुख्यमंत्री व्हायचा प्लॅन करताहेत. ( अर्थात बारामतीच्या काकांंच्या मांडीवर बसून ). पण त्यांना हे माहीत नसावे की बारामतीचे काका काय करतील ते स्वतःही सांगु शकत नाहीत

In reply to by विजुभाऊ

पण, त्यांच्या दुर्दैवाने, ते ज्या पक्षाच्या खांद्यावर हात ठेवतात, ते पक्ष लयाला जातात किंवा डबघाईस येतात... शेकाप, कॉंग्रेस, मनसे ही उदाहरणे पुरेशी आहेत .... वैयक्तिक सांगायचे तर, शरद पवार यांना, काळाची पावले व्यवस्थित ओळखता येतात. त्यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही. भरपूर वाचन, उत्तम स्मरणशक्ती, हे त्यांचे चांगले गूण आहेत ... पण उदारमतवादी हिंदू हा त्यांचा, माझ्या दृष्टीने अवगूण आहे.... खरंतर, मुंढे घराणे, ठाकरे घराणे इतकेच कशाला, छत्रपती भोसले घराणे पण आज शरद पवारच एकत्र आणू शकतात .... समजा, ही तिन्ही घराणी एकत्र झाली तर हिंदू नक्कीच एकाच व्यासपीठावर येतील.... एक हिंदू म्हणून, शरद पवार यांच्या कडून, माझी तरी इतकीच अपेक्षा आहे...