Skip to main content

शब्दखेळ : विरंगुळा

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 24/05/2020 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 150777
प्रतिक्रिया 523

प्रतिक्रिया

दुपार नंतर येतो.
. >>> जरूर ! पण... तोपर्यंत दर्दी मंडळी काही बाकी ठेवतात का ते बघू ! :-)

१ घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती २ रम्य ही स्वर्गाहुनी लंका, हिच्या कीर्तीचा सागर लहरी नादविती डंका ??? ७ अखेरचे येतिल माझ्या, हेच शब्द ओठी

६ बरोबर.... स्वागत ! आता बहुतेक उरलेले तुम्ही संपवाल ....

मंडळी एव्हाना हत्ती गेलाय आणि फक्त शेपूट राहिलय . संपवून टाका हे कोडे लवकर.......

पलाश, अगदी बरोबर. तुम्ही शेवटचा विजयी चौकार मारून कोड्याची सांगता केली आहे. अभिनंदन ! .............................................. सर्व सहभागींचे अभिनंदन ! आपणा सर्व संगीतप्रेमींच्या सहभागाने मजा आली. यावेळेस क्रम विस्कटून दिला तरीही आपण एका दिवसात कोडे संपवलेत. आनंद वाटला. धन्यवाद !

धन्यवाद! _/\_ सांग तू, सांग कधी, सांग सांग भोलानाथ,... अशी सगळी "सांग"गाणी आठवली तरी उत्तर मिळत नव्हतं. अखेर "जळी" शब्दावरून गाणी शोधल्यावर उत्तर मिळालं.

In reply to by पलाश

गाणी आठवल्यावर* *सध्या शोधणे या क्रियापदाचा गूगल सर्च असा अर्थ व्यवहारात घेतला जातो म्हणून "आठवल्यावर" हे स्पष्ट केलं. :D

वरील गाण्यांच्या दोन कोड्यांतील “सजल नयन नित धार बरसती” हे गाणे माझे प्रचंड आवडते आहे. ते मला अक्षरशः वेड लावते. काल या कोड्यांची सांगता झाल्यावर मी https://www.aathavanitli-gani.com/Song/Sajal_Nayan_Nit_Dhar या ठिकाणी जाऊन ते गाणे मनसोक्त स्वतःशीच म्हणत बसलो. शांताराम नांदगावकर यांच्या या गीताचे शब्द अत्यंत सुंदर आहेत. जरूर ऐका !

In reply to by हेमंतकुमार

केवळ "सजल"च नाही तर तुम्ही वरच्या यादीत निवडलेली सगळीच गाणी आशयघन आहेत. एक एक गाणे कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. पैजारबुवा,

नवा खेळ : मराठी नाटककार ओळखा. प्रत्येकाच्या एका नाटकाचे कथानक/विशेष माहिती थोडक्यात दिली आहे. त्यानंतर या नाटकांच्या लेखकाबद्दलची विशेष माहिती दिली आहे. ती नाटकांच्या अनुक्रमानुसार नाही. मात्र एका नाटकाची जोडी फक्त एकाच वैशिष्ट्याशी जुळली पाहिजे. ......... नाटकाचे कथानक/विशेष : १. शहरातील एक सधन डॉक्टर ध्येयापोटी खेड्यात राहायला येतो. अर्थात हे त्याच्या बायकोला पटलेले नाही. पुढे या संसारात वादळ निर्माण होते. २. याचा नायक विमा प्रतिनिधी आहे. त्याचा नेटका संसार. उपकथानकात एक वेगळी ‘जोडी’ आणि त्यांचे ‘उद्योग’ आहेत. शोकांतिका. ३. नायक एकापेक्षा अधिक भूमिकांत आहे. त्यातली एक भूमिका समाजातली प्रतिष्ठित तर अन्य एक हीन दर्जाची. ४. मुलीच्या लग्नासाठी जोडे झिजवण्याचा काळ. ते जमत नसल्याने पालकांची होणारी उलघाल व अत्यंत चिडचिड. ५. एका नाटककाराने चांगले नाटक लिहावे म्हणून त्याला आग्रह करणारा निर्माता. मानवी नात्यांच्या तकलादूपणावर भाष्य. ६. नवरा बायकोतील विसंवाद. तो एकदम उच्चशिक्षित आणि लफडेबाज. अशाच एका तरुणीमुळे त्यांच्यात झालेला बेबनाव. ७. एका वृद्ध रुग्णाची शुश्रुषा करणारी व्यक्ती. या दोघांच्या सहवासावर झोत. या नाटकाला सामाजिक, राजकीय आणि आपसातले नातेसंबंध असे अनेक पैलू आहेत. .......................................................... लेखकाची विशेष माहिती (अनुक्रमानुसार नाही) : • मानवी मनातील हिंसा बाहेर काढणारे लेखक. वादग्रस्त. • लेखक व दिग्दर्शक. एका प्रकारच्या लेखनात हातखंडा. समाजकारणात सक्रीय सहभाग. • हे ‘डॉक्टर’, अभिनेते व लेखकदेखील. मोजके लेखन. रूढ अर्थाने ‘प्रसिद्ध’ नाहीत. या कोडयातले नाटक दमदार. • अगदी मध्यमवर्गीयांचे आवडते लेखक. प्रसिद्ध. पटकथाकर व स्तंभलेखक देखील. • प्रख्यात नाटककार. यांचे वडील प्रसिद्ध कवी. • प्रसिद्ध नाटककार. यांना एका दिग्गज नाटककाराच्या नावाचा मानाचा पुरस्कार. • अनेक प्रकारचे लेखन. दमदार नाटके. प्रसिद्ध टोपणनावाने वृत्तपत्रलेखन.

