Skip to main content

बिथरलेले हिंदूत्व

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 03/04/2018 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले.

असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने

लेखक चामुंडराय यांनी मंगळवार, 03/04/2018 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने बेक करुनि त्यास ओव्हन मध्ये खाईन मी तो आनंदाने थिन क्रस्ट वा थिक असो वा मिट असो वा मिटलेस असो वा शर्करावगुंठित सोडयासंगे खाईन मी तो आनंदाने हाय कॅलरी लो फायबर तयाला एक्स्ट्रा चिजचा थर पोषणमूल्ये असो नसो वा खाईन मी तो आनंदाने मिट लव्हर्स वा मार्गारिटा वरती एक्स्ट्रा चीझ मारा नानाविध टॉपिंग्ज संगे खाईन मी तो आनंदाने चीज असो वा व्हेजि असो वा स्मॉल मीडियम लार्ज असो वा चिकन टिक्का वा चिकरोनी खाईन मी तो आनंदाने चीज-न-कॉर्न, मार्गारिटा पेरी-पेरी अथवा फियेस्टा पॅराडाईज वा पनीर मखानी खाईन मी तो आनंदाने पनीर तंदुरी, चिकन विंग्ज अन गार्ल

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ६ (गरोदरपण)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 03/04/2018 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या) भाग ६ (अंतिम) : गर्भवतीच्या चाचण्या गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील बाब. आपण आई होणार याची चाहूल लागल्यापासून ते प्रत्यक्ष बाळाचा जन्म होईपर्यंत ती कशा अवस्थांतून जाते ते बघा. आनंद, हुरहूर, काळजी, घालमेल, ‘त्या’ वेदना आणि अखेर परमानंद ! पण हा गोड शेवट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एक निरोगी मूल जन्मास येते. जर या प्रक्रियेत काही बिघाड झाला आणि एखादा गंभीर विकार अथवा विकृती असलेले मूल निपजले तर? तर तिच्या वाट्याला येते फक्त दुःख आणि दुःखच.

अधिजनुक शास्त्र - डॉ. जगन्नाथ दीक्षित (एम०डी०) यांचा प्रतिसाद

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 03/04/2018 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, काही दिवसांपूर्वी मी या ठिकाणी अधिजनुकशास्त्रावरील लेखावर बरीच प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत मी डॉ० जगन्नाथ दीक्षितांचा उल्लेख केल्यामुळे या चर्चेचा दूवा डॉ० दीक्षिताना पाठवला होता (ते या समूहाचे सदस्य नाहीत). ही चर्चा वाचल्यावर त्यांच्याकडून आलेले विस्तृत उत्तर मी जसेच्या तसे पुढे देत आहे. मला आणखी काही गैरसोईची सत्ये सांगायची होती पण ती नंतर कधीतरी... -- युयुत्सु ON MY EPIGENETICS POST COMMENTS RECEIVED FROM J.K.Dixit, M.D: Rajeev Upadhye, asked me to look into his write up for this forum on epigenetics.

बे एरिया मध्ये भाषण : भारतीय शिक्षण धोरण बदल आणि RTE कायदा - प्रा. भरत गुप्त

लेखक साहना यांनी मंगळवार, 03/04/2018 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
इंडो-अमेरिकन डेव्हलोपमेंट कौन्सिल मधील काही मित्र खालील इव्हेंट घडवून आणत आहेत. प्रा. भरत गुप्त ह्यांना मी भारतात असताना ओळखत होते. ते चांगले वक्ते असून शैक्षणिक धोरण ह्या विषयावर त्यांनी खूप काम केले आहे. मिपा वरील मंडळी जर बे एरिया मध्ये असेल तर त्यांनी ऐकायला जायला हरकत नाही. "Education in India - Scope for Reforms and Right to Education" A talk and discussion with Prof.

