✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

नविन मिपाकरांना मिपाकरांची (कट्टाविरहीत) ओळख

स
सोत्रि यांनी
Sat, 07/30/2011 - 04:42  ·  लेख
लेख
डिस्क्लेमर: हा धागा समस्त मिपाकरांसाठी जे मिपावर नवअर्भकावस्थेत आहेत, नवीन आहेत, वाचक आहेत आणि तळ्यात मळ्यात असणारे असे जे पाहुणॆ आहेत त्यांच्यासाठी आहे. मिपाकरहो, मी सोकाजीरावत्रिलोकेर, गेली दोन वर्ष मिपाकर आहे जो प्रामुख्याने वाचक असलेला आणि नुकताच लिहीता झालेला. आज काही मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. फक्त एका व्यनीतुन भेटण्याची इच्छा मी व्यक्त केली आणि त्या इच्छेला मान दिला जाउन भेट जुळुन आली. हो खरच, भेटण्यासाठी एकही गाजावाजात्मक धागा न काढता (किंवा ‘न काढलेला’ धागा काढुन न टाकता) आणि ‘मिपा कट्ट्या’ची घोषणा न करता. खरे नाहे वाटत? पण असे झाले खरे, आणि हे फक्त मिपावरच होउ शकते असा आत्मविश्वास (फाजील नव्हे) आता मला आला आहे. ह्या भेटीला ‘मिपा कट्टा’ म्हणावे कि नाही हा मुद्दा गौण आहे कारण नविन मिपाकरांना आपलेसे करुन जाणुन घेण्यास, औपचारिकतेस फाट्यावर मारून आणि गाजावाजा न करता केलेला हा स्तुत्य असा हा अट्टाहास होता ह्याची अनुभुती मला ह्या भेटीत आली. ह्या भेटीत विवीध व्यक्तीमत्वाचे मिपाकर होते, पिणारे आणि न पिणारे. पण त्यामुळॆ माझ्यासारख्या नवमिपाकरास आणि इतरांस काहीही अडचण आली नाही. गडबड, राडा तर अजिबात झाला नाही उलट मझा आला. माझा हेतु, जो की आतरजालीय ओळख दृढ करून तीला मिपाच्या ओळखीच्या पुढची पायरी गाठणे हा होता. जो सर्व जाणत्या आणि प्रगल्भ मिपाकरांनी ह्या भेटीत सार्थ केला. पिणार्यांेसाठी पिणे हे फक्त एक साधन होते, मुळ हेतु होता (जो मला जाणवला) एकमेकांची ओळख करुन घेणे, समजणे (आणि आजमावणे सुद्धा ;)) आजच्या ‘बैठकीत’ प्रत्यक्ष, याची देहा याची डोळा भेटण्याचा योग आलेल्या मिपाकरांचा परिचय मी ‘नविन’ मिपाकरांना करून देणार आहे.
कोणाच्यातरी (बहुतेक वसईचे किल्लेदार) खरडवहीत हे वाक्य वाचले होते 'प्रथमच (घाबरत घाबरत) प्रवेश करतोय!' खरेतर वाइट वाटले होते वाचुन. एवढी दहशत? मिपाच्या होमपेज वर 'अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.' असे घोषवाक्य असुनसुद्धा? म्हणुन हा 'पात्र'परिचय जेणेकरोन नवागतांची भीड चेपली जाउन ते बेधडक, तमा न बाळगता लिहीते व्हावे.
1. परा (परिकथेतील राजकुमार) : ह्या पराचा कावळा होउ शकत नाही कारण हा ऑलरेडी ‘डोमकावळा’ आहे. मनाने अतिशय निर्मळ (?) आहे परा. ह्याने तुमच्या धाग्यावर येउन कितीही आणि कसाही गोंधळ घातला किंवा कितीही ‘काड्या सारल्या’ तर अजिबात मनावर न घेता खुशाल ह्याला फाट्यावर मारा. क़ाड्या घालणे ही त्याची आवड (की धंदा?) आहे ;) 2. धमाल मुलगा: ‘पोपटपंची करणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ असा खाक्या असलेला गुणी (?) मुलगा आहे हा. हुषार, सालस आणि गुणी (स्वयंघोषित बर का) आहे आपला धमु. परा खालोखाल क़ाड्या घालण्यात पटाइत आहे, म्हणुन जो कायदा पराला तोच ह्याला, फाट्यावर मारणे. 3. श्रावण मोडक: दांडगा व्यासंग आणि वाचन असलेला गृहस्थ. भला माणुस कारण दारु पित नाही (हे 'शुद्ध शाकाहारी' मत आहे) :). पण ‘मी दारु पीत नाही, मी दारू पिणार्यांसबरोबर बसणार नाही’ असा आजिबात ‘हट्ट’ नाही. मोकळ्या मनाने भेटा बोला (काहीही, वाट्टेल ते) त्याबरोबर दारू प्या, शिव्या घाला मला काहीही फरक पडत नाही असा स्वभाव आहे ह्यांचा 4. चिंतामणी: आजच्या ‘बैठकीची’ सोय ह्यांनी लावली म्हणुन नाही पण एकंदरीतच छान व्यक्तीमत्व. काहीसे अबोल पण ‘सौ सुनार की एक लोहार की’ ह्या उक्तीप्रमाणे दणका देणारे. तब्बेतीने दारवा पिणारे, वयाचा मुलाहिजा न बाळगता आपलेसे करून घेणारे. (पण शेवटी गाडी आणायला जातो म्हणुन गुल होणारे ;)) 5. बिपीन कार्यकर्ते: आपले बिपीनदा, हे आपलेसे झाले की छान छान पुस्तके भेट देतात (स्वत:ची सही बीही करुन). तर ह्यांच्याशी गट्टी जमवा, ह्यांना व्यनी पाठवा, खरडी लिहा, हमखास पुस्तक भेट मिळण्याची सोय :) पण हो तुमचा तेवढा व्यासंग हवा ह्यांच्याशी गट्टी जमवायला. उगाच काहीतरी करायला जाल तर तोंडघशी पडाल. हो नाहीतर काय, फुकट पुस्तक मिळवायची हौस अंगाशी यायची. ‘मंडळींच्या’ परवानगीने 2 बीअर प्यायची परवानगी आहे ह्यांना पण त्यामुळे तुम्हीही तेवढीच प्या अशी ह्यांची बोंब नाही. आणि जर पान बीन खायची आवड असेल तर ह्याच्याबरोबर ‘मसाले पान जमवायचा’ आनंदही लुटु शकाल. 6. छोटा डॉन: डॉन्या, हा ‘वायदेआजम’ म्हणुन मशहुर आहे. वेळ देउन न पाळण्याची कारणे द्यायच्या शिकवण्या घेतो हा. व्यनी किंवा खरड टाकली की फी माफ आहे इथे (स्कॉलरशीपही चालु करणार आहे म्हणे). पंढरपुर आणि पंढरपुरच्या वारीवर काही धागा काढायचा मनसुबा असेल तर बाबांनो (बाबींनो सुद्धा) जरा जपुन. खवचट आणि जिव्हारी लाग़णारे प्रतिसाद ह्याच्याकडुन येण्याची दाट शक़्यता आहे. आता जरा सचित्र ओळख डावीकडुन: (टाय घातलेला नव्हे तो वेटर आहे :D) धमु, बिपीनदा आणि परा डावीकडुन: सोकाजी, श्रावण मोडक आणि वायदेआझम उर्फ छोटा डॉन उर्फ डॉण्या डावीकडुन: परा आणि चिंतामणी इथे फ़ॉर अ चेंज पराचा ‘कावळा’ झाला आहे आणि तो गायब झाला आहे ;) मोराल ऑफ द स्टोरी (तात्पर्य) : 1. येवा मराठीजनहो मिपा आपलेच आहे, सर्व मिपाकर आपलेच आहेत. इथे आपपरभाव नाही 2. प्रतिसादांची आणि कंपुबाजांची तमा न बाळगता अभिव्यक्त ह्या आणि बिन्धास्त लिहा (व्याकरणाची आणि शुद्धलेखनाची चिंता न करता ;)) 3. मोकळ्या मनाने इथे वावरलात तर माणसे जोडाल, किंतु घेउन वावराल तर कंपुबाज बनाल 4. फाट्यावर मारणे हे इथले ब्रीदवाक्य आहे, हे जाणुन घ्याल तर धाग्यावर धागे काढाल आणि ते काढुन टाकण्याची वेळ न येउ द्याल ;) उगाचच अवांतर (स्वगत) : च्यायला हे फोटो बघुन आणि पात्रपरिचयावरून 'एक दारूकट्टा' झाला शांततेत असा फील राहुन राहुन येउन राहिलाय.
  • मिपाकरांना मिपाकरांची (कट्टाविरहीत) ओळख – 2

