Skip to main content

पाभे की बात नं ८

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 23/05/2026 12:47 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात नं ८

मितरों,  

आता इथेनॉलचा नवा जोर चाललाय! सरकार म्हणतंय – पेट्रोलात इथेनॉल मिक्स करा, जास्त करा, E30 पर्यंत करा, शेवटी E100 करा! म्हणजे १००% इथेनॉल. गडकरी साहेब म्हणतात, “पेट्रोल सोडा, इथेनॉल प्या... अरे म्हणजे गाडीत घाला!”  

मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय तो देशी दारूचा! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”  

आता प्लॅन असा आहे –  
- पेट्रोल महाग? इथेनॉल घाला.  
- मायलेज कमी? म्हणजे कमी फिरा, पर्यावरण वाचवा.
- गाडी बिघडते आहे? गॅरेजमध्ये न्या. 
- गाडी बंद पडली? शेतकऱ्यांना धन्यवाद द्या, त्यांचा उसाचा रस चालवताय!  

मितरों, लवकरच गाड्या धान्यावर चालतील. फक्त एक सल्ला – E100 भरताना गाडीला “नॉन-व्हेज” स्टिकर लावा!

आणि हो, एक सांगायचे राहीले. इथेनॉल मिक्स करण्याचा धसका इराण, सौदी, रशीया, अमेरीका इत्यादी तेल पुरवठादार देशांनी घेतला आहे. आता त्यांचे हक्काचे गिर्हाईक गेले समजा. 

हा एक मास्टरस्ट्रोक आहे.  

भेपुपाकीबा त.  

#पाभे_की_बात


वाचने 344
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

>> हा एक मास्टरस्ट्रोक आहे.  

आणि हा मास्टरस्ट्रोक मारणारं 'डीप स्टेट' आहे ह्याचा उल्लेख विसरून कसे बरें चालेल!

 

- (मास्टरस्ट्रोकर) सोकाजी 


बीपीसीएल सरकारी तेल कंपनी मार्च तीमाहीतील नफा ३२९१ कोटीवर स्थीर राहिला.  संपूर्ण  आर्थिक वर्षामधे हा नफा ७५ % च्या प्रचंड वाढीसह २३३०३ कोटीवर पोहचला. रिफायनरी उत्पादन आणि इंधन विक्री वाढल्यामुळे हा नफा झाला आहे. 
 

बाकी, देशभक्तांनी हार्मूझ बंदरावर डोळे ठेवून राहा. देशावर संकट आहे, एकदा हार्मूझ बंदर मोकळं झालं. भाववाढ कमी होईल थोडा धीर धरा. 

-दिलीप बिरुटे


"मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय ती देशी दारूची! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”  

ठ्ठो 😁 वाईट हसतोय

 

#पाभे_की_बात नाही भाऊ ही भपके कि बात है 😜


In reply to by सचु कुळकर्णी

वाचकांचे समाधान हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आमचे येथे नेहमी ताजा, स्वच्छ माल मिळतो.

कमी किंमत आणि उच्च दर्जा हे आमचे सातत्य आहे.

येथे कामगारांना दररोजचा पगार दिला जातो.

येथे बालकामगार काम करत नाहीत.

दुपारी १ ते ४ दुकान बंद असते.

आमची दुसरीकडे शाखा नाही.


"मितरों, ऊसाच्या रसाची ही क्रांती बघाच!"
सौदी अरेबियाने आता गाशा गुंडाळायला हवा आणि रशियाने तर विषयच सोडला पाहिजे. जगाच्या भूकारणावरचा सगळ्यात मोठा 'मास्टरस्ट्रोक' आता कुठे अरब देशात नाही, तर आपल्या गल्लीतल्या साखर कारखान्यात तयार होतोय!
सरकारने थेट आदेश दिलाय – "इथेनॉल मिक्स करा! अजून मिक्स करा! E20, E80, E100!" अहो, इथेच का थांबता? थेट E200 चा टार्गेट ठेवा – जिथे गाडीला इंजिनची गरजच पडणार नाही; गाडी फक्त शुद्ध देशप्रेम आणि आंबलेल्या ऊसाच्या रसावर सुसाट पळेल. गडकरी साहेबांचं म्हणणं आहे की आता पेट्रोलचा नाद सोडा. तसंही पेट्रोलचे भाव बघता, त्याच्याकडे नुसतं बघणं हा सुद्धा आता लक्झरीचा भाग झालाय.
म्हणून मी एक आदर्श नागरिक व्हायचं ठरवलं. मधल्या सगळ्या सिस्टीमला बायपास करून मी माझ्या छोट्या गाडीत थेट E100 टाकलं!
निकाल? एकदम जादुई!
सकाळी थंडीत गाडी चालूच होत नाही, पण सायलेन्सरमधून जो सुंगध येतोय ना... आहाहा, अद्भूत! रात्री ११ वाजता देशी दारूच्या दुकानाबाहेर जसा सुवास येतो, अगदी तस्साच! काल एका ट्रॅफिक पोलिसाने माझी गाडी थांबवली. त्याने गाडीच्या काचेजवळ नाक नेऊन वास घेतला आणि तो फक्त गोड हसला. ब्रेथ ॲनालायझर काढायची त्याला गरजच वाटली नाही. तो नुसताच म्हणाला, "साहेब, सोड्यासोबत की थेट 'ऑन द रॉक'?"
जर तुम्हीही माझा हा ऐतिहासिक प्लॅन फॉलो करणार असाल, तर हा घ्या अधिकृत 'सर्व्हायव्हल गाईड':
  • इंजिनमधून धडधड आवाज येतोय? अजिबात काळजी करू नका. तो कसलाही बिघाड नाही, तो ग्रामीण विकासाचा आवाज आहे! ऊसाचं पीक चांगलं आल्यामुळे तुमचे पिस्टन्स इंजिनमध्ये ढोल-ताशांच्या तालावर नाचत आहेत.
  • मायलेज अर्ध्यावर आलं? अहो, हा तर सगळ्यात मोठा फायदा आहे! गाडी जर दर ५ किलोमीटरला बंद पडली, तर तुम्ही जास्त पायी चालाल. पायी चालल्याने आरोग्य सुधारेल आणि पर्यावरणही वाचेल. हा आरोग्याचा मास्टरस्ट्रोक आहे.
  • इथेनॉलमुळे रबर पाईप्स सडून खराब होतायत? गाडीच्या बंपरवर फक्त एक "मी शेतकरीपुत्र" चा स्टिकर लावा. त्या भावनेच्या जोरावरच इंजिनचे सगळे सुटे भाग एकत्र टिकून राहतील. आणि गाडी पूर्णपणे बंद पडलीच, तर गॅरेजमध्ये गाडी लावून शेतकऱ्यांचे आभार माना की त्यांनी तुम्हाला ट्रॅफिक जाममधून वाचवलं!
जगाच्या राजकारणावरचा याचा परिणाम बघा मित्रांनो. दुबईतले तेल राजे सध्या घामाने डबडबले आहेत. ओपेक देशांच्या इमर्जन्सी मिटिंग्ज सुरू आहेत. त्यांना कळून चुकलंय की त्यांची मक्तेदारी संपली आहे, कारण भारताच्या गाड्या आता कालच्या उरलेल्या भातावर आणि सडलेल्या मक्यावर धावतायत!
भविष्य एकदम उज्ज्वल आहे मित्रांनो. लवकरच आपण पेट्रोल पंपावर नाही, तर धान्य बाजारात जाऊ. जाता जाता फक्त एकच सल्ला: गाडीत E100 भरताना त्यावर "शुद्ध शाकाहारी" असा स्टिकर नक्की लावा. गाडीच्या इंजिनमध्ये धान्यासोबत विनाकारण 'नॉन-व्हेज्' वाईब्स नकोत!