Skip to main content

शब्दखेळ : विरंगुळा

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 24/05/2020 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 150777
प्रतिक्रिया 523

प्रतिक्रिया

या खेळात भाग घेतलेल्या सर्वांचेच अभिनंदन आणि धन्यवाद. मजा आली. साधारणपणे सध्या कायप्पावर फिरणारी कोडी ही तशी ‘एक छाप’ प्रकारची असतात. म्हणून इथे कोडी देताना जरा विचार करून वेगळ्या पद्धतीची केली. जरी उत्तर आले नाही, तरी सोडविण्याच्या प्रक्रियेतच मजा येते. इथे भाग घेणारे आपण सर्व भाषादर्दी आहातच. आपणही असे खेळ तयार करून जरूर द्या.

खालील कोड्यातीला सर्व शब्द मु या अक्षराने सुरु होणारे रोजच्या बोलीभाषेतले सोपे मराठी शब्द आहेत. इतके सोपे की कदाचित मला कोणत्याच शब्दाचे उत्तर सांगायची गरज पडणार नाही. तेव्हा नक्की प्रयत्न करा.... मु १ – चेहरे पट्टीची स्वच्छता, सहसा सकाळी उठल्या नंतर करतात मु २ – पुण्यातून वहाणार्‍या दोन नद्या मु ३ – भिजत घालून नंतर भाजलेला तांदूळ मु ४ – ज्ञानदेवांची बहिण मु ५ – वाचा नसलेला, बोलता येत नसलेला मु ६ – उंदीर मु ७ - विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन लिहिणारा मु ८ – किरीट टोप राजाचे शिरस्त्राण मु ९ – सोवळ्यात नेसायचे रेशमी वस्त्र मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख मु ११ – मोठा कळा किंवा कलिका किंवा घोड्याच्या कपाळावर जाईच्या कळीप्रमाणे असलेला भोवरा, मु १२ – जोंधळा किंवा बाजरी यांच्या मध्ये पेरलेले मुग किंवा अशा तर्‍हेचे दुसरे धान्य मु १३ – मोठी मुंगी, डोंगळा मु १४ – उपनयन, व्रतबंध मु १५ – हाताची पाचही बोटे एकत्र केल्यावर होते ती मु १६ – सापांचा शत्रू मु १७ – एका उपनिषदाचे नाव मु १८ – राजकारणी, धुरंधर कारभारी मु १९ – कर्जाऊ दिलेली मूळ रक्कम मु २० – भात एका विशिष्ठ आकारात वाढण्या साठी वापरले जाणारे भांडे मु २१ – मोहोर, शिक्का, छाप मु २२ – विशिष्ठ सांकेतिक खुणेनी लिहून ठेवलेले मुल ध्वनी मु २३ सुळे नसलेला हत्ती मु २४ एकाही शब्द न बोलता केवळ हावभाव आणि शारीरिक हलचाल करून सादर केलेली कथा मु २५ झाडाचा सर्वात खालचा भाग पैजारबुवा,

मु १ – चेहरे पट्टीची स्वच्छता, सहसा सकाळी उठल्या नंतर करतात >>> मुखमार्जन मु ४ – ज्ञानदेवांची बहिण >>> मुक्ताबाई मु ५ – वाचा नसलेला, बोलता येत नसलेला >> मुका मु ६ – उंदीर >>मूषक मु ८ – किरीट टोप राजाचे शिरस्त्राण : मुकुट मु ९ – सोवळ्यात नेसायचे रेशमी वस्त्र >> मुकटा मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख >> मुख्यमंत्री मु १३ – मोठी मुंगी, डोंगळा > मुंगळा मु १४ – उपनयन, व्रतबंध >मुंज मु १५ – हाताची पाचही बोटे एकत्र केल्यावर होते ती > मूठ मु १६ – सापांचा शत्रू >मुंगुस

मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख >> मुख्यमंत्री हे उत्तरही बरोबर आहे पण हे विषेशनाम झाले पण या अर्थाचा दोन अक्षरी शब्द अपेक्षितत होता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख >> मुख्यमंत्री हे उत्तरही बरोबर आहे पण हे विषेशनाम झाले पण या अर्थाचा दोन अक्षरी शब्द अपेक्षितत होता. >> मुख्य ??? १९. मुद्दल ?

१८ मुत्सद्दी २० ? मुदपात्र २१ मूस २३ मुकणा २४ मुकाभिनय

In reply to by हेमंतकुमार

२० चे जरा उत्तर वेगळॅ आहे तुम्ही बरेच जवळ आहात २३ मुकाणा किंवा मुकणा दोन्ही बरोबर आहेत पैजारबुवा,

१७. मुक्तिकोपनिषद ..आता ११ , १२ सांगून टाका ! मग मी पुढचे कोडे देतो.

मु ११ – घोड्याच्या कपाळावर जाईच्या कळीप्रमाणे असलेला भोवरा, मोठा कळा किंवा कलिका – मुकुल मु १२ – जोंधळा किंवा बाजरी यांच्या मध्ये पेरलेले मुग किंवा अशा तर्हेचे दुसरे धान्य – मुगाण मु या शब्दापासून सुरु होणारी दोन उपनिषदे आहेत १ गुरु आणि शिष्य यांच्यातला संवाद असलेले मुंडकोपनिषद आणि दुसरे हनुमान व राम यांच्या संवादातले मुक्तिकोपनिषद सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि आभार पैजारबुवा,

मु १ – चेहरे पट्टीची स्वच्छता, सहसा सकाळी उठल्या नंतर करतात – मुखमार्जन मु २ – पुण्यातून वहाणार्या नद्या- मुळा, मुठा मु ३ – भिजत घालून नंतर भाजलेला तांदूळ – मुरमुरा मु ४ – ज्ञानदेवांची बहिण - मुक्ताबाई मु ५ – वाचा नसलेला, बोलता येत नसलेला – मुका मु ६ – उंदीर – मुषक मु ७ - विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन लिहिणारा – मुकुंदराज मु ८ – किरीट टोप राजाचे शिरस्त्राण – मुकुट मु ९ – सोवळ्यात नेसायचे रेशमी वस्त्र – मुकटा मु १० – अग्रेसर प्रधान किंवा प्रमुख – मुख्य मु ११ – घोड्याच्या कपाळावर जाईच्या कळीप्रमाणे असलेला भोवरा, मोठा कळा किंवा कलिका – मुकुल मु १२ – जोंधळा किंवा बाजरी यांच्या मध्ये पेरलेले मुग किंवा अशा तर्हेचे दुसरे धान्य – मुगाण मु १३ – मोठी मुंगी, डोंगळा – मुंगळा मु १४ – उपनयन, व्रतबंध, - मुंज मु १५ – हाताची पाचही बोटे एकत्र केल्यावर होते ती – मुठ मु १६ – सापांचा शत्रू – मुंगुस मु १७ – एका उपनिषदाचे नाव – मुंडक, मुक्तोपनिषद आणि तिसरे मुद्गल (मु द ग ल) उपनिषद मु १८ – राजकारणी, धुरंधर कारभारी – मुत्सद्दी मु १९ – कर्जाऊ दिलेली मूळ रक्कम – मुद्दल मु २० – भात एका विशिष्ठ आकारात वाढण्या साठी वापरले जाणारे भांडे – मुदाळ मु २१ – मोहोर, शिक्का, छाप – मुद्रा मु २२ – विशिष्ठ सांकेतिक खुणेनी लिहून ठेवलेले मुल ध्वनी - मुळाक्षरे मु २३ सुळे नसलेला हत्ती – मुकाणा मु २४ एकाही शब्द न बोलता केवळ हावभाव आणि शारीरिक हलचाल करून सादर केलेली कथा - मुकनाटय मु २५ झाडाचा सर्वात खालचा भाग – मुळ पैजारबुवा,

