Skip to main content

अपूर्ण आयुष्याची कविता

लेखक Prakashputra यांनी शनिवार, 25/08/2018 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
दोन पेग झाल्यानंतर, जेव्हा दोन पेगचे लिमिट म्हणून तिसरा प्यायचा नव्हता, पण ग्लासात काहीतरी पाहिजे होते, म्हणून मी नुसताच सोडा ओतला तेव्हा सुचलेली कविता मी स्वतःला फसवायला खूप प्रयत्न करतो ! आणि दरवेळेला स्वतःच फसतो !! दरवेळी जिंकायचा प्रयत्न करतो, ! मग मीच जिंकतो आणि मीच हरतो !! स्पर्धा कुणाशी आहे तेच कळत नाही ! तरी उगाचच लढत बसतो !! मी शहाणा म्हणून मलाच समजावत बसतो ! मी वेडा म्हणून माझ्याशीच भांडत बसतो !! क्षुद्र आयुष्याला अर्थ द्यायचा म्हणून ! भव्य तत्वज्ञान मांडत बसतो !! शिस्तीच्या नावाखाली तिसऱ्या पेगला ! नुसता सोडा म्हणत बसतो...... !! सगळ्याचाच उबग येऊन चौथा पेग ओततो ! मग एक कविता राहते अपूर्ण अपूर्ण आयुष्याची कथा सांगत…….
लेखनविषय:

वाचने 836
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया