हुंडीव्यवहार
ब्रिटिश सत्तेच्या मागोमाग हिंदुस्तानात अर्थव्यवहार करण्यासाठी बॅंका स्थापन होऊ लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून एका स्थानावरून दुसरीकडे वा एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पैसा पाठविण्यासाठी नवे साधन हिंदुस्तानात उपलब्ध झाले. तत्पूर्वी हिंदुस्तानातील दूरदूरच्या गावातील असे व्यवहार ’हुंडी’ ह्या गोष्टीच्या माध्यमातून होत असे. अशा ’हुंडी’चा हा अल्पपरिचय.
हुंडीचे मूळ स्वरूप म्हणजे ’अ’ ह्या व्यक्तीने ’ब’ ह्या व्यक्तीला लिहिलेले पत्र, ज्यामध्ये ’क’ ह्या व्यक्तीला एक रक्कम देण्याचा आदेश असतो. हिंदुस्तानातील व्यापारी समाजाने निर्माण केलेली ही पद्धत कोठल्याहि कायद्यानुसार निर्माण झालेली नव्हती.
माझे जगणे होते गाणे ( विडंबन )
माझे जगणे होते गाणे ( विडंबन )
जाता जाता पिईन मी
पिता पिता जाईन मी
गेल्यावरही या मैफिलितल्या
धुंदीमधुनी राहीन मी ||
माझे जगणे होते पिणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी पाण्यासवे कधी सोडयासवे
जवळ चणे फुटाणे ||
सिग्रेटीची संथ धुरावळ
वा मित्रांचा संकर गोंधळ
कायम आर्तता काळजातली
कधीच नाही बहाणे ||
ओकलो अथवा ओकलाो नाही
पोटी काही राहिले नाही
'इंग्लिश' मधील बडबडींचे
होई मस्त तराणे ||
आठवणीँचे राजस गुंजन
कधी राजकारणी मंथन
जाणतेपणी अजाणतेचे
सोंग करी शहाणे ||
खिलजीचा माफीनामा
खिलजी एक असे पात्र जे इतिहासात त्याच्या कुकर्मामुळे प्रसिद्ध झाले . प्रत्येक पटावर ते पात्र जन्माला येतच असते . नियतीचा अलिखित नियम आहे . मी देखील परत आलोय . पण माझ्या परतीचे कारण मात्र वेगळे आहे . मी परत आलोय ते फक्त माफी मागण्यासाठी. मी माफी मागणारही होतो पण त्यावेळेला मला संधीच मिळाली नाही . मी कैक धडका दिल्या , पण जेव्हा जेव्हा मी माझे नाव किंवा आडनाव टंकले त्या वेळेस माझ्या हाती अपयशच आले . असो ...
जिच्यासाठी उपवास व्रत वैकल्ये केली , ती माझी आई ६ जानेवारीला देवाघरी गेली. जाईपर्यंत चूल आणि मुलांची काळजी करणारी बाई, अशीच निघून गेली ...
पेशवाईची अखेर आणि दुसरा बाजीराव
दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचे राज्य घालवले अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. तो अखेरचा पेशवा असल्याने या समजुतीला बळ मिळते. त्या काळाबद्दल खोलवर वाचन करताना (एकत्रित यादी शेवटी दिली आहे) मला असा आढळलं की ही समजूत खोटी आहे. मागच्या भागात वल्ली आणि गामा पैलवान यांनी थोडक्यात प्रतिसाद लिहिले आहेतच, पण मला असे वाटले की याबद्दल सविस्तर लिहायला हवे. म्हणून हा सारांश इथे मांडतो आहे. राज्य बुडवण्यासाठी दुसरा बाजीराव हा कारणीभूत नसला तरी याचा अर्थ असा नाही की तो शूर होता किंवा त्याच्या हातून चुका झाल्या नाहीत. त्याने आपल्या कुवतीनुसार धडपड केली आणि अखेरपर्यंत त्याला आपण काय गमावले याची जाणीव होती.
कालवं
समुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे.
थायरॉइड हॉरमोन्स आणि त्यांचा गोतावळा
अनुक्रमणिका | १. इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा | २. मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक | ३. कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ ! | ४. हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन | ५. रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर | ६. बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस | ७. युरिआ व क्रिअॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक | ८.
वलय (कादंबरी) - प्रकरण ९, १० आणि ११
प्रकरण ८ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41914
----
प्रकरण 9
मुंबईच्या क्वीन्स नेकलेस म्हणजेच मरीन ड्राईव्ह परिसरात अनेक उंच इमारती दिमाखात उभ्या होत्या. त्या परिसरात असणारे बॉलीवूड मधल्या प्रसिद्ध कलाकारांचे बंगले, त्यांचा तेथला वावर आणि परिसरातला समुद्र हे सगळं एकूणच त्या परिसराबद्दल जनसामान्यांच्या मनात नेहमी कुतूहल आणि आकर्षण निर्माण करत होतं. जवळचा फेसाळणारा अरबी समुद्र आणि मुंबईचा देखणा नजारा तेथील अनेक इमारतींच्या खिडकीतून सहज दिसायचा. रोज सायंकाळी ते दृष्य बघणे म्हणजे डोळ्यांना एक पर्वणीच होती.
सरकारचं 'गजब' कृषिशास्त्र ?
सरकारचं 'गजब' कृषिशास्त्र ?
सत्ताधाऱ्यांची घोषणा आणि अमलबजावणीची भूमिका यामध्ये मोठा फरक असल्याची प्रचिती आजवर अनेकदा आली आहे. शेतकऱ्यांसाठी तर ही बाब नित्यचीचं. कर्जमुक्ती असो कि हमीभाव, सुविधांचा मुद्दा असो कि शेतीमाल खरेदीचा.. घोषणेवर अमल करताना सरकारने बहाणेबाजीच केल्याचे दिसून येते. भला मोठा अभ्यास करून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना लागू करण्यात आली, मात्र त्यातील जाचक अटींचा शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शेतीमालाच्या खरेदीसंदर्भातही हाच अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. "मेरे प्यारे कास्तकार भाईयो और बहनो..
खारे दाणे
खारे दाणे
खारे दाणे कोणाला आवडत नाहीत?मी तर फॅनच आहे.लहानपणी शनिवरी सकाळची शाळा असे.पपा 10 पैसे देत असत,त्या दहा पैशांचे स्कर्टचा खिसा भरून जाईल इतके खारे दाणे येत असत.राजा बढे चौकात भडभुंजाचे दुकान होते.फुटाणे,गोडे शेंगदाणे,खारे शेंगदाणे,कुरमुरे,चूनखडीची माती,भाजलेले चिंचोके असं काय काय मिळायचं तिथं.
खारे दाणे कोणाला आवडत नाहीत?मी तर फॅनच आहे.लहानपणी शनिवरी सकाळची शाळा असे.पपा 10 पैसे देत असत,त्या दहा पैशांचे स्कर्टचा खिसा भरून जाईल इतके खारे दाणे येत असत.राजा बढे चौकात भडभुंजाचे दुकान होते.फुटाणे,गोडे शेंगदाणे,खारे शेंगदाणे,कुरमुरे,चूनखडीची माती,भाजलेले चिंचोके असं काय काय मिळायचं तिथं.
मिसळपाव