पाभे की बात नं ८
मितरों,
आता इथेनॉलचा नवा जोर चाललाय! सरकार म्हणतंय – पेट्रोलात इथेनॉल मिक्स करा, जास्त करा, E30 पर्यंत करा, शेवटी E100 करा! म्हणजे १००% इथेनॉल. गडकरी साहेब म्हणतात, “पेट्रोल सोडा, इथेनॉल प्या... अरे म्हणजे गाडीत घाला!”
मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय तो देशी दारूचा! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”
आता प्लॅन असा आहे –
- पेट्रोल महाग? इथेनॉल घाला.
- मायलेज कमी? म्हणजे कमी फिरा, पर्यावरण वाचवा.
- गाडी बिघडते आहे? गॅरेजमध्ये न्या.
- गाडी बंद पडली? शेतकऱ्यांना धन्यवाद द्या, त्यांचा उसाचा रस चालवताय!
मितरों, लवकरच गाड्या धान्यावर चालतील. फक्त एक सल्ला – E100 भरताना गाडीला “नॉन-व्हेज” स्टिकर लावा!
आणि हो, एक सांगायचे राहीले. इथेनॉल मिक्स करण्याचा धसका इराण, सौदी, रशीया, अमेरीका इत्यादी तेल पुरवठादार देशांनी घेतला आहे. आता त्यांचे हक्काचे गिर्हाईक गेले समजा.
हा एक मास्टरस्ट्रोक आहे.
भेपुपाकीबा त.
#पाभे_की_बात
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> हा एक मास्टरस्ट्रोक आहे. …
आणि हा मास्टरस्ट्रोक मारणारं 'डीप स्टेट' आहे ह्याचा उल्लेख विसरून कसे बरें चालेल!
- (मास्टरस्ट्रोकर) सोकाजी
बीपीसीएलचा नफा
बीपीसीएल सरकारी तेल कंपनी मार्च तीमाहीतील नफा ३२९१ कोटीवर स्थीर राहिला. संपूर्ण आर्थिक वर्षामधे हा नफा ७५ % च्या प्रचंड वाढीसह २३३०३ कोटीवर पोहचला. रिफायनरी उत्पादन आणि इंधन विक्री वाढल्यामुळे हा नफा झाला आहे.
बाकी, देशभक्तांनी हार्मूझ बंदरावर डोळे ठेवून राहा. देशावर संकट आहे, एकदा हार्मूझ बंदर मोकळं झालं. भाववाढ कमी होईल थोडा धीर धरा.
-दिलीप बिरुटे
टॅंगो पंच का संतरा ?
"मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय ती देशी दारूची! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”
ठ्ठो 😁 वाईट हसतोय
#पाभे_की_बात नाही भाऊ ही भपके कि बात है 😜
वाचकांचे समाधान हेच आमचे…
In reply to टॅंगो पंच का संतरा ? by सचु कुळकर्णी
वाचकांचे समाधान हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आमचे येथे नेहमी ताजा, स्वच्छ माल मिळतो.
कमी किंमत आणि उच्च दर्जा हे आमचे सातत्य आहे.
येथे कामगारांना दररोजचा पगार दिला जातो.
येथे बालकामगार काम करत नाहीत.
दुपारी १ ते ४ दुकान बंद असते.
आमची दुसरीकडे शाखा नाही.
आमची दुसरीकडे शाखा नाही…
आमची दुसरीकडे शाखा नाही.
अंदरकी बात
आहे तीच नीट चालत नाही
))=((
येथे बालकामगार काम करत नाहीत…
येथे बालकामगार काम करत नाहीत.
अंदर की बात
आहेत तेही नीट काम करत नाहीत.
))=((
जेमिनि कि बात
सकाळी थंडीत गाडी चालूच होत नाही, पण सायलेन्सरमधून जो सुंगध येतोय ना... आहाहा, अद्भूत! रात्री ११ वाजता देशी दारूच्या दुकानाबाहेर जसा सुवास येतो, अगदी तस्साच! काल एका ट्रॅफिक पोलिसाने माझी गाडी थांबवली. त्याने गाडीच्या काचेजवळ नाक नेऊन वास घेतला आणि तो फक्त गोड हसला. ब्रेथ ॲनालायझर काढायची त्याला गरजच वाटली नाही. तो नुसताच म्हणाला, "साहेब, सोड्यासोबत की थेट 'ऑन द रॉक'?"