✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुलवामा : काही प्रश्न

ग
गामा पैलवान यांनी
Fri, 02/15/2019 - 19:00  ·  लेख
लेख
लोकहो, काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत. १. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते. ४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय? ५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय? झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील? ६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=147 यांत ते म्हणतात की ३ पातळ्यांवर संरक्षणकार्य चालतं. क. निव्वळ बचाव : यांत शत्रू आक्रमक असतो व आपण फक्त बचाव करतो. च. आक्रमक बचाव : यांत भारत आक्रमणाचं मूळ सक्रीयपणे नष्ट करतो. पण आक्रमकांचं मूळ तसंच राहतं. ट. उघड आक्रमण : यांत भारत आक्रमकांवर प्रत्याक्रमण करून त्यांना नष्ट करतो. या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल? असो. जाणकारांनी कृपया उत्तरे सुचवावीत. तसेच अधिक प्रश्न जरूर विचारावेत. धन्यवाद! आपला नम्र, -गामा पैलवान
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
184618 वाचन

💬 प्रतिसाद (193)

प्रतिक्रिया

कोणत्यातरी बोकड

शब्दबम्बाळ
Mon, 02/25/2019 - 11:01 नवीन
कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते
अरेरे सरकार आता खरे साहेबानी डिक्लेर केलेल्या अश्या प्रेस्टिट्यूटने दिलेल्या बातम्यांचा विचार करून निर्णय घ्यायला लागले! आता कसं व्हायचं?! व्हात्साप्प ग्रुपवरती माहिती मिळाली नाही वाटत यावेळेस?? बाकी तुम्हीच खाली लिहिलेलं पटलं बुआ आपल्याला
बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे.
मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत
येऊ द्या हं नीट लक्षात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पुलवामा हल्ल्याचा काश्मिरियतशी कसलाही संबंध नाही

गामा पैलवान
Wed, 02/20/2019 - 18:35 नवीन
लोकहो, पुलवामा हल्ल्याचा काश्मिरियतशी कसलाही संबंध नाही. मसूद अझरचा भाऊ अब्दुल रौफ अजगर याने आत्मघातकी आक्रमणाची धमकी दिल्याची चित्रफीत समोर आली आहे. यामध्ये त्याने ‘जर मोदी सरकारने अयोध्येत राममंदिर उभारण्याचा प्रयत्न केला, तर आत्मघातकी आक्रमणे करू’, अशी धमकी दिली आहे. संदर्भ : https://sanatanprabhat.org/marathi/219206.html अधिक माहिती : https://mumbaimirror.indiatimes.com/news/india/pulwama-attack-nine-days-before-the-attack-jems-abdul-rauf-asghar-vowed-to-terrify-delhi/articleshow/68022324.cms पाकिस्तानात ५ फेब्रुवारी हा काश्मीर दिवस पाळला जातो. त्याचं चलचित्र : https://www.youtube.com/watch?v=ENOPIhZQFQA उपरोक्त चलचित्रात भारत मुर्दाबाद स्पष्टपणे म्हंटलं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

काश्मिरी तियेशी संबंध नाही हे खरं आसेल तर डिफेन्स सुधा बदलावा ला

Rajesh188
Wed, 02/20/2019 - 19:44 नवीन
काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो . मग डिफेन्स सुधा फक्त काश्मीर मध्ये करून चालणार नाही पूर्ण देशात आशा कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल
  • Log in or register to post comments

