नविन मिपाकरांना मिपाकरांची (कट्टाविरहीत) ओळख
डिस्क्लेमर: हा धागा समस्त मिपाकरांसाठी जे मिपावर नवअर्भकावस्थेत आहेत, नवीन आहेत, वाचक आहेत आणि तळ्यात मळ्यात असणारे असे जे पाहुणॆ आहेत त्यांच्यासाठी आहे.
मिपाकरहो, मी सोकाजीरावत्रिलोकेर, गेली दोन वर्ष मिपाकर आहे जो प्रामुख्याने वाचक असलेला आणि नुकताच लिहीता झालेला. आज काही मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. फक्त एका व्यनीतुन भेटण्याची इच्छा मी व्यक्त केली आणि त्या इच्छेला मान दिला जाउन भेट जुळुन आली. हो खरच, भेटण्यासाठी एकही गाजावाजात्मक धागा न काढता (किंवा ‘न काढलेला’ धागा काढुन न टाकता) आणि ‘मिपा कट्ट्या’ची घोषणा न करता. खरे नाहे वाटत? पण असे झाले खरे, आणि हे फक्त मिपावरच होउ शकते असा आत्मविश्वास (फाजील नव्हे) आता मला आला आहे.
ह्या भेटीला ‘मिपा कट्टा’ म्हणावे कि नाही हा मुद्दा गौण आहे कारण नविन मिपाकरांना आपलेसे करुन जाणुन घेण्यास, औपचारिकतेस फाट्यावर मारून आणि गाजावाजा न करता केलेला हा स्तुत्य असा हा अट्टाहास होता ह्याची अनुभुती मला ह्या भेटीत आली.
ह्या भेटीत विवीध व्यक्तीमत्वाचे मिपाकर होते, पिणारे आणि न पिणारे. पण त्यामुळॆ माझ्यासारख्या नवमिपाकरास आणि इतरांस काहीही अडचण आली नाही. गडबड, राडा तर अजिबात झाला नाही उलट मझा आला. माझा हेतु, जो की आतरजालीय ओळख दृढ करून तीला मिपाच्या ओळखीच्या पुढची पायरी गाठणे हा होता. जो सर्व जाणत्या आणि प्रगल्भ मिपाकरांनी ह्या भेटीत सार्थ केला. पिणार्यांेसाठी पिणे हे फक्त एक साधन होते, मुळ हेतु होता (जो मला जाणवला) एकमेकांची ओळख करुन घेणे, समजणे (आणि आजमावणे सुद्धा ;))
आजच्या ‘बैठकीत’ प्रत्यक्ष, याची देहा याची डोळा भेटण्याचा योग आलेल्या मिपाकरांचा परिचय मी ‘नविन’ मिपाकरांना करून देणार आहे.
डावीकडुन: सोकाजी, श्रावण मोडक आणि वायदेआझम उर्फ छोटा डॉन उर्फ डॉण्या
डावीकडुन: परा आणि चिंतामणी
इथे फ़ॉर अ चेंज पराचा ‘कावळा’ झाला आहे आणि तो गायब झाला आहे ;)
मोराल ऑफ द स्टोरी (तात्पर्य) :
1. येवा मराठीजनहो मिपा आपलेच आहे, सर्व मिपाकर आपलेच आहेत. इथे आपपरभाव नाही
2. प्रतिसादांची आणि कंपुबाजांची तमा न बाळगता अभिव्यक्त ह्या आणि बिन्धास्त लिहा
(व्याकरणाची आणि शुद्धलेखनाची चिंता न करता ;))
3. मोकळ्या मनाने इथे वावरलात तर माणसे जोडाल, किंतु घेउन वावराल तर कंपुबाज बनाल
4. फाट्यावर मारणे हे इथले ब्रीदवाक्य आहे, हे जाणुन घ्याल तर धाग्यावर धागे काढाल आणि ते काढुन टाकण्याची वेळ न येउ
द्याल ;)
उगाचच अवांतर (स्वगत) : च्यायला हे फोटो बघुन आणि पात्रपरिचयावरून 'एक दारूकट्टा' झाला शांततेत असा फील राहुन राहुन येउन राहिलाय.
कोणाच्यातरी (बहुतेक वसईचे किल्लेदार) खरडवहीत हे वाक्य वाचले होते 'प्रथमच (घाबरत घाबरत) प्रवेश करतोय!' खरेतर वाइट वाटले होते वाचुन. एवढी दहशत? मिपाच्या होमपेज वर 'अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.' असे घोषवाक्य असुनसुद्धा? म्हणुन हा 'पात्र'परिचय जेणेकरोन नवागतांची भीड चेपली जाउन ते बेधडक, तमा न बाळगता लिहीते व्हावे.1. परा (परिकथेतील राजकुमार) : ह्या पराचा कावळा होउ शकत नाही कारण हा ऑलरेडी ‘डोमकावळा’ आहे. मनाने अतिशय निर्मळ (?) आहे परा. ह्याने तुमच्या धाग्यावर येउन कितीही आणि कसाही गोंधळ घातला किंवा कितीही ‘काड्या सारल्या’ तर अजिबात मनावर न घेता खुशाल ह्याला फाट्यावर मारा. क़ाड्या घालणे ही त्याची आवड (की धंदा?) आहे ;) 2. धमाल मुलगा: ‘पोपटपंची करणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ असा खाक्या असलेला गुणी (?) मुलगा आहे हा. हुषार, सालस आणि गुणी (स्वयंघोषित बर का) आहे आपला धमु. परा खालोखाल क़ाड्या घालण्यात पटाइत आहे, म्हणुन जो कायदा पराला तोच ह्याला, फाट्यावर मारणे. 3. श्रावण मोडक: दांडगा व्यासंग आणि वाचन असलेला गृहस्थ. भला माणुस कारण दारु पित नाही (हे 'शुद्ध शाकाहारी' मत आहे) :). पण ‘मी दारु पीत नाही, मी दारू पिणार्यांसबरोबर बसणार नाही’ असा आजिबात ‘हट्ट’ नाही. मोकळ्या मनाने भेटा बोला (काहीही, वाट्टेल ते) त्याबरोबर दारू प्या, शिव्या घाला मला काहीही फरक पडत नाही असा स्वभाव आहे ह्यांचा 4. चिंतामणी: आजच्या ‘बैठकीची’ सोय ह्यांनी लावली म्हणुन नाही पण एकंदरीतच छान व्यक्तीमत्व. काहीसे अबोल पण ‘सौ सुनार की एक लोहार की’ ह्या उक्तीप्रमाणे दणका देणारे. तब्बेतीने दारवा पिणारे, वयाचा मुलाहिजा न बाळगता आपलेसे करून घेणारे. (पण शेवटी गाडी आणायला जातो म्हणुन गुल होणारे ;)) 5. बिपीन कार्यकर्ते: आपले बिपीनदा, हे आपलेसे झाले की छान छान पुस्तके भेट देतात (स्वत:ची सही बीही करुन). तर ह्यांच्याशी गट्टी जमवा, ह्यांना व्यनी पाठवा, खरडी लिहा, हमखास पुस्तक भेट मिळण्याची सोय :) पण हो तुमचा तेवढा व्यासंग हवा ह्यांच्याशी गट्टी जमवायला. उगाच काहीतरी करायला जाल तर तोंडघशी पडाल. हो नाहीतर काय, फुकट पुस्तक मिळवायची हौस अंगाशी यायची. ‘मंडळींच्या’ परवानगीने 2 बीअर प्यायची परवानगी आहे ह्यांना पण त्यामुळे तुम्हीही तेवढीच प्या अशी ह्यांची बोंब नाही. आणि जर पान बीन खायची आवड असेल तर ह्याच्याबरोबर ‘मसाले पान जमवायचा’ आनंदही लुटु शकाल. 6. छोटा डॉन: डॉन्या, हा ‘वायदेआजम’ म्हणुन मशहुर आहे. वेळ देउन न पाळण्याची कारणे द्यायच्या शिकवण्या घेतो हा. व्यनी किंवा खरड टाकली की फी माफ आहे इथे (स्कॉलरशीपही चालु करणार आहे म्हणे). पंढरपुर आणि पंढरपुरच्या वारीवर काही धागा काढायचा मनसुबा असेल तर बाबांनो (बाबींनो सुद्धा) जरा जपुन. खवचट आणि जिव्हारी लाग़णारे प्रतिसाद ह्याच्याकडुन येण्याची दाट शक़्यता आहे. आता जरा सचित्र ओळख डावीकडुन: (टाय घातलेला नव्हे तो वेटर आहे :D) धमु, बिपीनदा आणि परा
डावीकडुन: सोकाजी, श्रावण मोडक आणि वायदेआझम उर्फ छोटा डॉन उर्फ डॉण्या
डावीकडुन: परा आणि चिंतामणी
इथे फ़ॉर अ चेंज पराचा ‘कावळा’ झाला आहे आणि तो गायब झाला आहे ;)
मोराल ऑफ द स्टोरी (तात्पर्य) :
1. येवा मराठीजनहो मिपा आपलेच आहे, सर्व मिपाकर आपलेच आहेत. इथे आपपरभाव नाही
2. प्रतिसादांची आणि कंपुबाजांची तमा न बाळगता अभिव्यक्त ह्या आणि बिन्धास्त लिहा
(व्याकरणाची आणि शुद्धलेखनाची चिंता न करता ;))
3. मोकळ्या मनाने इथे वावरलात तर माणसे जोडाल, किंतु घेउन वावराल तर कंपुबाज बनाल
4. फाट्यावर मारणे हे इथले ब्रीदवाक्य आहे, हे जाणुन घ्याल तर धाग्यावर धागे काढाल आणि ते काढुन टाकण्याची वेळ न येउ
द्याल ;)
उगाचच अवांतर (स्वगत) : च्यायला हे फोटो बघुन आणि पात्रपरिचयावरून 'एक दारूकट्टा' झाला शांततेत असा फील राहुन राहुन येउन राहिलाय.
वर्गीकरण
अरे वा !! छान छान. असेच कट्टे
छान छान..........
