Skip to main content

माझी आयर्नमॅन भाग -२ (तयारी)

लेखक पुतळाचैतन्याचा यांनी शनिवार, 09/03/2019 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
https://photos.app.goo.gl/nfZY36KHdppJYbfBA (Please ignore grammatical errors). गुगल ट्रान्सलेटर चा वापर करून लिहिल्याने भाषा पुस्तकी झाली आहे तरीपण.... जर आपण विचार करीत असाल - "आयर्नमन" माझ्यासाठी नाही तर आपण नक्कीच एकदा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य पूर्ण ताकदीने जगायची इच्छा जागृत करावी लागते. आमच्या रेस मध्ये 67 वयाची महिला सहभागी होती आणि ती २२ वी आयरनमॅन पळत होती आणि कमीतकमी 3 शारीरिक अपंग सहभागी होते (कमीत कमी १पाय किंवा हात नाही).

काचेच्या अलिकडून

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 09/03/2019 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक वेळेला मी मान फिरवूनच घेतो किंवा लक्ष नाही असं दाखवतो नाहीच जमलं दुर्लक्ष करणं तर मानेनेच नाही म्हणतो आणि कधीकाळी दिलेल्या दहा रूपड्याचं गणित मांडून स्वतःचच समर्थन करतो... पण खरं सांगायचं तर, आत एक द्वंद्व चालू असतं कारण मला पक्कं ठाऊक असतं की, नकार, अपमान, एकटेपण, तिरस्कार, नाकारलेपण, संघर्ष, या शब्दांचे अर्थ मला नाही कळणार कधीच.... ते कळतील फक्त गाडीच्या बंद काचेबाहेर असणा-या आणि बेदरकार नजरेने आयुष्याशी दोन हात करत असणा-या ....त्या हिजड्याला
काव्यरस

Women 's Day - 2019

लेखक माउ यांनी शनिवार, 09/03/2019 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळीनो ! काल ' जागतिक महिला दिन' (International Women 's Day ) झाला. सगळ्या महिलांनी एकमेकीना शुभेच्छा दिल्या. ज्या working आहेत, त्यांनी छान Day Out त्यांचा enjoy केला. बऱ्याच पुरुषांनी त्यांच्या मुलीना,आई ला, बायकोला, मैत्रिणी ना, girlfriend ला वेगवेगळ्या पद्धतीने wish केले. Such a kind gesture! परत Men - Women Equality, women and their rights ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाल्या ofcourse on different platforms .. मी स्वतः एक स्त्री आहे पण मुळात मला ह्या Women 's Day celebration वर थोडासा आक्षेप आहे.

मैत्र - ७

लेखक शाली यांनी शुक्रवार, 08/03/2019 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
इन्नीने त्याला वर्गाच्या दारातच गाठलं आणि आधार दिला. दत्त्याही धावला. शकील गाडीच्या चाव्या माझ्या अंगावर फेकत म्हणाला “अप्पा, गाडी काढ. ठोब्बा, पानी ला जलदी.” मी रामला सगळ्यांच्या वह्या गोळा करायला सांगीतल्या आणि शकीलबरोबरच वर्गाबाहेर पडलो. सखाराम आमच्या या धावपळीकडे डोळे विस्फारुन पहात राहीला… मी आणि शकील बाहेर आलो. शाम्या इन्नीच्या हातातून दंड सोडवायचा प्रयत्न करत होता. इन्नी घाबरली होती, रडतही होती.

युवक मतदारकांचा दृष्टीकोण..

लेखक मुदखेडकर यांनी गुरुवार, 07/03/2019 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
आता काहीच दिवसात आगामी लोकसभा 2019 निवडणुका जाहिर होतील व सर्वत्र देशात राजकिय धुमाकुळीचे वातावरण निर्माण होईल यात शंकाच नाही. ही निवडुणक माझ्यासाठी महत्त्वाची कारण मतदान करण्याची ही माझी प्रथमच वेळ आणि घरामध्ये पहिले पासुनच राजकिय वातावरण व राजकीय चर्चा असल्यामुळे थोडी उत्सुकता. आता नव युवक पीढी मध्ये राजकारणा बद्धल थोडी जागरुक झाली हे म्हणणे चूकीचे होणार नाही. पहिले मतदाना करतांना मदतार हे जात- पात, धर्म इ.

शिवजयंती

लेखक मकरंद घोडके यांनी बुधवार, 06/03/2019 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी निघाली..चायनीज ची दुकाने आणि त्याच्या बाजूला मंडई त्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याने आणि फळांनी बहरलेला माहोल.तिथेच बाजूला एक पूजा साहित्याचं दुकान आणि त्यात सिजनल वस्तूंची रेलचेल. समोर सिग्नल आणि प्रचंड गर्दी! १९ फेब्रुवारी.आज शिवजयंती. महाराजांना दोन क्षण घट्ट डोळे मिटून आठवून पाहिलं.मग ते चौथीच्या पुस्तकात घोड्यावर बसून मोहिमांना जाताना दिसले,काय ते रूप काय ते तेज अगदी अवर्णनीयच! सगळा इतिहासच प्रेरणादायक तो. पिप sssssss पिप ssssss एकदम वर्तमानातच आदळलो! डोळ्यातून ते तेज हटेना!! पण समोरचं चित्रही पाहवेना- हे चायनीज गाडीवाले का बरं फोफावले असतील?

नकळत सारे घडले ४

लेखक शाम भागवत यांनी बुधवार, 06/03/2019 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!! दुसरा: सर, आपलं एफ१६ जरी पडलं असलं तरी त्या अगोदर आपल्या वैमानिकाने भारतात जाऊन तिथे मिझाईल डागलं याचा मला अभिमान वाटत होता. पण त्याचाही नेम चुकला. फुरफुर: कुठे धरला होता: दुसरा: धरला नव्हता. धरणार होता. फुरफुर: (जरा ओरडून) अरे पण कुढे? दुसरा: भारतीय ब्रिगेडच्या मुख्यालयावर. फुरफुर: पुढे दुसरा: ती मिग२१ अपेक्षेपेक्षाही लवकर आली. जणू भुताटकी झाली. फुरफुरः ????? दुसराः श्रीनगर विमान तळावरून सुखोई, मिराज व मिग२१ आली. आता सुखोई प्रथम यायला पाहिजे.

व्हेनीसचे व्यापारी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 06/03/2019 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
क्लीओपात्राच्या सौंदर्याला सीझरच्या नश्वरतेचा शाप या भुताटकीच्या जगात सगळेच हॅम्लेटचे बाप * व्हेनीसचे व्यापारी सारे मासाचे भुकेले रोमीयोचे शहाणपण उगाळुन प्यायलेले * म्हणुन म्हणतो पोरी बरे असते स्व:ताला जपलेले ईथे सगळे वंशज सेक्सपीयरचे तारुण्याला हपापलेले...........

सजले अंतर

लेखक कुमार जावडेकर यांनी बुधवार, 06/03/2019 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर विसरलो गेला कसा सारा दिवस सरून झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर... - कुमार जावडेकर