अलबत

ट्रेड मार्क
Wed, 02/20/2019 - 23:26 नवीन
काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो नक्कीच बनवायचा आहे. फक्त भारतच नव्हे तर समस्त जग मुस्लिम नेशन झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. गझवा-ए-हिंद म्हणजे काय हे विशद करून सांगणारा हा व्हिडिओ बघाच ही विनंती आहे. फक्त ६-७ मिनिटांचाच आहे त्यामुळे फार वेळ वाया जाणार नाही. पूर्वापार हिंदुस्थानवर होत असलेली मध्यपूर्वेकडून होणारी आक्रमणे ही याची साक्षीदार आहेत की हे फक्त प्रदेश काबीज करण्यासाठी नसून धार्मिक आक्रमण होते. हल्ले करून देवळे तोडून, ग्रंथ पुराणे जाळून, तरुण हिंदूंना मारून, हिंदू तरुण स्त्रियांना बळजबरीने इस्लाम स्वीकारायला लावणे आणि बलात्कार करून दासी म्हणून भरपूर पोरे काढून त्यांना मुस्लिम वळण लावणे हे कशाचे द्योतक आहे? सीमेवर हे उघड हल्ले तरी लोकांना दिसत आहेत, देशांतर्गत चालू असलेले छुपे हल्ले अजून लोकांच्या लक्षात येत नाहीयेत. एकीकडे हिंदू मुलींना नादाला लावण्यासाठी ग्रूमिंग गँग्स, दुसरीकडे शालेय शिक्षणात अकबर, औरंगजेब, टिपू, तैमूर यांचे गोडवे गाणारे धडे, मुस्लिम संस्कृती कशी चांगली आहे हे सांगणारे परिच्छेद आणि त्याच जोडीने हिंदू राजांबद्दल संस्कृतीबद्दल अतिशय कमी माहिती, तिसरीकडून सिनेमासारख्या माध्यमांतून उर्दू भाषेचे चाललेले कौतुक आणि चौथ्या बाजूने लोकसंख्या वाढण्यासाठी चार चार लग्न करून अनिर्बंध पोरे पैदा करणे. असा चोहीबाजूने छुपा हल्ला चालू आहे. इंग्लंडची वाट लावलीच आहे. युरोपातील बहुतांश देश येत्या २५-५० वर्षात मुस्लिम बहुल होतील, बरेचसे मुस्लिम अधिपत्याखाली जातील. त्या देशातील स्थानिक लोकसंख्या कमी जन्मदरामुळे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. त्यावर तथाकथित मानवतावादाच्या नदी लागून भरमसाठ मुस्लिम रेफ्युजी घेऊन ठेवलेत. आता ते लोक फुकटची वैद्यकीय सेवा आणि child केअर वर मजा मारत आहेत. हे पैसे स्थानिक जनता कष्ट करून जो टॅक्स भरते त्यातून येतात. जेव्हा मुस्लिम लोकसंख्या ३०% च्या वर जाते तेव्हा हे लोक शरियाची मागणी करतात. ते पण फक्त त्यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण प्रदेशात लागू करावा असा आग्रह होतो. जेव्हा ५०% च्या वर जाते तेव्हा तिथे बिगर मुस्लिमांचे जबरदस्तीने धर्मांतरण तरी चालू होते अथवा हत्याकांड चालू होते. त्यानंतर बिगर मुसलमानांचे तिथे राहणे अशक्य होऊन जाते आणि तो प्रदेश पूर्ण मुस्लिम अधिपत्याखाली जातो. हे लक्षात घ्या की नुसती त्यांच्या अधिपत्याखाली जायची प्रोसेसच निर्दयी आणि रक्ताळलेली नसून नंतर सुद्धा हे लोक तेवढेच निर्दयी व क्रूर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

https://en.wikipedia.org/wiki

सुबोध खरे
Wed, 02/20/2019 - 19:55 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Category:Islamic_terrorism_in_India यात भरपूर दुवे आहेत वाचून पहा, महिनाभर तरी लागेल. मग चर्चा करू. पण असे एका धर्माला नाव ठेवायचे नसते त्याने आपल्या पुरोगामित्वाचा धक्का पोहोचतो.
  • Log in or register to post comments

एक व्हिडिओ

धर्मराजमुटके
Wed, 02/20/2019 - 23:07 नवीन
एक व्हिडिओ
  • Log in or register to post comments

एक व्हिडिओ

धर्मराजमुटके
Wed, 02/20/2019 - 23:09 नवीन
एक व्हिडिओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

व्हिडिओhttps://www.youtube

जानु
Wed, 02/20/2019 - 23:34 नवीन
व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=DmmShgL9OUQ
  • Log in or register to post comments

दोन प्रश्नांची उत्तरे देतो -

मनो
गुरुवार, 02/21/2019 - 01:28 नवीन
दोन प्रश्नांची उत्तरे देतो - ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते. आदिल अहमद हा स्फोटतत्ज्ञ नसून एक डोके भडकावलेला आणि साधन म्हणून वापरला गेला अतिरेकी होता. त्याला आय ई डी बद्दल माहिती होती कि नाही ते माहित नाही, पण या कृत्याचे बोलावते धनी वेगळे आहेत - अश्या वेळी आय ई डी कसा वापरायचा याची माहिती आणि प्रशिक्षण आय एस आय किंवा अफगाणी तालिबान यांच्याकडून मिळते. स्फोटके स्थानिक, चोरून अथवा इतर मार्गानी जमवतात. स्थानिक मदतनीस इतर व्यवस्था (गाडी वगरे) करतात. प्रत्येकाला पूर्ण प्लॅन माहित नसतो - तो प्लॅन सीमेपलीकडून आखला जातो आणि प्रत्येकाला त्याचा भाग फक्त माहिती असतो. त्याने लाल रंगाची मारुती कार वापरलेली आहे, जीप नव्हे. फोटो पाहिलेत तर तुम्हाला त्यात लाल रंगाचे छोटे कारचे तुकडे दिसतील. प्राणहानी स्फोटामुळे नाही, तर shrapnel मुळे झाली आहे. त्यामुळे दिशा वेगळी असली तरी त्याने फरक पडलेला नाही. ४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय? गोळीबार नाही, त्या shrapnel च्या खुणा आहेत. अश्या वेळी या घटनेमागचे मदतनीस कोण, बोलावते धनी कोण याचा पूर्ण तपास जर लावला तर आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. पण हे पुरावे मिळणे अर्थातच फार अवघड असते.
  • Log in or register to post comments

खुलाशाबद्दल धन्यवाद!

गामा पैलवान
गुरुवार, 02/21/2019 - 03:34 नवीन
मनो, खुलाशाबद्दल धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

१. हे सैनिक नसून निमलष्करी

राघव
Tue, 02/26/2019 - 21:58 नवीन
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? हे सर्वस्वी सेनेवर अवलंबून असून सेना त्या त्या परिस्थितीत योग्य तो निर्णय घेत असते. त्यात आपण इथं खल करत बसण्यानं खरंच काही उपयोग नाही. २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? या प्रकाराला अँबुश अटॅक म्हणतात. हा कधीही, कुठेही, कुणावरही होऊ शकतो. जसं हार्ट अटॅक आलेला समजण्याआधी अनेक अटॅक येऊन गेलेले असतात आणि त्यांना शरीर सांभाळून घेतं, त्यासारखं. असा अटॅक येतो तेव्हा योग्य मदत मिळाली तर तोही परतवून लावता येतो. अर्थात् संपूर्ण सुरक्षीत कुणीच / कधीच नसतो. त्यामुळे अशा अटॅक्समुळे गुप्तचर यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असं मकुणीच, मला तरी योग्य वाटत नाही. सर्वजण आपापल्या परीनं पूर्ण प्रयत्न करतच असतात, नाही तर पावलोपावली अटॅक्स झाले असतेत. जे अशा अपयशाच्या नावानं बोंब मारतात, ते सरकारला नव्हेत तर सेना, गुप्तचर यंत्रणा आणि समग्र संरक्षण यंत्रणेला नावं ठेवत असतात. या प्रकाराला शुद्ध कृतघ्नपणा असंच म्हणतात. एक मुखबीर नावाचा चित्रपट आहे, तो बघावा अशा लोकांनी.. चित्रपट असला तरी इतका अंगावर येतो.. प्रत्यक्षात कसं असेल याची आपल्याला कल्पनाही येऊ शकत नाही. ५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय? झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील? कोणताही समर्थ देश हे जाहीररित्या करेल. त्याला असलं काही लपून करण्याची गरज नाही. जसं इस्रायल. आता भारतही. म्हणतांना खरंच अभिमान वाटतोय. :-) ६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं हे आत्ताचं नाही. जानेवारी २०१४ मधे हे वक्तव्य प्रसारित झालेलं मला चांगलं आठवतंय. मी तो विडिओ बघितलेला आहे. या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल? आज केलेला स्ट्राईक हा ऑफेन्सिव्ह डिफेन्स याच प्रकारात मोडतो. उरीचा बदलाही असाच. पण एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक नाकेबंदी, शत्रूच्या मित्रदेशांशी हातमिळवणी करून शत्रूला एकटे पाडणे, संरक्षण दलांना पूर्ण मोकळीक, कडक गुप्तचर यंत्रणांचे जाळे... हे सगळे नाही अशी कल्पना करा आणि मग ह्या प्रकारच्या स्ट्राईकची कल्पना करा.. उरीच्या बदल्याच्या वेळेसच मोठ्या युद्धाला तोंड फुटले असते. अचूक नियोजन करून, बिनचूक अटॅक करणे आणि शत्रूदेशाची सीमा ओलांडून ३०० ते ३५० अतिरेकी एकरकमी मारणे, हे गुप्तचर यंत्रणांच्या निर्भेळ यशाचेच द्योतक आहे. जाता जाता: मला स्वतःला असं वाटतंय की हा बालाकोटचा हल्ला पुरेसा राहणार नाही. आणिकही काही होईल. काय त्याची कल्पना नाही अर्थात्.. अवांतरः कलम ३७० कधीही रद्द करता येऊ शकते. https://www.youtube.com/watch?v=OcEpkuNZEqQ मला ३५ अ / ब याबद्दल माहिती हवी आहे. असल्यास सांगावे. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

धन्यवाद!

