आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती
इतर लेख
आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख
आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था
आकाशदर्शन - संदर्भ पद्धती
'आकाशदर्शन - सुरुवात आणि ओळख' या मागच्या भागात आपण सूर्याची रास आणि वर्षाचा महिना - तारीख याचा संबंध पाहिला. तसेच सूर्य मावळल्यावर साधारणपणे कोणती रास डोक्यावर, कोणती रास पूर्वेला उगवत असणार हे कळले.
सुधारीत जीवनशैलीच्या शोधात....
स्वच्छंदी जीवनाची परिणिती, वाढत्या वयाबरोबर रोज नविन दुखण्याचा शोध किंवा नविन समस्या उद्भवल्या नाहीत तर जुन्याच समस्या तिव्रतेने जाणवण्यात होते. ऐन तारूण्यातली जागरणं, अरबट चरबट आणि वेळी अवेळी खाणं त्या त्या वेळी खुप सुखाऊन गेली. पण पन्नाशी नंतर कांही शारीरिक कुरबुरी सुरू झाल्या. तसं गंभीर कांही नव्हतं पण थकवा जाणवायचा म्हणून एकदा डॉक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढलोच. म्हंटलं कांही तरी मल्टीव्हिटॅमिन वगैरे देतील थोड्या दिवसांकरीता आणि सर्व ठीक होईल.
आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख
इतर लेख
आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती
आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था
आकाशदर्शन - सुरुवात आणि ओळख
गाभा आणि ओळख
समुद्रमार्गे आणि जमिनीवरून विशेषत: वाळवंटातून पूर्वी व्यापारी रात्रीचा प्रवास करत असत तेव्हा आकाशातील ताऱ्यांचा दिशादर्शक म्हणून उपयोग होत असे. ग्रीक आणि अरब व्यापारी यात पुढे असल्याने त्यांचा गाढा अभ्यास होता. ताऱ्यांची नावे त्यांच्या भाषेतील असण्याचं मुख्य कारण तेच आहे. विशेष तारकापुंजातील ताऱ्यांना ग्रीक पुराणातील नावे देऊन त्यांच्या कथा आहेत.
पाणी आंदोलन
- डॉ. सुधीर रा. देवरे
या लेखात सटाणा शहराचा विचार केला असला तरी सर्वदूरच्या (महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र) वाचकांनी सटाणा हे शहर उदाहरणार्थ म्हणून समजावं. ज्यांनी दूरदृष्टीने जल व्यवस्थापन केलं नाही अशा सर्व गाव- शहरांत कमी अधिक प्रमाणात या वर्षी पाणी टंचाईची अशीच भीषण अवस्था आहे :
सटाणा शहराचा पाणी प्रश्न तीस- चाळीस वर्षांपासून तसाच टांगणीला पडला आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या वाक्प्रतचारासारखं सटाण्याचं झालं आहे. पाणी टंचाई झाली की बोलायचं. नदीला आवर्तन सुटलं की आपल्यापुढे पाण्याचा प्रश्नच नाही असं वागायचं.
जमिनीत बोरवेल करून जो तो आपापला पाणी प्रश्न सोडवू पाहतो.
राखून ठेव दुधाचे थेंब तू
राखून ठेव दुधाचे थेंब तू
मज पाडसा पाजावया
रक्त माझे शोषलेस
काही नाही त्यास द्यावया
घास देई तू मजप्रती
दुध देते मी म्हणोनि
अर्थ नाही, व्यर्थ आहे
जीवन शिंगे असोनि
कामधेनु, गोमाता नावे
मज अनेक ती
भाकड पैदा होता
खाटीकास विकती
निचाहूनी नीच तू
तुझ्यासम कुणी नसे
धर्माचे स्तोम फक्त
अंतरी आत्माच नसे
विकशील का मुलीला ?
वांझ जर असेल ती
जरा खरचटता तिला
झोपही उडेल ती
वळू नको, भाकड नको
दुभती गाय पाहिजे
माग तू याच जन्मी
मग नरकात जायचे
(( सिद्धेश्वर विलास पाटणकर ))
मरणाचं अर्थशास्त्र
काल बातमी आली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघणारा फूट ओव्हर ब्रिज कोसळला. काही माणसं मेली.
कसंही मरण येऊ शकतं आपल्या देशात. कोणी उघड्या गटारात पडून मरतं, कोणी रस्त्यावरच्या सुट्या विजेच्या तारेला धक्का लागून मरतं, कोणी झाड पडून मरतं. कोणी भिंत पडून मरतं तर कोणी इमारत कोसळून मरतं. कोणी सरकारी दवाखान्यात योग्य उपचार न मिळाल्याने मरतं तर कोणी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून मरतं. कुठेना कुठेतरी या सगळ्याची मुळं भ्रष्ट सामाजिक व्यवस्थेत आणि मानसिकतेत असतात. आपण तरी धुतल्या तांदळासारखे पवित्र कुठे असतो? काही जणं 70% भ्रष्ट असतील तर कदाचित आपण 30% च असू.
|| माझे बाबा ||
हे विठ्ठला माझे मस्तक तुझ्या चरणी झुकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||धृ||
त्यांच्याच आधाराने झाले लहानाची मोठी |
खंबीरपणे उभे राहिले सतत माझ्या पाठी ||
त्यांचच बोट धरुन मी चालायला ही सिकाले |
म्हणूनच तर आतापर्यंत कधिच नाही थकले ||
हे विठ्ठला त्यांच शेत मोत्यावानी पिकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||1||
जुनी पुरानी कपडे त्यांनी शिवून शिवून घातली |
माझ्यासाठी प्रत्येक वेळेस नविन फ्रॉक घेतली ||
एकच जोडी चपल ते सांधुन सांधून घालायचे |
माझ्यासाठी पायघड्या ते काट्यांवरून चालायचे ||
त्यांच्याकडुन मला पण काही तरी शिकु दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे |
काव्यरस
झगमगाटातील अस्वस्थता....
एक जोरदार आळस देऊन मी उठलो. भ्रमणध्वनीवर 'ओला' निरोप पावला. Driver Saroj is reaching your address. 'सरोज? ओलाने लेडी ड्रायव्हर पाठवला की काय?' क्षणभर सुखावलेल्या माझ्या मनाला चालकाच्या तपशिलात छायाचित्र दिसले जे बाप्याचे होते. म्हंटले 'असो.' सामानाची बॅग उचलली आणि खाली आलो. चालक वाट पाहात होता. डिकीत (भारतात हाच शब्द प्रचलित आहे) बॅग ठेवली आणि पासपोर्ट, तिकिट थोडेफार भारतिय आणि ओमानचे चलन असलेला महत्वाचा चामड्याचा कसा उर्फ 'पाऊच' घेऊन मी चालकाशेजारी बसलो. परदेश प्रवास, विमान प्रवास तसा आता मला नविन नव्हताच.
मिसळपाव