In reply to छान छान.......... by निवेदिता-ताई
प्रतिसाद टाकला कधी, संपादित
दारुकट्टा नाय हो,कट्यावर दारू झाल्यासारखी वाटतीये...
व्वा व्वा छान छान.
झकास..
:-)
In reply to :-) by सहज
अगदी असेच म्हणतो.. आम्हाला
In reply to अगदी असेच म्हणतो.. आम्हाला by अर्धवट
@ सहज : सहमत आहे. @ अर्धवट :
पर्या
In reply to पर्या by आनंदयात्री
+१
चान चान. पण..............प-याला विचारायचेस ना हे लिहीण्या आधी
In reply to चान चान. पण..............प-याला विचारायचेस ना हे लिहीण्या आधी by चिंतामणी
खी खी खी ....
भला माणुस कारण दारु पित
In reply to भला माणुस कारण दारु पित by मृत्युन्जय
खर का काय?
लै भारी
वा वा
भाउ.... जे पी मोरगन अन
In reply to भाउ.... जे पी मोरगन अन by विकाल
पास
आता नाय घाबरत बॉ!
उत्तर
In reply to उत्तर by श्रावण मोडक
>>भला माणुस कारण दारु पित
>>भला माणुस कारण दारु पित
In reply to >>भला माणुस कारण दारु पित by अर्धवट
_/\_
In reply to >>भला माणुस कारण दारु पित by अर्धवट
भला माणुस कारण दारु पित
In reply to >>भला माणुस कारण दारु पित by अर्धवट
वाक्यात थोडा बदल
हँड्सम
प्रभू मास्तरांशी सहमत अवांतरः
In reply to प्रभू मास्तरांशी सहमत अवांतरः by विजुभाऊ
माताय
मला नेहेमी असे वाटत आले आहे
धन्यवाद मिष्टर त्रिलोकेकर,
सचित्र ओळख
In reply to सचित्र ओळख by अजातशत्रु
काही प्रश्न...
- वयस्कर नसावेत असे का वाटले होते?
- वयस्कर असणॆ हा गुन्हा आहे का?
- वयस्कर असण्यार्यांनी मिपावर येउ नये का?
- वयस्कर असण्यार्यांनी कट्टे करु नयेत का?
असो, तुम्हाला हे गाणे माहित आहे काय ? 'पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा.......' - (हिरव्या देठाचा) सोकाजीIn reply to काही प्रश्न... by सोत्रि
उत्तरे
In reply to उत्तरे by अजातशत्रु
तुम्हि आणि तुमचे मित्र मला
- बोलण्यावरून 'वयस्कर नसावेत' असा तुमचा 'पुर्वग्रह' का व कसा झाला?
- ते बोलणे बाळबोध होते का?
- ते बोलण्याला पोच नव्हता का?
- ते बोलण्याला अनुभवाची झालर नव्हती का?
- अतिशयोक्ति प्रश्न म्हणजे काय?
- लावणी हे गाणॆ नसते का?
- मग आपण गाणे-बजावणे म्हणतो ते का?
- (पुर्वग्रहाचा चष्मा न घालाणारा) सोकाजी अवांतर: असे बादरायाण संबंध जोडता आहात गुगळ्यांचा "एक चित्रपट एक जाहिरात'' हा धागा फार मनावर घेतला आहे असे दिसते. ;)In reply to तुम्हि आणि तुमचे मित्र मला by सोत्रि
हे बघा सोत्रे, तुमचे दोन्ही
In reply to हे बघा सोत्रे, तुमचे दोन्ही by परिकथेतील राजकुमार
आलास का रे बाबा तु? घे बाबा
In reply to सचित्र ओळख by अजातशत्रु
आँ??????
...आणि
दुसर्या फोटोत मोडक डान्याला
गविंना भेटण्याची आस आहे योग
ं
मी 'चला व्यसनांना बदनाम करुया' या मोहिमेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तांबड्या पिवळ्या पेयांकडे दुर्लक्ष केल्यावर फोटो अन पेयतृप्त चेहरे बघून खूप मस्त वाटले ...
In reply to ं by प्यासा
ओ
In reply to ओ by मी-सौरभ
प्यासा हे एक तीर्थ (??)
In reply to प्यासा हे एक तीर्थ (??) by इंटरनेटस्नेही
प्यासा
आवडलं !
कट्टे चालू ठेवा.
वा मस्तचं, अशी अनौपचारीकता जास्त खेळकरं वाटते...
चांगला धमाकेदार झालेला दिसतोय
हाहाहा.... सोकाजींची
जुन्यांनी नव्याला दिलेला
In reply to जुन्यांनी नव्याला दिलेला by गणपा
गणपा शेठ
In reply to गणपा शेठ by चिंतामणी
अरे वा
In reply to जुन्यांनी नव्याला दिलेला by गणपा
गण्या भो***, येतोस तेव्हा
In reply to गण्या भो***, येतोस तेव्हा by बिपिन कार्यकर्ते
नोंद घेतली गेली आहे.
डॉन्या, हा ‘वायदेआजम’ म्हणुन
चामारी!
बिका चौथ्या फोटोत फोटोग्राफर