Skip to main content

किस्सा ए पारसी

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 30/04/2018 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
किस्सा ए पारसी पारशी लोक म्हटले कि आपल्याला ही गोष्ट अगदी आवर्जून सांगितली जाते कि ते ८व्या कि ९व्या शतकात इराण मधल्या मुसलमानी आक्रमणामुळे पलायन करून गुजरात मधल्या संजाण नावाच्या गावी आले आणि त्यानी तिथल्या राजाकडे( जाधव राणा किंवा यादव राणा )आश्रय मागितला मग त्याने दुधाने भरलेला वाडगा पाठवला – तुमच्या करता इथे जागा नाही हे सुचवायला, तर त्या पारशी लोकांच्या प्रमुखाने त्यात मूठभर साखर टाकली – ह्या साखरेप्रमाणे आम्ही तुमच्यात मिसळून जाऊ आणि उलट गोडवाच वाढवू असे सुचवण्याकरता. आता ही गोष्ट कितपत खरी आहे ते माहिती नाही. पण खरी नसावी.

फसता फसता जमलेली गोष्ट-२

लेखक शाली यांनी सोमवार, 30/04/2018 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासाचा ऊद्देश फक्त खादाडी असल्याने ताम्हीणी घाटाला टांग मारुन सरळ एक्सप्रेस-वेने पेण-वडखळ करीत अलीबाग गाठायचे ठरले. माझ्याकडे फरसाण-फळे होतीच. स्वातीनेही दशम्या, चटणी, लोणचे आणि फोडणी घातलेला दहीभात घेतला होता. त्यामुळे नाष्ट्यासाठी हॉटेल शोधायचा वैताग नव्हता. हवाही छान होती. कुमारांचे ‘अवधुता, गगन घटा गहरानी रे’ लावले आणि निघालो. चार तासाचा तर प्रवास होता. त्यामुळे रमत गमत निघालो. एक्सप्रेसवेवर यायच्या अगोदर ईंद्रायणी नर्सरी जवळ गाडी बाजूला घेतली. शेतात मस्त चटई टाकली आणि सकाळचा नाष्टा ऊरकला. कुणाच्या हातात काय जादू असते कळत नाही. आता दही-भातात काय करायचे असते?

तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

लेखक खिलजि यांनी सोमवार, 30/04/2018 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
तप्त झाली धरा सारी दहाही दिशा त्या पेटल्या दिनकराशी हात मिळवुनी उग्र होऊनि परतल्या ॥ मरूत व्यस्त, घाले गस्त थैमान चहूकडे माजले पशु, प्राणी, झाडे, पक्षी नद्या नाले भाजले ॥ रुक्ष झाले वृक्ष सारे सावलीपण महाग ती यत्र तत्र वणवा पेटला स्वस्त झाली आग ती ॥ कोपला तो, झोपला तो भक्ती कमी जी जाहली मोह मायेत प्राण सारे म्हणुनी झाली काहिली ॥ {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

बालाशिष स्तोत्र

लेखक खिलजि यांनी सोमवार, 30/04/2018 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच खूप दुःख वाटतेय आजकालच्या बातम्या ऐकून ऐकून . वृत्तांकनामधून आजकाल लहान मुलांवरील अत्याचाराच्या बातम्या जरा जास्तच येत आहेत . खूप विषन्न व्हायला होते हे सारे ऐकून . मला जे वाटते ते मी आतापर्यंत करत आलोय . माझ्या मुलाचा जन्म झाल्यापासून मी नित्यनेमाने बालाशिषः स्तोत्र म्हणतो . जेणेकरून खरंच दत्तगुरूंचे रक्षकवच असेल तर ते माझ्या मुलांना लाभावे म्हणून . या स्तोत्राची संख्या ५ आहे . म्हणजे किमान आपल्या मुलांच्या रक्षणासाठी ते दिवसातून किमान पाच वेळा तरी म्हणावे . वरील लिखाणावरून अभिप्रायांची राळ उडू शकते . मला पुन्हा नास्तिक नि आस्तिक वादामध्ये पडायचे नाही आहे .

पुरुष जननेन्द्रियाचे यशस्वी प्रत्यारोपण : अभिनंदन !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 30/04/2018 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या अर्धशतकात शरीरातील अनेक अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वी करण्यात वैद्यकशास्त्राला यश आलेले आहे. हृदय, मूत्रपिंड, यकृत, नेत्रपटल, त्वचादि अवयवांची प्रत्यारोपणे आता नियमित होत असतात आणि सामान्यजनांना ती परिचित आहेत. हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यांचे प्रत्यारोपण हे एखाद्या रोग्याच्या जीवनमरणाशी थेट संबंधित असते. या दृष्टीकोनातून आता पुरुषाच्या जननेंद्रियाकडे बघूया. त्या अवयवाचा गंभीर कर्करोग झाल्यास अथवा ते एखाद्या गंभीर अपघातात नष्ट झाल्यास तो त्या पुरुषासाठी फार मोठा धक्का असतो. संबंधित भागाच्या डागडुजीनंतर तो रुग्ण जिवंत राहू शकतो पण त्याच्या पुढील आयुष्यातील ‘पुरुषार्थ’ संपलेला असतो.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ४

लेखक रा.म.पाटील यांनी सोमवार, 30/04/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate Your Love) कथा - ४ यात्रा.. (प्रेमाचा प्रवास..) समोरून ती येत होती.. त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली.. पाहताक्षणीच कोणालाही आवडतील इतके सुंदर डोळे.. डोळ्यावरूनच तिच्या सौन्दर्याचा अंदाज येत होता.. पण स्कार्फने चेहरा झाकल्याने ते सौन्दर्य सध्या तरी भूमीगतच होतं.. आणि कानात त्याच्या मोबाईलवरचे गाणे घुमत होते..

मेथी पिठले

लेखक श्वेता२४ यांनी रविवार, 29/04/2018 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - १वाटी बेसन २मीरची चीरून १०-१२ लसूण ठेचुन १०-१२ पाने कढीपत्ता २ चमचे कांदा लसूण मसाला मीठ , तेल व फोडणीसाठी साहित्य अंदाजे साहित्य बेसनमध्यये पाणी व मीठ घालून खूप पातळ करावें. २-३ चमचे तेलात मीरची, कांदा व निम्मा लसुण घालावा फोडणी आता त्यात मेथीची पाने घालावी मेथी घाला आता थोडी हळद घालून बेसनाचे पाणी घालावे व झाकण ठेऊन मंद आचेवर १०-१२ मी शिजत ठेवावे.