Skip to main content

शिवसेनेचे हे काय चाललय

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 09/09/2020 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत

वाचने 109686
प्रतिक्रिया 293

प्रतिक्रिया

In reply to by सॅगी

त्यांच्या काळात झालेले सर्जिकल स्ट्राईक इतके गुप्त होते की लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा कळले नाहीत केंव्हा केले गेले ते.

सध्याच्या राजकीय वातावरणात विचार केलं जेव्हापासून शिवसेना राजकीय दृष्ट्या घरोबा बदलला, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले तेव्हापासून भाजपा नेतृत्वाने आपल्या भावी राजकारणाची दिशा कृतीत आणणे सुरू केले. मुळात एक समजून घेतले पाहिजे भाजपाला एक राजकीय पक्ष म्हणून राज्याची एक हाती सत्ता आवश्यक वाटते. कोणतेही राजकीय पक्षासाठी हे लक्ष योग्य आहे, परंतु महाराष्ट्रात चार वेगवेगळे पक्ष काम करतात त्यामध्ये वैचारिक दृष्टीने काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना भाजप हे दोन गट कार्यरत दिसतात. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपले मतदार वाढवायचे असतील तर आपल्याच मित्रपक्षाला आपल्यात सामील करणे अथवा आपल्यात सामील करणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे, तथापि त्यास यश आलेले नाही तोच प्रयत्न भाजपा आता सेनेसोबत करीत आहे. विरोधी मताचा मतदार बदलण्या पेक्षा समविचारी असलेल्या मतदाराला एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षांकडे अधिक सोपे असते. आमदाराने पक्षांतर करणे आणि मतदाराने पक्ष बदलणे यामध्ये फार फरक असतो शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेचे राजकारण केले असते, आणि आपल्या शिवाय राजकारणात सत्ता मिळवणे अशक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले असते तर दक्षिण भारताप्रमाणे महाराष्ट्रात शरद पवारांना एक हाती सरकार स्थापन करणे शक्य झाले असते. वर्तमानाचा विचार केला तर केंद्रात भाजप राजकीय दृष्ट्या अत्यंत परिणामकारक खेळी करून जनमत फिरवण्यासाठी हुशार झालेला आहे. त्यात विरोधी पक्ष भाजपाला आवडेल आणि सोईची होईल अशी राजकीय भूमिका घेऊन मदत करत आहे याचे सगळ्यात चांगले उदाहरण काश्मीर, मध्यप्रदेश आणि आता महाराष्ट्र ज्याप्रमाणे मेहबूबा यांनी राजीनामा देणे, राज्यपालांच्या हाती सत्ता देणे, त्यावेळी अब्दुल्ला सांगत होते आपण एकत्र येऊ पण भारताच्या जनतेचे नशीब थोर त्यांनी तसे केले नाही आणि भाजपाने कायदाच बदलला. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर यामध्ये भाजपाला पूर्ण राज्य मिळवणे शक्य झालेले नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला एका मोठ्या आणि सत्ताधारी समाजाचा पक्ष असून सुद्धा एक हाती सत्ता मिळवणे शक्य होत नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी पाहिजे तसं स्थान मिळू शकत नाही यासाठी जातीय समीकरण बदलणे आवश्यक आहे यात सगळ्यात मोठा बदल म्हणजे भाजपासाठी सेना आणि राष्ट्रवादीसाठी काँग्रेस नामशेष होणे आवश्यक आहे कारण हे दोन्ही पक्ष सध्या इतरांच्या जीवावर म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी वर जगत आहेत, यांना यापुढे कधीही स्वत: च्या अथवा एकत्र येऊन सत्ता प्राप्ती शक्य नाही. यासाठी भाजपाने सेनेचा मतदार आणि राष्ट्रवादीने काँग्रेसचा मतदार मिळवणे सर्वात आवश्यक आहे. पूर्वीच्या फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकार स्थापनेत हाच मुद्दा दोघांच्या मनात असावा अजित पवार यापूर्वीदेखील अशा प्रकारची मांडताना दिसतात मात्र पवार साहेबांना हे प्रत्यक्षात आणणे सहज शक्य वाटत नसावे. त्यासाठी पवारांना सेनेला मुख्यमंत्री पदी विराजमान करणे ही एक राजकीय खेळी असू शकते कारण एकदा सेना राज्य करण्यास लायक नाही हा मुद्दा जनतेच्या मनात ठसला की ते मतदार आपोआप भाजपाच्या बाजूने झुकतील. राष्ट्रवादी हा तुलनेने तरुण नेत्यांचा त्यांना आपल्या भवितव्याची काळजी वाटू शकणाऱ्या नेत्यांचा पक्ष आहे. तसेच राजकीय तडजोडी करण्यासाठी राष्ट्रवादी अधिक लवचिक आहे. सेनेच्या स्वभावानुसार सेनेतील नेते यापेक्षा वेगळे काही करतील अशी अपेक्षा पवार आणि मोदी यांना नव्हती त्यासाठी सुशांत सिंग प्रकरण हे महत्त्वाचे ठरले. सुशांत सिंग मृत्यु हे तत्कालीन कारण अपेक्षेपेक्षा लवकर मिळाले त्यात साठ पासष्ठ दिवस वाया घालवून केंद्राला हस्तक्षेप करण्याची सुवर्णसंधी सेनेने मोदी आणि शहा यांना दिली. जोडगोळी याचा लाभ घेणार नाही अशी अपेक्षा कशी करू शकतो? राजकारणात आपला फायदा झाला नाही तरी चालेल पण विरोधकाला वाट देऊ नये हा नियम असतो. त्यातच सुशांत सिंग प्रकरणाच्या निमित्ताने बॉलिवूड सरळ होत असेल तर सोयीचे होणार कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की बॉलिवूड मध्ये भाजपा आणि हिंदू विचारांचे विरोधाचा फार प्रभाव आहे आणि त्यास राजकारणातील काही मोठ्या नेत्यांचा पाठिंबा आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्व साठी सुशांत सिंग प्रकरणाचा याहून चांगला उपयोग करणे शक्यच नव्हते. त्यात शिवसेनेने काँग्रेसच्या मागे जाऊन अर्णव गोस्वामी यांच्या विरोधातील लढाई आपली लढाई करून घेतली आणि सोबत कंगना अंगावर घेणे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन.

In reply to by जानु

भाजपासाठी सेना आणि राष्ट्रवादीसाठी काँग्रेस नामशेष होणे आवश्यक आहे कारण हे दोन्ही पक्ष सध्या इतरांच्या जीवावर म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी वर जगत आहेत, या बाबतीत माझा असा अन्दाज आहे की येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सेनेची बरीच मते भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. भाजपातील काही मवाळ भाजपा वाले कामगिरीच्या जोरावर राष्ट्रावादी कॉन्ग्रेसकडे वा कॉन्ग्रेसकडे वळण्याची शक्यता कमीच कारण तसा या दोन पक्षान्चा कार्यक्रम ही नाही वा संयुक्त सरकार असल्यानी तशी सन्धीही नाही. साधारण पणे ब्राह्मण द्वेष्टे मतदार कदापीही भाजपा ला मत देणे शक्य नाही व संघाच्या प्रभावाखाली असलेले कदापिही भाजपेतर पक्षाला मत देण्याची शक्यता नाही. अत्यन्त उदारमनस्क नेतृत्व जर बविआ ला मिळाले व ते कॉन्ग्रेस बरोबर आले तर काही नवी मान्डणी होउ शकते. बाकी ममता दीदी सारखा चमत्कार पवारांचे बेभरवशी नेत्रुत्व कधीच करून एकहाती सत्ता स्थापन करून शकणार नाहीत हे लिहून घ्या !

जेव्हा काँग्रेस पूर्ण फॉर्म मध्ये होती ,इंदिराजी पंतप्रधान होत्या तेव्हा पूर्ण महाराष्ट्र काँग्रेस अधिपत्य खाली होता. त्या पाठची कारण पण फक्त भावनिक नव्हती महाराष्ट्र मध्ये सहकारी क्षेत्र उदयास येत होते काँग्रेस च्या नेतृत्व खाली. नव नवीन सहकारी साखर कारखाने उभे राहिले,बँका उभ्या राहिल्या ,सहकारी तत्वावर दूध डेअरी उभ्या राहिल्या. कर्मवीर सारख्या नेत्यानं मुळे शिक्षण क्षेत्रात विकास झाला,धरण बांधली गेली शेती पाण्या खाली आले. विद्युत वितरण आणि निर्मिती मध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला. एकंदरीत विकासाचे राजकारण काँग्रेस चे झाले आनी लोक त्या विकास च्या माध्यमातून काँग्रेस ची पाठी राखी झाली मूळ तळागाळात रोवली गेली. ग्रामीण क्षेत्रात विकास झाला . नेतृत्व उत्तम दर्जाचे होते आणि भावनिक राजकारण न करता विकासाचे केले gele. शरद पवार पण त्याच संस्कृती मध्ये वाढले राज्य साठी काय करायला हवं हे त्यांना चांगले माहीत आहे . इंदिराजी गेल्या आणि सर्वच बदललं. काँग्रेस नी काही केले नाही असे आपण बोलू शकत नाही.. सेने ची निर्मिती च भावनिक प्रश्नावर झाली मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांवर होणाऱ्या अन्यायाला तिनी हवा दिली काँग्रेस नी छुपा पाठिंबा दिला ह्या मागचा काँग्रेस चा उध्येश जात होता हे मला सांगता येणार नाही. पण कामगार चळवळी शी संबंधित काही तरी असावे आणि कामगार संघटना पासून उद्योगपती चे रक्षण करण्याचा कुटील हेतू पण असू शकतो.. पण सेने मुळे मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांना आधार मिळाला हे कोणीच नाकारू नये. नोकऱ्या मध्ये सेने च्या दबाव मुळे मराठी लोकांची संख्या वाढली. मराठी लोकांवर दादागिरी जे परप्रांतीय लोक करत होती त्याला चाप बसले . लहान धब्दे सेने च्या संरक्षण खाली चालू केले गेले. आणि एक प्रकारचे आत्मिक बळ मिळाले . राज्याचे हित शिवसेना चांगली समजते असा विश्वास निर्माण झाले आणि सेने ला जन आधार मिळाला. गुंडागर्दी करणे त्या वेळी गरजेचे होते संवेधनिक मार्गाने काहीच साध्य झाले नसते ते सेने नी गुंडागर्दी करून साध्य केले पण गुंडागर्दी मराठी लोकांच्या हिता साठी होती. काँग्रेस राष्ट्रवादी चे मतदार एकाच आहेत आणि ते सहकारी क्षेत्र शी संबंधित आहे आता काही वर्षात सहकारी क्षेत्र भ्रष्टाचार मुळे संपले,आर्थिक संस्था दबघाईला आल्या आणि काँग्रेस राष्ट्र वादी च जनाधार कमी झाले. Bjp ni हिंदुत्व चे राजकारण केले मुस्लिम समाज विषयी हिंदूंना भीती दाखवून हिंदू ना वेगळे केले आणि बहुसंख्य हिंदू मत विभागली गेल्या मुळे bjp सत्तेत आली. पण विकासाचे राजकारण bjp ni कधीच केले नाही त्यांचा पायाच भावनिक आहे . भावनिक पायावर उभी असलेली bjp ची इमारत जशी लवकर उभी राहिली तशी लवकर कोसळू पण शकते. कमीत कमी हिंदू ना तरी आर्थिक क्षेत्रात संधी निर्माण करणे गरजेचे होते ते bjp नी केले नाही. आर्थिक संध्या फक्त ठराविक उद्योगपती नच देवून बाकी बहुसंख्य हिंदू चा आर्थिक आधार तोडण्याचे उपत्याप bjp ni केले. किती ही चुकीची काम केली तरी हिंदू हिंदू करून जिंकून येवू असा त्यांना आत्मविश्वास आहे पण उपाशी पोटी लोक जास्त दिवस हिंदू म्हणून bjp च्या पाठी जाणार नाही. त्यांची मोठी काम कोणती तर kashmir चे विभाजन,370 रद्द,राम मंदिर. एवढीच. काश्मीर चे विभाजन करून काश्मिरी लोकमत बदलणार नाही. त्यांना हा देश आपला वाटला पाहिजे त्या साठी आर्थिक विकास हाच एकमेव मार्ग आहे. हा देश बहुधर्मिय आहे हे सत्य बदलणे शक्य नाही सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेवून आर्थिक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारण्याची कुवत bjp madhye नाही. हे सत्य लोकांना जाणवू लागले आहे.. त्या मुळे आलेल्या सत्तेचा उपयोग धार्मिक तेढ आणि जहाल राष्ट्रवाद साठी न करता आर्थिक,सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचं आहे तरच bjp टिकेल नाही तर . काँग्रेस,लालू,मुलायम सारखी अवस्था तिची सुधा होईल हे नक्की.

जेव्हा काँग्रेस पूर्ण फॉर्म मध्ये होती ,इंदिराजी पंतप्रधान होत्या तेव्हा पूर्ण महाराष्ट्र काँग्रेस अधिपत्य खाली होता. त्या पाठची कारण पण फक्त भावनिक नव्हती महाराष्ट्र मध्ये सहकारी क्षेत्र उदयास येत होते काँग्रेस च्या नेतृत्व खाली. नव नवीन सहकारी साखर कारखाने उभे राहिले,बँका उभ्या राहिल्या ,सहकारी तत्वावर दूध डेअरी उभ्या राहिल्या. कर्मवीर सारख्या नेत्यानं मुळे शिक्षण क्षेत्रात विकास झाला,धरण बांधली गेली शेती पाण्या खाली आले. विद्युत वितरण आणि निर्मिती मध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला. एकंदरीत विकासाचे राजकारण काँग्रेस चे झाले आनी लोक त्या विकास च्या माध्यमातून काँग्रेस ची पाठी राखी झाली मूळ तळागाळात रोवली गेली. ग्रामीण क्षेत्रात विकास झाला . नेतृत्व उत्तम दर्जाचे होते आणि भावनिक राजकारण न करता विकासाचे केले gele. शरद पवार पण त्याच संस्कृती मध्ये वाढले राज्य साठी काय करायला हवं हे त्यांना चांगले माहीत आहे . इंदिराजी गेल्या आणि सर्वच बदललं. काँग्रेस नी काही केले नाही असे आपण बोलू शकत नाही.. सेने ची निर्मिती च भावनिक प्रश्नावर झाली मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांवर होणाऱ्या अन्यायाला तिनी हवा दिली काँग्रेस नी छुपा पाठिंबा दिला ह्या मागचा काँग्रेस चा उध्येश जात होता हे मला सांगता येणार नाही. पण कामगार चळवळी शी संबंधित काही तरी असावे आणि कामगार संघटना पासून उद्योगपती चे रक्षण करण्याचा कुटील हेतू पण असू शकतो.. पण सेने मुळे मुंबई सारख्या शहरात मराठी लोकांना आधार मिळाला हे कोणीच नाकारू नये. नोकऱ्या मध्ये सेने च्या दबाव मुळे मराठी लोकांची संख्या वाढली. मराठी लोकांवर दादागिरी जे परप्रांतीय लोक करत होती त्याला चाप बसले . लहान धब्दे सेने च्या संरक्षण खाली चालू केले गेले. आणि एक प्रकारचे आत्मिक बळ मिळाले . राज्याचे हित शिवसेना चांगली समजते असा विश्वास निर्माण झाले आणि सेने ला जन आधार मिळाला. गुंडागर्दी करणे त्या वेळी गरजेचे होते संवेधनिक मार्गाने काहीच साध्य झाले नसते ते सेने नी गुंडागर्दी करून साध्य केले पण गुंडागर्दी मराठी लोकांच्या हिता साठी होती. काँग्रेस राष्ट्रवादी चे मतदार एकाच आहेत आणि ते सहकारी क्षेत्र शी संबंधित आहे आता काही वर्षात सहकारी क्षेत्र भ्रष्टाचार मुळे संपले,आर्थिक संस्था दबघाईला आल्या आणि काँग्रेस राष्ट्र वादी च जनाधार कमी झाले. Bjp ni हिंदुत्व चे राजकारण केले मुस्लिम समाज विषयी हिंदूंना भीती दाखवून हिंदू ना वेगळे केले आणि बहुसंख्य हिंदू मत विभागली गेल्या मुळे bjp सत्तेत आली. पण विकासाचे राजकारण bjp ni कधीच केले नाही त्यांचा पायाच भावनिक आहे . भावनिक पायावर उभी असलेली bjp ची इमारत जशी लवकर उभी राहिली तशी लवकर कोसळू पण शकते. कमीत कमी हिंदू ना तरी आर्थिक क्षेत्रात संधी निर्माण करणे गरजेचे होते ते bjp नी केले नाही. आर्थिक संध्या फक्त ठराविक उद्योगपती नच देवून बाकी बहुसंख्य हिंदू चा आर्थिक आधार तोडण्याचे उपत्याप bjp ni केले. किती ही चुकीची काम केली तरी हिंदू हिंदू करून जिंकून येवू असा त्यांना आत्मविश्वास आहे पण उपाशी पोटी लोक जास्त दिवस हिंदू म्हणून bjp च्या पाठी जाणार नाही. त्यांची मोठी काम कोणती तर kashmir चे विभाजन,370 रद्द,राम मंदिर. एवढीच. काश्मीर चे विभाजन करून काश्मिरी लोकमत बदलणार नाही. त्यांना हा देश आपला वाटला पाहिजे त्या साठी आर्थिक विकास हाच एकमेव मार्ग आहे. हा देश बहुधर्मिय आहे हे सत्य बदलणे शक्य नाही सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेवून आर्थिक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारण्याची कुवत bjp madhye नाही. हे सत्य लोकांना जाणवू लागले आहे.. त्या मुळे आलेल्या सत्तेचा उपयोग धार्मिक तेढ आणि जहाल राष्ट्रवाद साठी न करता आर्थिक,सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचं आहे तरच bjp टिकेल नाही तर . काँग्रेस,लालू,मुलायम सारखी अवस्था तिची सुधा होईल हे नक्की.

In reply to by Rajesh188

वरील लेख बरचसा वास्तवाला धरून आहे ! कोणताही अभिनिवेश नाही याबद्द्ल आभारी आहे !

In reply to by Rajesh188

कामगार चळवळीत सेनेने नेहमीच सोयीस्कर भुमीका घेतली आहे.कामगार चळवळीला पहिला सुरूंग लागला तो कृष्णा देसांई या कम्युनिस्ट कार्यकर्त्यच्या खुनानंतर. बाळासाहेब ठाकर्‍यांनी कृष्णा देसाईंच्या मारेकर्‍यांचे अभिनंदन केले होते. दुसरी वेळ म्हणजे डॉ दत्ता सामंतांनी केलेल्या गिरणी कामगार सम्पात ठाकर्‍यांनी त्यांची भूमिका अचानक बदलली. पुण्यातल्या टेल्को च्या सम्पाच्यावेळेसही ती अगदी तळ्यात मळ्यात अशीच होती. कामगार चळवळीत सेनेला कोहीनूर मिल फिनीक्स मिल या मील्स च्या जागांच्या ठिकाणी कामगाराम्ना वसवणे सहज शक्य होते. जे त्यानी कधीच अजेंड्यावर ठेवले नाही. छगन भुजबळ सेनेत असताना बेळगाव चा प्रश्न त्याम्नी बेळगावात जाऊन स्टंट करत अटक करुन घेतली होती. पण सत्तेत येताच तो प्रश्न सोयीस्करपणे अजेंड्यावरून पुसून टाकला. त्या नंतर सेनेने त्याचा उच्चारही केला नाही. कोकणात दाभोळ वीज प्रकरणात सेना तो प्रकल्प समुद्रात बुडवायला निघाली होती. रेबेका मार्क बाळासाहेबाना एकदा भेटली आणि त्या नंतर त्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन झाले तेही जास्तीच्या दरानुसार. बीजेपी चे कसे होईल यापेक्षाही आता मुळात प्रश्न निर्माण झालाय तो सेनेच्या आस्तित्वाचा. आडमुठ्या आणि गुंड दहशतवादी भूमीका घेवून मिळालेली लोकप्रियता सवंग असते. याचे भान सेना नेतृत्वाला ज्या वेळेस येईल त्या वेळेस फार उशीर झालेला असेल. म्हणावे असे एक दोन अपवाद सोडले तर सेनेला तारून नेतील असा जनाधार असलेला तळागाळातला कोणताच नेता त्यांच्याकडे नाहिय्ये. उद्धव ठाकरेंच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. आदित्य ठाकरे अगदीच अननुभवी आहेत. दरवेळेस राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन राज्य मिळवणे हाच एकमेव मार्ग चोखाळला तर आत्ता आहे तेही जनमत विरोधात जाईल

In reply to by विजुभाऊ

विजुभौ , बाळासाहेब हे उमदे कलाकार वगैरे होते पण सुमार राजकारणी होते. मॅनेज करता येणारे गॉडफादर होते असे म्हणायचे का ..... ?

In reply to by विजुभाऊ

बीजेपी चे कसे होईल यापेक्षाही आता मुळात प्रश्न निर्माण झालाय तो सेनेच्या आस्तित्वाचा.
तुमच्या धाग्याला हे वाक्य बरोबर बसते आहे आणि त्यानुसारच धागा पुढे चालला आहे.. परंतु थोडे अवांतर वाटेल पण हे मुद्दे मांडतो.. --=> प्रश्नच पडायचा असेल तर या देशाचे काय होईल याचाच पडतोय आता.. 1. आता केंद्र आणि राज्याकडे कोविड मुळे पैसे कमी आहेत, निदान अश्या वेळेस काही गोष्टीत tax वाढवून सरकार पैसे जमवू पाहतेय.. पेट्रोल dizel हे त्याचे मुख्य स्रोत, तसेच नुकतेच zee business ला ऐकले sanitizer वर gst जादा आकारणार आहेत म्हणुन त्याच्या किंमती वाढणार, आता ज्या गोष्टीला tax free असायला हवे त्या पेक्षा जास्त कर लावला जातोय.. पेट्रोल वर जास्त कर घेण्या विरोधात मी होतो, परंतु देशाच्या गरजेसाठी आणि पैसेच नसल्याने ते पैसे आता गोळा करत असले तर माझा आता त्याला विरोध नाही.. परंतु जे खरे आहे ते चित्र जनतेला दिसले पाहिजे, आणि गरज नसताना जास्त कर आधी आणि नंतरही आकारला नाही पाहिजे.. 2. बर अश्या अनेक सरकारी किंवा निमसरकारी संस्थे तुन करोडो रुपये मिळतात तरी, पण या मधील भागीदारी खुप वेगाने विकली जात आहे, आणि नंतर भविष्यात हे स्रोत ही private झाल्यावर सरकार ला असा पैसा वापरता येणार नाही.. पेट्रोलियम, lic, रेल्वे, विमानतळ डीफेंस अश्या अनेक संस्था आता हळू हळू विकल्या जातायेत.. उद्याचे रोजगार हे कंत्राटी आणि अश्या दिग्गच busineman कडेच असणार आहेत, याचा दूरगामी परिणाम होणारच.. 3. कोविड मुळे अर्थव्यवस्थेवर खुप परिणाम झाला आहेच, पण त्या अगोदरच अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती.. तिला जोराचा झटका कोविड ने दिला पण त्या आधी? त्यामुळे हे अपयश सरकार कोविड च्या नावाने खपवत असले तरी ते अपयश त्यांचे आधी आहे.. यावर कोणी बोलत नाही.. 4.. करोना आधी महाराष्ट्रात जास्त वाढला, मग मुख्यमंत्री, आघाडी कशी हाताळू शकत नाही गोष्टी असे पसरवले गेले, आता देशात वाट लागली आहे, यावेळेस पंतप्रधान परिस्थिती हाताळू शकत नाही असे मेसेज किंवा सोशल डंका कुठेच वाजत नाही, आणि मग मात्र अश्या काही घटना वगैरे कडे लक्ष वळवले जातेय असे मला वाटते.. 5. धार्मिक भेग अधिक वाढवून, त्याच्यावर आपली पोळी भाजण्याचे काम चालू आहे, पण देशात दंगली झाल्या तरी हिंदू मुस्लिम ह्या मुद्द्यावर राजकारण करून देशात दुफळी माजवली जातेय.. याचे पाडसाद उद्या जगात पडतील आणि हा देश हि सुरक्षित नाही असे उद्या जग बोलू शकते, पण याचे कोणालाच काही पडले नाही.. कुरेशी जनगण किंवा भारत माता बोलला किंवा राहुल गांधी नीट बोलला कि अजुन काय acche din पाहिजेत असे म्हणणारी जनता, acche din ला इतक्या level वर आणतील वाटले नव्हते.. त्यामुळे bjp, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना यांच्या पेक्षा देशाचे काय होईल, रोजगारआणि अर्थव्यवस्थेचे काय होईल, देशाच्या प्रतिमेचे काय होईल, संस्था विकल्याने देश भविष्यात कुठल्या संकटातून जाऊ शकेल आणि या अनुषंगाने देशाचे काय होईल हा प्रश्न पडतो.. परंतु, हे प्रश्न पडू नये म्हणुन 6. लोकशाही चा चौथा खांब स्वतःच्या पद्धतीने वापरून असे प्रश्न लोकांना पडूच नयेत म्हणुन त्यांना वेगवेगळे मुद्दे चघळायला दिले जातायेत असे मला वयक्तिक वाटते.. शिवसेना, पवार, मोदी, काँग्रेस यांचे काही हि झाले तरी जनतेला काडीचा फरक पडत नाही, पण देशाच्या नुकसानीने सगळ्यांचे आयुष्य बदलणार आहेच आणि पुढील पिढी असल्या अराजक, धार्मिक स्थिती मध्ये आपण ढकलणार आहोत हे नक्की... #India deserves better पुढचा भाग लिहावा म्हणतोय आता.. वेळ आलीये..

In reply to by गणेशा

देशाची स्थिती गंभीर होत आहे. Bjp सरकार ला विकासाची दिशा अजुन मिळत नाही. मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या संस्था नष्ट करण्याचे काम ती मन लावून करत आहे. फक्त दिखावा केला जात आहे विकासाचा पण विकास फक्त काही लोकांचाच होत आहे.. मीडिया लोकांना वेगळ्याच विश्वात घेवून जात आहे मीडिया जे विषय मांडत आहे आणि सरकार चे अपयश लपवत आहे हे पहिल्यांदा च घडताना दिसत आहे. लोकांच्या सर्व अनुभवाने लक्षात येत आहे फक्त हिंदू चे राजकारण करून सत्ता मिळते हे गणित चुकीचे ठरू शकते. ठोस असा कोणत्याच क्षेत्रात bjp ni काहीच केले नाही.

केवळ कोणी एक व्यंगचित्र काढले तर त्यासाठी एका ६५ वर्षाच्या नौदल अधिकार्‍यास मारहान करणॅ हे सेनेच्या कोणत्या संस्कारात बसते. बाळासाहेब ठाकर्‍यांनी मार्मीक मधे अशी अनेक व्यंगचित्र काढली असतील याचाही सेनेला विसार पडलाय. दुसरे म्हणजे ज्याला मारले तो नौदल अधिकारी होता हे लगेच समजणे शक्य नाही. पण एखाद्या ६५ वर्षाच्या माणसाला मारहाण करणे म्हणजे सेनेच्या लोकांनी त्याम्च्या अहंगंडामुळे साधी माणूसकीही सोडली आहे याचे ठळक उदाहरण आहे. आता यावर सेना म्हणू शकेल की ज्यानी त्या अधिकार्‍याला मारले ती सेनेची अधिकृत भूमीका नव्हती. दुसरे म्हणजे राऊत कोणालाही काहिही बोलले तरी ते चालते. अजितदादांना " मुतर्‍या तोंडाचे ' गटारातला कीडा असले शेलके शब्द वापरतात त्यावर राउतांना काय न्याय लावायचा. राउताना अक्कल नाही असे एकवेळ समजले तरी राउताचा धनी उद्धव ठाकरे यानीही त्या विरोधात कधी चकार शब्द काढला नाही. कम्गना हा विषय सम्पला असे म्हणताना सामना मधे राऊत लिहीतात " उखाड दिया" . म्हणजे यानी जीभ उचलून टाळ्यालाच काय अगदी पायाच्या तळव्याला लावायची मात्र इतर कोणी त्यावर काही बोलले की म्हणायचे की हा विषय आमच्यासाठी सम्पलाय. पूर्वी बाळासाहेब असताना सेने बद्दल ममत्व होते. मराठी माणसाचा आवाज अशी एक आशा वाटायची ( तीही फोल ठरवली गेली होती ) त्याम्च्या नंतरची इतकी भेक्कड भित्री असेल असे कधीच वाटले नव्हते

कंगना ल प्रती उत्तर देवून सेने चे चुकलंच. कंगना च्या ऑफिस वर आता कारवाई करणे सेने च्या अंगलट आले. सुशांत सिंग केस तपास जलद गती नी न करून bjp ल हात घालायला जागा दिली हे पण हुकलेच असे आताची स्थिती बघून वाटणे साहजिक आहे. पण एक गोष्ट सर्व विसरत आहेत. राडा करण्यासाठी ,टीका करणाऱ्या लोकांना दम देवून गप्प बसवण्यासाठी प्रतेक पक्ष कडे एकादी बेनामी संघटना असते वरवर तिचा संबंध पक्ष शी नसतो पण ती कार्य त्याच पक्षाचे करत असते. राष्ट्रवादी कडे अशा बेनामी संघटना आहेत हे पण जवळ जवळ सर्व लोकांना माहीत आहे ते राडे करायचे काम करतात पण राष्ट्रवादी चे त्या मध्ये नाव येत नाही. Bjp कडे पण बजरंग दल,हिंदू महासभा आहे ते गौरक्षक म्हणून bjp चेच काम करतात. काँग्रेस कडे अनेक संघटना आहेत . फक्त राडे करण्यासाठी सेने कडे अशी सुविधा नाही सर्व त्यांनाच करावे लागते मग ते बदनाम होतात.

कसले कार्टून होते म्हणे ? ठाकरे कुटुंब चांगल्या कार्टूनवर चिडेल असे वाटत नाही घरात 2 कार्टुनिस्ट आहेत , बाळासाहेब आणि राज

कुठल्या ही पक्षातील नेते कसे का असेनात. मला ते नाशिकचे आर्मस्ट्रॉंग काका फार आवडतात. मला हेच खाते हवे, तेच खाते हवे यासाठी कधीही ते भांडताना दिसत नाहीत. मिळेल त्या खात्यात, 'खायच्या' संधी ते बरोबर शोधून काढतात. आता करोना काळात झालेला 'तांदूळ घोटाळा' पाहा.

भक्त लोकांना विचारायच आहे की त्यांना विकासाच राजकारण पाहीजे की असे मुर्ख भावनिक राजकारण पाहीजे आहे. कारण हे सर्व तुमच्या सपोर्टवर चालु आहे. दिल्ली निवड्नु़कांच्या वेळी असेच केल गेल होत पण दिल्लीकरांनी विकासाला निवडल. भक्त लोकांना विनंती आहे की चुकीच्या गोष्टींना डोक्यावर घेउ नका. मी कोण्त्याही पक्षाचा समर्थक नाही आहे.

In reply to by गोंधळी

बरोबर आहे तुमच, लोकांनी विकासलाच निवडलं पाहिजे. देशात २०१४ आणि २०१९ साली लोकांनी विकासा लाच निवडून दिलंय. राज्यात पण विकासलाच निवडलं होतं पण धोका दिला ती गोष्ट वेगळी. ज्या दिल्लीत लोकांनी विधानसभे साठी विकासाला निवडून दिल त्याच लोकांनी लोकसभे साठी ही विकासलाच निवडून दिलंय पण ते कदाचित दिसत नसावं. आपल्या आवडीचा पक्ष जिंकला की विकास जिंकला आणि ना आवडता जिंकला की भावनिक मुद्दे जिंकले हे बरोबर नाही. आपला तो बाबू दुसऱ्याच ते कार्ट.

In reply to by रात्रीचे चांदणे

दुसऱ्या पक्षांना निवडून दिले तरी तात्या विंचू ओम भग भुगे करत शिरतो व परत तात्या विंचूचेच सरकार येते

In reply to by रात्रीचे चांदणे

मी कोण्त्याही पक्षाचा समर्थक नाही आहे. मी एक सामान्य नागरीक म्हणुन जे वाटते ते लिहील आहे. मल वाटत आपण कुठल्या पक्षाचे समर्थक म्हणुन नाही तर तटस्थ नागरीक म्हणुन विचार केला पाहीजे तरच आपल्याला वस्तुस्थीति कळेल. जर विकास राजकारणा चा मुद्दा असेल तर बकिचे अनावश्यक भावनीक मुद्द्यांना महत्वच मिळाल नसत. भारतीय जनतेने आता emotional होन सोडुन logical व्ह्ययला पाहिजे.

आत्ताच बातमी वाचतोय. माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण प्रकरणी संजय राउतांनी " ती एक स्वाभाविक प्रतिक्रीया आहे" असे मत प्रदर्शीत केले आहे. ही अशी प्रतिक्रीया इतरांनी व्यक्त केली तर ? स्वतःचा मुख्य मंत्री असूनही सेना केवळ दंगा राडे यातून बाहेर येताना दिसत नाहिय्ये. एकूणच सेनेचे राजकारण पाहिले तर राजकारण कमी आणि टपोरीगिरी जास्त असेच दिसतय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांना बदनाम करण्याच्या बातम्या प्रसारित होत असल्याने ‘रिपब्लिक टीव्ही’ व ‘रिपब्लिक टीव्ही भारत’ या दोन वाहिन्या दाखवणे सुरू ठेवल्यास लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा आशयाचे म्हणणे मांडत केबल चालकांना या वाहिन्या दाखवण्यास मनाई करणारे पत्र शिव केबल सेना या संघटनेने १० सप्टेंबर रोजी अनेक केबल चालकांना पाठवल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, या दोन वाहिन्या चालवत असलेल्या ‘एआरजी आऊटलाय प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने ज्येष्ठ वकील निखिल साखरदांडे यांच्यामार्फत तातडीच्या रिट याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘अशा वादांविषयी दाद मागण्याचा मंच हा टेलिकॉम डिस्प्युट्स सेटलमेंट अँड अॅपलेट ट्रिब्युनल (टीडीसॅट) हा आहे. मात्र १८ सप्टेंबरपर्यंत कामकाज बंद असल्याचे या मंचाने अधिसूचनेद्वारे नुकतेच स्पष्ट केले आहे. म्हणून आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमच्या वाहिन्या दाखवणे बंद होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकारला निर्देश द्यावेत’, अशी विनंती कंपनीतर्फे अॅड. साखरदांडे यांनी न्या. नितीन जामदार व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या सुनावणीत केली. तर ‘याचिकादारांचे गाऱ्हाणे हे खासगी संस्थेविरोधात असल्याने त्याविषयी रिट याचिकेद्वारे दाद मागता येऊ शकत नाही. त्यांना अन्य मार्ग असून ते दिवाणी दावा दाखल करू शकतात’, असे म्हणणे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मांडले. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-high-court-…

शिवसेना आता सत्तेत नेहमीच राहणार आणि विरोधी पक्षाची भूत जी सर्व व्यापी आहेत ते सेने ला त्रास देणार कधी अर्णव च्या रुपात,कधी कंगना च्या रुपात. सेने नी पण आता भूत निर्माण करावी आपल्या लोकांना वेगवेगळ्या नावाच्या संघटना निर्माण करण्यास बळ देवून त्यांना उभ करावे. आणि शिवसेनेची भूत निर्माण करावी वेगवेगळ्या नावांनी भुतं शी भुताच लढतील आपण नाम निराळे. काश्मीर मध्ये पाकिस्तान सैनिकांची भुतं च अतिरेकी बनून भारताशी सर्व नियम मोडून लढतात. ते अतिरेकी नसतात तर पाकिस्तान चे सैनिक च असतात. सर्व जग च हा फॉर्म्युला वापरात आहे. तेव्हा सेने नी तोडफोड,मारझोड,मोर्चे,ही सर्व काम भुतांकडे सोपवावित आणि स्वतः माणूस राहवे.

In reply to by Rajesh188

अर्णव,कंगना ही भज्जी खाव आहेत ज्यांची plate त्यांचे गुणगान. सेनेचा भज्जी खाव लोक जवळ बळगवित. बिल त्यांचे पैसे आमचे. आपले फक्त पैसे जातील पण बिल त्यांचे फाडले जाईल.

In reply to by Rajesh188

शिवसेनेकडे शिकलेला-मध्यममार्गी मतदार नाही हे त्याचे कारण आहे रे राजेशा . सुरुवातीच्या काळात तो होता- म्हणजे ८७-८८ सालापर्यंत पण सेनेने मराठी झूल फेकली व हिंदुत्वाची झूल पांघरून राजकारण सुरु केले. मग हा मतदार हळुहळु भाजपाकडे वळला. शिवसेनेला जर भाजपा/कॉन्ग्रेसशी टक्कर द्ययची असेल तर आधी विकासाचे राजकारण त्यानी चालु करावे. 'सामना'/भाषणातून खंजिर्/कोथळा/किल्ल्ला असली भाषा बंद करावी. लोकाना ईतिहासात रममाण होण्यापासुन परावृत्त करावे. 'आम आदमी' पक्षाचे उदाहरण घ्या. फक्त आठ वर्षे झाली आहेत त्या पक्षाला. त्यानीही चुका केल्या पण त्या त्याना समजल्या व त्यानी आपली धोरणे आखली. आज त्यांचे विरोधकही त्यानी केलेली कामे मान्य करतात. महाराष्ट्रापुरते असाल तर राज्याच्या समस्यांपुरतेच बोला. द्रमुक पक्षाचे नेते कधी कश्मिर्/अयोध्या प्रकरणावर बोलताना दिसतात का ? उद्धव्/संजय राउत 'सामना'तून ईमरान खान/ट्रम्प ह्याना ईशारे का देतात? प्रत्येक समस्येसाठी मुस्लिम्/उत्तर भारतीय लोकाना जबाब्दार ठरवण्याचे सोडुन द्या. स्थानिक लहान उद्योग राज्य सरकार का निर्माण करू शकत नाही? हे जे काही कथित लोंढे म्हणता ते कॉन्ग्रेसने आखलेल्या चुकीच्या ओद्योगिक धोरणांमुळेच आले ना ? मग त्यासाटी काँग्रेसला/राष्ट्र्वादीला जाब कधी विचारणार?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कुर्डुवाडीतून येऊन मुंबईत पाणीपुरीचा ठेला घालायला काँग्रेसने बंदी घातली का ? बांधकामे बंद पडलीत , कामगार नाहीत म्हणे , मग मराठी कामगार भेटत का नाहीत ??

In reply to by Gk

मोगा खान बिहार पश्चिम बंगाल मधील गरिबी पाहिली आहे का तुम्ही? बिहार मध्ये मैलोगणती केवळ शेती आणि गावं. उद्योग नाहीतच. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले लोक मुंबईत येऊन 10 x 10 च्या खोलीत 15 जण राहतात. इतकी वाईट परिस्थिती कुर्डुवाडीत नाही. 1998 साली बिहार मध्ये शेतमजुराला दोन वेळचे जेवण आणि 1800 रुपये मिळत. महिन्याला नव्हे वर्षाला. मी स्वतः तेथील भयानक परिस्थिती पाहिली आहे. ओडिशा मध्ये दुष्काळ पडल्यावर लोक उंदीर खाउन जगताना पाहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

एका खोलीत 15 रहातात , कारण त्यांच्या कामातून , चहा विकणे , पाणीपुरी , द्रायव्हर वगैरे कामात त्यांना पगारच तितका मिळतो , पण असे ते जन्मभर रहात नाहीत , हळूहळू भाड्याचे घर , मग उपनगरात घर वगैरे घेतात , पुढची पिढी सामान्य मराठी कुटुंबाइतके सुखात रहाते , कुठल्याही सोसायटीत आज 20 ते 30 % लोक मराठीच असतात ह्या सगळ्याला काही काँग्रेसच जबाबदार आहे , असे नाही आणि लोंढे तर गुजरातवरूनही येतात , मग त्याला मोदी , गुजरात भाजप जबाबदार का ? स्वतः मोदींनी स्वतःची खासदारकी वारांनशीतून घेतली अन गुजरातची एक सीट वाचवली , पंतप्रधानकी सांभाळताना मतदार संघ फाफलला तर फाफलला , आणि भक्ताडे म्हणतात माँ गंगा ने बुलाया है, मग माँ साबरमती , माँ नर्मदा ह्या काय जिनपिंगला हाक मारतात काय ??

In reply to by Gk

कुठल्याही सोसायटीत आज 20 ते 30 % लोक अमराठीच असतात ------ युज इट ऑर लूज इट

In reply to by Gk

पंतप्रधानकी सांभाळताना मतदार संघ फाफलला तर फाफलला
पण नाही ना फाफलला? झालं तर मग....
मग माँ साबरमती , माँ नर्मदा ह्या काय जिनपिंगला हाक मारतात काय ??
हे नाही माहित...पण रागा किंवा सोगांना नक्कीच हाक मारत नसाव्यात....

In reply to by Gk

मोगा खान बिहार पश्चिम बंगाल मधील गरिबी पाहिली आहे का तुम्ही? बिहार मध्ये मैलोगणती केवळ शेती आणि गावं. उद्योग नाहीतच. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले लोक मुंबईत येऊन 10 x 10 च्या खोलीत 15 जण राहतात. इतकी वाईट परिस्थिती कुर्डुवाडीत नाही. 1998 साली बिहार मध्ये शेतमजुराला दोन वेळचे जेवण आणि 1800 रुपये मिळत. महिन्याला नव्हे वर्षाला. मी स्वतः तेथील भयानक परिस्थिती पाहिली आहे. ओडिशा मध्ये दुष्काळ पडल्यावर लोक उंदीर खाउन जगताना पाहिले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

रात्री बाईकवरून जाताना ऐरोलीच्या / मानखुर्दच्या खारफुटीमुळे पूर्वी ज्या प्रमाणात थंडी वाजायची ती आता जाणवत देखील नाही. या मागची गंमत अशी आहे कि प्रत्येक नगरसेवकाने, आमदाराने खारफुटीमध्ये आपापल्या नावाने झोपडपट्ट्या निर्माण करून ठेवल्या आहेत. या झोपडपट्ट्या अनधिकृत असून सुद्धा त्यांना वीज, पाणी वगैरे सगळे फायदे देऊन प्रत्येक नगरसेवकाने, आमदाराने आपली जागा पक्की करून ठेवली आहे. या सगळ्यांना आपल्या सारख्या सर्वसामान्य मतदाराची गरजच आता नाही आहे.

मी कोण्त्याही पक्षाचा समर्थक नाही आहे. मी एक सामान्य नागरीक म्हणुन जे वाटते ते लिहील आहे. मल वाटत आपण कुठल्या पक्षाचे समर्थक म्हणुन नाही तर तटस्थ नागरीक म्हणुन विचार केला पाहीजे तरच आपल्याला वस्तुस्थीति कळेल. जर विकास राजकारणा चा मुद्दा असेल तर बकिचे अनावश्यक भावनीक मुद्द्यांना महत्वच मिळाल नसत. भारतीय जनतेने आता emotional होन सोडुन logical व्ह्ययला पाहिजे.

In reply to by गोंधळी

तुमचं हे म्हणणं मान्य आहे की लोकांनी विकासा साठीच मतदान करायला पाहिजे. पण दिल्लीत केजरीवाल जिंकले की विकासाला मतदान आणि त्याच दिल्लीत लोकसभेत भाजपा चे खासदार जिंकले की भावनिक मुद्दे, हे योग्य नाही. मद्यप्रदेश, राजस्थान मध्ये पण हेच झालं. विधानसभेला लोकांनी काँग्रेस ला आणि लोकसभेला भाजपा ला मतदान केलं. त्यामुळे जेवढे तटस्थ आपण आपल्याला हवा असलेला पक्ष जिंकला की असतो तेवढेच तटस्थ आपण आपल्याला नको असलेला पक्ष जिंकला तरी असायला हवं.

In reply to by रात्रीचे चांदणे

२०१४ ला मलाही वाट्ल होत की चला वाजपेयीं नंतर कोणीतरी चांगला पं.प्र. देशाला मिळाला. पण दोनच वर्षात त्यांची फेकाफेकी बाहेर यायला लागली. मोठ्या प्रमाणात मार्केटींग करणे व भावनीक मुद्दे हेच मोदी सरकार्चे USP आहेत नाहितर मोदींच्या गुजरात मधे विकास वेडा झाला नसता. आणि २०१९ निवडनुक ही पुलावामा च्या मुद्द्यावर लढवली. २०१४ नंतर भाजपा चा मोदीपा झाला आहे. पण यात मोदींना काय दोष देणार आपली लोकशाहीच तेव्हडी परीपक्व झालेली नाही. त्यामुळे जनतेला अनावश्यक कंगना सार्ख्या मुद्द्यांवर नाचवल जात आहे. आता त्या निवृत्त नौदल अधिकार्‍यास मारहाण झाली. यामध्ये परत सामान्य जनतेलाच त्रास. त्या कंगना ने मुद्दाम शिवसेनेला उचकावल आहे.या मध्ये सामान्य जनतेला पडायची काहिच गरज नव्हती. हे सगळ बिहार निवड्नुकी च्या वातावरण निर्मिती साथी केल जात आहे. कारण विकास आहे कुठे???

In reply to by Gk

सुप्रिम कोर्टाने परवानगी दिल्यावरच ते बांधकाम तोडले होते रे जिक्या. https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/illegal-portion-of-s… दुसरे म्हणजे अनधिक्रुत बांध्कामाची तक्रार अहमदाबाद पालिकेकडे २०१२ साली होती. २०१६ मध्ये नोटिस् दिली होती. व जुले २०१८ मध्ये बांधकाम तोडले. तेव्हा मोदी पंतप्रधान होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कंगनालाही 2018 ला नोटीस दिली होती अन प्रत्येक हगल्या मुतल्याला सुप्रीम कोर्ट पाहिजे तर मग सगळीकडे सुप्रीम कोरटेच काढावीत

In reply to by Gk

४ तासाची नोटिस देउन पाडले ही थापेबाजी होती. हे सांगतेय. ड्रग्ज मुंबईत गेले अनेक वर्षे मिळतात.. हाय प्रोफाईल पार्ट्यंमध्ये ती वाटलीजातात. ही त्याना मिळवून देण्यात मुंबई पोलिसाना 'आपला वाटा' मिळतो. पोलिस-अंडरवर्ल्ड-बोलिवूड अशी ही अभद्र युती आहे. ती मोडून काढण्याचे काम होताना दिसत आहे. त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. सुशांत मृत्यु प्रकरणात मुंबई पोलिसानी काय दिवे लावले ते आपण पाहिले. तपास चोख असता तर हे सगळे टळले असते. ह्या अशा संस्था हगल्या मुतल्यासारखा तपास करतात म्हणून सुप्रिम कोर्टात जायची वेळ येते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुशांत मृत्यु प्रकरणात मुंबई पोलिसानी काय दिवे लावले ते आपण पाहिले.
काय ? हे ड्रग्ज संबंधित मुळात नव्हतंच. त्यामुळे मुंबई पोलिसांवर कितपत दोष मढता येईल ?

In reply to by Gk

कंगना चे बांधकाम तोडल्याबद्दल आक्षेप नाही तर मुंबईत 60000 अनधिकृत बांधकामे आहेत त्याबद्दल महापालिकेने इतकी तत्परत दाखवली नाही आणि येथे 24 तासाच्या आत जे सी बी बुलडोझर आणून बांधकाम तोडल्याबद्दल आहे. हे उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम निकालात स्पष्टपणे म्हटले आहे म्हणजे आम्हाला विरोध कराल तर आम्ही काय करू शकतो याचे शक्तिप्रदर्शन आहे. विरोधाचा आवाज दाबून टाकण्याच्या या वृत्तीबद्दल आक्षेप आहे.

In reply to by सुबोध खरे

एकदा 2018 ला नोटीस दिली की जेसीबी मुन्शीपालतीच्या वेळेनुसार कधीही येईल, तुमच्या मर्जीने जेसीबी यायला ती काय एमबुलन्स आहे ?

In reply to by सुबोध खरे

कंगना चे बांधकाम तोडल्याबद्दल आक्षेप नाही 60000 बांधकामे पाडायची असताना हिचेच का पाडले ? मग आता 60000 जेसीबी एकाच वेळी पाठवायचे ? आणि हा आक्षेप कोर्टाने घेणे हास्यस्पद आहे , कोर्टातही 60000 बलात्कार , फसवणुकीच्या अन पाडापाडीविरोधात कोर्ट केसेस पेंडिंग असतीलच की, मग हिची केस ताबडतोब का घेतली म्हणे ? जशी ही डिस्करीशनरी पॉवर कोर्टाला आहे तशीच बीएमसीलाही असेलच की

In reply to by Gk

एक जेसीबीने एका महिन्यात कमीत कमी १० तरी अनधिक्रुत बांधकामे पाडता येतील. . . . या न्यायाने आतापर्यंत मुंबईतली सारी (किंवा किमान अर्धी तरी) अनधिक्रुत बांधकामे पाडली जायला हवी होती...नै का??? डिस्क्रिशनरी पॉवर जरी असली तरी कामाच्या वेळेत कामच झाले पाहीजे...झोपा काढण्यासाठी डिस्क्रिशनरी पॉवर दिलेली नाही....

In reply to by सॅगी

बिंधास्त अतिक्रमण करा. आणि कारवाई झाला की राज्यपालाला भेटा

In reply to by Gk

माजी सैनिकांना ठोका...आणि ४ तासांत जामिन घ्या...

In reply to by Gk

आणि हा आक्षेप कोर्टाने घेणे हास्यस्पद आहे. रिट अर्ज किंवा रिट अधिकारकक्षा हा उच्च न्यायालयाचा घटनात्मक अधिकार आहे असा अधिकार इतर कोणत्याही संस्थेला नाही अगदी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा. एकदा वाचून पहा Discretionary power तर साध्या वाहतूक पोलिसालासुद्धा असते पण ती पूर्णपणे अधोरेखित आणि मर्यादित असते. अभ्यास वाढवा

कंगना मुंबई ला pok म्हणली तर म्हणू ध्या. Pok हा भाग भारतील किती राज्यांपेक्षा सुंदर आहे.निसर्ग रम्य आहे.

मुंबई महाराष्ट्र ला उपमा दिल्या बद्द्ल. Pok म्हणजे आझाद काश्मीर. आझाद काश्मीर ला स्वतःच पंतप्रधान असतो, आझाद काश्मीर ला स्वतःचे सर्वोच्च न्यायालय आहे. 3.2 billion dollar ची gdp aahe त्यांची. तेथील लोक 100 वर्ष जगतात. कंगना महाराष्ट्र pok बोलली च आहे तर मोदी ना सांगून एवढं बदल करायला सांग. महाराष्ट्र ला पण स्वतःचे सर्वोच्य न्यायालय, महाराष्ट्र च्या मुख्य मंत्री हा महारष्ट्र चा पंतप्रधान असेल अशी सुविधा द्यायला सांग.

नेव्हीमधल्या माणसाला मारले म्हणून नाचत होते, तो इंडियन आर्मी नाही मर्चंट नेव्हीतला आहे. पोस्टमनाला बीएमसीवाला मर्चंट नेव्हीला नेव्हीवाला गांजेडी बाईला वीर राणी इथे कुणाला काय करतील नेम नाही राहिला

In reply to by Gk

इंडियन आर्मी नाही मर्चंट नेव्हीतला आहे.
आर्मी = जमीनीवर युध्द करणारे नेव्ही = पाण्यात/समुद्रात युध्द करणारे फरक समजुन घ्या हो Gk काका

In reply to by Gk

मर्चंट नेव्ही चा नव्हे तर भारतीय नौदलातून निवृत्त झालेले पेटी अधिकारी आहेत ते CHELP(Chief petty officer electrical power) हा हुद्दा होता. त्यांना बेदम मारहाण केल्यामुळे डोळ्यात रक्तस्त्राव झाला आहे. Subconjunctival hemorrhage. त्यासाठी ते नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात भरती झालेले होते.

In reply to by Gk

निरक्षर राजा आणि अडाणी जनता हे आपण आपले स्वत: बद्दल चे केलेले वर्णन एकदम योग्य आहे.आपले कंपांउडरप्रेमी राजे बेताल वक्तव्य करतात आणि आपल्या सारखे अडाणी पाठीराखे कोणताही शहानिशा न करता नाचायला लागतात व नंतर तोंडावर आपटले की पळून जातात..

शिवसेनेला सत्ता कधीही पचत नाही. सत्ता आली की ते माजतात. हे वास्तव आहे, इतिहास आहे. त्यात ही ओरबाडून घेतलेली सत्ता मग काय विचारता.. दोष द्यायला आहेच कॉन्ग्रेस, भाजपा. राष्ट्रवादी नाही ते सध्या अन्नदाते आहेत. पाच वर्ष (किंवा यांनी स्वतः राजकिय आत्महत्या करे पर्यंत) हा तमशा बघण्याव्यतिरिक्त जनता काहीही करु शकत नाही

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

त्यात ही ओरबाडून घेतलेली सत्ता
चोरलेली सत्ता असा एक माफक बदल सुचवतो.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

पण बहुमत युतीला असताना आघाडीवाल्यांच्या पाया पडून दिवसाढवळ्या सत्तेची चोरी केली हे सुचवायचे होते. बाकी तुमच्या मतांशी सहमत आहेच..

In reply to by सॅगी

सुरुवात तर फडणवीसने केली पार्टनरला सत्तेत वाटा दिला नाही ( आणि हे म्हणे तुम्हाला 15 लाख देणार ) राष्ट्रवादी हा दुसरा पार्टनर निवडला. मग तीच खेळी सेनेने केली , पण इथे निदान मुमं पदाबाबत तरी एकवाक्यता आहे.

In reply to by Gk

पार्टनर आता सत्तेत येउन काय उजेड पाडतोय ते दिसतंच आहे....बरं केलं सत्तेत वाटा दिला नाही ते... आणि कमवा की १५ लाख तुमचे तुम्हीच? कोणी अडवलंय??

In reply to by सॅगी

फडणवीस बिहारला गेले , भाषण द्यायला व चिठ्ठ्या वाटायला . आता 5 वर्षात बिहारचा ब्रिस्बेन होईल

In reply to by Gk

चांगलंच आहे की मग

In reply to by सॅगी

Bjp आनि bjp समर्थकांनी हाच अहम बाजूला ठेवला पाहिजे कि सेनेने रडत खडत त्यांच्या मागुन आलेच पाहिजे होते.. जर युती धर्म पाळायचा असला तर तो दोघांनी पाळला पाहिजे.. आणि सेनेचे पुन्हा शुन्य येतील कि जास्त हे जनता उत्तर देईलच. पण त्यांनी भाजपाने जसे म्हणेल तसेच वागले पाहिजे हा अहम कशा साठी? युती करायला bjp च गेली होती ना मातोश्री वरती? त्या आधी शिवसेना वेगळी लढलेली होतीच ना? कितीदा तेच तेच.. म्हणे ओरबाडून, मग कर्नाटक, गोवा येथे ओरबाडलेली नाही का सत्ता bjp ने? आणि काँग्रेस ची लोकं फोडून भर करोना काळात सत्तेचेच डोहाळे मध्य प्रदेश मध्ये लागलेले होतेच कि.. आणि महाराष्ट्राचे बोलायचे झाल्यास, काँग्रेस बरोबर हातमिळवणी शिवसेनेची चूक.. किंवा जूने शिवसैनिक दुखावलेत वगैरे.. मग ज्या राष्ट्रवादीला, काँग्रेस ला भ्रष्ट म्हणताना हयात घालवली, त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने जूने bjp समर्थक दुखावलेत असे का नाही? किती तरी उमेदवार हे मूळचे काँग्रेस राष्ट्रवादी चे होते, मग ते चालते का? अजित पवार बरोबर युती करून, एका दिवसात 9 केसेस बंद केल्यात bjp ने त्याचे काय? तेंव्हा कोणी दुखावत नाही..? त्यामुळे स्वतः नीट असल्यास bjp आणि समर्थकांनी इतरांना बोलावे. नाही तर त्यांनी तरी विकासावर प्रश्न विचारावेत.. उजेड कोणीच पाडला नाहि.. 2014 ला कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र माझा, यातल्या प्रश्नांची उत्तरे 2019 ला निवडणुकीला सामोरे जाताना bjp का देऊ शकली नाही, ह्याचे आपण का काही पाहत नाही? 2019 ची महाराष्ट्र निवडणूक काश्मीर 370 मुद्दयांवर लढवायची काय गरज होती? असो..असे अनेक मुद्दे आहेत.. आजकाल लोकांनी एका पक्षाची पालखी वाहायची ठरवलेली असल्याने त्यांना दुसरे चूकच दिसतात, जे चूक ते चूक, जे बरोबर ते बरोबर हा सारासार विचार जो पर्यंत जनता करणार नाही, तो पर्यंत bjp, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर या असल्या अंध समर्थकांना पुढे रेटून आपल्याला जे पाहिजे तेच करत राहणार.. असो

In reply to by Gk

जुना वाद उकरलाच आहे तर आम्ही पण त्या गावघाणीत लोळून घेऊ म्हणतो... "पार्टनरला सत्तेत वाटा दिला नाही " म्हणजे मुमु पद ना? अरे तुमचे ५६ आणि भाजपचे १२० मग मुमु कसे रे मिळणार...नुसत्या डरकाळ्या का गणित चंद्रावर शिकला ? मग धूर्त काकांनी शिवसेनेचा वाघ ( म्याव करणारा) सोन्यताईंकडे घेऊन नेला आणि "मांडवली केली" ( मध्यलामध्ये पुतण्याने का "रात्रीस खेळ केला " आणि त्याला फडणवीसांपासून मोदी आणि शहा कसे तयार झाले/ गंडले हे २१ वय शतकातले एक गूढ कधी कळणार कोन जाणे.. काकांचीच फूस असे म्हणतात तर असा तमाशा ते करतील असे वाटत नाही...त्यांना भाजपला बाहेरून पाठिंबा देणे तर सहज शक्य होते मग सोनोयताईंचे तोंड पण बघावे लागले नसते पण त्यांनी तसे का केले नाही? खरंच पुतण्याने काकांचा मामा ( १-२ दिवन्संपुरता ) केला काय ?)

In reply to by चौकस२१२

आरोप काय होते हे बघण्याचे तरी कष्ट घ्या बचावला येण्यापूर्वी ! "२.५ वर्ष सेनेचा मुख्यमंत्री असेल, असे अमित शहांनी वचन दिले होते" असा आरोप आहे सेनेचा. त्यात ५६ आणि १२० चा काय हो संबंध ? (आता सेना खोटारडी आणि फडणविस/शहा खर्रेखुर्रे असलं काही नका सांगू. आपल्याला खरं काय माहित नाही हेच खरं आहे.) नाही तुम्हाला तुमच्या पूजनीय नेत्यांचे रक्षण करायचे आहे जरूर करा, पण उगाच उसना आवेश आणून काहीही बोलू नका. बादवे, शिवसेनेचा वाघ म्याव करतो म्हणजे काय ? गुरकावता पाहिजे म्हणजे काय ? हि आताची तोडफोड आणि हाणामारी गुरकावत्या वाघाचीच लक्षणे आहेत. सो मेक अप योर माईंड. हे जे चाललंय ते हवं का नको.

In reply to by शा वि कु

अहो आंधळा बचाव नाही करत आहे, औटघटकेचा सरकार बनवताना "भाजप ने लाज सोडली हे मान्य" करूनच बोलतोय.. ते चुकलंच त्यांचं घाणेरडे वागले ( अजित पवार काय वागले त्या पातळीवर भाजपने कशाला जायचा?).. बाकी मी पाहिलेलंय लोकशाहीत तरी १२०/५६ अश्या परिस्थिती १२० चाचा मुख्य असतो हे साधा गणित आहे. अमित शहाणी खरंच अशी ग्वाही दिली होती का? आणि हे सगळं उघड आधी ठरतेआणि जनतेला कळवले असते ( परिपक्व लोकशाहीत) शिवसेनेला काह्ही करून आपणच मुख्य हे करायचे होते..... आपण तर बुवा सेनाला १० पैकी २ भाजपला १० पैकी ४ आणि द्यायचेच तर राष्ट्रवादीला १० पैकी ७ गन देणार ( ७ एक तर आलेली साधनही त्यांनी वापरली.. त्यात काही चूक नाही निर्लज्ज पण असेल तर तो हाच कि दगाबाजी करणाऱ्याला परत उपमुख्यमंत्रीपद दिला.. पण राष्ट्रवादी पक्ष कुठाय ते तर एक घराणं मग केला पुतण्याला माफ.. जनतेचा काही संबंध नाही ) सेनायचवागाह्चे म्याऊ चा अर्थ असा कि "स्वबाल वैगरे" गर्जणारा वाघ शेवटी काँग्रेस चाय साथीत गेलं म्हणून म्याऊ....उपहासात्मक

In reply to by चौकस२१२

शाह समोर उठा स्पष्ट बोलले होते , की निम्मा वाटा म्हणजे सर्व पदाचे समसमान वाटप ! पूर्वी इथं व्हिडीओ पण डकवले होते, तेव्हा भक्त गण गायब झाले होते. बहुधा गणेशा च्या धाग्यावर चर्चा झाली होती