नाटके आवडतात, पण खुप पाहिलेली नाहीत.. त्यामुळे माझा यावेळेस पास.. 3. सही रे सही आहे का? आपली येव्हडीच उडी..

१.श.ना. नवरे २.वसंत कानेटकर ३.प्र.के.अत्रे ४.विजय तेंडुलकर ५.???? ६.प्र.ल.मयेकर ७.डॉ.शिरीष आठवले

३ तो मी नव्हेच प्र के अत्रे एवढेच महितिये
....>>>> चूक. इथे गन्डायला होणार याची कल्पना होतीच. पण हे नाही.

In reply to by हेमंतकुमार

म्हणजे दुसर्यांच्या उत्तराला ही बरोबर म्हणालो तरी मी चुकच येतोय.. हे देवा

In reply to by रातराणी

मी हा धागा उघडला होता, मात्र हा वरचा नाटकांविषयीचा प्रश्न वाचून बंद केला =))

कोडे अवघड आहे. दोन नाटकाची नावे ४. अशी पाखरे येती ( विजय तेंडूलकर) (बहुदा सई परांजपे यांच्या "कथा" चित्रपटातल्या चाळीत हे नाटक बसवलेले असते.) ७. मित्र (डाॅ. शिरीष आठवले)

४ व ७ ही उत्तरे म मा यांनी आधीच दिली आहेत. बरोबर. अता २, ३, ५ हेच बाकी आहे. ..........................

३. नायक एकापेक्षा अधिक भूमिकांत आहे. त्यातली एक भूमिका समाजातली आदरणीय, तर अन्य एक हीन दर्जाची. >>>>>> इथे ‘एकापेक्षा अधिक’ म्हणजे कितीही आकडा असू शकतो ! फक्त ‘तीच’ पंचरंगी भूमिका डोक्यात ठेऊ नका.

चे जे नाटककार आहेत, त्यांच्यावर यंदा अनेक प्रसारमाध्यमांतून भरपूर लिहिले गेले.

In reply to by हेमंतकुमार

धन्यवाद. "प्रख्यात नाटककार. यांचे वडील प्रसिद्ध कवी." ह्याचे उत्तर तर वसंत कानेटकर हे निश्चित आहे , मग "वसंत कानेटकर" कोडे २ ऐवजी ३ चे उत्तर आहे का ?

वसंत कानेटकर" कोडे ३ चे उत्तर आहे . सहज, नाटक ओळखाल ?

५ तसे झालेच की. शक्य असल्यास नाटक ? २ च राहिले

फक्त.... हे बाकी २. याचा नायक विमा प्रतिनिधी आहे. त्याचा नेटका संसार. उपकथानकात एक वेगळी ‘जोडी’ आणि त्यांचे ‘उद्योग’ आहेत. शोकांतिका. आणि त्याची जोडी कोणाशी ते तुम्हाला माहितीच आहे. येउद्यात रात्रीपर्यंत !