खाली प्रत्येक प्रसिद्ध मराठी लेखकाचे एक वाक्य दिलेले आहे. त्यावरून तुम्ही संबंधित लेखक ओळखावा. (लेखक शोधायला मदत म्हणून सर्व लेखकांची काही वैशिष्ट्ये वाक्यांच्या शेवटी देत आहे. अर्थातच ती वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत. एक वैशिष्ट्य एकाच लेखकासाठी आहे). वाक्ये: १. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या. २. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो. ३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही. ४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे. ५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी. ६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात. ७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे. …………….. (इथे ज्यांना खालील माहिती न बघताच उत्तर येत असेल, त्यांनी जरूर द्यावे ! ) ...... ........ लेखकांची वैशिष्ट्ये ( वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत) : • यांची विचारधारा कामगारधार्जिणी. • खूप जंगलप्रेमी. • साहित्यातील अत्युच्च पुरस्कारप्राप्त. • हे प्रसिद्ध शहरी कथालेखक. • सडेतोड व व्यवहारदक्ष म्हणून प्रसिद्ध. साहित्य प्रकाशन मर्यादित. • कथा- कादंबरीपेक्षा नाटकात अधिक रमलेले. • स्वतःच्या व्यावसायिक शिक्षणावर चरितार्थ न करता लेखक म्हणून कारकीर्द. ……………………………………………………

इतके सगळे सुंदर चालले आहे.. आणि इकडे आम्ही कामात प्रचंड busy.. वेळ देता येईना.. शनिवार रविवार साठी पण ठेवा जपून राव धन्यवाद...

In reply to by हेमंतकुमार

अहो, माझे वाचन मर्यादित.. काम खुप असल्याने आता वेळ देता येईना.. आज share मार्केट मुळे काम मागे ठेवले तर 11 वाजतील आज त्याला :-)) काय करणार.. मजबुरी... पण 15 मिनटात दिला प्रतिसाद.. ब्रेक घेऊन.. शब्दांच्या जादूगाराला सलाम :-))

( गुगल ची मदत घेतली नाही.. चुकण्यात जास्त मजा येते.. बरोबर तर सगळे असतात ) 1. रंगनाथ पठारे? ( शंकर गुहा नियोगी? ) 2. स्टाईल व. पु. काळे वाटते पण गो.नी.दांडेकर आहेत याचे लेखक, बहुतेक 3. वी.स.खांडेकर? 4. व.पु. काळे. 6. पु. ल. देशपांडे. 7. विश्वास पाटील?

In reply to by गणेशा

लेखकांची वैशिष्ट्ये ( वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत) हे मी घाईत वाचले नाही.. थांबा बदलतो.. तरी चुकल्या सारखे वाटत होतो.. घाईत असे होते

तुमच्या पहिल्या प्रतिसादातील व पु वगळता बाकी इथे कोणीही नाही !
गुगल ची मदत घेतली नाही.. चुकण्यात जास्त मजा येते.. बरोबर तर सगळे असतात )
यावर एक कडक सलाम !

In reply to by हेमंतकुमार

पुन्हा हे वाचण्या अगोदर रिप्लाय दिला.. आता कामाला जातो.. हे आवडले मला पण.. धन्यवाद

( गुगल ची मदत घेतली नाही.. चुकण्यात जास्त मजा येते.. बरोबर तर सगळे असतात ) 1. रंगनाथ पठारे. 2. व. पु. काळे ( तेच असणार) मला आधी वाटले होते.. पण निसर्ग म्हणल्यावर बदलले.. 3 . पु. ल. देशपांडे. 5. गो नी दांडेकर 6. वी. स. खांडेकर 7. विश्वास पाटील

In reply to by हेमंतकुमार

5. व. पु. काळे ऑर्केस्ट्रा चे वाक्य कुठे तरी ऐक सखे किंवा महोत्सव मधले आहे. असे वाटते.. कर्मचारी मध्ये झोपडपट्टी चे वर्णन नाही बहुतेक

In reply to by हेमंतकुमार

आता कळाले मला :-) 3 च त्यांच्या टाईप ची होती वाक्य.. चुकायचे पण किती माणसाने.. आता दुसर्यांना देऊ दया त्याचे उत्तर... मला कळाले आहे.. :-))

In reply to by हेमंतकुमार

ऑर्केस्ट्रा साठी त्यांचे नाव लिहिले कारण त्यांचे गायकाने भेसूर असु नये.. आणि श्रोत्याने असुर हे वाक्य आठवले होते.. तसेच असेल हे वाटले.. म्हणून राहिलेले वाक्य, त्या कामगार वाल्या लेखकाला सोडले :-))) हे असे होते आल्यावर.. 1 तास गेलाय.. :-)) पण मज्जा आली

6. अरूण साधू ? (खात्री नाही पण वाक्य वाचल्यापासून हेच नाव मनात येते आहे.) साहित्यातील अत्युच्च पुरस्कारप्राप्त हे वर्णन अरूण साधू यांचे आहे का? लेखकांच्या माहितीतील शेवटचे लेखक अनिल अवचट असावेत.

3 च त्यांच्या टाईप ची होती वाक्य.. >>> नाहीच ! मज्जा येतेच आहे.....

In reply to by हेमंतकुमार

नाही नाही मला म्हणायचं होत की त्यांच्या type ची तीनच वाक्य होती, आता 2 झाले , तिसरे मला कळलेलं आहे :-)

अरूण साधू ? >>> इथे नाहीतच . * साहित्यातील अत्युच्च पुरस्कार >>> यावर शांतपणे विचार करा ! छान प्रयत्न

In reply to by हेमंतकुमार

साहित्यातील अत्युच्च पुरस्कार - ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कारप्राप्त साहित्यिक :१. वि. स. खांडेकर, २.वि. वा. शिरवाडकर ३.विंदा करंदीकर ४. भालचंद्र नेमाडे ( हे गूगल केल्यावर मिळालं. ) हे प्रसिद्ध शहरी कथालेखक. व. पु. काळे असावेत.

हे प्रसिद्ध शहरी कथालेखक. व. पु. काळे असावेत. >>> +११. ..आता त्या ४ पैकी एक निवडा !

कोडे सोपे करून देतो. आता लेखकांची वैशिष्ट्ये वाक्यांच्या क्रमानुसार आहेत. १. हे प्रसिद्ध शहरी कथालेखक. २. सडेतोड व व्यवहारदक्ष म्हणून प्रसिद्ध. साहित्य प्रकाशन मर्यादित ३. यांची विचारधारा कामगारधार्जिणी. ४. स्वतःच्या व्यावसायिक शिक्षणावर चरितार्थ न करता लेखक म्हणून कारकीर्द ५. खूप जंगलप्रेमी. ६. साहित्यातील अत्युच्च पुरस्कारप्राप्त. ७. कथा- कादंबरीपेक्षा नाटकात अधिक रमलेले.

In reply to by हेमंतकुमार

वाक्ये: १. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या. : व. पु. काळे २. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो. ३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही. : विजय तेंडूलकर. ४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे. : अनिल अवचट. ५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी. : व्यंकटेश माडगूळकर. ६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात. : विंदा करंदीकर. ७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.

छान यातील काहीच माहिती नाहीये त्यामुळे पास म्हणींची उत्तरे मिळाली नाहीयेत

२. सुनिता देशपांडे (सुनिताबाई) अगदी बरोबर ! छान

आता कोणी हे उरलेले कोडे सोडवत नसावे. थोड्या वेळाने सर्व उत्तरे लिहितो.

१. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या. वपु २. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो. सुनीता देशपांडे ३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही. अनिल बर्वे ४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे. अ अवचट ५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी. व्यं. माडगूळकर ६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात. कुसुमाग्रज ७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे. विजय तेंडूलकर

धन्यवाद ! आता सहभागींपैकीही कोणीतरी कोडी जरूर द्या. स्वतः कोडी तयार करण्याची मजा काही औरच असते.