गामा पैलवान
Wed, 02/27/2019 - 02:26 नवीन
उत्तरांबद्दल धन्यवाद! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

आपल्याला पाकिस्तानवर

सुबोध खरे
गुरुवार, 02/21/2019 - 09:30 नवीन
आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. हा एक गैरसमज आहे तुम्ही वाटेल तो पुरावा द्या पाकिस्तान तो मान्य करणारच नाही. India

will not submit any evidence to Pakistan

on the role of Jaish-e-Mohammad in the Pulwama terror strike, and instead give all such facts to friendly nations to unmask the role of elements based in the neighbouring country in the attack, a senior government official said. The official was sharing the views within the government, which is not at all in favour of giving any evidence to Pakistan considering the past experience when despite giving multiple dossiers on the involvement of Pakistan-based elements in the 26/11 Mumbai terror attacks and terror strike in Pathankot airbase, Islamabad did nothing to punish the perpetrators. https://www.business-standard.com/article/pti-stories/india-won-t-give-proof-to-islamabad-but-to-friendly-nations-to-unmask-pak-role-in-terror-official-119022000941_1.html तपासाचा मूळ हेतू हा आहे कि गुन्हा कसा घडला त्याची पार्श्वभूमी त्याची पद्धत(MODUS OPERANDI) त्यात हातभार लावणारे घरभेदी कोण आहेत त्यांचा छडा लावणे हा आहे. पाकिस्तानला कितीही पुरावा दिला तरी ते ग्राह्य धरणार आहेत का? अजमल कसाबला जिवंत पकडल्यावर(प्रत्यक्ष पुरावा असताना) तो पाकिस्तानी नागरिक नाहीच म्हणून सांगितले मग परिस्थितीजन्य पुराव्याचा काय उपयोग?
  • Log in or register to post comments

सहमत आहे, आपले घरभेदी कोण ते

मनो
गुरुवार, 02/21/2019 - 10:10 नवीन
सहमत आहे, आपले घरभेदी कोण ते मात्र हुडकायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

घरभेदी कोण

ट्रेड मार्क
गुरुवार, 02/21/2019 - 19:07 नवीन
घरभेदी कोण असावेत याचा अंदाज येण्यासाठी खालील लेख वाचा लेख १ लेख २ वरील लेखामधील एक परिच्छेद - २०११ च्या सुमारास अकस्मात एक बातमी भारतीय माध्यमातून झळकली आणि राजकारणात एकच खळबळ उडालेली होती. संरक्षणमंत्र्यांच्या फ़ोनवरील संभाषणही चोरून ऐकले जात असल्याची ती बातमी होती. तो आक्षेप भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागावर ठेवण्यात आलेला होता. त्याखेरीज आणखी एक अशीच अफ़वा वर्तमानपत्रातून सोडली गेलेली होती. प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने सेनादलाच्या अनेक तुकड्या राजधानी दिल्लीत संचलनाचा सराव करीत होत्या. त्याचवेळी उत्तरप्रदेशाच्या मेरठ येथून काही सेनादलाच्या तुकड्या इतरत्र कुच करीत होत्या. त्यातून भारतीय लोकशाही उलथून टाकत सेनादल सत्ता काबीज करायच्या प्रयत्नात असल्याची ती अफ़वा होती. तिला कुठलाही आधार नव्हता आणि गोंधळ उडवून देण्याचाच त्यामागचा हेतू होता. तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. कारण तितके निमीत्त साधून दिल्लीची नोकरशाही, राजकारणी व तथाकथित बुद्धीमंतांनी मोठा हलकल्लोळ माजवला आणि तेव्हाचे लष्करप्रमुख व्हॊ. के. सिंग यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. उपरोक्त दोन बातम्या भारतीय सुरक्षा दलाच्या विविध दक्षता यंत्रणांना उध्वस्त करणाचा व्यापक कट होता. कारण तेव्हा सिंग व संरक्षणमंत्री अन्थोनी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचाच आधार घेऊन गलिच्छ राजकारण खेळले जात होते. माध्यमातून मग सिंग यांना सरसकट लक्ष्य करण्याची मोहिमच हाती घेण्यात आली. काश्मिरातील पाकवादी प्रवृतीच्या राजकारण्यांनी तोफ़ा डागल्या. सिंग लष्करी अधिकारी आणि संरक्षण खात्याचा पैसा वापरून काश्मिरी राजकारणात ढवळाढवळ करीत असल्याचाही एक आरोप त्यात समाविष्ट होता. त्यासाठी मग टीएसडी हा शब्द पुढे आला, ही टीएसडी म्हणजे टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन गुप्तचर म्हणून काम करीत नसून काश्मिरातील लोकांनी निवडलेले सरकार पाडण्यासाठी उचापती करीत असल्याचा आरोप पुढे आला. लष्करी पैसे देऊन एक अपक्ष आमदाराला खरेदी करण्यात आल्याचा बिनबुडाचा आरोप ठळकपणे पुढे आला आणि त्याचा कुठलाही पुरावा कधीच कोणी दिलेला नव्हता. पर्यायाने टीएसडी ही गोपनीय बाब चव्हाट्यावर आली आणि तिचा गाशा सेनादलाला गुंडाळावा लागला. त्यात कार्यरत असलेल्या अधिकारी व हस्तकांचे चेहरे उघडे पडले आणि अनेक अधिकारी कोर्टमार्शलचे बळी झाले. पण ती बाब महत्वाची नाही. त्यातून काश्मिरात गुपचुप जी कारस्थाने शिजवलॊ जात होती, त्यांची इत्थंभूत माहिती सेनादलाला मिळण्याचा मार्गच बंद होऊन गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

