Skip to main content

लाडकी झाली दोडकी...

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 26/02/2025 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
लागली कडकी, घटली लाडकी ।। 9 लाख अपात्री, 135 कोटी/महिना खर्चाला कात्री ।। लाडकी बहिणीमुळे जिंकले, आता माशी शिंकली ।। चारचाकी नाहीना, कितीउत्पन्न महिना ?। आला 'त्यांचा ' आदेश, आता तपासा निकष ।। गरजू बहिणी राहूद्या अपात्र बहिणी जाऊद्या ।। म्हणे वेळ कमी होता, ना केलाआधार लिंक कोटा ।। 9 लाख मोठा आकडा, विरोधकांचा लावला निकाल वेडा वाकडा ।। नाना,दादा,भाऊ ची चलाखी, विरोधकांची केली हलाखी ।। आता गरज सरो, लाडकी मरो ।।

श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 26/02/2025 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
१. अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन - https://www.misalpav.com/node/44374 २. श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन - https://www.misalpav.com/node/44416 ३. श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार - https://www.misalpav.com/node/46057 ४.

फ्लॅट खरेदी ,शाप कि वरदान ( खास करुन नोकरी वाल्या लोकांसाठी)

लेखक स्वरुपसुमित यांनी सोमवार, 24/02/2025 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेने किती सोयिस्कर? फायदे ,खास करुन नोकर दार लोकान साठी आयकर सुट हक्काचे घर मोड तोड स्वातंत्र्य कीमत वाढु शकते कायम ची गुंतवणुक सारखी घर बदलायचि कट कट नाही नुक्सान नोकरी ची जागा बदलली कि फ्लॅट बदलणे किवा लांब चा प्रवास गुंतवणुक आहे पण लगेच पैसे पाहिजे असल्यास फ्लॅट विकणे वेळ खाउ आहे भाडे हे. होम लोन हप्त्यां पेक्शा स्वस्त आहे शेजारि पाजारि आले कि फ्लॅट बदलता येत नाही, आहे त्यांना सहन करावे लागते

सतारीचे बोल

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 24/02/2025 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
जरा सोडला लगाम ढिला, अंग प्रत्यंगाने संकेत दिला. हळूहळू कुरकूर करू लागलं. गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं. हात पायाच्या झाल्या काड्या, कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या. कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता. दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता. कधी माझ्या भोवती जग फिरले, तर कधी डोळ्यासमोर तारे विरले. भर दुपारी जगाला भोवळ आली. आणी बोळवण धन्वंतरींच्या घरी झाली. काही रक्तपिपासू रक्त शोषू लागले, तर प्रकांड पंडीत कारण शोधू लागले. हृदयाची सतार बिघडली होती दिड दा दिड दा लय बेकाबू होती गवसणीतूनच तारा छेडल्या सतारीच्या खुंट्या पिळल्या सतार झाली म्हातारी... तारा नाजूक झाल्यात. तार सप्तक लावू नका. आर्त स्
काव्यरस

परीक्षा...कुणाची ?

लेखक बाजीगर यांनी रविवार, 23/02/2025 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
परीक्षा...कुणाची? 'सी ई ओ'समोर पडला कॉप्यांचा पाऊस ! डोके गरगरले,संताप आला भाऊस ।। 'विकास मीना'- करारी, मारली धडक भरारी ।। बारावी चा गणिताचा पेपर, खोके भरून कॉप्या,गाईड, पाहून आले फेफरं ।। परीक्षाकेंद्रातून अनेकांनी मारली धूम, कॉपी फॅक्टरी हँडलूम ।। आता त्यांची सटकली, जबाबदारी ना झटकली ।। इमानदारीची लढाई आरपार, पूर्ण प्रशासन व पर्यवेक्षक यांच्यावर, केला पोलीस ठाण्यात FIR ।। आदर्श(?!)विद्यालय फुलंब्री संचालक पर्यवेक्षक नंबरी ।। कुंपण च शेत खाते, पर्यवेक्षक कॉपी देते ।। कशासाठी हे सर्व? शिक्षण न देता पास व्हावेत सर्व ।। विद्यार्थांना शिकायचे नाहीये. श

बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 23/02/2025 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा ========================= मंडळी मागील आठवड्यात जे नकारात्मक चित्र युयुत्सु-नेट ने दाखवले त्या प्रमाणे परत एकदा मार्केटने आपला मगदूर दाखवला. या आठवड्यात मात्र चित्र वेगळे आहे. बाजारात अजून करेक्शन येणं बाकी आहे असं तज्ञ मंडळी सांगत असताना मॉडेल मात्र चढा-सूर आळवत आहे. कदाचित या खेपेस युयुत्सु-नेट याखेपेला नक्की गंडेल असे वाटते. त्यामुळे माझी उत्सूकता किंचित ताणली गेली आहे.

शिक्षण आणि विटाळ पाळणे

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 23/02/2025 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
"शिक्षण प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात.

शिवजयंती

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 19/02/2025 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पोराचे वडील तसे नामी सरदार होते बरं. आज आपण उपहासाने जो जहागीरदार शब्द वापरतो तसा त्या मुलाचा बाप खरंच खूप मोठा जहागीरदार होता. पैशापाण्याची, सेवेकऱ्यांची कमी नव्हती. त्या तरुणाने सगळी हयात मजा मारण्यात घालवली असती तरीसुद्धा तो काही चुकला असं कुणीही म्हणू शकलं नसतं. परंतु गर्व आजपर्यंत कुणाला चुकला? तुम्ही पुराणे उचकून पहा, परमेश्वरी अवतारांना सुद्धा गर्वाची बाधा झाल्याचे क्षण तुम्हाला सापडतील. असाच गर्व या विश्वाची निर्मिती करणाऱ्या आदियोगी-आदिशक्तीला झाला. आणि अनंत विश्वातल्या अनंत चुका अनंत चाचण्यांनी सुद्धा ज्याच्यात सापडणार नाहीत असा युगपुरुष निर्माण करण्याची नियतीला इच्छा झाली.

त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 18/02/2025 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
✪ त्र्यंबकेश्वरमध्ये बिहार स्कूल ऑफ योगाचं योग शिबिर ✪ पण त्याआधी प्रसिद्ध संस्थानाच्या नावाने झालेली ऑनलाईन फसवणूक ✪ "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!" ✪ परमहंस निरंजनानंद सरस्वतींच्या उपस्थितीतील सत्संग ✪ "चार मिले, चौसठ खिले, बीस करें जोड़" ✪ BSY चं सुंदर आयोजन आणि सत्रांची मेजवानी ✪ आदर्श गुरू बरोबर आदर्श शिष्यत्वाचं उदाहरण! ✪ साधकांची मांदियाळीसह कीर्तन, भजन आणि ध्यान ✪ त्र्यंबकेश्वर भटकंती व ब्रह्मगिरीचा अविस्मरणीय ट्रेक सर्वांना नमस्कार. नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बिहार स्कूल ऑफ योगा ह्या मोठ्या योग विद्यापीठाच्या एका योग शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

पत्रास कारण की

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 18/02/2025 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
मा० राष्ट्रपती मा० पंतप्रधान मा० सरन्यायाधीश, भारत सरकार स० न० वि० वि० या देशाचा नियमित कर भरणारा आणि कायद्याला भिणारा एक नागरिक म्हणून मला देशातील अधिकाधिक गढूळ वातावरणाची चिंता वाटते. आजचे गढूळ वातावरण भविष्याचा पाया असल्याने ते जास्त धोकादायक आहे. मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते. माझ्या अल्पमती धारणेनुसार अस्मिता माणसाला एक प्रकारे मानसिक ताकद देते. त्या ताकदीतून आत्मविश्वासाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते.