फुटकळ लिखाण ...
बरेच दिवस काहीच लिखाण झाले नाही. असे झाले कि कसेसेच वाटते. आपण लेखक नाही ह्याची जाणीव मला आहे. पण अधून मधून विचार प्रकट करत राहावे असे वाटते. आपले विचार हि आपल्या जिवंतपणाची खूण आहे असे वाटत राहते. तर झाले असे आहे कि आज सकाळी सकाळी बरे वाटेनासे झाले. येथे सध्या वेग वेगळ्या व्हायरस मंडळींनी बस्तान बसवले असल्याने कधी कोणता व्हायरस ना सांगता भेटीला येईल ह्याचा नेम नाही. त्यातलाच एक व्हायरस माझ्याकडे माहेरपणाला आला आहे असे वाटते. माहेरवाशीण जशी जास्त काळ राहू शकत नाही तसाच हा पण लवकरच जाईल बहुदा.
सकाळी सकाळी उठून थोड्यावेळातच परत मुरगाळून पडलो.
<नाव सुचवा>
तुझ्या त्या निरागस आनंदामागेही थोडेसे बालिश शौर्य असेल बहुतेक
बागेत सापडलेल्या नारळाला धागे बांधून बनवलेले टेलिफोन
मी झोपी गेलो तू तरीही बोलतच राहिलास
तू बोललास मरणाला काय घाबरायचे?
मुलींचे कपडे घालून काढलेल्या फोटोंची मात्र तुला भीती वाटत असावी.
नाहीतर कुलूप लावून पेटीत का लपवले होतेस?
खरेतर ज्या दिवशी तू निघून गेलास,
तेव्हा मला वाईट वाटले नाही.
जेव्हा तू गाडीचा दरवाजा धाडकन बंद केलास
मी सुखावलो होतो जरासा.
पुरस्कार वितरण सोहळा
नमस्कार !
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ च्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सांयंकाळी ६.०० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्या जवळ मुंबई ४०० ०२१ येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात मला देरसू उझाला या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे.
सर्वांना माझे आग्रहाचे निमंत्रण.
आपला,
जयंत कुलकर्णी.
व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा
व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा
सध्या जगात सर्वत्र प्रेमाला उधाण आलेलं आहे. १४ फेब्रुवारी रोजी साज-या होणा-या 'व्हॅलेंटाईन डे' ची तयारी जोरात सुरू असून दररोज वेगवेगळे दिवस त्यानिमित्ताने साजरे केले जात आहेत. दुकानं, रेस्टॉरंट लाल रंगात न्हाऊन निघाली असून प्रियजनांना भेटवस्तू घेण्याची लगबग सुरू आहे. प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईनडे च महत्व अनन्य साधारण आहे.. मनातील प्रेम व्यक्त करण्याचा किंवा प्रिय व्यक्तीला प्रेमाची नव्याने जाणीव करून देण्याचा हा दिवस.
शेजाऱ्याचा डामाडुमा- सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक - मालदीव भाग ८ (अंतिम)
मालदीव मालिकेतील या आधीचे ७ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. सातवा भाग इथे आहे :-
https://www.misalpav.com/node/41903
आधीच्या भागांमधून आणि त्यावरील प्रतिसादांमधून मालदीवमधल्या सद्यस्थितीबद्दल बरेच सांगून झाले आहे. सध्या मालदीवमधल्या प्रचंड राजकीय उलाढालींमुळे दुसरे 'कॅक्टस' घडेल की काय अशी स्थिती आहे. त्याच्या बातम्या सर्वत्र आहेतच. याचवर्षी आपल्या अन्य काही शेजारी देशांप्रमाणे मालदीवमध्येही सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्याही प्रसारमाध्यमे कव्हर करतील, त्यात मी आणिक वेगळे काय सांगणार?
धोकेबाज
प्रिय आई,
काय सांगू आणि कुठून सुरुवात करू? कशी आहेस? पाच सहा महिन्यांत एकदा तुझी खुशाली कळते. जग कुठल्या कुठे गेलं पण आपलं गाव अजून तसंच . मोबाईल नेटवर्कच नाही. माणसाने कॉन्टॅक्ट ठेवावा तरी कसा! आणि तू आणि तुझे विचार तर त्या गावापेक्षाही जुने. आठवतं, मी पहिल्यांदी गोव्याला आलो, मला नोकरी मिळाली, तुला गोव्याला घेऊन आलो. तूसुद्धा खूष होतीस पण जेव्हा तुला कळलं की मी बिअर बारमध्ये नोकरीला लागलोय तशी तू त्याच रात्रीच्या एसटीने निघून गेलीस. दारूच्या पैशाने चालणार्या घरात पाणीसुद्धा पिणार नाही म्हणालीस. किती दुखावलंस मला. आजकाल कुणी असं नसतं.
गोव्यातला बसवाला
गोव्यातला बस प्रवास, हा एक विशेष विषय आहे. यासंदर्भातला पैसाताईचा भन्नाट लेख माझी प्रेरणा
http://www.misalpav.com/node/14121
तर गोव्यात भरपूर सामान असणं हे बसप्रवास न करण्याचं कारण असू शकत नाही. भरपूर गर्दी असणं हे अपेक्षितच असतं. त्यामुळे ट्रेनने सकाळी लवकर पोहोचवल्यावर बस स्टॉपवर उभी राहिले, तेव्हा मी गोंयकाराला(च) शोभणाऱ्या आरामात उभी होते. बस आली, आणि माझ्याकडचं सामान बघून त्या बॅगांना, आणि त्यांच्यानंतर मला अगोदरच सामानाने भरलेल्या केबिनमध्ये कोंबण्याचा सोहळा झाला. त्यानंतर बस आणि ड्रायव्हरच्या तोंडाचा पट्टा एकत्रच सुसाट सुटले.
पुण्याची मुंबई आता झाली की राव...
आजकाल आपले पुणे सुध्दा..
रात्रभर जागे राहून धडधडत असते!
कारण आपली सुध्दा मुंबई झाल्याचे..
स्वप्न जागेपणी त्याला पडत असते!
पुण्यातील पीएमटी खचाखच गर्दीने भरून..
केविलवाणी धावत रडत असते!
मुंबईतील लोकल ट्रेनचा हात हातात धरून..
ती सुद्धा मैत्रीला जागत असते!
मुंबईतील मराठीपणा हद्दपार झाल्याचं..
दुःख मुंबई पचवत जगत असते!
पुणे सुध्दा तिच्याशी समदुःखी होऊन..
गळ्यात गळा घालून रडत असते!
कशापायी आमच्या मुंबईला ठेवता नाव?
पुण्याची मुंबई आता झाली की राव!
तुमचा आमचा असतो सेम वडा पाव..
दिवसरात्र लोकांची जीवघेणी धावाधाव!
- निमिष सोनार
(आता पुणेकर पण भूतकाळातील मुंबईकर)
सफर ग्रीसची: अंतिम भाग – राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालय
भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस
भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय
भाग ११ - गूढरम्य डेल्फी १
भाग १२ - गूढरम्य डेल्फी २
भाग १३ – अक्रोपोलिस
अथेन्स आणि ग्रीसचा निरोप घ्यायची वेळ आली होती. शेवटच्या दिवशी विमानतळाकडे जाण्याआधी सकाळी मोकळा वेळ होता. त्या वेळात काय पाहायचं हा प्रश्नच आला नाही. अथेन्सच्या इतर पुरातन वास्तू आणि अवशेष किंवा बेनाकी संग्रहालय वगैरे बघण्यात रस होता. पण ग्रीसच्या राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाला (National Archaeological Museum, अर्थात NAM) अग्रक्रम होता. डेल्फी वा मायसिनी सारख्या प्रसिद्ध पुरावशेषांजवळही संग्रहालये आहेत, तिथे मिळालेल्या काही वस्तू या संग्रहालयांमध्ये पाहता येतात. परंतु सगळ्यांत महत्त्वाचे पुतळे, भांडी, धातूकाम, दागिने हे राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयात मांडून ठेवलेले आहेत.
मिसळपाव