Kashmir प्रश्र्नाशी खलिस्तान प्रश्र्नाशी तुलना केली तर

Rajesh188
गुरुवार, 02/21/2019 - 10:36 नवीन
Kashmir आणि खलिस्तान ह्याची तुलना केली तर दोघांना सुधा स्वायतत्ता हवी होती . आणि संघर्षाचं कारण उघड तरी दोघांचं होते . मग खलिस्तान प्रश्न मिटवता आला परंतु काश्मीर धागगत राहायला ह्या मधून आसा पण निष्कर्ष निघतो की हा काश्मीर शी संबंधित प्रश्न नसून dharmikteshi संबंधित प्रश्न आहे आणि त्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आघाड्या उघडलेल्या आहेत पण आपण फक्त ऐकाच आघाडीवर लक्ष केंद्रित केले आहे त्या मुळे तो सुटत नाही . ऐक तर्क आसा सुधा करता येतो सध्य परिस्थिती बघून
  • Log in or register to post comments

म्हात्रेंनी खोटी बातमी इथे

अर्वाच्य
गुरुवार, 02/21/2019 - 11:01 नवीन
म्हात्रेंनी खोटी बातमी इथे दिल्याबद्दल एक अक्षराने माफी मागितलेली नाही ह्याची नोंद सगळे वाचक घेतीलच.
  • Log in or register to post comments

तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही

सिद्धार्थ ४
गुरुवार, 02/21/2019 - 11:18 नवीन
तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही बोलता का हो?आज वर म्हात्रें काकांनी मिपा वर एकही खोटा किंवा असंतुलित प्रतिसाद मी तरी वाचला नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य

बा अर्वाच्च्या

lakhu risbud
गुरुवार, 02/21/2019 - 12:24 नवीन
बा अर्वाच्च्या तु मिपा वरुन हाकलुन लावलेल्या ज्या कोणाचा आय डी आहेस तुझी हकालपट्टी ही तुझ्याच कर्माने झालेली आहे या याबद्दल निश्चिन्त रहा . ती का झाली असावी याचाही अंदाज आता यायला लागला आहे. म्हात्रे कांकांवर खोटारडे पणाचा आरोप त्यांच्या विचारसरणीचे विरोधकही करणार नाहीत.. जर तू डोक्यावर पडला असशील तर बाबच वेगळी आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य

लखमीचंद ..!!

विशुमित
गुरुवार, 02/21/2019 - 13:11 नवीन
अगदी बरोबर..!! शेवटी एक मिपाकरच दुसऱ्या मिपाकराच्या मदतीला येणार. खांद्यावर डोके वगैरे वगैरे..! आपल्या कांकांवर खोटारडे पणाचा आरोप म्हणजे काय ! जाहीर निषेद..! ===
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

इथले काका त्यांचे ते बघण्यास

lakhu risbud
Mon, 02/25/2019 - 15:23 नवीन
इथले काका त्यांचे ते बघण्यास समर्थ आहेत हो ! तुम्ही तुमच्या काकांची काळजी करा.पुतण्याला तोंडघशी पाडलंन त्यांनी. मावळातून लढायचं म्हणे पर्यंत कात्रज चा घाट दाखवलान. तुम्हाला आता प्रचाराचा ओव्हरटाईम कसा जमणार ते बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

लखमिचंद..

विशुमित
Mon, 02/25/2019 - 15:48 नवीन
अस कस अस कस.. आपले सन्मानीय काका देखील डू आय डी चा सहारा घेत आहेत, असे जाणवते आहे. बाकी आमच्या तालुक्यातील काका पुतणे त्यांच ते बघून घेतील. तुम्ही कशाला लुडबुड करताय? चिरीमिरीसाठी एवढा निर्लज्जपणा?? अरेरे...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

जिथे तिथे व्यक्तिपूजाच

शब्दबम्बाळ
गुरुवार, 02/21/2019 - 16:12 नवीन
जिथे तिथे व्यक्तिपूजाच करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार! म्हात्रेंनी वरती व्हिडीओ लिंक शेअर केली आहे ती फेक बातमी आहे, मजकूर खुबीने टाकलाच नाहीये म्हणजे असे नको व्हायला कि काही स्वतः काहीतरी लिहून जबाबदारी घ्यायला लागावी! हे आधी पण काही ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे असे होऊच्च शकत नाही टाईप प्रतिसाद तुमच्यापाशी ठेवा! बाकी जास्त काही बोलायला नको नाहीतर "जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला नाही पण संक्षींना घालून पाडून बोललं गेलं! सोबतीला इतर सवंगडी आलेच लगेच... १-२ दिवसातच संक्षींचा आयडी देखील बॅन झाला!" असो, आताशा इकडे येणे कमीच केले असल्याने स्वतःच्या आयडीबद्दल फारसे ममत्व राहिलेले नाही त्यामुळे चालू द्यात काहीही! ट्रोल्सचे पीक चिखलात उत्तम येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

द्वेषातुन प्रतिसाद देण्याची

शब्दबम्बाळ
गुरुवार, 02/21/2019 - 18:29 नवीन
द्वेषातुन प्रतिसाद देण्याची काही गरज नव्हती असे वाटते... त्यांनी केलेल चांगले लिखाण हे चांगलेच आहे.. जिथे चुक वाटते तिथेच बोलणे संयुक्तिक असावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य

अर्वाच्य हा आयडी इतक्यात बॅन

शब्दबम्बाळ
Fri, 02/22/2019 - 14:09 नवीन
अर्वाच्य हा आयडी इतक्यात बॅन पण झाला! केवढं ते स्पीड! इथले बरेच मान्यवर आयडी इतरांची लायकी/पगार काढून, शिवीगाळ करूनही कवच कुंडले पांघरून सुरक्षित राहतात असे दिसतंय! असेही खाजगी संस्थळ आहे म्हणा! पण मग जाहीर करून टाका ना, की या या आयडीना स्पेशल प्रोटेक्शन योजना आहे, बाकी लोकांनी काहीही बोलू नये अन्यथा १ दिवसाच्या आत हकालपट्टी होईल. याशिवाय फेक न्यूज पसरवल्याबद्दल अवाक्षर देखील काढलेलं नाहीये अजून कोणी! पुरावा दिल्यावर आता सवंगडी आणि फॉलोवर गायब झाले वाटत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

म्हणून गपगुमान बस्तो.

यशवंत पाटील
Fri, 02/22/2019 - 14:25 नवीन
म्हणून गपगुमान बस्तो. काही लोकांनी कायबी लीहीलं तर चालतंय हिकड. अट एकच मोदीशेठला चांगलं म्हणा. म्हात्रे साहेब न ते दुसरे खरे साहेब यांना आवरा अस कुणी सांगायच आन कुणाला. ते गुर्जी का कोण आन ते मोदक साहेब न्हाईत वाटत आजकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

राम्राम.. काय विशेष..? आज

मोदक
Tue, 02/26/2019 - 13:12 नवीन
राम्राम.. काय विशेष..? आज अचानक आमची आठवण कशीकाय निघाली..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंत पाटील

बुडाखाली आग लागली असेल...

mayu4u
Tue, 02/26/2019 - 21:13 नवीन
२० लाखांच्या ट्र्क मधून वाळूची पोती पाठवायची का? अग्निशमनार्थ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

संपादक मंडळ- आय डी बॅन बाबत

विशुमित
Fri, 02/22/2019 - 14:39 नवीन
संपादक मंडळ- आय डी बॅन बाबत काही पारदर्शकता आणता येउ शकते का ? नाहीतर मिपा हे २०१९ च्या निवडणुकीपर्यंतच स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू शकेल. कृपया याला कोणी "गर्भित धमकी" वगैरे असली विशेषणे लावू नका. कारण ती मी फाट्यावर मारत असतो. मला फक्त मिपाची काळजी आहे. विविध वाङ्मय रसग्रहणाची हक्काची जागा म्हणून मी या संकेतस्थळाकडे आज पर्यंत तरी पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

अहो संपादक मंडळाला विनंती

शब्दबम्बाळ
Mon, 02/25/2019 - 10:50 नवीन
अहो संपादक मंडळाला विनंती करताय पण त्यात कोण आहे पाहिलंय का? :) बर मागे कोणीतरी म्हटलं होत कि संपादक मंडळाला अधिकार नाहीत हकालपट्टीचे, पण "वट्ट" असला कि कोण काय बोलणारे?! ;) इतरांनी चुकीची बातमी दिली(जी फक्त भाजपशी रिलेटेड असेल) तर पानभर लिहितील समोरच्याला उपदेश! पण स्वतः दिलेली सगळी माहिती चुकीची निघाल्यावर खेद व्यक्त करायला पण जमत नाही! ब्रम्हांडनायकाकरून हि गोष्ट तेव्हडी चांगली शिकून घेतलीये त्यांच्या फोल्लोवर्सनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

IT सेल कडे दाद माघा कि.

lakhu risbud
Mon, 02/25/2019 - 15:25 नवीन
IT सेल कडे दाद माघा कि. आपल्या घरचंच आह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

लखमिचंद..

विशुमित
Mon, 02/25/2019 - 16:01 नवीन
तुम्हाला सदाशिव पेठेत जायचे असताना बारामतीच्या एस टी त कसे काय बसता?? काही केमिकल लोचा आहे का?? === अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

असे हिसके मारू नका हो !

lakhu risbud
Tue, 02/26/2019 - 13:03 नवीन
असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात. स्वतःबद्दलचे एवढे अचूक आणि परखड निरीक्षण करणारे आजकाल विरळच ! मिपाकर म्हणून तुमच्या प्रगतीबद्दल अभिमान वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

ल(राॅ)की ...

विशुमित
Tue, 02/26/2019 - 13:25 नवीन
असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. ==)) अस होय, सोर्री सॉरी. उगाच हिस्के मारले तुम्हाला. त्यां मेनका मैडम यायच्या धावत. तुम्हाला दुखलं असेल ना! === बाकी वरचं विश्लेषण तुमच्यासाठीच होते. वाटले होते तुम्हाला समजले असेल पण तुम्हाला एस टी चा बोर्डच नाही समजत तर हे कुठले समजायला. असो. आता तरी समजलं असेल अशी आशा करुयात. आता तुम्हाला युयु करतोय, परत आला की हाड हाडच असणार आहे ...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं,

तेजस आठवले
Tue, 02/26/2019 - 15:00 नवीन
प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.
हे वाक्य अप्रतिम आहे, पण ते प्रत्येकालाच लागू होते ह्याची नोंद घ्यावी. वारसाहक्काने कुठले आयडी स्वतःच्या प्रतिकृती काढून येत आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे.बिग्रेडी अजेंडा राबवणारे ह्याला अपवाद नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी

एकुलता एक डॉन
Mon, 02/25/2019 - 02:24 नवीन
जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला मला फक्त जिएसटी माधे इन्तेरेस्त आहे ,कोनि धाग सन्गु शकेल कोन्त आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

एक बरळप्रहरी धागा.

विजुभाऊ
गुरुवार, 02/21/2019 - 11:38 नवीन
एक बरळप्रहरी धागा. तारतम्य सोडून बोलण्याचा कहर झालाय इथे
  • Log in or register to post comments

भयानक

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/21/2019 - 17:38 नवीन
२०१४ पासून काश्मीरमध्ये दर दोन दहशतवाद्यांमागे एक जवान शहीद https://www.loksatta.com/desh-videsh-news/since-2014-in-kashmir-for-every-2-militants-killed-forces-lost-1-of-its-men-1845217/
  • Log in or register to post comments

सर्कारचे अभिनंद्न

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/21/2019 - 19:31 नवीन
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सैनिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सर्व केंद्रीय सुरक्षा दलांना आता जम्मूहून श्रीनगरला नेण्यासाठी विमान प्रवासाची सेवा पुरवली जाणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता बीएसएफ, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनातीसाठी हवाईमार्गे श्रीनगरला नेलं जाणार आहे. सुट्टीवर जाताना, सुट्टीवरुन परतताना किंवा सुरक्षा दलाच्या पथकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हवाईमार्गाचा वापर केला जाणार आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-दिल्ली या मार्गावर विमान सेवेचा वापर केला जाईल. जवळपास 7 लाख 80 हजार जवानांना याचा लाभ मिळणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-pulwama-attack-govt-allows-air-travel-for-jawans-of-crpf-and-other-forces-deployed-in-kashmir-1845151/ मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले.
  • Log in or register to post comments

मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी

डँबिस००७
गुरुवार, 02/21/2019 - 19:49 नवीन
मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले. हे बघण्या आधी भाजपा सरकारला सैनिकांची सुरक्षा व त्यांचे जीव हे जास्त महत्वाचे आहेत हा महत्वाचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे जवळपास ८ लाख सैनिक हे श्री मोदीजींचे फॅन झालेले आहेत. सैनिकांच्या रक्ताची दलाली करणार्यां काँग्रेसला व अश्या पक्षाची दलाली करणार्या निर्बुद्धाला हे कळणार नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

....

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/21/2019 - 19:57 नवीन
सरकारचे अभिनंदन केले आहेच. तुमचे तज्ञ मित्रच याला विरोध करत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

विमान म्हणजे काय गं माऊ?

गामा पैलवान
गुरुवार, 02/21/2019 - 21:43 नवीन
ए माझ्या काळ्याकुट्ट मनीमावट्ये, तू कित्तीकीत्ती गोंडस आहेस, अगदी त्या पप्पूसारखी गं! पण तू किनई त्याच्यारखा बथ्थडपणा करू नकोस हं. विमान म्हणजे काय गं माऊ? हे वाक्य 'दारू म्हणजे काय रे भाऊ' याच्या धर्तीवर शंभर वेळा बडबडून बघ. मग तुला विमान आणि हेलिकॉप्टर यांच्यातला फरक आपोआप कळून येईल. तु. न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

७ लाख ८० हजार एका सुटीच्या

सुबोध खरे
गुरुवार, 02/21/2019 - 20:26 नवीन
७ लाख ८० हजार एका सुटीच्या वेळेस होणारे ४ हजार येण्यासाठी आणि ४ हजार जाण्यासाठी असे ८ हजार प्रत्येकी म्हणजे ६२४ कोटी रुपये एका सुटीला देणे सरकारला ( आणि पर्यायाने जनतेला) परवडणार आहे का? वर्षात तीन वेळेस जवानांना सुटी मिळते याच्या तिप्पट खर्च शक्य आहे का? आणि असल्यास एवढी विमाने कोणाकडे आहेत? आणि आता श्रीनगर च्या विमानांचे आरक्षण मिळणे अशक्य होणार आहे. वायुदलाची किंवा एअर इंडियाची विमाने गृह खात्याकडून वापरली तर त्याचे पैसे तर द्यावेच लागतील अर्थ खात्याची मंजुरी मिळेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. नि जर्क रिऍक्शन आहे एवढेच मी म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

मग नेहमी प्रमाणे जूमलाच होणार

विशुमित
Fri, 02/22/2019 - 13:45 नवीन
मग नेहमी प्रमाणे जूमलाच होणार का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हल्ला झाला तेंव्हा

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/21/2019 - 20:37 नवीन
हल्ला झाला तेंव्हा महामहिम जिम कॉर्बेट पार्क मध्ये फोटो शूट करत होते म्हणे , असे सर्वत्र येत आहे, खरे आहे का ?
  • Log in or register to post comments

त्यांना खराब हवामानामुळे

विशुमित
Fri, 02/22/2019 - 13:52 नवीन
त्यांना खराब हवामानामुळे उशीरा संदेश पोहचला, असे स्पष्टीकरण आले आहे. === ते पिश्चर मधे दाखवतात तसा रेडिओ सेट नव्हते का त्यांच्या ताफ्यात?? "अल्फा टॅगो चार्ली, ओव्हर ऍण्ड आऊट..!!""
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

हल्ला झाला तेंव्हा महामहिम

प्रसाद_१९८२
गुरुवार, 02/21/2019 - 21:05 नवीन
हल्ला झाला तेंव्हा महामहिम जिम कॉर्बेट पार्क मध्ये फोटो शूट करत होते म्हणे , असे सर्वत्र येत आहे, खरे आहे का ? -- असा हल्ला होईल, हे काय स्वप्नात आले होते का त्यांच्या ? -- तो कॉंग्रेसी सुरजेवाला डोक्यावर पडलेला माणूस आहे, फार लक्ष नका देऊ तुम्ही त्याच्याकडे.
  • Log in or register to post comments

भ्रष्ट काँग्रेस सुरझेवाला ,

डँबिस००७
Fri, 02/22/2019 - 14:51 नवीन
भ्रष्ट काँग्रेस सुरझेवाला , दिग्विजय सींग , मणी शंकर अय्यर सारख्या लोकांमुळे बुडणार आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

अगदी अगदी ...!!

विशुमित
Fri, 02/22/2019 - 15:05 नवीन
अगदी अगदी ...!! डायरेकट जल समाधीचं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

शेठने

खंडेराव
Fri, 02/22/2019 - 23:32 नवीन
2 तास फोटो काढले कोटबेटमध्ये त्यानंतर रुद्रपूरसाठी भाषण दिले फोनवर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा