--------अन----लग्न----------
भावाचं लग्न झालेलं आहे.
-त्याला एक मुलगी आहे.
माझं लग्न झालेलं नाही.
गावाकडे आमची अडाणी काकू राहते. ती म्हणते. तुझ्या (म्हणजे माझ्या) आयुष्याला काहीही अर्थ नाही.
(मी म्हणतो कोणाच्याही आयुष्याला काय अर्थ असतो?)
म्हणजे मी शिकलो, engg झालो. परदेशात वगैरे तरी जाऊन आलो. अन आता चांगला (म्हणजे अजिबात काम नसलेल्या आरामदायी कंपनीत) जॉब करतो- तरी माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तिचं ठाम मत. कारण असं की- माझं लग्न होत नाहीये. म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीये. बाकी मी तिकडे भारतीय असूनही US मधे जाऊन तिथला प्रेजिडेंट जरी झालो तरी माझ्या या काकुच्या दृष्टीने 'लग्न होत नाही तोवर' माझ्या आयुष्याला अर्थ नाही. खेड्यात हे असंच असतं. तिच्या नवरयापेक्षा जास्त विश्वास असलेल्या बामनाच्या (व्हिच आल्सो हॅपंन्स टू बी द मोस्ट ट्रस्टवर्ती ब्राह्मण ऑफ़ अवर तालुका) म्हणण्यानुसार 'मला शांती आहे' म्हणून मुलगी पसंत पडत नाही.
काकुला कैक वेळा सांगून झालंय की असल्या फ़ालतू बामनांवर (शहरात राहतात ते ब्राम्हण, खेड्यात राहतात ते बामन) विश्वास नकोस ठेवत जाऊ. पैशे उकळायाचे धंदे करता हे साले फ़क्त. मुलगी पसंत पडणे न पडणे हे माझ्या हातात आहे. त्यात बामनाचा काय संबंध?
काकाच्याच् वळणावर गेल्यामुळे काकू आमचं काहीही ऐकत नाही. तिने माझी अर्ग्युमेंट तिथंच फुकुन टाकली.
मग प्रात्यक्षिक दाखवावं असं छाटूर-मुटुर ठरवून शेजारच्या गावातल्या त्या प्रसिद्ध बामणाकडे तिला नेलं. फ़क्त सोबत अन शांत रहा म्हटलं. पोचल्यावर बामनाला म्हणलं ही छोटी, माझी मुलगी आहे. सारखं आजारी पड़तेय. थोड़े दिवस दवाखान्यानं बरं वाटल्यासारखं होतं अन परत आजारी पड़ते. तर काही सांगा. अंगाने मी भावापेक्षा बरा धडधाकट असल्याने डाऊट येऊनही बामण फसला. माझ्याकडे नीट बघुन स्वत्: काहीतरी खुडबुड करून म्हणला. तुम्ही तिची शांती केलेली नाही. ते पोरीवर आलंय. सांगतो ते विधी करा. लगेच बरं वाटेल. सारखी आजारी नाही पडणार. मी म्हटलं. ठिकाय.
काका फी किती लागेल?
2000 दिले त्याला. बामण पैशे ठेवत होता. तोवर काकुचं आवाक झालेलं उघडं तोंड बंद करून घेतलं.
(म्हणजे हा बामण अजुन लग्न-लेकरं न झालेल्या पोराला सुद्धा त्याच्या पोरीचा दोष काढून देणार होता.)
परत बामनाला म्हटलं. काका. हा माझ्यापेक्षा वर्षाने लहान भाऊ आहे. 29 वयाचा. माझं लग्न होऊन मुलगीही झाली पण याचं अजुन लग्न जमत नाहिये. काकुनं तुम्हाला सांगितलं होतं ना पोरगीच पसंत करत नाही म्हणून, तोच हा. नौकरी-पैशे-घर-गाड़ी सगळं चांगलं आहे. पण लग्न जमत नाही. बामणाने माझ्या हाड़कुळया भावाकडे निरखुन बघितलं अन परत काहीतरी स्वतः खुडबुड करून म्हणला तुम्ही अजुन पितरांची शांती केलेली नाही. ती लवकर करावी लागेल. स्वभाव पण चिडचिडा झाला असेल. गुरु पण करून घ्या. नोवेंबरच्या आत लग्न जमेल. पुढच्या वर्षी लेकराचं पेढ़े घेऊन या.
परत मी काकुचं अवाक तोंड बंद केलं.
ऑलरेडी लग्न झालेल्या भावाने 'मुलगी-पसंत-करावी' म्हणून 1000 अन
माझ्या म्हणजे अजुन लग्न-न-झालेल्या पोराच्या मुलीचा दोष निघावा म्हणून 2000. दिले.
काकु कडं कुत्सीत बघत हसत माघारी फिरलो.
नंतर काकू ते 3000 परत घेऊन-ते-घेऊन वरुन अर्धा तास त्या बामनाबरोबर खमंग भांडत होती.
-----------------------------------------------------
तर आता खरा प्रश्न हा आहे की,
गळ्यात एखाद्या कंपनीचं आय-कार्ड बघुन किंवा हेल्थ इन्सुरेंस आहे का? -याची खात्री करून घेऊन मग अ-गरजेच्या भरमसाठ टेस्टस करायला लावून, दोन दिवसांचा डिस्चार्ज विनाकारण 4 दिवस लांबवून, अंगात निव्वळ पाणी भरणारे पोकळ सलाईन्स लावून-- मुबलक पैशे उकळणाऱ्या शहरातल्या मोठ-मोठ्या हॉस्पिटल-डॉक्टरांत,,
किंवा
अत्यंत दुर्गम आदिवासी खेड़ेगावातल्या- लिंबू उतरवून, अन चप्पल हुंगायला देऊन दोन शेर ज्वारीच्या बदल्यात- लागलेलं भुत काढून देणाऱ्या भोंदूबाबात,
किंवा
राखेतुन अंगठी काढणाऱ्या अन तेंडुलकर चिदंबरम सारखे भक्त असलेल्या सत्य साईबाबा, किंवा राधे माँ,
किंवा तो समोश्या बरोबर हिरवी चटनी खा म्हणणाऱ्या निर्मल बाबात, बलात्कारी महापुरुष आसाराम बाबात, रेपिस्ट स्वामी नित्यानंदात,
किंवा
असं धड खेडं-ना-शहर असलेल्या निम्न आधुनिक गावात --शांत्या सांगून गिरहईकाच्या दिसण्यानुसार पैशे उकळणाऱ्या बामनात ---
एकूण या सगळ्यांत ,एक शरीराचा फरक सोडला तर बाकी अजुन कोणता फरक आहे??????
लग्न जमत नाही, नौकरी लागत नाही, अन अशीच बरीच कारणे म्हणून अन आई-वडलांच्या दबावाखाली किंवा फ़क्त त्यांच्या खुशीसाठी म्हणून असल्या बामनांकड़े शांती करायला जाणाऱ्या मॉडर्न श्रावणबालांची, मला आमच्या ऑफिस बाहेरच्या खपाटलेल्या कुत्र्यापेक्षा जास्त दया येते.
---अर्थहीन...
वाचने
12415
वाचनखूण
प्रतिक्रिया
76
अर्थपूर्ण लेख आहे! :-)
In reply to अर्थपूर्ण लेख आहे! :-) by एस
मस्त श्लेष!
हम्म
सणसणीत चपराक दिली आहे.
जबरदस्त!!!
ब्राम्हणांचा पोरोहित्य (काही)
In reply to ब्राम्हणांचा पोरोहित्य (काही) by हेमंत लाटकर
हेमंतजी
In reply to हेमंतजी by अर्थहीन
असा
तुमचं नाव
In reply to तुमचं नाव by भुमन्यु
थोडं
In reply to थोडं by अर्थहीन
विनोद केला हो
शांतीचीच
आता बामणाला फसवलं म्हणून
In reply to आता बामणाला फसवलं म्हणून by राजाभाउ
बराबर!
चर्वित चर्वण
पसंत
In reply to पसंत by सिरुसेरि
ते
In reply to ते by अर्थहीन
घ्या!
समोश्या बरोबर हिरवी चटनी खा
समोश्या बरोबर हिरवी चटनी खा म्हणणाऱ्या निर्मल बाबातअसं पण सांगतात बाबालोक ?! मज्जाय =)) बस, उल्लू बनानेवाला चाहीये, उल्लू बननेके लिए बहोत बैठे है लाईन लगाके ।आधी बामन, बामण, ब्राम्हण का
In reply to आधी बामन, बामण, ब्राम्हण का by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्यारे ला प्यार्या,
In reply to प्यारे ला प्यार्या, by प्यारे१
तसं नसतं तर प्यारे काकाचा
In reply to तसं नसतं तर प्यारे काकाचा by सूड
हे आणखी नाव जोडा. हरकत नाही.
In reply to हे आणखी नाव जोडा. हरकत नाही. by प्यारे१
आणि आठवत नसेल तर सांगतो..
In reply to आणि आठवत नसेल तर सांगतो.. by सूड
अजूनही म्हणतो.
In reply to अजूनही म्हणतो. by प्यारे१
पण त्याचा अर्थ तुला साधं
In reply to पण त्याचा अर्थ तुला साधं by सूड
मुद्दा प्यारे की प्यार्या हा
In reply to पण त्याचा अर्थ तुला साधं by सूड
आपल्या आपल्यामधे वाद नकोत.
In reply to आपल्या आपल्यामधे वाद नकोत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
रॉजर दॅट!
