मुसक्याबंद
धक्क्याच्या कोप-यात (धक्का हे जुनं नाव, हल्ली त्याला जेट्टि म्हणतात.)आता जिथं कुरकुरे, भेळ , शोभेच्या वस्तुंचे स्टाॅल्स आहेत तिथं पूर्वी एक भिकारी रहायचा. भिका-याला थोडंच नाव असतं. आणि असलं तरी कोण त्याला ते आपुलकीनं विचारणार? पण त्याला सगळे " मुसक्याबंद" म्हणायचे.
केस आणि दाढीच्या जटा वाढलेल्या, खोल गेलेले डोळे. अंगावर मळकट्ट कपडे. कपडे म्हणजे कधीकाळी तो शर्ट असावा, असं वाटणारा कपडा आणि खाली फाटकी पॅन्ट. ती सुद्धा दुस-या एका फडक्याने बांधून कमरेवर टिकवलेली. पावसात भिजला तरच आंघोळ. त्यामुळे त्याच्या अंगाला दुर्गंधी यायची.
मिसळपाव