गुलामीची १२ वर्षे..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 02/04/2018 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! बर्‍याच प्रयत्नांनंतर मी एक पुस्तक अ‍ॅमॅझॉन किंडलवर टाकले आहे. पुस्तकाचे नाव आहे... गुलामीची १२ वर्षे. मूळ लेखक आहे सालोमन नॉरथप आणि मी त्याचा अनुवाद केला आहे. पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे जरा समजून घ्यावे. ...हा इतिहास मोठा विचित्र आहे. त्यातील सत्य हे काल्पनिक गोष्टीपेक्षा ही अद्भुत आहे. जरा विचार करा, तीस वर्षे या माणसाने स्वातंत्र्यात काढली. साधे का होईना त्याच्या डोक्यावर छप्पर होते ज्यातून त्याला हाकलण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. दुर्दैवाने त्यानंतर १२ वर्षे तो गुलाम झाला, दुसर्‍याची मालमत्ता झाला.

लेक...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 02/04/2018 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
सोनसावळी स्वप्ने सगळी सुखेच लेवुन आली सोनपावले कुणा परीची हळुच उमटली दारी कुणी रेखिल्या त्या गालावर मोरपिसांच्या ओळी गाल गोबरे, गोड गुलाबी राजकुमारी प्यारी नाजुक काया प्राजक्तासम कुरळे कुंतल भाळी अप्सरा कुणी, शापभ्रष्ट ती मदनशराची स्वारी लेक असावी एक गोडशी नको धनाच्या राशी कुशीत घेवुन तिज सांगावी रोज कहाणी न्यारी हातात तिचे बोट कर्दळी जबाबदारी खाशी कोण परी ही? वळता नजरा, सुख वाटावे भारी तिने रुसावे, रुसुन बसावे, कासाविस मी व्हावे डोळ्यात तिच्या मला दिसावी माझी सौख्ये सारी वृत्त : लवंगलता ( मात्रा : 8 8 8 4 ) © विशाल कुलकर्णी

वादळ

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 02/04/2018 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ उरी फुटते रात्र उठे अंधारी प्राणात पेटे वादळ क्षितीजाचे रंग असुरी शुभ्र चांदण्या जाळून काळोख पसरे चहुकडे प्रकाशाच्या तुकड्यासाठी एक छाया तडफडे पानांच्या हिरव्या देहातून हुंकारते वाऱ्याचे काळीज घायाळ त्या सुरांभोवती श्वासांचा हलतो आवाज मंद शुक्राचा भास भुलते चंद्राची वाट निद्रेत आज फुलांच्या उसळते दु:खाची लाट
काव्यरस

Dead Man's Hand - 2

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 02/04/2018 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
"मालवणी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पेक्टर महाडीक बोलतोय..." "साहेब, मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या उलट्या बाजूला एक मुलगी मरुन पडली आहे. तुम्ही लवकर या!" महाडीक पुढे काही बोलण्यापूर्वीच फोन कट् झाला होता. "च्यायला, पोलिसांना पूर्ण माहिती का देत नाहीत हे लोक? डिस्ट्रीक्ट, जीप काढा.. डिटेक्शनवाले कोणकोण आहेत बघा..." सुमारे वीस मिनीटांत इन्स्पेक्टर घाटे, सब् इन्स्पेक्टर महाडीक, हेड कॉन्स्टेबल राणे आणि इतर चार शिपाई यांच्यासह सायरनचा आवाज करत पोलिस जीप मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या टोकाला येऊन थांबली.

Dead Man's Hand - 1

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 02/04/2018 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे दोनचा सुमार .... पश्चिम क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला अरबी समुद्र .... भर समुद्रात दूर अंतरावर असलेल्या जहाजांवरचे ठिपक्यांसारखे दिसणारे दिवे .... किनार्‍यावर आदळणार्‍या लाटांचा आवाज सोडला तर वातावरणात नीरव शांतता .... अमावस्येची रात्रं असल्याने डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा गडद अंधार .... रस्त्याच्या कडेल उभी असलेली त्याच अंधारात सहज मिसळून गेलेली काळ्या रंगाची कार .... "एकदा बाहेर चेक करा, आसपास कोणी दिसत तर नाही..." कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलेला माणूस म्हणाला. तो बहुतेक सर्वांचा प्रमुख असावा.