Book traversal links for नविन मिपाकरांना मिपाकरांची (कट्टाविरहीत) ओळख

  • मिपाकरांना मिपाकरांची (कट्टाविरहीत) ओळख – 2 ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
समाज
जीवनमान
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
प्रतिक्रिया
आस्वाद
लेख
अनुभव
सल्ला
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
11886 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

जुन्यांनी नव्याला दिलेला

गणपा
Mon, 08/01/2011 - 15:00 नवीन
जुन्यांनी नव्याला दिलेला दिक्षा समारंभ आवडला. ;) -(दिक्षेच्या प्रतिक्षेत) गणा
  • Log in or register to post comments

गणपा शेठ

चिंतामणी
Mon, 08/01/2011 - 15:37 नवीन
तुमचे पाय भारत भूला कधी लागणार आहेत????? म्हणजे लागणार आहेत की नाही?? (असे वाटायचे कारण म्हणजे तुम्ही पब्लीश केलेले मुलीचे स्टेटमेंट). आगमनाची खबर सवीस्तर द्या. आमच्यासाठी निदान एका संध्याकाळी ४-५ तास वेळ ठेवा. मग बघा तुमचा दिक्षा समारंभ धडाक्यात होतो की नाही ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अरे वा

सोत्रि
Mon, 08/01/2011 - 16:05 नवीन
अरे वा! गणपाजी या या लवकर या, सुस्वागतम करायला जातीने हजर रहायला आवडेल. खासच, ह्या निमीत्तने मलाही पुनश्च 'दिक्षीत' व्ह्यायला नक्कीच आवडेल. - (पुनश्च 'दिक्षांदेही' असे म्हणणारा ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

गण्या भो***, येतोस तेव्हा

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/01/2011 - 20:39 नवीन
गण्या भो***, येतोस तेव्हा कळवतही नाहीस... आणी म्हणे दीक्षेच्या प्रतिक्षेत वगैरे... साला दांभिक! ;) अवांतर : तू येच रे एकदा, तुझ्यासाठी एवढा मोठा कट्टा करू की दुनिया याद करेल, काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

नोंद घेतली गेली आहे.

गणपा
Mon, 08/01/2011 - 20:43 नवीन
नोंद घेतली गेली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

डॉन्या, हा ‘वायदेआजम’ म्हणुन

कुंदन
Mon, 08/01/2011 - 20:38 नवीन
"वायदेआजम" हा किताब तुर्त तात्याबांसाठी राखीव आहे. ;-)
  • Log in or register to post comments

चामारी!

ब्रिटिश टिंग्या
Tue, 08/02/2011 - 10:56 नवीन
सगळे एकजात बेवडे!
  • Log in or register to post comments

बिका चौथ्या फोटोत फोटोग्राफर

इरसाल
Wed, 08/03/2011 - 15:03 नवीन
बिका चौथ्या फोटोत फोटोग्राफर ला दरडावत आहेत असे वाटते. खरे काय ते धमू सांगू शकेल. कोपराने ढोसत तर नव्हतास ना धमू ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा