Skip to main content

दहशतवाद

बीचवरील रक्ताचे डाग

लेखक निनाद यांनी गुरुवार, 18/12/2025 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात असलेल्या प्रसिद्ध बॉंडाय बीचवर १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी 'हनुक्का' या ज्यू धर्मीयांच्या प्रकाशाच्या सणाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. आनंदाने आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला हा परिसर काही क्षणांतच किंकाळ्या आणि रक्ताच्या थारोळ्याने भरून गेला.

पुलवामा : काही प्रश्न

लेखक गामा पैलवान यांनी शुक्रवार, 15/02/2019 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत. १. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही).

‘सलाफी’इझम – आक्रमक इस्लाम की तात्विक इस्लाम?

लेखक रणभोर यांनी रविवार, 10/09/2017 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या जून मध्ये पूर्वीच्या इस्लामिक स्टेट नावाच्या एका संघटनेनी ‘अबू बक्र अल-बगदादी’ याच्या नेतृत्वाखाली इराक आणि सीरियाच्या मोठ्या प्रदेशावर खिलाफत स्थापन केली. सुरवातीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी अमेरिकी शास्त्रांच्या आधारे विजयसुद्धा मिळवले. जगातली दोन मोठ्या खनिज तेलाच्या विहिरी त्यांच्या ताब्यात होत्या. मोठ्या प्रमाणावर बिगर मुसलमानांच्या कत्तली, धर्मांतरं, बलात्कार त्यांनी केले. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया’ने स्थापन केलेली खिलाफत हा जगासमोरचा एक मोठा प्रश्न बनला होता.