माझं गाव-हरिहरेश्वर.-१
खरं म्हणजे हरिहरेश्वर माझं अजोळ.पण वडिलांकडून 'हे माझं गावं' असं म्हणावं असं कोणतंही गाव नसल्यामुळे लहानपणापासून,अगदी पहिली/दुसरीत असल्यापासून माझी मे महिन्याची सुट्टी म्हणजे हरिहरेश्वर असं समिकरण झालवतं.सुट्टी लागल्या दिवसापासून ते शाळा सुरु व्हायच्या दिवसापर्यंत मी आणी मोठाभाऊ(दादा), आमची घरुन रवानगी (किंवा हकालपट्टी ;-) ) मु.पो.हरेश्वरला असायची.
मी या पौरोहित्याच्या व्यवसायात पडल्यापासून,मला गेल्या १० वर्षात मे महिना हा अमचा सिझनचा असल्यामुळे माझ्या मामाच्या गावाला कध्धीही जाता आलं नव्हतं.म्हणजे एरवी अधुन मधुन जायचो,पण ती मे महिन्यातली मजा काहि अनुभवता येत नव्हती,पण या वर्षी पंचांगवाले दाते यांचे कृपेकरोन आंम्हा सर्व भटजींना गुरु/शुक्र अस्ताचे निमित्तानी मे महिन्याची सुट्टी मिळाल्यामुळे हरेश्वरला जायचा योग आला. (त्यामुळेच गेल्या अख्ख्या मार्च/एप्रिलचा कामाचा प्रचंड ताण मला एरवी पेक्षा सहज सहन झाला असावा.) तसही मला १०मे पर्यंत बारिक सारिक काम होतच.पण ११मे मी मनानी कोकण दोर्याची ओपनींग डेट म्हणुन निश्चित केलेली होती.१० मे-ला माझं चालू काम संपताना/घरी येताना,माझ्या मनात शाळेत असताना शेवटचा पेपर-टाकताना जी खुषी दाटून यायची (ग्येले ते दीस ;-) ) तीच त्या दिवशी आलेली होती. आणी मग पुढे तेच जुन चक्र चालू झालं.१० ला का कोण जाणे कळत नव्हतं,पण होता होता संध्याकाळ होत नव्हती. आणी संध्याकाळ होऊन रात्र झाली तर झोप लागत नव्हती.
अखेर ११ला मी आधी रेवदंड्याला मावशीच्या घरी,आणी तिथुन दुसर्याच दिवशी दुपारी माझ्या कळव्याच्या आलेल्या मामासह त्याच्या व्ह्यान मधुन सगळेजण हरेश्वरला गेलो. तिथुन श्रीवर्धन पर्यंत पोहोचलो,आणी मग माझा गावाचा-मोड ऑन>> झाला,कारण पूर्वी त्या लाल डब्यातून एकदा पुण्याहून श्रीवर्धनला येऊन पडलो...(पार्सल सारखे!) की मग पुढे हरेश्वरला नेऊन टाकणार्या ,खास खिळखिळ्या झालेल्या,दुसर्या लोकल लाल डब्यात पडायचो.मग तो लाल्या उर्फ यश्टीचे विंजिन त्याच्या खास खड्र्रss खड्र्रss घ्यांss घ्यांss अश्या अवाजाच्या कुठल्याही घराण्याशी न जुळणार्या रागात आंम्हाला हरेश्वरला नेऊन विसर्जन करायचा. (हो... विसर्जनच! कारण तो पर्यंत त्यावेळी असलेल्या पर्याप्त रस्त्यांमुळे आणी त्याच रस्त्यावर मेंटेन झालेल्या येश्टीमुळे देहातली हाडं खिळखिळी होऊन अस्थी विसर्जनाचीच वेळ आलेली असायची)
पण यावेळी रस्ताही छान होता आणी बरोबर मामाची व्ह्यान होती म्हणुन,आणी आमची श्रीवर्धन-हरेश्वर टप्याची वेळ तीच संध्याकाळच्या येश्टीची 'सोडायची' अशी जुळून आल्यामुळे मला लै मज्जा येत होती. पूर्वी येश्टीतनं जाताना एकेक गाव जसं मागे पडायला लागायचं,तशी मनातली गावभेटीची हुरहुर अधिक दाटायला लागायची.तसच यावेळी मला सायगाव /काळिंजे/ भेंडखोल-कडे,अश्या गावांच्या पाट्या जायला लागल्यावर मनात आनंद आणी हुरहुर अश्या मिश्र भावना दाटत होत्या.तसच मागे एकदा याच काळिंज्याच्या जवळपास गतिरोधक या पाटिवरच्या शब्दाचा खाडाखोड करुन केलेला अचरट पंचनामाही ;-) अठवत होता.तसच खास त्या लालमातीच्या गुण-धर्मानी युक्त विचारांची मधुनच दिसणारी पुढं गाव व शाळा आहे.वहाने सावकाश हाका! ही पाटिपण मज्जा देऊन जात होती.हे सगळ होता होता आंम्ही मावशीच्या घरी हरेश्वरला पोहोचलो. आणी तिथुन दुसर्या दिवशी माझा,हरेश्वर या बालजीवनातला अत्यंत जिव्हाळ्याच्या शिनुमातला ''मामाचं घर'' हा पार्ट सुरू झाला...