In reply to by हेमंतकुमार

धन्यवाद. खुप मजा आली आठवताना आणि शोधताना. रत्नाकर मतकरींच्या नाटकाचे नाव काय ?

नाटक आणि नाटककार १. सूर राहू दे : शन्ना नवरे २. महासागर : ज. दळवी ३. अश्रूंची झाली फुले : वसंत कानेटकर ४. अशी पाखरे येती : वि. तेंडुलकर ५. इथं हवय कुणाला प्रेम : मतकरी ६. आसू आणि हसू : प्र ल मयेकर ७. मित्र : डॉ शिरीष आठवले

मित्रहो, आता एक विशेष खेळ. तुम्हाला लेखकच ओळखायचे आहेत, पण हे दुसरे तिसरे कुणी नसून खुद्द आपलेच मिपाकर आहेत ! प्रत्येकाच्या इथल्या संग्राह्य लेखनातून एक निवडक उतारा घेतलाय. त्या शैलीवरून तुम्ही लेखक सहज ओळखाल याची खात्री आहे ! म्हणूनच आता लेखकाचा कुठलाही परिचय देत नाही. अहो, हे सर्व आपले जुने जाणते सहकारीच आहेत. परिचय न दिल्यामुळे कोडे चटकन संपणार नाही असे वाटते. सुरवातीच्या प्रतिसादांवरून ठरवतो. ........................................................................... १. त्याशिवाय महड गावातून पालीकडे जाणारा एक जवळचा रस्ताही त्यांनी सुचवला. त्यांचा शब्द प्रमाण मानुन पळसदरी रस्त्याला लागलो. खरोखरच खड्डे भरलेले होते. एक सांगायचं राहिलं.... बदलापूर कर्जत रस्त्यावर नेहमीप्रमाणेच नेरळच्या आसपास मोराची केकावली मस्त ऐकू आली. दहाच्या आसपास महडला पोचलो. हॉटेल साई गणेश येथे नाश्त्याकरता थांबलो. या हॉटेलचा मालक निव्वळ धन्देवाला नसून एक रसिकही आहे. हॉटेलमध्ये मित्र, बाप, आई, बहिण, कुटुंब अशा अनेक मानवी नात्यांच्या व्याख्या अत्यंत सुंदर, समर्पक स्वरुपात इंग्रजीत लिहिल्या आहेत. नाश्ता आणि सोलकढी यांचा आस्वाद घेतल्यावर हॉटेल मालकाची थोडा सुसंवाद साधला. ................................................................................................. २.

मात्र याचा इफेक्ट उलटा झाला. अचानक दहाबारा कुत्री कुठून आली कळले नाही. "साल्यांनो दिवसा या, दाखवतोच तुम्हाला" मनात विचार आला. फार आक्रमक पद्धतीनं ती कुत्री अंगावर यायच्या बेतात होती. अगदी फुटभर अंतरावरुन जोरजोरात भुंकत होती. मला आता भिती वाटायला लागली होती. सावधगिरी म्हणून मी पाठीवरची सॅक हातात घेतली. माझी सॅक हेच माझे हत्यार. पुढे मागे बघत आपण त्या गावचेच नाही असा विचार करत चालू लागलो. पाळीव कुत्रीही फाटकाच्या आतून भुंकू लागली. मला वाटले एखादा वाचमन वगैरे काठी घेऊन येईल आणि माझी सुटका करेल. पण तसे काही झाले नाही.

