Skip to main content

सुखासन

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 12/08/2016 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
आले कोण गेले कोण कवतुक आता वाटत नाही , कुणी थांबले हसून बोलले मनात किणकिण वाजत नाही , पानाफुलापक्ष्यांसाठीही दार सुखाचे उघडत नाही . . . इतके माणूस छिलून निघते एकांताच्या सुखासनावर! -शिवकन्या

वाचने 4975
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

सुंदर. टोकाला पोचलेला एकाकीपणा आणि मनातून स्वतःला बंद करत जाणे या भावना चार ओळीतूनही ताकदीने व्यक्त झाल्यात. अशीच हौशी पण आयुष्यातल्या अनुभवांनी पोळून एक्टी पडलेली, स्वतःला हळू हळू मिटून घेणारी जवळची व्यक्ती आठवली आणि डोळ्यात पाणी उभं राहिलं.

In reply to by अंतरा आनंद

अंतरा ताई, भावना पोहचते ती कविता आणखी अर्थपूर्ण होते. धन्यवाद.

छिलून म्हणजे सोलून अशा अर्थाने आहे का? जर तोच अर्थ अभिप्रेत आहे तर छिलून हा हिंदी शब्द का? बाकी थोडक्याच शब्दात खूप काही मांडलेलं आवडलं.

In reply to by किसन शिंदे

छिलले कि छिलके उडतात, अगदी रफली. सोलले कि अखंड साल निघते. . पेन्सिल छिलतात. केळे सोलतात.