गोष्ट मोडलेल्या लग्नाची !!!
प्रसाद आणि वीणा हताश होऊन बसलेले इतकी सगळी तयारी झालेली पत्रिका पण वाटल्या, नातेवाईकांसाठी रुम्स बुक केल्या. लग्न अगदी आठ दिवसांवर आलेलं आणि आता सर्वांना फोन करून सांगायचं येऊ नका लग्न मोडलेय म्हणून! एका सर्वसामान्य कुटुंबाला हा धक्का पचवणं कठीणच होतं. हाच निर्णय घेणे आवश्यक होते पण तरीही मनावर मणभर वजन ठेवल्यासारखं वाटतंय हेच खरं!
तनिष्का एमबीए करून व्यवस्थित सेटल झाली तेव्हा कुठल्याशा वेबसाईटवरच लग्नासाठी नाव नोंदणी केली रितसर! कित्येक महिने मग पटलेली स्थळं शॉर्टलिस्ट करायची आणि त्यावर सल्लामसलत करायची, असा त्या कुटुंबाचा कार्यक्रमच झालेला.
मिसळपाव
काव्य, शास्त्र, विनोदाने दरवळणार्या मैफिलीत
हुरळून आपण सामिल होतो.
संवादासाठी, मैत्रीसाठी आसुसलेले आपण
चार दोस्तांच्या सहवासात हरखून जातो.
मैफिलीतल्या अनवट कविता,
एखादी नेमकी दाद,
तिथली व्यासंगी चर्चा,
आणि मनसोक्त गप्पा.
अशा हव्याहव्याशा वातावरणात
आपणच नकोसे आहोत,
हे अवचितच झालेले दंशभान….
शरीरात एखादे विष पसरत जावे
तसा पसरत जाणारा तुटकपणा.
आपल्याच हाताने तोडून सर्व पाश
खुलाशाचाही न करता अट्टहास,
पुन्हा एकदा मौन प्रवास.
एकट्याचा….
कधीही न पर