...................................................................................................................................................................................... ३. कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण..... एक श्रीलंकेविरूद्धचा सामना सोडला तर आजपर्यंत तरी भारतीय महिलांनी ह्या वेळी चांगली कामगिरी केली आहे. मिताली राज स्वतः एक अप्रतिम फलंदाज आणि एक उत्तम संघनायक तर आहेच पण ह्यावेळी स्मृती मंधाना आणि पूनम राऊत ह्यांच्यामुळे एक उत्तम ओपनिंग पण मिळत आहेच. झूलन गोस्वामी, एकता बिश्त, दिप्ती शर्मा, हरमीत कौर, पूनम यादव, मानसी जोशी आणि शिखा पांडे ह्यांची गोलंदाजी पण बर्‍यापैकी होत आहे. .............................................................................. ४. याच जिममधला एक जबर हसवलेला पण काहीसा डेंजर किस्सा. हेवी बेंचप्रेस करत होतो. त्या दिवशी एकही इन्स्ट्रक्टर नव्हता, दुपारची वेळ होती. तीन चारच जण जिममधे होतो त्यामुळे मी आणि माझा मित्र एकमेकांना स्पॉट करत होतो, सपोर्टला उभे होतो. माझा मित्र बेंचप्रेस करत होता, पन्नास किलो. त्यावेळी रिसेप्शन वर कोण बया होती ठाऊक नाही पण जुनी हिंदी गाणी लावत होती. 'आप जैसा कोई मेरी ज़िंदगी में आए' हे गाणं लावलं होतं. या गाण्यात '...तो बात बन जाए.........' या ओळीनंतर एक 'टू.....' असा आवाज आहे. जिमच्या त्या (गाण्याव्यतिरिक्त) शांततेत बेंचप्रेस मारत असताना हा 'टू..........' आवाज आला .............................................................................. ५.

इथं मला अनेकदा भारतातली खेडी आठवतात. स्त्रिया कमी शिकतात; घरकाम ही त्यांचीच जबाबदारी वगैरे अनेक गोष्टी इथंही दिसतात. इकडे मुलीच्या वडिलांना मुलाकडून पैसे मिळतात; त्यामुळे पैशाच्या लोभाने मुलींना फार लवकर लग्नात अडकवलं जातं. कौटुंबिक अत्याचार आणि आरोग्य असे अनेक प्रश्न त्यातून उद्भवतात. अर्थार्जनाची आधुनिक कौशल्य कमी असल्याने बरेचदा स्त्रिया ‘स्वस्तातल्या कामगार’ असतात. संसदेत आणि विधानसभांमध्ये स्त्रियांची संख्या चांगली आहे (सुमारे ४०%), पण त्या कितपत सक्रीय आहेत ते माहिती नाही. बँका, सरकारी कार्यालयं अशा ठिकाणी स्त्रिया दिसतात आणि सहजतेने वावरतात. चारचाकी चालवणा-या खूप स्त्रिया दिसतात – पण हे फक्त शहरांत.

......................................................................................................................................................... ६. ते बुट होते भारतीय राजकारणाचे , ते बुट होते भारतीय समाजमनाचे . ती एकमात्र निशाणी मागे ठेवून तो लोकनायक परलोकवासी निघाला होता . पुढील काही दशके तरी या नेत्याची , या राष्ट्राला गरज भासणार होती . त्याच्या अशा अकाली जाण्याने राजकारणात कधीही न भरणारी पोकळी निर्माण होणार होती . या घडी नंतर संपूर्ण देश दु:खाच्या खाईत लोटला जाणार होता . या घटनेचा मोहनवर इतका गंभीर परिणाम झाला की , त्या दिवसापासून त्याची वाचा गेली . तो कुणालाही प्रतिसाद देत नाही . त्याचे नैसर्गिक विधींवर पण नियंत्रण राहिले नाही . एकूणच त्याचा संपूर्ण शरीरावरचा ताबा सुटला आहे . नियंत्रणात आहेत ते फक्त डोळे , त्यांना खुप काही सांगायचंय ……………………………………………………………………… ७. स्वयंपाकघर, लिविंग रूम, एक आमची बेडरूम आणि गेस्ट रूम आणि बाथरूम/ टॉयलेट. हे सर्व 3००--३५० स्क्वेर फुट मधे बसविणे हे त्या आर्किटेक्ट्स चं कौशल्य होतं. या सगळ्या घरांना जमिनीवर फरशीच्या जागी तातामी चटाया. या तातामीची जमीन दिसायला फार छान दिसते. जागा वाचवण्यासाठी घरात सगळी सरकणारी दारं असायची. तसेच आमच्या घरी सोफे किंवा झोपायला पलंग हे प्रकार नव्हतेच, ठेवणार कुठे? लिविंग रूम मधे बसायला गाद्या आणि लोडांची भारतीय बैठक आणि बेडरूममधे झोपायला जपानी गाद्या-फूतोन. ………………………………………………………………………………

In reply to by हेमंतकुमार

मी एवढा प्रतिथयश लेखक असुन सुध्दा माझ्या विपुल लेखनातला एकही उतारा न घेतल्या बद्दल सर्वप्रथम कुमार१ सरांचा निषेध... पण उतारे वाचल्यावर काही अंदाज बांधता आले. १. भटक्या खेडवाला ? २. जव्हेरगंज... हो नक्की तेच... ३. कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण. - असे फक्त आमचे मुवि काकाच लिहू शकतात. ७. पदमावती ताई- जपान वरचा लेख बाकीचे पण वाचलेले आहे.. नक्की आठवेल... परत एकदा वाचून बघतो पैजारबुवा,

एकदम बरोबर ! निषेधाचा प्रेमाने स्वीकार ! आता ४, ५, ६ राहिले. आपण निवृत्ती घ्यावी इथून ☺️

In reply to by हेमंतकुमार

एक तर पहिल्यांदा तुम्ही आमच्या आवडत्या खेळपट्टीवर खेळायला उतरलात. याच्या आधी सगळ्या मॅच मधे शुन्यावर आउट व्हावे लागले. आता जरा कुठे शतक करेन म्हटले की तुम्ही रिटायर व्हायला सांगत आहात. ये नाही चॉलबे... तरीपण तुमच्या विनंतीस मान देउन उरलेली उत्तरे पण मिळवतोच पण इथे सांगणार नाही... पैजारबुवा,

एकदम बरोबर अभ्या . कोडे संपले. आता यापुढचे कोडे किमान दोन दिवस टिकेल, असे द्यायची जबाबदारी आताचे सामनावीर ज्ञा पै यांची आहे !

In reply to by हेमंतकुमार

पण डॉक हा प्रकार नको कोड्याचा. कारण तो पॅरा उचलुन गुगल्यात टाकला की लगेच लिंक येते लेखाची. ;) (मी असे केले नाही हे नमूद करतो)

टाळेबंदी विशेष पर्वातील पुढच्या शब्दखेळात आपले स्वागत. आपल्या सर्वांच्या सहभागाने खूप मजा येत आहे. आतापर्यंत आपण भाषा, संगीत, नाट्य, चित्रपट, संस्कृती इत्यादी क्षेत्रात विहार केला. आता घेऊया राजकारण. या नव्या खेळात तुम्हाला भारतीय राजकारणी ओळखायचे आहेत. त्या प्रत्येकाची थोडक्यात माहिती दिली आहे. या लोकांनी त्यांच्या जीवनात विविध टप्प्यांवर केलेल्या भूमिका दिल्या आहेत. ते आज काय आहेत याचा उल्लेख असेलच असे नाही. या खेपेस जोड्या जुळविणे हा प्रकार नाही. व्यक्तींच्या माहितीवरून त्यांना ओळखावे. गरजेनुसार अधिक माहिती वाढवेन. ……………………………… १. व्यावसायिक उच्चशिक्षण. जागतिक स्तरावरील अनेक संस्थांशी संबंधित. राज्य पातळीवर मंत्रीपद नव्हते पण केंद्रात अनेक महत्वाची मंत्रि‍पदे. ‘G 20’ चे ‘शेर्पा’. २. विज्ञानात पदव्युत्तर. शिक्षक. एक महत्वाचे राष्ट्रीय शौर्यपदक. मुख्यमंत्री. राज्यपाल. ३. भाषा व राजकारण या विषयात परदेशातून पदव्युत्तर. लेखक, संपादक, प्रकाशक. पक्षाचे महासचिव. ४. राज्यस्तरावरील एक महत्वाचे मंत्रिपद प्रदीर्घ काळ. वंचित कल्याणाच्या अनेक योजनांत यशस्वी. संयुक्त राष्ट्रसंघाकडून कौतुक. लेखक. ५. कला शाखेत पदव्युत्तर. टोपण नावाने विविध साहित्यलेखन. शिक्षक. दोन राज्यांत मंत्रि‍पदे. केंद्रीय मंत्री. ६. राज्यशास्त्रात पदव्युत्तर. इ-प्रशासनात वाकबगार. न्यायसंस्थेत योगदान. केंद्रीय मंत्री. ७. विज्ञान पदवीधर. दूरसंचार क्षेत्रात नोकरी. महाराष्ट्रातील एका पक्षाच्या तळागाळातून राजकारणास सुरवात. केंद्रीय मंत्री. ..................................................................................

मागच्या वेळेस पाटा विकेट होती. आता तसं नाय. एकेक चेंडू जपून खेळायचा आहे...... :))