म्हणजे, आजूबाजूला काहीतरी एखादा शब्द वाचायचा आणि तो दुसर्‍याला शोधायला सांगायचा. एसटी, एखाद्या मोठ्या गावात बराच वेळ उभी असेल तर किंवा रेल्वे, स्टेशनात उभी असेल तेव्हा हे खेळ निघायचे. अजून एक, गावाच्या नावाच्या भेंड्या. पान-फूल-फळ हा तीन चार जणांनी वही पेन घेऊन खेळायचा खेळ. वेळ कसा जायचा कळायचं नाही. थोडे अजून मोठे झालो की पेप्रातली शब्दकोडी सोडवायला मज्जा येऊ लागली. पुणे रेल्वे स्टेशनला पहिल्यांदा जेव्हा फक्त शब्दकोड्यांचा पेपर पाहिला होता तेव्हा अलिबाबाला गुहेत खजिना सापडल्यासारखा आनंद झाला होता. नंतर सुडोकूने डोके खाल्ले. आजकाल व्हाट्सअ‍ॅपवर येतात कोडी पण त्यात तोचतोचपणा असतो. इथल्या ह्या कोड्यांनी मजा आणली. धन्यवाद, कुमार१! ___/\__ मी जमले तर एखादे कोडे देतो. :) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

जरूर द्या !
आजकाल व्हाट्सअ‍ॅपवर येतात कोडी पण त्यात तोचतोचपणा असतो.
म्हणूनच स्वतः तयार करूयात

या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही शब्द जसेच्या तसे दिलेले आहेत. त्याच बरोबर त्या गाण्याशी संबंधित एखाद्या कलाकाराबद्दलची विशेष माहिती दिली आहे. गाणे ओळखल्यावर त्याचे ध्रुवपद पूर्ण लिहावे. ही सगळी गाणी प्रसिद्ध आणि तुमच्या आमच्या ओठांवर असलेली आहेत. चला तर मग पटकन ओळखू या….. १. ते, घर, असेल : याच्या गायिका प्रख्यात असून त्यांच्या नावाने चित्रपट संगीतातील पार्श्वगायकासाठी एक पुरस्कार आहे. २. हरी, पण, माझ्या : याचे गीतकार दीड महिन्यापूर्वी निवर्तले. त्यांनी सुमारे चार हजार कविता, गाणी लिहिली. ३. चंद्रमा, मनी, भावना : याचे संगीतकार या गाण्याचे सहगायकही आहेत. ४. झाल्या, आता, येशील : याचे गीतकार हरहुन्नरी. त्यांचा ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत आणि नाट्य दिग्दर्शन यांतही संचार. ५. सावळा, ही, शोधिता : याच्या गायिका एकेकाळच्या आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या गायिका. राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त. ६. फुलांनी, आली, ओल्या : याचे गीतकार हे नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध. ७. आलं, गालात : याचे संगीतकार एका ग्रामीण काव्यप्रकारचे गायक म्हणूनही गाजले. .............................................................................................................

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे आनंदाची अन्‌ तृप्तीची, शांत सावली इथे मिळे जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे.. जुळलेले नाते अतुट,घड़े जन्म जन्माची भेट घेऊनिया प्रीतिची आण,एकरूप होतील प्राण जुळलेले नाते अतुट, घड़े जन्मजन्माची भेट ला ला ला ला घेऊनिया प्रीतिची आण,एकरूप होतील प्राण सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे …

१ चे उत्तर चूक. शोधशब्द नीट पाहा. .... गाणे ओळखल्यावर फक्त त्याचे ध्रुवपद लिहावे, पूर्ण गाणे नको.

हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली तारे निळ्या नभांत हे गूज सांगतात का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा ती रात्र धुंद होती स्वप्नात दंगलेली ( किती दिवसांनी आठवले गाणे.. वा.. मज्जा आली.. Love this song.. जुन्या आठवणी )

वा ! ६ अगदी बरोबर हो. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे चुकण्यातच खरी मजा आहे ! छान प्रयत्न.

नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी! दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी अननुभूत माधुरी आज गीत गायने -- आधी तोच आहे चंद्रमा वाटलेले :-))

कुन्या गावाचं आलं पाखरू? अहो, कुन्या गावाचं आलं पाखरू? बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात हे आपल्याला लहान पणा पासून येते रंजना ♥️

गणेशराव, ३ पण अगदी बरोबर ! आता तुम्ही अन्य इच्छुक खेळाडूंसाठी बहुतेक काही बाकी ठेवणार नाही वाटतं.......

In reply to by हेमंतकुमार

थांबतो... बाकीच्यांना पण. मजा येऊदे.. गाणी मला म्हणता येत नाही सुरात.. पण ऐकायला मज्जा येते.. आधी घरी रेडिओ असल्याने जुनी marathi गाणी खुप ऐकली जात होती.. कुण्या गावाचं तेंव्हाच... आता हि मागे रेडिओ आणलाय मी घरी.. बाकीची गाणी इतरां साठी सोडतो.. शोधल्यावर सापडतील.. आणि मी 6 वे गाणे ऐकत.. शब्द मोती वर एक जुनी आठवण लिहितो वेगळी..

लागोपाठ तीन गाणी ओळखून गणेशा यांनी हॅटट्रिक केली आहे. अभिनंदन ! आता ते मैदानावरून विश्रांती घेत आहेत याबद्दलही आभार. ...... आठवण जरूर लिहाच

१. ते माझे घर ते माझे घर असेल सुंदर. आशा भोसले २. हात धरि रे हरि पहा पण करात माझ्या वजे कंकण : मधुकर जोशी ३. नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी: सुधीर फडके ४. सखी मंद झाल्या तारका , आता तरी येशील का : सुधीर मोघे

आतापर्यंतच्या कोड्यात असे दिसले की गाण्यांचे कोडे पटकन सोडवून होते. आता पुन्हा एक गाण्यांचेच देतो आहे पण जरा अवघड केले आहे. बघा कसे वाटतंय……. नवा खेळ : मराठी गाणी ओळखा. या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही शब्द जसेच्या तसे दिलेले आहेत. त्यानंतर या गाण्यांशी संबंधित एखाद्या कलाकाराबद्दलची विशेष माहिती दिली आहे. ती गाण्यांच्या अनुक्रमानुसार नाही. मात्र एका गाण्याची जोडी फक्त एकाच वैशिष्ट्याशी जुळली पाहिजे. गाणे ओळखल्यावर त्याचे ध्रुवपद पूर्ण लिहावे. चला तर मग पटकन ओळखू या….. ध्रुवपदातील शब्द : १. घर, नुसत्या, प्रेम २. हिच्या, लहरी ३. हाक, नाव ४. जीवनी, पाऊली ५. तू, सांग, जळी ६. नित, मिसळती ७. माझ्या, केल्या ……………………………………… कलाकाराची विशेष माहिती (अनुक्रमानुसार नाही). • याचे गायक व संगीतकार एकच आहेत. • याचे संगीतकार जोडीने दोन व्यक्ती आहेत. • याच्या गायिका अभिनेत्री पण आहेत. • याच्या गीतकारांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी या प्रकारची गीते लिहिली आहेत. • याचे गीतकार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते. • याचे गायक जितेंद्र अभिषेकींचे शिष्य आहेत • याचे संगीतकार पद्म पुरस्कार विजेते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले.

कुमार सर, दुपार नंतर बघतो वेळ काढून.. जाता जाता.. तुमच्या ह्या गाण्यांमुळेच.. काल एक विडंबन लिहिले गेले.. मज्जा आली. :-) दुपार नंतर येतो..