Skip to main content

शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/07/2020 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ नव्या धाग्यावर स्वागत. नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा. • त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा. • पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा. • असे क्रमाने खाली जात राहा. • आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे. • कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या. • १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल. ……………………………………………………………………………… १. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ). २. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ). ३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित) ४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री) ५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ). ६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी) ७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ). ८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा). ९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित). …………………………………. नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 61434
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

नालसाहेब च ! छान हो

In reply to by आवडाबाई

नालसाहेब : पंजा; मोहरमांत एका उंच काठीला वर पंजा बांधून व त्याला पुष्पमाळा वगैरे घालून गांवांतून मिरवीत नेतात, ही काठी हातीं धरणाराच्या अंगांत दैवी संचार होतो असें समजतात. याला भाविक लोक नालसाहेब म्हणतात.

अखेर हा ३ दिवसांचा सामना सुफळ संपूर्ण झाला. सर्व छान खेळले. आवडाबाई = सचिन/विराट ! एकहाती ! म मा यांचा विजयी चौकार ! बरेच शब्द वापरातले नाहीत मान्य. डोक्याला खुराक आणि इतिहासात डोकावणे हा हेतू . धन्यवाद !

In reply to by हेमंतकुमार

... तरी मजा आली खरच डोक्याला खुराक मिळाला आणि तो भरपूर दिवस पुरला ह्या सगळ्या शब्दांसोबत अजून कितिक शब्द डोळ्याखालून गेले

विषय : शिक्षणशास्त्र खाली दिलेल्या ९ प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे: १. शब्दाची अक्षरसंख्या आणि २. त्या शब्दातील तिसरे अक्षर. काही प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे. उत्तर देण्यापूर्वी शब्दातील अक्षरसंख्या व तिसरे अक्षर ताडून पाहावे. . ............................................................................ प्रश्न: १. शिक्षण समाजाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? (7, त्रि) २. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, श्रा ) ३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, दे) ४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, भ ) ५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, व) ६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, मा). ७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, ष्य ). ८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, म). ९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) .....................................................

चालेल. ‘सार्वत्रिकीकरण’ असे उत्तर आहे. छान !

२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, श्रा ) ==> दृकश्राव्यपद्धती ३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, दे) ==> उपदेशन ४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, भ ) ==> ? ५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, व) ==> ज्ञानवर्धनकारी ६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, मा). ==> बुद्धीमापन ७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, ष्य ). ==> मनुष्यविकासखाते (पण आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार बदललंय) ८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, म). ==> महामहोपाध्याय ९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) ==> ? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) ==> अनौपचारिक -गा.पै.

दृकश्राव्यपद्धती >>> दृकश्राव्यमाध्यमे ३, ५, ६ >> नाही. जरा वेगळी आहेत. बाकी बरोबर. छान !

६. मूल्यमापन >>> बरोबर. ५ चूक ....( 7, व) असे बघा.

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, मूल्यमापन म्हणजे assesment. ही एक सर्वसाधारण संज्ञा आहे. शैक्षणिक प्रगती मोजण्याची असेल तर माझ्या मते अधिक समर्पक शब्द हवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

या कोड्यात केवळ एकाच शब्दात उत्तर द्यायचे असल्याने अशा काही मर्यादा आहेत. प्रश्न 5 व 6 याचे उत्तर जोडीने द्यायचे आहे. या दोघांची उत्तरे मी एका शिक्षणतज्ञांच्या लेखातून घेतली आहेत. एका शब्दाचे बंधन घातल्याने एकंदरीत कोड्याला मर्यादा आहेत हे कबूल. तेव्हा पर्यायी शब्द जरूर असतील आणि सुचवा.

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, कलमापन हा पर्यायी होऊ शकेल काय? अन्यथा ही संज्ञा नव्याने उत्पन्न करावी लागेल. नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम शोभून दिसावी. मी प्रयत्न करेन. बघूया काय होतं. सूचनेबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

३ ४ ५ राहिलेत. उद्या भेटू.

३ अनुदेशन ४ अनुभवाधारित ५ गुणवत्ताविकास …… अक्षरसांगड हा एक नवा खेळ सुचवतो. आपण यात ९ सुटी अक्षरे देतो. त्यापासून जमतील तितके किमान ३ अक्षरी शब्द करायचे.. (जास्तीत जास्त ९ पर्यंत कितीही अक्षरी शब्द चालेल ). कोडेनिर्माता आधी शब्दांची किमान संख्या जाहीर करतो. काही तासानंतर सहभागीं नी त्यांची यादी द्यायची. ३-४ जण इच्छुक असतील तर खेळू. तसे लिहा धन्यवाद.

बरेच दिवस वाटच बघत होतो नव्या खाद्याची टाका लवकर टाका पैजारबुवा,

अक्षरसांगड खेळ खाली दिलेल्या ९ अक्षरांतून किमान १५ सामान्य शब्द बनवा. सर्व शब्द किमान ३ अक्षरी. पण एक ७ अक्षरी हवा. बाकी कसेही. १ शब्द करताना १अक्षर एकदाच वापरा; पुढच्या शब्दासाठी पुन्हा घेऊ शकता. न त इ डी इ बा मा र स उत्तरे तुमच्याकडे फक्त तयार ठेवा. ४ तासांनी उघड करू. …… काही नियम : १. सर्व शब्द सामान्यनामे हवीत आणि मूळ रूपातले शब्द. २. एकाच शब्दाचे एकवचन घेतले असल्यास त्याचे अनेकवचन चालत नाही. ३. सर्व शब्द अर्थातच अधिकृत हवेत. ४. जोडशब्द ( मध्ये – असलेले) नकोत. ५. हृस्व दीर्घ महत्त्वाचे. ........ एकेक शब्द इथे लिहू नका

एवढा वेळा डोके फोडून फक्त दोन शब्द मिळाले पैजारबुवा,

४ तास दिलेत ! नंतर मजा समजेल .

यादी सादर करू शकता.

In reply to by गणेशा

थोडा घाईत आहे, कॉल आहे.. 15 शब्द आणि त्यातील एक 7 अक्षरी शब्द झालेत. व्यनि करतोय.. येथे नंतर ड्या तुम्ही

चालेल !

बघतो ! धन्यवाद

ज्ञा पै गायब ?

In reply to by हेमंतकुमार

दोनच शब्द झाले अन पुढे काही जमले नाही. आज काही आपले डोके चालत नाहीये. पैजारबुवा,

गणेशा यांचे शब्द: मानस, इमारत, , बारस, सरमाडी, बारडी, इतबार,, तरस, इतर, , इमान, तरडी, नरडी, समान, इमानइतबार ... भर घालू शकता

इ दोनदा आल्याने ८ च अक्षरं आहेत. -गा.पै.

९ दिलेली अक्षरे असा अर्थ घ्यावा. प्रकार नव्हे

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, अक्षरांचा प्रकार हे काय आहे? तुम्ही केवळ ८ भिन्न अक्षरं दिलेली आहेत. इ हे अक्षर दोनदा दिलंय. म्हणजे दोन इ वापरता येतील, असं काही आहे का? उदा. : मानेतबारे धन्यवाद. आ.न., -गा.पै.

In reply to by हेमंतकुमार

इ दोनदा असल्या ने एका शब्दातही दोनदा चालेले.

सर्व शब्दप्रेमींना स्वातंत्र्य वर्धापनदिनाच्या शुभेच्छा .

अन्य काही शब्द : तनसडी रतन बासन बासर रसन रसडी तसर

In reply to by हेमंतकुमार

रतन सोडल्यास इतर शब्द कधीच ऐकलेले नाहीत मी. रतन हे विशेषनाम आहे असे वाटल्याने मी दिलेले नव्हते.

एक सोपे देतो. खाली दिलेल्या अक्षरांत मिळून एका शब्दाचे ६ समानार्थी दडलेले आहेत. कारकुन पुडी देशवरी हयात ते ओळखा. एक अक्षर फक्त एकदाच घ्या. सर्व ६ शब्द एकदम लिहा. तेव्हा उत्तर उघडच असेल !

देह,काया,शरीर,तन,वपु,कुडी!

छान ! बरेच दिवसांनी भेट !

येथील जुन्या सहकारी बंधूभगिनींना नववर्षाच्या शुभेच्छा ! पुन्हा खेळ सुरु करावेत काय ? जरूर कळवा.

एका छोट्याने प्रारंभ : ६ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी : (अंक =अक्षरक्रम) १२ - हगवण ३४ - नळकांडे ५६ - मेंढपाळास हाक मारली संपूर्ण शब्द - वृत्तमाध्यमांचे अनिष्ट वर्तन

शब्द असा आहे : १२३४५६ १२ हाही छोटा शब्द तसेच ३४ व ५६ . हे सर्व ओळखायचे. शेवटी पूर्ण शब्द तयार होईल.

In reply to by हेमंतकुमार

हरलो :)

इथे न सुटल्याने हेच कोडे अन्यत्रही दिले आहे. तिकडचा निकाल लागला की इथे उत्तर लिहितो धन्यवाद

उत्तर १२ - हगवण = फोक ३४ - नळकांडे = नाड ५६ - मेंढपाळास हाक मारली = बाजी संपूर्ण- वृत्तमाध्यमांचे अनिष्ट वर्तन = फोकनाडबाजी ................................... इथून घेतला : माध्यमांची फोकनाडबाजी! प्रवीण बर्दापूरकर https://www.aksharnama.com/client/trending_detail/4787

In reply to by हेमंतकुमार

आता फोकडान्स पहाताना सुध्दा बेक्कार हसायला येणार पैजारबुवा,

अक्षरमिसळ एक ८ अक्षरी शब्द ओळखायचा आहे. हा खेळ २ टप्प्यात आहे. टप्पा १: दोन गटांत मिळून ८ अक्षरमिसळ दिल्या आहेत. प्रत्येक गटातील प्रत्येक मिसळीतून (फक्त) एकेक अक्षर निवडा. त्या ४ अक्षरांतून (योग्य तो क्रम लवून ) प्रत्येक गटाचा एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यासाठी शोधसूत्र दिले आहे. गट १: अधूसरपणामूळचाच सकातकरीचाचाला वावरतानाचहालात्या विसरमिसळीतूनह्या ४ अक्षरी शब्दाचे सूत्र : धातूची अवजड वस्तू ......................... गट २ : धुरंधरच्यापायाशी विशहाजोगपणाने तोदबण्यासाठीच सरकारदादताना ४ अक्षरी शब्दाचे सूत्र : व्यक्तीविशेषण ..................... टप्पा २: आता पहिल्या गटाच्या शब्दाला दुसऱ्या गटाचा शब्द जोडा. = अर्थपूर्ण शब्द. (हा अर्थपूर्ण झाल्यासच खेळ पूर्ण).

सोपे करू. योग्य क्रम लावला आहे. आता एकेक अक्षर निवडा. गट १ सकातकरीचाचाला अधूसरपणामूळचाच वावरतानाचहालात्या विसरमिसळीतूनह्या गट २ : तोदबण्यासाठीच विशहाजोगपणाने सरकारदादताना धुरंधरच्यापायाशी

गट १ मध्ये शस्त्र आहे !

बरोबर !

वजनदार असते ना.

In reply to by हेमंतकुमार

शिवकालीन तलवार जड नसायची म्हणे. हलकी व मजबूत असायची. यासंबंधी मिपावर एक लेख आलेला यापूर्वी. -गा.पै.