Skip to main content

पुलवामा : काही प्रश्न

लेखक गामा पैलवान यांनी शुक्रवार, 15/02/2019 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत. १. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते. ४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय? ५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय? झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील? ६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=147 यांत ते म्हणतात की ३ पातळ्यांवर संरक्षणकार्य चालतं. क. निव्वळ बचाव : यांत शत्रू आक्रमक असतो व आपण फक्त बचाव करतो. च. आक्रमक बचाव : यांत भारत आक्रमणाचं मूळ सक्रीयपणे नष्ट करतो. पण आक्रमकांचं मूळ तसंच राहतं. ट. उघड आक्रमण : यांत भारत आक्रमकांवर प्रत्याक्रमण करून त्यांना नष्ट करतो. या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल? असो. जाणकारांनी कृपया उत्तरे सुचवावीत. तसेच अधिक प्रश्न जरूर विचारावेत. धन्यवाद! आपला नम्र, -गामा पैलवान

वाचने 186048
प्रतिक्रिया 193

प्रतिक्रिया

आपण स्वतःचा जरी विचार केला तरी समजेल . मुंबई आणि राज्यात हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढली आहे आणि त्या मुळे आपण सुधा अस्वस्थ होतो .हे सत्य आहेच की . कोणत्याच राज्याच्या संस्कृतीवर आक्रमण विनाश कडे घेवून जाईल

ह्या विषयावर खूप प्रतिक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी वाचल्या . पण पूर्ण विचार करून परिणामाचा विचार करून प्रतिक्रिया खूप कमी आहेत . प्रत्येक जण आपल्या विचारधारा सोडायला तयार नाहीत आणि aashich अवस्था पाकिस्तान मध्ये सुधा आहे . डोकं थोड शांत ठेवून दोन्ही देशांनी मिळून निर्णय घेणे अपेक्षित आहे इथे भावनिक mudhe काही कामाचे नाहीत. व्यवहारिक विचार झाला पाहिजे . दोन्ही देश विकसनशील देश आहेत आणि दोघे सुधा गरीबी bairojgari,लोकसंख्या अनियंत्रित वाढ आशा बऱ्याच समस्यांनी ग्रासले आहेत .जर दोन्ही देशांना काश्मीर च हित हवं आसेल तेथील जनता सुखी समाधानी झालेली बघायची आसेल तर थोड पाठी सरल पाहिजे . दोन्ही देशाची अखंडत्व आणि सर्वभोमत्व ह्या वर कसली ही तडजोड न करता सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे . हा सुवर्ण मध्य दोन्ही देशांनी ठरवावं .तो आपण काय सुचवणार . आता आसा विचार केला की दोन्ही देश आपल्याला हवा तसा काश्मीर प्रश्न सोडवू लागला तर त्याचे परिणाम काय होतील aatangvad हा त्याच्या वर नक्कीच उपाय नाही आणि युद्ध हा सुधा उपाय नाही . Aatangvad ही दुधारी तलवार आहे हिचा वापर जो करेल ती तलवार त्याच्या वर सुधा वार करू शकते आणि ह्याचा चांगला अनुभव पाकिस्तान कडे आहे ते चक्रव्यूहात सापडले आहेत बाहेर येण्याचा मार्ग सध्या तरी बंद आहे . दोन्ही देशातील दुष्मानीचा फायदा बाकी देश मित्रत्वाचे वाचन देवून स्वतःचा स्वार्थ साधून घेतली त्यात होणाऱ्या नुकसानी शी त्यांचा काहीही संबंध नसेल . पाहिजे तर ह्या विषयावर bayanbaji करायला दोन्ही देशांनी बंदी घातली पाहिजे .प्रधान मंत्री व्यतिरिक्त कोणताही नेता ह्या विषयावर बोलणार नाही ह्याची काळजी घेणे . युद्ध न परवडणारे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आताच युद्ध खूप भयंकर आसेल .आणि युद्ध काळात सर्व विकास योजना बंद होवून रोजगाराचा प्रश्न गंभीर होईल . आपण आता कितीही बोललो तरी त्या वेळी वेगळा विचार करू . पोट भरणे अवघड झाले की afratafar maju शकते . शास्त्र विकणारे लढा चालू ठेवतील आणि दोन्ही देशाचं वाटोळे होईल . समजा आपण युद्ध जिंकाल तर पाकिस्तान मध्ये आपण सत्ता स्थापित करू शकणार नाही जागतिक विरोध होईल मग युद्ध जिंकून फायदा काय अजुन द्वेष वाढेल

१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

१९८९-९० मध्ये तेथे दहशतवाद आला तेव्हा तुमचे शासन होत वाटते तिथे? हजारो काश्मीरी पंडितींना विस्थापित केले तेव्हा नव्हता वाटते दहशतवाद? की तो जिहाद होता?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

बरेच विसरभोळे आहात तुम्ही !! पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! हा हा हा काँग्रेस चे कमकुवत सरकार बघुन एक दोन नव्हे तर चार चार युद्धे लादली पाकिस्तानने भारतावर !! चीन ने तर एकाच तडाख्यात लोळवल होत विसरले काय ? ते तर बर की भारतीय सेना खमकी होती म्हणुन बचावलो !! अन्यथा काँग्रेसवाल्यांनी देशच आंदण दिला असता पाकिस्तानला ! काश्मिरचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग पाकिस्तानच्या अख्त्यारीत आहे ! गीलगीट बाल्टीस्तान, अक्साई चीन हा भाग सुद्धा काँग्रेसवाल्यांनी देऊन टाकला ! कॉग्रेस मुक्त भारत झाल तर १८८५ पासुनचा रोग बरा होईल !!

In reply to by डँबिस००७

जवानांच्या अंतयात्रेत उपमुख्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, साक्षी महाराज हसत होते व प्रार्थनेत जोडे घालून आले होते, नातेवाईकांनी हाकलून लावले. व्हाट्सपवर व्हिडीओ फिरत आहेत, ते पहा. भाजपयाना तर इथलेच लोक विचारेनात , पाकिस्तान तर लांब राहिला.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

९०,००० सैनिक युद्धबंदी होते आणि पाकिस्तानी लष्करशहा हात बांधून शरण आलेले असताना काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधींनी घालवली.

त्याबद्दल तुमची पचपच करणारी विचारसरणी काय म्हणते आहे?

In reply to by सुबोध खरे

त्या वर गेल्या. आता मोदीना 9000 तरी पकडून आणायला सांगा. सोडायचे का ठेवायचे , ते नन्तर बघू.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

त्यांना (९००० लोकांना) एक वेळ तरी जेवायला घालायची आपली लायकी आहे का? आपला पगार किती? आपण बोलता किती?

In reply to by सुबोध खरे

इंदिराजी त्यावेळी 90000 पाकिस्तानयाना जेवायला घालत बसल्या असत्या , तर तुम्हाला पेन्शनला उरले असते का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

इतिहास वाचलेलाच दिसत नाही. १ कोटी बांगलादेशी निर्वासित भारतात आले होते आणि त्या निर्वासितांच्या निर्वाहासाठी आपण( सामान्य नागरिक) २० पैशाच्या पोस्टाच्या तिकिटांवर ५ पैसे निर्वासित अधिभाराचे तिकीट लावत होतो https://www.thedailystar.net/supplements/victory-day-2016-special/refug…. त्यामध्ये ९०,००० तोंडे म्हणजे काहीच नाही

त्या "ओलिस सैनिकांच्या" बदल्यात आणि शरण आलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या बदल्यात काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधी यांनी घालवली.

त्या धनगराकडे मेंदू विकारावर औषध आहे का विचारुन पहा. कायम नुसती जळजळ आणि मेंदूत जळमटं झाली आहेत. कोणताही विषय अजिबात न वाचता किंवा अजिबात विचार न करता नुसती आचरटपणाची पचपच करण्याची सवय सोडून द्या जाता जाता -- मला कोणतेही निवृत्ती वेतन नाही. तेंव्हा तुम्हाला जळजळ होण्याचे कारण नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

काश्मीर प्रश्नाला पंडित नेहरूच कारणीभूत, अमित शाह यांचा आरोप. काश्मीर प्रश्नाचे जनक कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर पंडित नेहरू असेच आहे. नेहरूंमुळे काश्मीरचा मुद्दा निर्माण झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काश्मीर खोरे कायम धगधगतेच असते या सगळ्याचं कारण पंडित नेहरू आहेत त्यांनी हा प्रश्न निर्माण केला आणि भिजत ठेवला असाही आरोप अमित शाह यांनी केला. सगळ्यात महत्वाचे आहे, हे तुम्ही लक्ष्यात ठेवा == पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे असे पंतप्रधान आहेत जे २४ पैकी १८ तास काम करतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत त्यांच्यावर तुमच्यासारख्यांच्या आरोपांमुळे परिणाम होणार नाही असेही अमित शाह यांनी ठणकावले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pandit-nehru-responsible-for-… === सगळं रांकेला लावून आज ते कोरियाला भुर्र उडून गेले आहेत. तुम्ही बसा उंदरांचा पाठलाग करत!!

१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

5लाख पंडितानी जीवाच्या भीतिने काश्मीर सोडले तेव्हा विद्यमान सरकारने ना त्यांची चिंता केली वा चिकित्सा, मग जे पाहिजे ते आपसुक तोंडात पडले तर कोण कशाला अतिरेकी बनतोय? उद्या काळ्या माउकड़े शांतताप्रिय धर्माचे लोक बोलायला आले की तुमची जागा आम्हाला आमचे प्रार्थनास्थळ म्हणून हवे आहे तर तुम्ही किती आनंदाने ते खाली कराल ? आधी तुमचा प्रतिसादच गंडलाय, भाजपा सरकारमधे अमरनाथ हल्ला झाला व विधानसभा हल्ला झाला मग पाकिस्तानमधून कसाब आणि कंपनी कोंग्रेसच्या काळात क़ाय आटयांपाट्या खेळायला आली होती ? हायला , यांचा क़ाय भरोसा नाय, प्रतिसाद झोम्बल्यावर कसाब आपल्या मुब्र्यातुंन आला होता बोलायला कमी करणार नाही. इशरतजहांचा बदला घ्यायला ! संपादक मंडळाला एक विनंती आहे , ह्या काळ्या माऊचा ईमेल आईडी उघड़ करावा , मग काहीतरी सामदामदंडभेद करता येईल

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा व वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल. का या असल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची धमक नाही ?

In reply to by lakhu risbud

@ Blackcat निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत) हे सपशेल खोटे विधान निर्लज्जपणे केलेत त्यावर पुरावा मागितला तो काही देता येत नाही. माझ्या वर्णव्यवस्थेच्या पुरस्काराबद्दल खोटारडेपणा केला त्याबद्दल कोणताही पुरावा देता येत नाही. इतका खोटारडेपणा, निलाजरेपण,, लोक टोचून बोलतात त्याबद्दल खंत नाही खेद नाही मिपावरून हाकलून दिल्यावर पन्नास वेगवेगळे डू आयडी घेऊन परत परत येण्यासारखा लोचट पणा आणि लुब्रेपणा आहे. आयुष्यातील वैफल्य जालावर काढून ते जाणार नाही आणि खोटेपणा हा लांड्या चादरी सारखा असतो. वरनं ओढली तर खालचा भाग उघड पडतो आणि खाली ओढली तर वरचा. मनाची नाहीच पण जनाची तरी लाज बाळगा.

सुबोध खरे-"उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे आज जो उठतो तो बेफाट आरोप करतोय "प्रधान मंत्रीजी आप मुझे बताईये, सारा कम्युनिकेशन भारत सरकार के हात मे है, आप कोई भी फोन टॅप कर सकते हो, आप् ने अभीतक क्या किया? अभीभी घुसपेटी भारत के अंदर कसे आते है ? कितने आतण्कवादीयोंको आपने विदेशसे भारत लाया? आतंकवादीयोंके पास बाहर से गन आता है, गोला बारूद आता है, हवाला के माध्यमसे पैसा आता है, पैसा बँको के माध्यमसे आता है, प्रधान मंत्री, आप ईतनी निगरानी नही रख सकते? ये राज्योंका विषय नही है.. ये आपका विषय है.. काय किया है आपने ?" नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये मनमोहन सिंगांना भाषणात विचारलेले हे काही प्रश्न. (https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&t=737s २०:०० ते २३:००) ह्याला काय म्हणायचे रे सुबोधा? उचलली जीभ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब , अजुनही तुमची उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे पुलवामा रस्त्यावर तिन तिन बॅरीकेडस होते ! कश्मिरच्या मुख्यमंत्र्यामुळे ते बॅरीकेडस बंद झाले आणि अतिरेक्यांना रस्ता साफ झाला ! पण त्या कश्मिरच्या मुख्यमंत्र्याला ना खंत ना खेद ! अजुन ही पाकिस्तानशी बोलणी कर ण्याची वार्ता करत आहे ! वायरलेस, मोबाईल, टेक्स्ट मेसेज,व ईतर कम्युनिकेशन वर करडी नजर असल्याने अतिरेक्यांनी ह्यावेळेला नविन मोबाईल + वायरलेस मेसेज सिस्टीम वापरली. चायनात बनलेली ही एनक्रिपशन सिस्टीम अजुन ही आपल्या कम्युनिकेशन ए़क्स्पर्टसना क्रॅक झालेली नाही. स्फोटके कश्मिरच्या सीमा भागातुन खंदक खणुन त्या मार्गाने आणलेली आहेत असा कयास आहे. गेल्या ६५ वर्षांत काश्मिरची सीमा सील करता आलेली नाही. त्या सीमेतुन माणसे, प्राणी , मादक पदार्थ ह्यांची तस्करी चालु असते. अश्या तस्करी मुळे सीमा पुर्ण पणे सील राहील ह्याची शाश्वती नसते. गेल्या ६५ वर्षांत सील न झालेली सीमा आता सील का झाली नाही अस विचारण म्हणजे मुर्खपणा आहे हे तुमच्या व तुमच्या ह्यांना आम्ही सांगावे म्हणजे काजव्याने सुर्याला .................. गेल्या ६५ वर्षांत जे न घडलेल आहे त्यातल जे काही ह्या ५ वर्षांत घडलेल आहे ते मात्र बघायच नाही असा प्रयास आपल्यालाच खाली घेऊन जाणार आहे !

In reply to by डँबिस००७

61 चा पाढा आता 65 ला आला, त्यातली 10 भाजपचीही आहेत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

बाकी ५५ कोणाची?

In reply to by सॅगी

आमच्या काँग्रेसची

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

| माईसाहेब कुरसूंदीकर १)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. या दोन्ही गोष्टी अप्रस्तुत आणि अप्रासंगिक आहेत आणि त्यात आपला केवळ भाजप द्वेष दिसतो आहे हे मी सप्रमाण सिद्ध केलंय. ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात तीन वेळेस हेलीकॉप्टरने घेऊन जाणे आणि परत आणणे हि अशक्य गोष्ट आहे हे शेम्बड्या पोरालाही पटेल. मुळात हि मागणी कुणी केली आहे हे तुम्हाला दाखवता येईल का? नसेल तर उगाच कळफलक बडवणे थांबवा कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते उगाच फालतू प्रतिवाद करू नका आणि विषयाला फाटे फोडून पळवाट काढू नका.

In reply to by सुबोध खरे

ही घ्या लिंक https://www.thequint.com/news/india/pulwama-terror-attack-crpf-request-… मूळ मुद्दा हा नाही. मोदी व भाजपा २०१२ च्या भाषणात ज्या गमजा मारत होते, मनमोहन सिंगांनाच जबाबदार ठरवत होते. कश्मिर प्रश्न हा जणू काही काँग्रेसवाल्यांनी मुद्दामून निर्माण केला आहे.. आम्ही सत्तेवर आलो की तो सोडवू... मग वाट वाकडी करून नवाझ शरीफांना केक भरवायला जाणे.. मोदी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तान सूतासारखा सरळ आला आहे.. ह्या बद्दल बातम्या पसरवणे... मग सर्जिकल स्ट्राएकने कशी कायमची अद्दल घड्वली..वगैरे... ६०-६५ वर्षत जे झाले नाही ते ५ वर्षात होणार नाही हे कळण्यास राजकीय पंडिताची गरज नाही. मग जाहिरातबाजी न करता निमूटपणे काम तरी करा. प्रत्येकवेळी ईतिहासात जाऊन आधीचे सत्ताधारी कसे चुकले.. हेच सांगणार असाल तर लोक प्रश्न विचारणारच ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

परत तेच कुणा तरी पत्रकाराने कुणाचा तरी हवाला देऊन सांगितलेली गोष्ट जी केवळ अशक्यप्राय आहे ( ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात सहा फेऱ्या हेलिकॉप्टरने करणे). बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे. या स्थितीवर अचूक बोट ठेवणारा जालावर फिरणारा विनोद -- कुठे कुठे आणि कशी क्षेपणास्त्रे डागून पाकिस्तानला नष्ट करणारा डावपेच मी जालावर टाकणार होतोच तेवढ्यात आतून आमची हि ओरडली अहो जाता जाता धोब्याकडे इस्त्रीला कपडे टाका आणि ऑफिसमधून येताना न विसरता दळणाचा डबा घेऊन या. मुलखाचे धांदरट मेले. कुठे लक्ष असतं कुणास ठाऊक? मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत

In reply to by सुबोध खरे

तात्पर्य : इथून पुढे चहावाल्यांनी चहावालेच रहावे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

छान..!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हो डॉक्टर होऊन धनगराचे औषध घेण्यापेक्षा बरं नाही का?

In reply to by सुबोध खरे

"आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत" हे प्रथम सत्तधार्यांना सांगाय्ला हवे. अंतिम संस्काराला चपला घालुन बसणे, अंत्ययात्रा जात असताना पोझ देणे. ज्या दिवशी हल्ला झाला त्याच रात्री खाजगी पार्टीत नाचणे.... https://www.youtube.com/watch?v=CiEatCP6X6Q

In reply to by सुबोध खरे

कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते
अरेरे सरकार आता खरे साहेबानी डिक्लेर केलेल्या अश्या प्रेस्टिट्यूटने दिलेल्या बातम्यांचा विचार करून निर्णय घ्यायला लागले! आता कसं व्हायचं?! व्हात्साप्प ग्रुपवरती माहिती मिळाली नाही वाटत यावेळेस?? बाकी तुम्हीच खाली लिहिलेलं पटलं बुआ आपल्याला
बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे.
मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत
येऊ द्या हं नीट लक्षात!

लोकहो, पुलवामा हल्ल्याचा काश्मिरियतशी कसलाही संबंध नाही. मसूद अझरचा भाऊ अब्दुल रौफ अजगर याने आत्मघातकी आक्रमणाची धमकी दिल्याची चित्रफीत समोर आली आहे. यामध्ये त्याने ‘जर मोदी सरकारने अयोध्येत राममंदिर उभारण्याचा प्रयत्न केला, तर आत्मघातकी आक्रमणे करू’, अशी धमकी दिली आहे. संदर्भ : https://sanatanprabhat.org/marathi/219206.html अधिक माहिती : https://mumbaimirror.indiatimes.com/news/india/pulwama-attack-nine-days… पाकिस्तानात ५ फेब्रुवारी हा काश्मीर दिवस पाळला जातो. त्याचं चलचित्र : https://www.youtube.com/watch?v=ENOPIhZQFQA उपरोक्त चलचित्रात भारत मुर्दाबाद स्पष्टपणे म्हंटलं आहे. आ.न., -गा.पै.

काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो . मग डिफेन्स सुधा फक्त काश्मीर मध्ये करून चालणार नाही पूर्ण देशात आशा कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल

In reply to by Rajesh188

काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो नक्कीच बनवायचा आहे. फक्त भारतच नव्हे तर समस्त जग मुस्लिम नेशन झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. गझवा-ए-हिंद म्हणजे काय हे विशद करून सांगणारा हा व्हिडिओ बघाच ही विनंती आहे. फक्त ६-७ मिनिटांचाच आहे त्यामुळे फार वेळ वाया जाणार नाही. पूर्वापार हिंदुस्थानवर होत असलेली मध्यपूर्वेकडून होणारी आक्रमणे ही याची साक्षीदार आहेत की हे फक्त प्रदेश काबीज करण्यासाठी नसून धार्मिक आक्रमण होते. हल्ले करून देवळे तोडून, ग्रंथ पुराणे जाळून, तरुण हिंदूंना मारून, हिंदू तरुण स्त्रियांना बळजबरीने इस्लाम स्वीकारायला लावणे आणि बलात्कार करून दासी म्हणून भरपूर पोरे काढून त्यांना मुस्लिम वळण लावणे हे कशाचे द्योतक आहे? सीमेवर हे उघड हल्ले तरी लोकांना दिसत आहेत, देशांतर्गत चालू असलेले छुपे हल्ले अजून लोकांच्या लक्षात येत नाहीयेत. एकीकडे हिंदू मुलींना नादाला लावण्यासाठी ग्रूमिंग गँग्स, दुसरीकडे शालेय शिक्षणात अकबर, औरंगजेब, टिपू, तैमूर यांचे गोडवे गाणारे धडे, मुस्लिम संस्कृती कशी चांगली आहे हे सांगणारे परिच्छेद आणि त्याच जोडीने हिंदू राजांबद्दल संस्कृतीबद्दल अतिशय कमी माहिती, तिसरीकडून सिनेमासारख्या माध्यमांतून उर्दू भाषेचे चाललेले कौतुक आणि चौथ्या बाजूने लोकसंख्या वाढण्यासाठी चार चार लग्न करून अनिर्बंध पोरे पैदा करणे. असा चोहीबाजूने छुपा हल्ला चालू आहे. इंग्लंडची वाट लावलीच आहे. युरोपातील बहुतांश देश येत्या २५-५० वर्षात मुस्लिम बहुल होतील, बरेचसे मुस्लिम अधिपत्याखाली जातील. त्या देशातील स्थानिक लोकसंख्या कमी जन्मदरामुळे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. त्यावर तथाकथित मानवतावादाच्या नदी लागून भरमसाठ मुस्लिम रेफ्युजी घेऊन ठेवलेत. आता ते लोक फुकटची वैद्यकीय सेवा आणि child केअर वर मजा मारत आहेत. हे पैसे स्थानिक जनता कष्ट करून जो टॅक्स भरते त्यातून येतात. जेव्हा मुस्लिम लोकसंख्या ३०% च्या वर जाते तेव्हा हे लोक शरियाची मागणी करतात. ते पण फक्त त्यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण प्रदेशात लागू करावा असा आग्रह होतो. जेव्हा ५०% च्या वर जाते तेव्हा तिथे बिगर मुस्लिमांचे जबरदस्तीने धर्मांतरण तरी चालू होते अथवा हत्याकांड चालू होते. त्यानंतर बिगर मुसलमानांचे तिथे राहणे अशक्य होऊन जाते आणि तो प्रदेश पूर्ण मुस्लिम अधिपत्याखाली जातो. हे लक्षात घ्या की नुसती त्यांच्या अधिपत्याखाली जायची प्रोसेसच निर्दयी आणि रक्ताळलेली नसून नंतर सुद्धा हे लोक तेवढेच निर्दयी व क्रूर आहेत.

https://en.wikipedia.org/wiki/Category:Islamic_terrorism_in_India यात भरपूर दुवे आहेत वाचून पहा, महिनाभर तरी लागेल. मग चर्चा करू. पण असे एका धर्माला नाव ठेवायचे नसते त्याने आपल्या पुरोगामित्वाचा धक्का पोहोचतो.

दोन प्रश्नांची उत्तरे देतो - ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते. आदिल अहमद हा स्फोटतत्ज्ञ नसून एक डोके भडकावलेला आणि साधन म्हणून वापरला गेला अतिरेकी होता. त्याला आय ई डी बद्दल माहिती होती कि नाही ते माहित नाही, पण या कृत्याचे बोलावते धनी वेगळे आहेत - अश्या वेळी आय ई डी कसा वापरायचा याची माहिती आणि प्रशिक्षण आय एस आय किंवा अफगाणी तालिबान यांच्याकडून मिळते. स्फोटके स्थानिक, चोरून अथवा इतर मार्गानी जमवतात. स्थानिक मदतनीस इतर व्यवस्था (गाडी वगरे) करतात. प्रत्येकाला पूर्ण प्लॅन माहित नसतो - तो प्लॅन सीमेपलीकडून आखला जातो आणि प्रत्येकाला त्याचा भाग फक्त माहिती असतो. त्याने लाल रंगाची मारुती कार वापरलेली आहे, जीप नव्हे. फोटो पाहिलेत तर तुम्हाला त्यात लाल रंगाचे छोटे कारचे तुकडे दिसतील. प्राणहानी स्फोटामुळे नाही, तर shrapnel मुळे झाली आहे. त्यामुळे दिशा वेगळी असली तरी त्याने फरक पडलेला नाही. ४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय? गोळीबार नाही, त्या shrapnel च्या खुणा आहेत. अश्या वेळी या घटनेमागचे मदतनीस कोण, बोलावते धनी कोण याचा पूर्ण तपास जर लावला तर आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. पण हे पुरावे मिळणे अर्थातच फार अवघड असते.

In reply to by मनो

१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? हे सर्वस्वी सेनेवर अवलंबून असून सेना त्या त्या परिस्थितीत योग्य तो निर्णय घेत असते. त्यात आपण इथं खल करत बसण्यानं खरंच काही उपयोग नाही. २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? या प्रकाराला अँबुश अटॅक म्हणतात. हा कधीही, कुठेही, कुणावरही होऊ शकतो. जसं हार्ट अटॅक आलेला समजण्याआधी अनेक अटॅक येऊन गेलेले असतात आणि त्यांना शरीर सांभाळून घेतं, त्यासारखं. असा अटॅक येतो तेव्हा योग्य मदत मिळाली तर तोही परतवून लावता येतो. अर्थात् संपूर्ण सुरक्षीत कुणीच / कधीच नसतो. त्यामुळे अशा अटॅक्समुळे गुप्तचर यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असं मकुणीच, मला तरी योग्य वाटत नाही. सर्वजण आपापल्या परीनं पूर्ण प्रयत्न करतच असतात, नाही तर पावलोपावली अटॅक्स झाले असतेत. जे अशा अपयशाच्या नावानं बोंब मारतात, ते सरकारला नव्हेत तर सेना, गुप्तचर यंत्रणा आणि समग्र संरक्षण यंत्रणेला नावं ठेवत असतात. या प्रकाराला शुद्ध कृतघ्नपणा असंच म्हणतात. एक मुखबीर नावाचा चित्रपट आहे, तो बघावा अशा लोकांनी.. चित्रपट असला तरी इतका अंगावर येतो.. प्रत्यक्षात कसं असेल याची आपल्याला कल्पनाही येऊ शकत नाही. ५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय? झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील? कोणताही समर्थ देश हे जाहीररित्या करेल. त्याला असलं काही लपून करण्याची गरज नाही. जसं इस्रायल. आता भारतही. म्हणतांना खरंच अभिमान वाटतोय. :-) ६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं हे आत्ताचं नाही. जानेवारी २०१४ मधे हे वक्तव्य प्रसारित झालेलं मला चांगलं आठवतंय. मी तो विडिओ बघितलेला आहे. या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल? आज केलेला स्ट्राईक हा ऑफेन्सिव्ह डिफेन्स याच प्रकारात मोडतो. उरीचा बदलाही असाच. पण एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक नाकेबंदी, शत्रूच्या मित्रदेशांशी हातमिळवणी करून शत्रूला एकटे पाडणे, संरक्षण दलांना पूर्ण मोकळीक, कडक गुप्तचर यंत्रणांचे जाळे... हे सगळे नाही अशी कल्पना करा आणि मग ह्या प्रकारच्या स्ट्राईकची कल्पना करा.. उरीच्या बदल्याच्या वेळेसच मोठ्या युद्धाला तोंड फुटले असते. अचूक नियोजन करून, बिनचूक अटॅक करणे आणि शत्रूदेशाची सीमा ओलांडून ३०० ते ३५० अतिरेकी एकरकमी मारणे, हे गुप्तचर यंत्रणांच्या निर्भेळ यशाचेच द्योतक आहे. जाता जाता: मला स्वतःला असं वाटतंय की हा बालाकोटचा हल्ला पुरेसा राहणार नाही. आणिकही काही होईल. काय त्याची कल्पना नाही अर्थात्.. अवांतरः कलम ३७० कधीही रद्द करता येऊ शकते. https://www.youtube.com/watch?v=OcEpkuNZEqQ मला ३५ अ / ब याबद्दल माहिती हवी आहे. असल्यास सांगावे. राघव

आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. हा एक गैरसमज आहे तुम्ही वाटेल तो पुरावा द्या पाकिस्तान तो मान्य करणारच नाही. India

will not submit any evidence to Pakistan

on the role of Jaish-e-Mohammad in the Pulwama terror strike, and instead give all such facts to friendly nations to unmask the role of elements based in the neighbouring country in the attack, a senior government official said. The official was sharing the views within the government, which is not at all in favour of giving any evidence to Pakistan considering the past experience when despite giving multiple dossiers on the involvement of Pakistan-based elements in the 26/11 Mumbai terror attacks and terror strike in Pathankot airbase, Islamabad did nothing to punish the perpetrators. https://www.business-standard.com/article/pti-stories/india-won-t-give-… तपासाचा मूळ हेतू हा आहे कि गुन्हा कसा घडला त्याची पार्श्वभूमी त्याची पद्धत(MODUS OPERANDI) त्यात हातभार लावणारे घरभेदी कोण आहेत त्यांचा छडा लावणे हा आहे. पाकिस्तानला कितीही पुरावा दिला तरी ते ग्राह्य धरणार आहेत का? अजमल कसाबला जिवंत पकडल्यावर(प्रत्यक्ष पुरावा असताना) तो पाकिस्तानी नागरिक नाहीच म्हणून सांगितले मग परिस्थितीजन्य पुराव्याचा काय उपयोग?

In reply to by मनो

घरभेदी कोण असावेत याचा अंदाज येण्यासाठी खालील लेख वाचा लेख १ लेख २ वरील लेखामधील एक परिच्छेद - २०११ च्या सुमारास अकस्मात एक बातमी भारतीय माध्यमातून झळकली आणि राजकारणात एकच खळबळ उडालेली होती. संरक्षणमंत्र्यांच्या फ़ोनवरील संभाषणही चोरून ऐकले जात असल्याची ती बातमी होती. तो आक्षेप भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागावर ठेवण्यात आलेला होता. त्याखेरीज आणखी एक अशीच अफ़वा वर्तमानपत्रातून सोडली गेलेली होती. प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने सेनादलाच्या अनेक तुकड्या राजधानी दिल्लीत संचलनाचा सराव करीत होत्या. त्याचवेळी उत्तरप्रदेशाच्या मेरठ येथून काही सेनादलाच्या तुकड्या इतरत्र कुच करीत होत्या. त्यातून भारतीय लोकशाही उलथून टाकत सेनादल सत्ता काबीज करायच्या प्रयत्नात असल्याची ती अफ़वा होती. तिला कुठलाही आधार नव्हता आणि गोंधळ उडवून देण्याचाच त्यामागचा हेतू होता. तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. कारण तितके निमीत्त साधून दिल्लीची नोकरशाही, राजकारणी व तथाकथित बुद्धीमंतांनी मोठा हलकल्लोळ माजवला आणि तेव्हाचे लष्करप्रमुख व्हॊ. के. सिंग यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. उपरोक्त दोन बातम्या भारतीय सुरक्षा दलाच्या विविध दक्षता यंत्रणांना उध्वस्त करणाचा व्यापक कट होता. कारण तेव्हा सिंग व संरक्षणमंत्री अन्थोनी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचाच आधार घेऊन गलिच्छ राजकारण खेळले जात होते. माध्यमातून मग सिंग यांना सरसकट लक्ष्य करण्याची मोहिमच हाती घेण्यात आली. काश्मिरातील पाकवादी प्रवृतीच्या राजकारण्यांनी तोफ़ा डागल्या. सिंग लष्करी अधिकारी आणि संरक्षण खात्याचा पैसा वापरून काश्मिरी राजकारणात ढवळाढवळ करीत असल्याचाही एक आरोप त्यात समाविष्ट होता. त्यासाठी मग टीएसडी हा शब्द पुढे आला, ही टीएसडी म्हणजे टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन गुप्तचर म्हणून काम करीत नसून काश्मिरातील लोकांनी निवडलेले सरकार पाडण्यासाठी उचापती करीत असल्याचा आरोप पुढे आला. लष्करी पैसे देऊन एक अपक्ष आमदाराला खरेदी करण्यात आल्याचा बिनबुडाचा आरोप ठळकपणे पुढे आला आणि त्याचा कुठलाही पुरावा कधीच कोणी दिलेला नव्हता. पर्यायाने टीएसडी ही गोपनीय बाब चव्हाट्यावर आली आणि तिचा गाशा सेनादलाला गुंडाळावा लागला. त्यात कार्यरत असलेल्या अधिकारी व हस्तकांचे चेहरे उघडे पडले आणि अनेक अधिकारी कोर्टमार्शलचे बळी झाले. पण ती बाब महत्वाची नाही. त्यातून काश्मिरात गुपचुप जी कारस्थाने शिजवलॊ जात होती, त्यांची इत्थंभूत माहिती सेनादलाला मिळण्याचा मार्गच बंद होऊन गेला.

Kashmir आणि खलिस्तान ह्याची तुलना केली तर दोघांना सुधा स्वायतत्ता हवी होती . आणि संघर्षाचं कारण उघड तरी दोघांचं होते . मग खलिस्तान प्रश्न मिटवता आला परंतु काश्मीर धागगत राहायला ह्या मधून आसा पण निष्कर्ष निघतो की हा काश्मीर शी संबंधित प्रश्न नसून dharmikteshi संबंधित प्रश्न आहे आणि त्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आघाड्या उघडलेल्या आहेत पण आपण फक्त ऐकाच आघाडीवर लक्ष केंद्रित केले आहे त्या मुळे तो सुटत नाही . ऐक तर्क आसा सुधा करता येतो सध्य परिस्थिती बघून

म्हात्रेंनी खोटी बातमी इथे दिल्याबद्दल एक अक्षराने माफी मागितलेली नाही ह्याची नोंद सगळे वाचक घेतीलच.

In reply to by अर्वाच्य

तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही बोलता का हो?आज वर म्हात्रें काकांनी मिपा वर एकही खोटा किंवा असंतुलित प्रतिसाद मी तरी वाचला नाही आहे.

In reply to by अर्वाच्य

बा अर्वाच्च्या तु मिपा वरुन हाकलुन लावलेल्या ज्या कोणाचा आय डी आहेस तुझी हकालपट्टी ही तुझ्याच कर्माने झालेली आहे या याबद्दल निश्चिन्त रहा . ती का झाली असावी याचाही अंदाज आता यायला लागला आहे. म्हात्रे कांकांवर खोटारडे पणाचा आरोप त्यांच्या विचारसरणीचे विरोधकही करणार नाहीत.. जर तू डोक्यावर पडला असशील तर बाबच वेगळी आहे !

In reply to by lakhu risbud

अगदी बरोबर..!! शेवटी एक मिपाकरच दुसऱ्या मिपाकराच्या मदतीला येणार. खांद्यावर डोके वगैरे वगैरे..! आपल्या कांकांवर खोटारडे पणाचा आरोप म्हणजे काय ! जाहीर निषेद..! ===

In reply to by विशुमित

इथले काका त्यांचे ते बघण्यास समर्थ आहेत हो ! तुम्ही तुमच्या काकांची काळजी करा.पुतण्याला तोंडघशी पाडलंन त्यांनी. मावळातून लढायचं म्हणे पर्यंत कात्रज चा घाट दाखवलान. तुम्हाला आता प्रचाराचा ओव्हरटाईम कसा जमणार ते बघा.

In reply to by lakhu risbud

अस कस अस कस.. आपले सन्मानीय काका देखील डू आय डी चा सहारा घेत आहेत, असे जाणवते आहे. बाकी आमच्या तालुक्यातील काका पुतणे त्यांच ते बघून घेतील. तुम्ही कशाला लुडबुड करताय? चिरीमिरीसाठी एवढा निर्लज्जपणा?? अरेरे...!!

In reply to by lakhu risbud

जिथे तिथे व्यक्तिपूजाच करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार! म्हात्रेंनी वरती व्हिडीओ लिंक शेअर केली आहे ती फेक बातमी आहे, मजकूर खुबीने टाकलाच नाहीये म्हणजे असे नको व्हायला कि काही स्वतः काहीतरी लिहून जबाबदारी घ्यायला लागावी! हे आधी पण काही ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे असे होऊच्च शकत नाही टाईप प्रतिसाद तुमच्यापाशी ठेवा! बाकी जास्त काही बोलायला नको नाहीतर "जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला नाही पण संक्षींना घालून पाडून बोललं गेलं! सोबतीला इतर सवंगडी आलेच लगेच... १-२ दिवसातच संक्षींचा आयडी देखील बॅन झाला!" असो, आताशा इकडे येणे कमीच केले असल्याने स्वतःच्या आयडीबद्दल फारसे ममत्व राहिलेले नाही त्यामुळे चालू द्यात काहीही! ट्रोल्सचे पीक चिखलात उत्तम येत आहे.

In reply to by अर्वाच्य

द्वेषातुन प्रतिसाद देण्याची काही गरज नव्हती असे वाटते... त्यांनी केलेल चांगले लिखाण हे चांगलेच आहे.. जिथे चुक वाटते तिथेच बोलणे संयुक्तिक असावे

In reply to by शब्दबम्बाळ

अर्वाच्य हा आयडी इतक्यात बॅन पण झाला! केवढं ते स्पीड! इथले बरेच मान्यवर आयडी इतरांची लायकी/पगार काढून, शिवीगाळ करूनही कवच कुंडले पांघरून सुरक्षित राहतात असे दिसतंय! असेही खाजगी संस्थळ आहे म्हणा! पण मग जाहीर करून टाका ना, की या या आयडीना स्पेशल प्रोटेक्शन योजना आहे, बाकी लोकांनी काहीही बोलू नये अन्यथा १ दिवसाच्या आत हकालपट्टी होईल. याशिवाय फेक न्यूज पसरवल्याबद्दल अवाक्षर देखील काढलेलं नाहीये अजून कोणी! पुरावा दिल्यावर आता सवंगडी आणि फॉलोवर गायब झाले वाटत...

In reply to by शब्दबम्बाळ

म्हणून गपगुमान बस्तो. काही लोकांनी कायबी लीहीलं तर चालतंय हिकड. अट एकच मोदीशेठला चांगलं म्हणा. म्हात्रे साहेब न ते दुसरे खरे साहेब यांना आवरा अस कुणी सांगायच आन कुणाला. ते गुर्जी का कोण आन ते मोदक साहेब न्हाईत वाटत आजकाल.

In reply to by शब्दबम्बाळ

संपादक मंडळ- आय डी बॅन बाबत काही पारदर्शकता आणता येउ शकते का ? नाहीतर मिपा हे २०१९ च्या निवडणुकीपर्यंतच स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू शकेल. कृपया याला कोणी "गर्भित धमकी" वगैरे असली विशेषणे लावू नका. कारण ती मी फाट्यावर मारत असतो. मला फक्त मिपाची काळजी आहे. विविध वाङ्मय रसग्रहणाची हक्काची जागा म्हणून मी या संकेतस्थळाकडे आज पर्यंत तरी पाहिले आहे.

In reply to by विशुमित

अहो संपादक मंडळाला विनंती करताय पण त्यात कोण आहे पाहिलंय का? :) बर मागे कोणीतरी म्हटलं होत कि संपादक मंडळाला अधिकार नाहीत हकालपट्टीचे, पण "वट्ट" असला कि कोण काय बोलणारे?! ;) इतरांनी चुकीची बातमी दिली(जी फक्त भाजपशी रिलेटेड असेल) तर पानभर लिहितील समोरच्याला उपदेश! पण स्वतः दिलेली सगळी माहिती चुकीची निघाल्यावर खेद व्यक्त करायला पण जमत नाही! ब्रम्हांडनायकाकरून हि गोष्ट तेव्हडी चांगली शिकून घेतलीये त्यांच्या फोल्लोवर्सनी!

In reply to by lakhu risbud

तुम्हाला सदाशिव पेठेत जायचे असताना बारामतीच्या एस टी त कसे काय बसता?? काही केमिकल लोचा आहे का?? === अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.

In reply to by विशुमित

असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात. स्वतःबद्दलचे एवढे अचूक आणि परखड निरीक्षण करणारे आजकाल विरळच ! मिपाकर म्हणून तुमच्या प्रगतीबद्दल अभिमान वाटला.

In reply to by lakhu risbud

असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. ==)) अस होय, सोर्री सॉरी. उगाच हिस्के मारले तुम्हाला. त्यां मेनका मैडम यायच्या धावत. तुम्हाला दुखलं असेल ना! === बाकी वरचं विश्लेषण तुमच्यासाठीच होते. वाटले होते तुम्हाला समजले असेल पण तुम्हाला एस टी चा बोर्डच नाही समजत तर हे कुठले समजायला. असो. आता तरी समजलं असेल अशी आशा करुयात. आता तुम्हाला युयु करतोय, परत आला की हाड हाडच असणार आहे ...!

In reply to by lakhu risbud

प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.
हे वाक्य अप्रतिम आहे, पण ते प्रत्येकालाच लागू होते ह्याची नोंद घ्यावी. वारसाहक्काने कुठले आयडी स्वतःच्या प्रतिकृती काढून येत आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे.बिग्रेडी अजेंडा राबवणारे ह्याला अपवाद नाहीत.

In reply to by शब्दबम्बाळ

जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला मला फक्त जिएसटी माधे इन्तेरेस्त आहे ,कोनि धाग सन्गु शकेल कोन्त आहे ?

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सैनिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सर्व केंद्रीय सुरक्षा दलांना आता जम्मूहून श्रीनगरला नेण्यासाठी विमान प्रवासाची सेवा पुरवली जाणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता बीएसएफ, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनातीसाठी हवाईमार्गे श्रीनगरला नेलं जाणार आहे. सुट्टीवर जाताना, सुट्टीवरुन परतताना किंवा सुरक्षा दलाच्या पथकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हवाईमार्गाचा वापर केला जाणार आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-दिल्ली या मार्गावर विमान सेवेचा वापर केला जाईल. जवळपास 7 लाख 80 हजार जवानांना याचा लाभ मिळणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-pulwama-attack-govt-all… मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले. हे बघण्या आधी भाजपा सरकारला सैनिकांची सुरक्षा व त्यांचे जीव हे जास्त महत्वाचे आहेत हा महत्वाचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे जवळपास ८ लाख सैनिक हे श्री मोदीजींचे फॅन झालेले आहेत. सैनिकांच्या रक्ताची दलाली करणार्यां काँग्रेसला व अश्या पक्षाची दलाली करणार्या निर्बुद्धाला हे कळणार नाही !!