शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.
1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :
7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :
13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :
19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :
23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :
वाचने
151534
प्रतिक्रिया
523
मिसळपाव
प्रतिक्रिया
( गुगल ची मदत घेतली नाही..
( गुगल ची मदत घेतली नाही.. चुकण्यात जास्त मजा येते.. बरोबर तर सगळे असतात )
1. रंगनाथ पठारे?
( शंकर गुहा नियोगी? )
2. स्टाईल व. पु. काळे वाटते पण गो.नी.दांडेकर आहेत याचे लेखक, बहुतेक
3. वी.स.खांडेकर?
4. व.पु. काळे.
6. पु. ल. देशपांडे.
7. विश्वास पाटील?
थांबा
In reply to ( गुगल ची मदत घेतली नाही.. by गणेशा
लेखकांची वैशिष्ट्ये ( वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत)
हे मी घाईत वाचले नाही..
थांबा बदलतो.. तरी चुकल्या सारखे वाटत होतो..
घाईत असे होते
गणेशा,
तुमच्या पहिल्या प्रतिसादातील व पु वगळता बाकी इथे कोणीही नाही !
यावर एक कडक सलाम !
पुन्हा हे वाचण्या अगोदर
In reply to गणेशा, by हेमंतकुमार
पुन्हा हे वाचण्या अगोदर रिप्लाय दिला..
आता कामाला जातो..
हे आवडले मला पण..
धन्यवाद
नीट करून
( गुगल ची मदत घेतली नाही.. चुकण्यात जास्त मजा येते.. बरोबर तर सगळे असतात )
1. रंगनाथ पठारे.
2. व. पु. काळे ( तेच असणार) मला आधी वाटले होते.. पण निसर्ग म्हणल्यावर बदलले..
3 . पु. ल. देशपांडे.
5. गो नी दांडेकर
6. वी. स. खांडेकर
7. विश्वास पाटील
अंह ..
व. पु. काळे >>>> लेखक बरोबर पण वाक्य २ क्र चे नाही
5. व. पु. काळे
In reply to अंह .. by हेमंतकुमार
5. व. पु. काळे
ऑर्केस्ट्रा चे वाक्य कुठे तरी ऐक सखे किंवा महोत्सव मधले आहे. असे वाटते..
कर्मचारी मध्ये झोपडपट्टी चे वर्णन नाही बहुतेक
धन्यवाद ,
5. व. पु. काळे >>> नाही.
आता नक्की एखादे उत्तर बरोबर येईल !
आता कळाले मला :-) 3 च
In reply to धन्यवाद , by हेमंतकुमार
आता कळाले मला :-) 3 च त्यांच्या टाईप ची होती वाक्य..
चुकायचे पण किती माणसाने..
आता दुसर्यांना देऊ दया त्याचे उत्तर... मला कळाले आहे.. :-))
ऑर्केस्ट्रा साठी त्यांचे नाव
In reply to धन्यवाद , by हेमंतकुमार
ऑर्केस्ट्रा साठी त्यांचे नाव लिहिले कारण
त्यांचे
गायकाने भेसूर असु नये.. आणि श्रोत्याने असुर
हे वाक्य आठवले होते.. तसेच असेल हे वाटले..
म्हणून राहिलेले वाक्य, त्या कामगार वाल्या लेखकाला सोडले :-)))
हे असे होते आल्यावर.. 1 तास गेलाय.. :-))
पण मज्जा आली
6. अरूण साधू ?
6. अरूण साधू ?
(खात्री नाही पण वाक्य वाचल्यापासून हेच नाव मनात येते आहे.)
साहित्यातील अत्युच्च पुरस्कारप्राप्त हे वर्णन अरूण साधू यांचे आहे का?
लेखकांच्या माहितीतील शेवटचे लेखक अनिल अवचट असावेत.
+१
In reply to 6. अरूण साधू ? by पलाश
लेखकांच्या माहितीतील शेवटचे लेखक अनिल अवचट असावेत.>>> होय.
नाहीच !
3 च त्यांच्या टाईप ची होती वाक्य.. >>> नाहीच !
मज्जा येतेच आहे.....
नाही नाही मला म्हणायचं होत
In reply to नाहीच ! by हेमंतकुमार
नाही नाही मला म्हणायचं होत की
त्यांच्या type ची तीनच वाक्य होती, आता 2 झाले , तिसरे मला कळलेलं आहे :-)
पलाश,
अरूण साधू ? >>> इथे नाहीतच .
* साहित्यातील अत्युच्च पुरस्कार >>> यावर शांतपणे विचार करा !
छान प्रयत्न
साहित्यातील अत्युच्च पुरस्कार
In reply to पलाश, by हेमंतकुमार
साहित्यातील अत्युच्च पुरस्कार - ज्ञानपीठ पुरस्कार
पुरस्कारप्राप्त साहित्यिक :१. वि. स. खांडेकर,
२.वि. वा. शिरवाडकर ३.विंदा करंदीकर ४. भालचंद्र नेमाडे ( हे गूगल केल्यावर मिळालं. )
हे प्रसिद्ध शहरी कथालेखक. व. पु. काळे असावेत.
होय,
हे प्रसिद्ध शहरी कथालेखक. व. पु. काळे असावेत. >>> +११.
..आता त्या ४ पैकी एक निवडा !
जरा...
कोडे सोपे करून देतो. आता लेखकांची वैशिष्ट्ये वाक्यांच्या क्रमानुसार आहेत.
१. हे प्रसिद्ध शहरी कथालेखक.
२. सडेतोड व व्यवहारदक्ष म्हणून प्रसिद्ध. साहित्य प्रकाशन मर्यादित
३. यांची विचारधारा कामगारधार्जिणी.
४. स्वतःच्या व्यावसायिक शिक्षणावर चरितार्थ न करता लेखक म्हणून कारकीर्द
५. खूप जंगलप्रेमी.
६. साहित्यातील अत्युच्च पुरस्कारप्राप्त.
७. कथा- कादंबरीपेक्षा नाटकात अधिक रमलेले.
वाक्ये:
In reply to जरा... by हेमंतकुमार
वाक्ये:
१. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या. : व. पु. काळे
२. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो.
३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही. : विजय तेंडूलकर.
४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे.
: अनिल अवचट.
५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी. : व्यंकटेश माडगूळकर.
६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात. : विंदा करंदीकर.
७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.
...
१, ४ व ५ बरोबर.
बाकी नाही.
छान
छान
यातील काहीच माहिती नाहीये त्यामुळे पास
म्हणींची उत्तरे मिळाली नाहीयेत
आता
२,३, ६ व ७ उरलेत.
त्यात एक लेखिका आहे.
यात एक लेखिका असेल तर२.
यात एक लेखिका असेल तर
२. सुनिता देशपांडे (सुनिताबाई)
वा !
२. सुनिता देशपांडे (सुनिताबाई)
अगदी बरोबर ! छान
बहुधा ..
आता कोणी हे उरलेले कोडे सोडवत नसावे.
थोड्या वेळाने सर्व उत्तरे लिहितो.
उत्तरे
१. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या.
वपु
२. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो.
सुनीता देशपांडे
३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.
अनिल बर्वे
४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे.
अ अवचट
५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी.
व्यं. माडगूळकर
६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात.
कुसुमाग्रज
७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.
विजय तेंडूलकर
__^__
In reply to उत्तरे by हेमंतकुमार
__^__
एव्हडे वाचन झालेच नाही आमचे..
नवीन माहितीबद्दल धन्यवाद
नवीन माहितीबद्दल धन्यवाद
धन्यवाद !
धन्यवाद !
आता सहभागींपैकीही कोणीतरी कोडी जरूर द्या.
स्वतः कोडी तयार करण्याची मजा काही औरच असते.
असले तुमच्या कडे तर द्या..
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
असले तुमच्या कडे तर द्या..
मला तर उत्तरे शोधण्यात मज्जा आली होती
लहानपणी आम्ही शोधाशोध खेळ खेळायचो प्रवासात
म्हणजे, आजूबाजूला काहीतरी एखादा शब्द वाचायचा आणि तो दुसर्याला शोधायला सांगायचा. एसटी, एखाद्या मोठ्या गावात बराच वेळ उभी असेल तर किंवा रेल्वे, स्टेशनात उभी असेल तेव्हा हे खेळ निघायचे.
अजून एक, गावाच्या नावाच्या भेंड्या. पान-फूल-फळ हा तीन चार जणांनी वही पेन घेऊन खेळायचा खेळ. वेळ कसा जायचा कळायचं नाही. थोडे अजून मोठे झालो की पेप्रातली शब्दकोडी सोडवायला मज्जा येऊ लागली. पुणे रेल्वे स्टेशनला पहिल्यांदा जेव्हा फक्त शब्दकोड्यांचा पेपर पाहिला होता तेव्हा अलिबाबाला गुहेत खजिना सापडल्यासारखा आनंद झाला होता. नंतर सुडोकूने डोके खाल्ले. आजकाल व्हाट्सअॅपवर येतात कोडी पण त्यात तोचतोचपणा असतो.
इथल्या ह्या कोड्यांनी मजा आणली. धन्यवाद, कुमार१! ___/\__
मी जमले तर एखादे कोडे देतो. :)
सं - दी - प
संदीप, .
In reply to लहानपणी आम्ही शोधाशोध खेळ खेळायचो प्रवासात by चांदणे संदीप
जरूर द्या !
म्हणूनच स्वतः तयार करूयात
नवा खेळ : मराठी गाणी ओळखा.
या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही शब्द जसेच्या तसे दिलेले आहेत. त्याच बरोबर त्या गाण्याशी संबंधित एखाद्या कलाकाराबद्दलची विशेष माहिती दिली आहे.
गाणे ओळखल्यावर त्याचे ध्रुवपद पूर्ण लिहावे. ही सगळी गाणी प्रसिद्ध आणि तुमच्या आमच्या ओठांवर असलेली आहेत.
चला तर मग पटकन ओळखू या…..
१. ते, घर, असेल : याच्या गायिका प्रख्यात असून त्यांच्या नावाने चित्रपट संगीतातील पार्श्वगायकासाठी एक पुरस्कार आहे.
२. हरी, पण, माझ्या : याचे गीतकार दीड महिन्यापूर्वी निवर्तले. त्यांनी सुमारे चार हजार कविता, गाणी लिहिली.
३. चंद्रमा, मनी, भावना : याचे संगीतकार या गाण्याचे सहगायकही आहेत.
४. झाल्या, आता, येशील : याचे गीतकार हरहुन्नरी. त्यांचा ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत आणि नाट्य दिग्दर्शन यांतही संचार.
५. सावळा, ही, शोधिता : याच्या गायिका एकेकाळच्या आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या गायिका. राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त.
६. फुलांनी, आली, ओल्या : याचे गीतकार हे नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध.
७. आलं, गालात : याचे संगीतकार एका ग्रामीण काव्यप्रकारचे गायक म्हणूनही गाजले.
.............................................................................................................
1.
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे
स्वप्नाहून सुंदर घरटे,
मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे
आनंदाची अन् तृप्तीची,
शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की,
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे..
जुळलेले नाते अतुट,घड़े जन्म जन्माची भेट
घेऊनिया प्रीतिची आण,एकरूप होतील प्राण
जुळलेले नाते अतुट,
घड़े जन्मजन्माची भेट
ला ला ला ला
घेऊनिया प्रीतिची आण,एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे
आणि सुगंधा रूप दिसे
जग दोघांचे असे रचू की
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
दृष्ट लागण्याजोगे सारे,
गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे …
नाही !
१ चे उत्तर चूक.
शोधशब्द नीट पाहा.
....
गाणे ओळखल्यावर फक्त त्याचे ध्रुवपद लिहावे, पूर्ण गाणे नको.
तुमच्या धाग्यावर सर्वात
In reply to नाही ! by हेमंतकुमार
तुमच्या धाग्यावर सर्वात चुकणारा मी च असेल
6.
हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली
तारे निळ्या नभांत हे गूज सांगतात
का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस
ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली
तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा
ती रात्र धुंद होती स्वप्नात दंगलेली
( किती दिवसांनी आठवले गाणे.. वा.. मज्जा आली..
Love this song.. जुन्या आठवणी )
+१
वा ! ६ अगदी बरोबर हो.
तुम्हीच म्हटल्याप्रमाणे चुकण्यातच खरी मजा आहे !
छान प्रयत्न.
पहिल्यादा बरोबर आलो मी :-)) :
In reply to +१ by हेमंतकुमार
पहिल्यादा बरोबर आलो मी :-)) :-))
3.
नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी!
दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी
बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी
अननुभूत माधुरी आज गीत गायने
--
आधी तोच आहे चंद्रमा वाटलेले :-))
7.
कुन्या गावाचं आलं पाखरू?
अहो, कुन्या गावाचं आलं पाखरू?
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
हे आपल्याला लहान पणा पासून येते
रंजना ♥️
बरोबर !
गणेशराव, ३ पण अगदी बरोबर !
आता तुम्ही अन्य इच्छुक खेळाडूंसाठी बहुतेक काही बाकी ठेवणार नाही वाटतं.......
थांबतो... बाकीच्यांना पण. मजा
In reply to बरोबर ! by हेमंतकुमार
थांबतो... बाकीच्यांना पण. मजा येऊदे..
गाणी मला म्हणता येत नाही सुरात.. पण ऐकायला मज्जा येते..
आधी घरी रेडिओ असल्याने जुनी marathi गाणी खुप ऐकली जात होती..
कुण्या गावाचं तेंव्हाच...
आता हि मागे रेडिओ आणलाय मी घरी..
बाकीची गाणी इतरां साठी सोडतो.. शोधल्यावर सापडतील..
आणि मी 6 वे गाणे ऐकत..
शब्द मोती वर एक जुनी आठवण लिहितो वेगळी..
हॅटट्रिक !
लागोपाठ तीन गाणी ओळखून गणेशा यांनी हॅटट्रिक केली आहे. अभिनंदन !
आता ते मैदानावरून विश्रांती घेत आहेत याबद्दलही आभार.
...... आठवण जरूर लिहाच
१. ते माझे घर ते माझे घर असेल
१. ते माझे घर ते माझे घर असेल सुंदर. आशा भोसले
२. हात धरि रे हरि पहा पण करात माझ्या वजे कंकण : मधुकर जोशी
३. नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी: सुधीर फडके
४. सखी मंद झाल्या तारका , आता तरी येशील का : सुधीर मोघे
५ निळा सावळा नाथ, तशी ही निळी
५ निळा सावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात।
५. निळा सावळा नाथ तशीही
५. निळा सावळा नाथ तशीही निळीसावळी रात , कोडे पडते तुला शोधीता कृष्णा अंधारात : कुंदा बोकील
सर्व बरोबर
धन्यवाद !
नवा खेळ..
आतापर्यंतच्या कोड्यात असे दिसले की गाण्यांचे कोडे पटकन सोडवून होते. आता पुन्हा एक गाण्यांचेच देतो आहे पण जरा अवघड केले आहे. बघा कसे वाटतंय…….
नवा खेळ : मराठी गाणी ओळखा.
या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही शब्द जसेच्या तसे दिलेले आहेत. त्यानंतर या गाण्यांशी संबंधित एखाद्या कलाकाराबद्दलची विशेष माहिती दिली आहे. ती गाण्यांच्या अनुक्रमानुसार नाही.
मात्र एका गाण्याची जोडी फक्त एकाच वैशिष्ट्याशी जुळली पाहिजे.
गाणे ओळखल्यावर त्याचे ध्रुवपद पूर्ण लिहावे.
चला तर मग पटकन ओळखू या…..
ध्रुवपदातील शब्द :
१. घर, नुसत्या, प्रेम
२. हिच्या, लहरी
३. हाक, नाव
४. जीवनी, पाऊली
५. तू, सांग, जळी
६. नित, मिसळती
७. माझ्या, केल्या
………………………………………
कलाकाराची विशेष माहिती (अनुक्रमानुसार नाही).
• याचे गायक व संगीतकार एकच आहेत.
• याचे संगीतकार जोडीने दोन व्यक्ती आहेत.
• याच्या गायिका अभिनेत्री पण आहेत.
• याच्या गीतकारांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी या प्रकारची गीते लिहिली आहेत.
• याचे गीतकार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते.
• याचे गायक जितेंद्र अभिषेकींचे शिष्य आहेत
• याचे संगीतकार पद्म पुरस्कार विजेते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले.
कुमार सर, दुपार नंतर बघतो
कुमार सर, दुपार नंतर बघतो वेळ काढून..
जाता जाता..
तुमच्या ह्या गाण्यांमुळेच.. काल एक विडंबन लिहिले गेले.. मज्जा आली.
:-)
दुपार नंतर येतो..
गणेशा,
. >>>
जरूर !
पण...
तोपर्यंत दर्दी मंडळी काही बाकी ठेवतात का ते बघू ! :-)
१ घर असावे घरासारखे, नकोत
१ घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
२ रम्य ही स्वर्गाहुनी लंका, हिच्या कीर्तीचा सागर लहरी
नादविती डंका ???
७ अखेरचे येतिल माझ्या, हेच शब्द ओठी
पलाश
१, २, ७ बरोबर.
छान ! हॅटट्रिक !!
६. सजल नयन नित धार बरसती,
६. सजल नयन नित धार बरसती, भावगंध त्या जळी मिसळती
वा !
६ बरोबर....
स्वागत ! आता बहुतेक उरलेले तुम्ही संपवाल ....
४. रजनीगंधा जीवनी या बहरुनि
४. रजनीगंधा जीवनी या बहरुनि आली, मनमीत आला तिच्या पाउली
४ बरोबर !
४ बरोबर !
3 नाविका रे, वारा वाहे रे,
3 नाविका रे, वारा वाहे रे,
डौलाने हाक जरा, आज नाव रे
३ बरोबर
३ बरोबर
मी येई पर्यंत हे solved झाले.
मी येई पर्यंत हे solved झाले.. वाचायला पण छान vatale
पण बरे झाले.. मला जमले नसते असेच वाटत आहे.. :-))
अहो,
५ राहिलंय
बघा जरा ...!
...
मंडळी एव्हाना हत्ती गेलाय आणि फक्त शेपूट राहिलय .
संपवून टाका हे कोडे लवकर.......
५. गर्द सभवती रान साजणी तू तर
५. गर्द सभवती रान साजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी
पलाश,
पलाश,
अगदी बरोबर. तुम्ही शेवटचा विजयी चौकार मारून कोड्याची सांगता केली आहे.
अभिनंदन !
..............................................
सर्व सहभागींचे अभिनंदन !
आपणा सर्व संगीतप्रेमींच्या सहभागाने मजा आली.
यावेळेस क्रम विस्कटून दिला तरीही आपण एका दिवसात कोडे संपवलेत. आनंद वाटला.
धन्यवाद !
धन्यवाद! _/\_
धन्यवाद! _/\_
सांग तू, सांग कधी, सांग सांग भोलानाथ,... अशी सगळी "सांग"गाणी आठवली तरी उत्तर मिळत नव्हतं. अखेर "जळी" शब्दावरून गाणी शोधल्यावर उत्तर मिळालं.
गाणी आठवल्यावर*
In reply to धन्यवाद! _/\_ by पलाश
गाणी आठवल्यावर*
*सध्या शोधणे या क्रियापदाचा गूगल सर्च असा अर्थ व्यवहारात घेतला जातो म्हणून "आठवल्यावर" हे स्पष्ट केलं. :D
“सजल नयन नित धार ...
वरील गाण्यांच्या दोन कोड्यांतील “सजल नयन नित धार बरसती” हे गाणे माझे प्रचंड आवडते आहे. ते मला अक्षरशः वेड लावते.
काल या कोड्यांची सांगता झाल्यावर मी https://www.aathavanitli-gani.com/Song/Sajal_Nayan_Nit_Dhar या ठिकाणी जाऊन ते गाणे मनसोक्त स्वतःशीच म्हणत बसलो. शांताराम नांदगावकर यांच्या या गीताचे शब्द अत्यंत सुंदर आहेत. जरूर ऐका !
+१
In reply to “सजल नयन नित धार ... by हेमंतकुमार
केवळ "सजल"च नाही तर तुम्ही वरच्या यादीत निवडलेली सगळीच गाणी आशयघन आहेत.
एक एक गाणे कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.
पैजारबुवा,
अशोक पत्की....
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
संगीतकार अशोक पत्की यांच्यावर एक छान लेख...
नाटककार ओळखा
नवा खेळ : मराठी नाटककार ओळखा.
प्रत्येकाच्या एका नाटकाचे कथानक/विशेष माहिती थोडक्यात दिली आहे. त्यानंतर या नाटकांच्या लेखकाबद्दलची विशेष माहिती दिली आहे. ती नाटकांच्या अनुक्रमानुसार नाही.
मात्र एका नाटकाची जोडी फक्त एकाच वैशिष्ट्याशी जुळली पाहिजे.
.........
नाटकाचे कथानक/विशेष :
१. शहरातील एक सधन डॉक्टर ध्येयापोटी खेड्यात राहायला येतो. अर्थात हे त्याच्या बायकोला पटलेले नाही. पुढे या संसारात वादळ निर्माण होते.
२. याचा नायक विमा प्रतिनिधी आहे. त्याचा नेटका संसार. उपकथानकात एक वेगळी ‘जोडी’ आणि त्यांचे ‘उद्योग’ आहेत. शोकांतिका.
३. नायक एकापेक्षा अधिक भूमिकांत आहे. त्यातली एक भूमिका समाजातली प्रतिष्ठित तर अन्य एक हीन दर्जाची.
४. मुलीच्या लग्नासाठी जोडे झिजवण्याचा काळ. ते जमत नसल्याने पालकांची होणारी उलघाल व अत्यंत चिडचिड.
५. एका नाटककाराने चांगले नाटक लिहावे म्हणून त्याला आग्रह करणारा निर्माता. मानवी नात्यांच्या तकलादूपणावर भाष्य.
६. नवरा बायकोतील विसंवाद. तो एकदम उच्चशिक्षित आणि लफडेबाज. अशाच एका तरुणीमुळे त्यांच्यात झालेला बेबनाव.
७. एका वृद्ध रुग्णाची शुश्रुषा करणारी व्यक्ती. या दोघांच्या सहवासावर झोत. या नाटकाला सामाजिक, राजकीय आणि आपसातले नातेसंबंध असे अनेक पैलू आहेत.
..........................................................
लेखकाची विशेष माहिती (अनुक्रमानुसार नाही) :
• मानवी मनातील हिंसा बाहेर काढणारे लेखक. वादग्रस्त.
• लेखक व दिग्दर्शक. एका प्रकारच्या लेखनात हातखंडा. समाजकारणात सक्रीय सहभाग.
• हे ‘डॉक्टर’, अभिनेते व लेखकदेखील. मोजके लेखन. रूढ अर्थाने ‘प्रसिद्ध’ नाहीत. या कोडयातले नाटक दमदार.
• अगदी मध्यमवर्गीयांचे आवडते लेखक. प्रसिद्ध. पटकथाकर व स्तंभलेखक देखील.
• प्रख्यात नाटककार. यांचे वडील प्रसिद्ध कवी.
• प्रसिद्ध नाटककार. यांना एका दिग्गज नाटककाराच्या नावाचा मानाचा पुरस्कार.
• अनेक प्रकारचे लेखन. दमदार नाटके. प्रसिद्ध टोपणनावाने वृत्तपत्रलेखन.
नाटके आवडतात, पण खुप
नाटके आवडतात, पण खुप पाहिलेली नाहीत..
त्यामुळे माझा यावेळेस पास..
3. सही रे सही आहे का?
आपली येव्हडीच उडी..
नाही हो !
नाही हो !
आता
उद्या भेटू ..
तोपर्यंत दर्दी लोक उकल करतीलच !
१.श.ना. नवरे
१.श.ना. नवरे
२.वसंत कानेटकर
३.प्र.के.अत्रे
४.विजय तेंडुलकर
५.????
६.प्र.ल.मयेकर
७.डॉ.शिरीष आठवले
३ तो मी नव्हेच प्र के अत्रे
३ तो मी नव्हेच प्र के अत्रे एवढेच महितिये
अरे हा, हे लक्षात आले नाही
In reply to ३ तो मी नव्हेच प्र के अत्रे by Prajakta२१
अरे हा, हे लक्षात आले नाही एकदम..
५.पु ल देशपांडे
५.पु ल देशपांडे
वा !
२, ३, ५ चूक
बाकी बरोबर
म मा,
अभिनंदन !
...
....>>>> चूक.
इथे गन्डायला होणार याची कल्पना होतीच. पण हे नाही.
म्हणजे दुसर्यांच्या उत्तराला
In reply to ... by हेमंतकुमार
म्हणजे दुसर्यांच्या उत्तराला ही बरोबर म्हणालो तरी मी चुकच येतोय.. हे देवा
जरा सोपी कोडी घाला सर. डोकं
जरा सोपी कोडी घाला सर. डोकं भंजाळलं विचार करून करून.
अगदी अगदी...
In reply to जरा सोपी कोडी घाला सर. डोकं by रातराणी
मी हा धागा उघडला होता, मात्र हा वरचा नाटकांविषयीचा प्रश्न वाचून बंद केला =))
हा हा हा ...
In reply to जरा सोपी कोडी घाला सर. डोकं by रातराणी
हा हा हा ...
अहो,
In reply to जरा सोपी कोडी घाला सर. डोकं by रातराणी
7 पैकी 4 म मा यांनी एका फटक्यात सोडवली आहेत.
बघा येणार तुम्हाला !
कोडे अवघड आहे.
कोडे अवघड आहे.
दोन नाटकाची नावे
४. अशी पाखरे येती ( विजय तेंडूलकर)
(बहुदा सई परांजपे यांच्या "कथा" चित्रपटातल्या चाळीत हे नाटक बसवलेले असते.)
७. मित्र (डाॅ. शिरीष आठवले)
वरील
४ व ७ ही उत्तरे म मा यांनी आधीच दिली आहेत.
बरोबर.
अता २, ३, ५ हेच बाकी आहे.
..........................
नाटकांची नावे ओळखायची नाहीत
In reply to वरील by हेमंतकुमार
नाटकांची नावे ओळखायची नाहीत हे लक्षात नाही आलं.
हरकत नाही,
३.
नायक एकापेक्षा अधिक भूमिकांत आहे. त्यातली एक भूमिका समाजातली आदरणीय, तर अन्य एक हीन दर्जाची.>>>>>>
इथे ‘एकापेक्षा अधिक’ म्हणजे कितीही आकडा असू शकतो ! फक्त ‘तीच’ पंचरंगी भूमिका डोक्यात ठेऊ नका.
भर...
५ चे जे नाटककार आहेत, त्यांच्यावर यंदा अनेक प्रसारमाध्यमांतून भरपूर लिहिले गेले.
रत्नाकर मतकरी ?
In reply to भर... by हेमंतकुमार
रत्नाकर मतकरी ?