Skip to main content

शब्दखेळ : विरंगुळा

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 24/05/2020 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 150776
प्रतिक्रिया 523

प्रतिक्रिया

३ शी गन्डायला होईल हे बरोबर. ३ मंत्री नव्हते. सर्व मुद्दे जुळले पाहिजेत.

आता जे उरलेत त्यापैकी.... एक मराठी माणूस, एक एका छोट्या राज्यात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला नेता, आणि एक केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे.

२. आनंदीबेन पटेल ? >>> अगदी बरोबर , मस्त ! आता पुढची फलंदाजी तुम्ही जोरात कराल .... :-)))

3.प्रकाश करात >> अगदी बरोबर , मस्त ! या उत्तराबद्दल तुम्हाला एक पदक ! .................................... ४, ५, ७ राहिले.

आता जे उरलंय त्याचे सूत्र नीट वाचा. त्यात मेख आहे.

४. राज्यस्तरावरील एक महत्वाचे मंत्रिपद प्रदीर्घ काळ. वंचित कल्याणाच्या अनेक योजनांत यशस्वी. संयुक्त राष्ट्रसंघाकडून कौतुक. लेखक.


In reply to by हेमंतकुमार

४ ही हयात व्यक्ती आहे.

मेख इथेआहे : ४. राज्यस्तरावरील एक महत्वाचे मंत्रिपद प्रदीर्घ काळ.

In reply to by हेमंतकुमार

राज्यस्तरावरील महत्वाचे मंत्रीपद म्हणजे मुख्यमंत्रीपद अपेक्षीत असेल तर,उत्तर नवीन पटनायक असावे बहुधा!

सर्वांना धन्यवाद ! .............................. आतापर्यंतच्या खेळांत भाषा, संस्कृती आणि राजकारण घेऊन झाले. आता वळूयात क्रीडा क्षेत्राकडे. इथे तुम्हाला भारतीय क्रीडापटू ओळखायचे आहेत. या प्रत्येकाचा अल्पपरिचय व कारकीर्दीतील टप्पे दिले आहेत. ते भारतीय संघात आजी किंवा माजी असू शकतात. निवडलेल्या खेळांमध्ये क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती आणि मैदानी व्यायामाच्या खेळांचा समावेश आहे. या प्रत्येक खेळाचा एकच खेळाडू यादीत आहे. उत्तर देताना सर्व वैशिष्ट्ये जुळली पाहिजेत. १. वडिलांकडून हॉकीचा वारसा पण स्वतः बंदिस्त जागेतील खेळ स्वीकारला. राष्ट्रकुल स्पर्धेत सहकाऱ्यासमवेत सुवर्णपदक. २. दक्षिण भारतात जन्म. चेंडू आणि एक साधन यांनी खेळायचा “सेट्स” वाला मैदानवरील खेळ. पद्म पुरस्कार. या खेळाच्या अंतरराष्ट्रीय महास्पर्धेत दुहेरीत विजय मिळवणारा पहिला भारतीय. या खेळाच्या लीगची स्थापना केली. ३. इंजिनीयर. शरीराच्या एका अवयववैशिष्ट्यावरून टोपणनाव पडले. भारतीय संघाकडून काही विक्रम. हसतमुख. पद्म पुरस्कार. ४. फक्त चेंडूनेच खेळायचा मैदानी खेळ. दोघेही पालक व सासरे याच खेळातील राष्ट्रीय खेळाडू. पद्म पुरस्कार. ५. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात जन्म. मैदानी खेळ. अर्जुन पुरस्कार. ६. स्टिकने ‘गोल’ करायचा खेळ. भारतीय संघात पिछाडीवर छान कामगिरी. पद्म पुरस्कार. माजी लोकप्रतिनिधी. व्यक्तीचे भाऊ पण खेळाडू. ७. आपले शरीर सोडून कुठलेच साधन न लागणारा खेळ. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक. जोडीदार पण हाच खेळ खेळतो. सरकारी नोकरी. ……………………………………………………………

बरोबर ! तुमची जोडी आता डाव फटकन संपवणार वाटते !

केदार जाधव! (क्रिकेटचे कोडे कुठले हे कळू नये,यासाठीची गुगली मी ओळखलीय बहुतेक!)

3. राहुल द्रविड वाटतोय.. पण तो इंजिनियर नाहीये.. आणि अवयवा वरून नाही शैली वरून the वॉल नाव पडले होते.. आपला आवडता test क्रिकेटर.. सच्या बरोबर हा पण खुप आवडायचा.. चूक तर चूक :-))

In reply to by गणेशा

3. राहुल द्रविड वाटतोय.. पण तो इंजिनियर नाहीये.. >>> चूक. म्हणूनच इंजिनियर दिलयं....

केदारचा जन्म पुण्यातला आहे !!! ५ हा साधने लागणारा मैदानी खेळ आहे

६ चूक. धनराज? लोकप्रतिनिधी नव्हते. खेळाच्या पदाकावरून गुगल सहज होते. म्हणून थोडी अवांतर माहिती वाढवली आहे. ... जर सचिन, राहुल हे कोड्यात घेतले तर ते कोडेच राहत नाही !