In reply to प्यारे ला प्यार्या, by प्यारे१
पण ह्याचा अर्थ असा नाही ना की
In reply to पण ह्याचा अर्थ असा नाही ना की by कॅप्टन जॅक स्पॅरो
समोरच्या व्यक्तीच्या
In reply to समोरच्या व्यक्तीच्या by प्यारे१
विरोध सरसकटीकरणाला आहे. त्या
In reply to आधी बामन, बामण, ब्राम्हण का by कॅप्टन जॅक स्पॅरो
बरोबर आहे चिमण तुझं. शिवाय
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by अनुप ढेरे
+१
आय फोन ६ चा १६ GB चा फोन ३८
In reply to आय फोन ६ चा १६ GB चा फोन ३८ by सुबोध खरे
चुकीची माहिती
In reply to चुकीची माहिती by अमित मुंबईचा
ते मला माहित आहे.
In reply to ते मला माहित आहे. by सुबोध खरे
नाही हो, बाहेरच्या मेमरी
In reply to नाही हो, बाहेरच्या मेमरी by वगिश
हे बरोबरंय
३८ हजारात आय फोन ६ चा १६ GB
एकंदरीतच शांती, पत्रिका टाईप
In reply to एकंदरीतच शांती, पत्रिका टाईप by पिलीयन रायडर
नाही हो
गंदा है पर धंदा है वाला अजिबात भटजी नसलेला नाखुस "बाम"ण
मस्त लेख आहे. आवडला.
In reply to मस्त लेख आहे. आवडला. by कोमल
आयला हो?
In reply to आयला हो? by अनिरुद्ध.वैद्य
तुम्ही चुकीचा पॉईंट पकडलाय
In reply to तुम्ही चुकीचा पॉईंट पकडलाय by कोमल
कास्टीझम असं नुस्तं म्हणायचं
In reply to कास्टीझम असं नुस्तं म्हणायचं by प्यारे१
करणार होते ओ.. पण उगी जाउदे
In reply to तुम्ही चुकीचा पॉईंट पकडलाय by कोमल
जातीच राजकारण नैये हो …
In reply to जातीच राजकारण नैये हो … by अनिरुद्ध.वैद्य
मला अगदी हेच म्हणायचे होते
In reply to मस्त लेख आहे. आवडला. by कोमल
दुसरी जात आली असती तर अ
आज काल ते वास्तू, फेंग शुई ई
In reply to आज काल ते वास्तू, फेंग शुई ई by सुबोध खरे
अनुवंशीकता तर कारणीभूत
लेखाचे पहिले दोन परिच्छेद -
बाह्मण द्वेष लेख
In reply to बाह्मण द्वेष लेख by हेमंत लाटकर
मला नाही बुवा वाटला...
In reply to बाह्मण द्वेष लेख by हेमंत लाटकर
द्वेष नै!
उद्देश...
आता हे सगळं सुरु आहे म्हणून
In reply to आता हे सगळं सुरु आहे म्हणून by प्यारे१
कुलकर्णी पूजा सांगायला लागलेत …
In reply to कुलकर्णी पूजा सांगायला लागलेत … by अनिरुद्ध.वैद्य
तसंही असेल. कदाचित मी चुकलो
लोक जेव्हा म्हणतात शिंप्याकडे
अनुप
In reply to अनुप by अर्थहीन
तू कशाला मनाला लावून घेतोस बाबा
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by चैतन्यमय
या प्रतीक्रियेतून
जाहीर निषेध....
In reply to जाहीर निषेध.... by नन्दादीप
ओके
In reply to जाहीर निषेध.... by नन्दादीप
जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि
जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि सांगितलत माझ नाव **** आहे, आणी मला अमूक अमूक आजार आहे...तर डॉक्टरपण पेशंट म्हणून तुम्ही जे सांगाल तेच नाव लिहिणार..आणि सांगितलेल्या आजारावर उपचार करणार...(वरच्या अक्षरांचा ठळकपणा माझा... माझी खालची टिप्पणी कशावर आहे ते कळण्यासाठी.) असं नसतं ओ ! उदाहरण पार घसरले आहे... "रुग्णाने निदान सांगायचे आणि डॉक्टरने त्यानुसार उपचार करायचे" अशी पद्धत वापरणारा डॉक्टर आरोग्यास घोकादायक होईल... तो बदलणेच योग्य होईल ;) त्याऐवजी, रुग्णाचे सर्व ऐकेल आणि रुग्णाची शारिरीक व आवश्यक असल्यास लॅब तपासणी करून स्वतः निदान करून उपचार करेल असा डॉक्टर निवडा. बाकी चालू द्या.फुकटचा बाजार
त्या शब्दावरून
बाकी उदाहरणे दिली आहेत पण खरा
१. मी ब्राह्मण नाही.
In reply to १. मी ब्राह्मण नाही. by मांत्रिक
कमीत कमी या जातीने आपले वेद,
काकुला कैक वेळा सांगून झालंय
In reply to काकुला कैक वेळा सांगून झालंय by हेमंत लाटकर
+१