Skip to main content

समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/05/2025 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते! नऊ दशकांचा प्रवास केलेली माझी आजी- सौ. स्नेहप्रभा नारायणराव वेलणकर. जिचे तीन भाऊ दुसर्‍या महायुद्धात युरोप व आफ्रिकेत लढले होते! जिने इंग्रजांपासून अँड्रॉईडपर्यंतचा काळ बघितला!

माध्यमांची आरडाओरड

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 09/05/2025 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग... एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे? त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला. आपात्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण भारतीय नागरिक कसा बेपर्वा किंवा मठ्ठपणे वागतो, हे सर्वांनी करोना काळात बघितले.

अलविदा हिट्मॅन

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 08/05/2025 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी, हातात चहाचा कप आणि समोर मोबाईल. नेहमीसारखं क्रिकबझ उघडलं आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना — “रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त.” hitman थांबा जरा. रोहित शर्मा? हिटमॅन? ज्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडायचा, तो आता कसोटीच्या पांढऱ्या जर्सीला रामराम करतोय? क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी ही कला आहे, आणि रोहित म्हणजे त्या कलेचा एक लाडका चित्रकार.

हा सूर्य आणि......

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 08/05/2025 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा अर्जुनाने जयद्रथाला मारायची प्रतिज्ञा केली तेव्हा कृष्णाला काय वाटले असेल?? --- कृष्णाने शिबीरात रथ आणला आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. काहीतरी विपरीत घडले होते. आज अर्जुनाला संशप्तकांनी फारच गुंतवून ठेवले होते. संख्येच्या बळावर आणि विवीध रथीच्या निपुणतेवर आजचा दिवस अर्जुनाला बांधून ठेवण्यात संशप्तक सफल झाले होते. युधिष्ठीराला फसवून चक्रव्युहात आणून, युद्ध संपवायचा डाव होता हे कृष्णाला कळले होते. तो डाव कळल्यावर लगेच दूत युधिष्ठीराकडे पाठवून त्याने सावधही केले होते. "मग आज कोण वीरगतीला प्राप्त झाला?" प्रश्न मोठा होत होता.

राजांचे मावळे (ई.स.२२२२) - १

लेखक लाल गेंडा यांनी मंगळवार, 06/05/2025 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरपूर इसवी सन २२२२ , महिना आषाढ, दिवस एकादशीचा. दोनशे वर्षांपूर्वी पंढरपूर कसं होत काय माहित, आज विठ्ठल मंदिराचे भग्नावशेष राहिले होते. विठ्ठल अजून गाभाऱ्यात होता पण रखुमाई नव्हती. विठ्ठल जणू काळाच्या माऱ्याने दमून मागे टेकला होता. वरच्या छताला तात्पुरता आधार दिला होता. त्यात एक फट राहिली होती जिच्यातून वाऱ्याची झुळूक खाली येत होती. बलदंडाने हात जोडले आणि त्या टेकलेल्या विठ्ठलाला झुकून नमस्कार केला. याच माऊली समोर हजारो लाखो वारकरी नतमस्तक व्हायचे आणि वाट चुकलेले योग्य दिशेला लागायचे.

जाता पंढरीसी....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 05/05/2025 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा....." आजी आजोबांची पंढंरी म्हणजे नातवंड. पोटासाठी दाहीदिशा अशा परिस्थितीत बरेच आजीआजोबा या सुखापासून वंचितअसतात. कवीवर्य बाकीबाब म्हणतात तसेच, "पिलास फुटूनी पंख तयांचे घरटी झाली कुठे कुठे.....", आमचेही एक पिल्लू दुरदेशी गेलयं. भलं हो त्या इंजीनिअरांचे ज्यांनी व्हाट्स अप सारखे तंत्रज्ञान बनवले.विसाव्याच्या क्षणी सहवास नाही पण कमीतकमी संपर्क तरी होतो. तरूण पणी या गोष्टी सहज वाटतात.

कृष्णविवर

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 05/05/2025 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
शतसूर्यांची जळती बिंबे गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे स्थळकाळाची अदय शृंखला तटतट तोडून हिंडत आहे क्षुधा अपरिमित अंतर्यामी धगधग पेटून उठली आहे आदिम स्वाहाकार सूक्त का पुनश्च अविरत गुंजत आहे? विज्ञानाचे नियम तोकडे- विपरित त्यांच्या घडते आहे भवताला घोटात गिळुनिया कृष्णविवर हे हिंडत आहे "विझत्या सूर्यावरती लट्टू नार नवेली पृथ्वी आहे" कृष्णविवर संतप्त होऊनी अथक स्वतःला कोसत आहे

राजा माझा

लेखक लाल गेंडा यांनी सोमवार, 05/05/2025 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड सहयाद्री असो वा सागरी राज्य करतो, राजा माझा || शाहिस्ते खान, अफजल खान, मानसिंग, इंग्रज देशी असो वा विदेशी जिंकतो सगळ्यांना, राजा माझा ॥ दुर्जनांचा विनाशी, सज्जनांचा कैवारी रयतेला न्याय देतो सर्वांसाठी समान, राजा माझा || हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सर्व धर्म समान मानतो सगळ्यांना समान लेखतो, राजा माझा ।। निश्चयाचा महामेरु, सामान्यजनांचा आधारु मनातला तिमीर दूर करतो ध्येयाचा सूर्य तळपता, राजा माझा || निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी रजोगुणांनी संपन्न असा शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा || मुजरा, मान, देह, मन सर्वे त्याला अर्पावे त्याच्याच प्रेरणेने पुढे

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 05/05/2025 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.