In reply to by हेमंतकुमार

प्रशंसनीय आहे. शोधाशोध करतानाही, उत्तर नाहीच मिळाले तरी बरीच ईतर माहिती सापडते!

३. इंजिनीयर. शरीराच्या एका अवयववैशिष्ट्यावरून टोपणनाव पडले. भारतीय संघाकडून काही विक्रम. हसतमुख. पद्म पुरस्कार. अनिल कुंबळे.

In reply to by पलाश

हा असेल तर मी शोधलेले पण सांगता आला नाही असे वाटते.. कारण राहुल द्रविड आठवला.. कि इंजिनियर असणारे अनिल आणि जवागल श्रीनाथ आठवलेच.. पण अनिल कुंबळे ला अवयवावरून काय नाव होते? म्हणुन मी पार prasanna, बेदि पण आठवले.. आता पुन्हा काम खुप असल्याने तिकडे जातोय.. कुमार सर भेटू निवांत पुढच्या कुठल्याश्या कोड्यात...

तीन बरोबर. पलाश यांचा जोरदार षटकार ! सात : उत्तराच्या अगदी जवळ आला आहात. विकी वरील माहिती नुसार गीता सरकारी नोकरीत नसावी गणेशा , जरूर !

In reply to by हेमंतकुमार

कुंबळे गोलंदाजी करत असताना,अचानक उसळलेल्या चेंडूस सिद्धू 'जम्बो जेट' म्हणाला होता.त्यातून जेट मागे पडला नी 'जम्बो' हे टोपणनाव राहिले,असे वाचले आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

५. कविता राउत...>>> पर्यायी उत्तर म्हणून बरोबर. माझे 'ललिता बाबर' होते.

बबिता पण सरकारी नोकरीत नसावी. ‘गीता’ चे कुटुंब नीट बघा ! तिच्यापाशीच उत्तर मिळेल. ६ बरोबर ! हे कडक उत्तर !!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बबिता कुमारी फोगाट माझ्या महिती प्रमाणे हरियाणा पोलीस मधे होती असे वाचावे. पैजारबुवा,

आता असे बघू .. ७ 'स्त्री' नसेल तर.. असा विचार करा ! विकीनुसार ७ सध्या नोकरीत आहे.

७. पवन कुमार (गीता फोगाटचा नवरा ) सर्वांना धन्यवाद. ........................... क्रीडा कोडे तयार करतानाचे काही अनुभव. १. जर खेळाचे नाव, स्पर्धा आणि पदक हे लिहिले तर एक मिनिटात गुगल उत्तर देणार. २. मग पुरस्काराकडे लक्ष देऊ लागलो. तर लक्षात आले, की अर्जुन काय किंवा पद्म काय, हे पुरस्कार भरपूर मंडळींना आहेत ! ३. आता खेळाडू आमदार किंवा खासदार झालेले बघू लागलो, तर तिथेही बरीच मोठी यादी दिसते. ४. मग शेवटी एखाद्या खेळाडू खरोखर वैशिष्ट्य काय राहील ? काहींच्या बाबतीत पुस्तकी शिक्षण तर काहींच्या बाबतीत कौटुंबिक माहिती. ..... अशा प्रकारे कोडेनिर्मात्याची बरीच मानसिक घुसळण होते. आपल्या मनातील उत्तराला एखादे तसेच पर्यायी उत्तर पण निघू शकते. पण तुमच्या सर्वांच्या सहभागाने तेवढीच मजा येते. आनंद मिळतो. धन्यवाद !

मित्रहो, आतापर्यंतच्या खेळांमध्ये गाणी ओळखणे हा सर्वात लोकप्रिय प्रकार ठरला आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येतोय मराठी गाणी ओळखण्याचा हा खेळ. या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही मोजक्या शब्दांचे समानार्थी किंवा भावार्थी शब्द दिले आहेत. तसेच ध्रुवपदातील एकूण शब्दांची संख्या देखील कंसात दिली आहे. आता या माहितीवरून तुम्हाला त्या गाण्याचे पूर्ण ध्रुवपद ओळखायचे आहे. उत्तराची शब्दसंख्या सूत्राशी तंतोतंत जुळली पाहिजे. मला खात्री आहे की आपल्यातील दर्दी लोक हा खेळ पटदिशी सोडवतील ! …………………… १. निघताना, समजले, पिडले (१२) २. जमिनीत, फिरते, मेघ (११) ३. सांगायचे, नाही, मापणार (११) ४. लाडका, मुक्त (१०) ५. विशेष, सगळा, चांदणी (१५) ६. हातावर, अंतरी, स्वीकारते (११) ७. दिवा, शरीर, मिळाला (१२) ..................................................................

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

काळ्या मातीत मातीत तिफन चालते ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग राजसा किती दिसात, लाभला निवांत संग

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा

एकदम षटकार, तोही मैदानाबाहेर !!! आता आपण निवृत्त व्हावे ....