मामाचं घर- सुदैवानी हे आईच्या अजोबांच्याही पूर्वी बांधलेलं घर अजुनही तसच ठणठणीत आणी शाबूत आहे...
सकाळी उठल्यावर साधारण नऊ वाजता नाश्टा(घरातला) वगैरे झाला,की मी ,माझी बाकिची शेजारपाजारची आणी आलेली अशी आठदहा जणांची टिम गावावर स्वारी करायला निघायचो.मग पहिल्यांदा खोताच्या वाडितल्या कैर्यांवर हल्ला व्हायचा.
हा खोताच्या वाडिकडे जणारा रस्ता आणी आत दिसतय ते भलंमोठ्ठं १ ट्र्क अंबा देणारं एक झाड
अता तसं म्हातारं झालय,पण अजुनही अंबे देण्याचा जोम तोच आहे.. ;-)
ह्या झाडावरच्या कैर्या-नेलेल्या मिठाला जागुन भरपुर हदडून झाल्या,किंवा तिथनं कुणी हुसकवलं, कि मग शेजारी मोहन मामाच्या वाडितल्या जांबांवर आम्ची नजर पडायची.तिथंही अटकाव झाला,तरी त्यांच्याही इथे आलेली दोनचार कार्टी आम्च्या ग्यांगमधे सामिल असल्यामुळे मार पडत नसे,आंम्ही अती नासधुस करतोय असं वाटलं तर फक्त हुसकाऊन लावित!.मग नंतर आंम्ही त्याच्या शेजारच्या विठोबाच्या देवळात
मेंढिकोट/झब्बू/गड्डेरी/बदामसात असे-इतरांना आंम्ही शांत बसलोय,असा देखावा करणारे खेळ खेळत बसायचो. वातावरणातली धुळ जरा खाली बसली,की लगेच त्याच मोहन मामाच्या मळ्यातल्या दुसर्या अंब्याच्या झाडावर आमची धाड पडायची.हे झाड बुटकं असल्यामुळे आजुबाजुच्या गवताच्या गंज्यांवर चढुन कैर्या उडवता यायच्या... थोडक्यात म्हणजे,दगड मारायचे कष्ट वाचायचे..!
मग त्यानंतर आमच्या चार्ज झालेल्या गाड्या घरांच्या अंगणांमधे खांब-खांबोरी/एकटप्पा आऊट क्रिकेट/चोर-पोलिस इ.खेळांमधे परत डाऊन व्हायच्या..त्यातले वळचणी आणी दोन घरांच्या मधले बोळ हे आम्चे एकशेवीसनी पळायचे महामार्ग होते...
भरपुर हुंदडुन झाल्यावर परत पोटात आग पडायची.आणी,कोकणच्या हवेला ''खाल्लं काहिही आणी कितिही,तरी पचतं लवकर'' हा सार्वत्रिक परिणाम असल्यामुळे...भूक लागल्याची जाणिव होऊन आमचा मोर्चा परत घरांकडे वळायचा...
त्यानंतर दुपारी १ /२ वाजता आंम्ही परत ताजे तवाने होऊन वळायचो...ते उन्ह टाळून वाडित धिंगाणा घालायला...!
क्रमशः.....

Book traversal links for माझं गाव-हरिहरेश्वर.-१
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त नॉस्टॅल्जिया रंगत होता
+१
+२
छान छान
सही!!!!
ख्ररेच खुप मजा येत होती
कसलं भारी.... ज्याचं अजोळ
>>>कसलं भारी.... ज्याचं अजोळ
अगदि अगदि .. खरच गुर्जि भारी
गेले ते दिवस.. राहिल्या फक्त
किती स्वछ आणि सुबक आहे हे गाव
अत्रुप्त आत्मा साहेब, निव्वळ लाजवाब .
येवा, कोंकण तुमचोच असां...
छान लिहिलंत बुवा. मामाचं घर
क्रमशः नकोय, बाकि मज्जा आली
हा घ्या पुढचा भाग
मस्त हो बुवा!
सगळं भन्नाट!
व्वा बुवा..!
आई ग्ग! कैरीच्या नुसत्या
लई भारी ओ बुवा, तुम्हाला एक
अ आ , तुमचे नाव अत्रुप्त
छानच लिहील आहेत. पुढचा भाग
वा वा हा लेख म्हणजे माझीपण
सुंदर लिहिलेय. तसेही कोकणचे
आठवणी जाग्या झाल्या २
@ कुटुंबे नावाचे एक गृहस्थ
हो का? राहायला मि तिथे
गेल्याच वर्षी श्रीवर्धन - हरेश्वर-दिवेआगर यात्रा केली होती....
आज ह्या लेखाचा पहिला भाग वर
सुरेख कविता आत्मूस.
या लेखाचा दुसरा भाग साप्डत
हा घ्या पुढचा भाग http:/
लेख, कविता आणि फोटो सर्वच