Skip to main content

Relaxed Attentive

लेखक अन्या बुद्धे यांनी रविवार, 12/05/2019 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
थोडं मुक्तचिंतन करायचा प्रयत्न करतोय. मॅट्रिक्स सिनेमात मॉर्फियस निओ ला मार्शल आर्ट शिकवताना सांगतो, 'Don't try to hit me, and hit me!' सिनेमा बघितल्यापासून त्यातली अनेक वाक्य जी समजायला अवघड आहेत असं वाटलेलं त्यापैकी हे एक. अनेक वाक्य दरवेळी नव्याने अधिक उलगडत जातात. हे त्यातलंच एक. किंवा कॅरम खेळणाऱ्या तरबेज लोकांचा खेळ बघणं पर्वणी असते. त्यांचा गेम प्लॅन, स्ट्रोक्स च नियंत्रण वगैरे गोष्टी आकर्षक असतातच पण मला मोहात पाडते ती गोष्ट थोडी वेगळीच. अनेक वर्षांच्या गॅप नंतर कॅरम खेळायला सुरवात केल्यावर काही काळाने बरी पकड आली खेळावर. अनेकदा अवघड सोंगट्या पण हुकमी घेता येऊ लागल्या.

(उष:काल)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 12/05/2019 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात हळू हळू एकेक करत उलगडत चालले आहे... ज्याच्याकडे पहात पहात आम्ही आमचे मार्ग शोधायचो तो तारा आता कितीतरी मागे पडला आहे आणि तो एकुलता एक चंद्रही... ज्याची स्वप्नं दाखवत दाखवत आईने दुधभात भरवला दररोज नव्याने प्रकाशमान होणार्‍या सत्याला मी तर्काच्या कसोटीवर जोखत राहतो आणि मनातल्या मनात विचार करत रहातो उद्या कोणती नवी जाणीव उलगडेल ! आज सकाळी डोळे उघडले तर ते समोरचे हिरवेकंच झाड मोहराने गच्च बहरले होते त्याचा मंद सुवास आसमंत दरवळत होता आता लवकरच ते मधुर फळांनी लगडलेले असेल या विश्वाच्या पासार्‍यातली एकेक

धून वाजवी बासरीवाला

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 11/05/2019 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
धून वाजवी बासरीवाला ------------------------------------------------------------------------------------------ धून वाजवी बासरीवाला रास रंगला यमुनेच्या काठाला पुनव प्रकाशी सारे नाहले दंग नर्तनी सारे विसरले भिडे टिपरी कोणाची कोणाला धून वाजवी बासरीवाला जळात लहर अंगात बिजली मी तू पणाची भावना विझली असीम शांतता मनाच्या तळाला धून वाजवी बासरीवाला आता राधा हरी अन हरी राधा गाठ जिवाशिवाची हि भलतीच बाधा स्वर्गीय नाद तो पोचे टिपेला धून वाजवी बासरीवाला बिपीन Bip499@hotmail.com

भयकाल

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 11/05/2019 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू एकेक करत हरवत चालले आहे... ज्याच्याकडे पहात पहात आम्ही आमचे मार्ग शोधायचो तो ताराच आकाशातून नाहीसा झाला आहे आणि तो एकुलता एक चंद्रही... ज्याची स्वप्नं बघत बघत आम्ही निश्चिंत झोपी जायचो... नाहीशा होणाऱ्या प्रत्येकाला मी खिडकीतून पहात राहतो आणि मनातल्या मनात चरकतो उद्या मी ही असाच नाहीसा झालो तर! आज सकाळी डोळे उघडले तर ते समोरचे हिरवेकंच झाड कुठेच दिसत नव्हते ना ही कुठला पक्षी या पृथ्वीवरून हळूहळू एकेक गोष्टी हरवत चालल्याचे दिसत आहे जो मुलगा मोकळ्या मैदानात खेळायचा तो ही आज कुठे दिसत नाहीये, की त्या मुलाबरोबरच ते खुले मैदानही गायब झाले असेल.... गोष्टी नाहीशा होणे ही सरत्या
काव्यरस

बरवा विठ्ठल ,बडवा विठ्ठल...जुडवा विठ्ठल .

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 11/05/2019 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी :पंढरपुरात आता दोन विठ्ठल, बडवे समाजाने उभारले स्वतंत्र मंदिर https://www.loksatta.com/maharashtra-news/another-vitthal-temple-built-… बातमी वाचून मनात विचार आला..... जुडवा विठ्ठल !! जुडवा विठ्ठल बडवा विठ्ठल । खरा बा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें त्यांचे मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥ बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां येईल मिठी सावकाशें ?॥३॥ तु का म्हणे देह भारिला विठ्ठलें ? दामक्रोधें केलें मन रीतें ॥४॥
काव्यरस

प्रेमम !

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 10/05/2019 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात प्रत्येकाने कधी ना कधी कोणावर प्रेम केलेलं असते. भले यशस्वी होवो अथवा न होवो त्यासाठी आपल्या हृदयात एक कायम हळवा कोपरा राखीव असतो. तुमचं प्रेम यशस्वी असलं तर क्या बात असते, नाहीतर ती कायम कुरवाळत ठेवावी अशी हवीहवीशी जखम असते. प्रेमाला जसं जातपात, भाषा, धर्म यांचं बंधन नसते तसंच चित्रपटाचं सुद्धा असतं. एखादा चित्रपट समजण्यासाठी शब्द महत्वाचे नसतात तर महत्वाच्या असतात त्यात व्यक्त केलेल्या भावना, त्या जर तुम्हांला आपल्याशा वाटल्या तो चित्रपट सुद्धा आपला वाटतो.

थांबवावे कुणाला मी

लेखक आकाश५०८९ यांनी शुक्रवार, 10/05/2019 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
निघायचे आहे प्राणांना, आहे निघायचे तुलाही कळेना आकाश मला थांबवावे कुणाला मी

तुझ्याविनाही खराच आहे

लेखक आकाश५०८९ यांनी शुक्रवार, 10/05/2019 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
चेहरा मुखवट्यास म्हणाला तुला लावणे खोटेच होते तुझ्यासवे मी खराच होतो, तुझ्याविनाही खराच आहे

होत नाही कपातला चहा गार आता

लेखक आकाश५०८९ यांनी शुक्रवार, 10/05/2019 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
ना लोचनी आसवांचा तुलाभार आता नको उगा हासण्याचा तुला भार आता शब्दांनी शब्द पोहोचवणे सुरू केले उरला न अर्थ त्यांना तसा फार आता गंजला खंजीर पाठीत कधीचाच सखे ये पुन्हा नवा करायला तसा वार आता करणे विचार तुझा आकाश सोडले होत नाही कपातला चहा गार आता आकाश....

चेहरा हसराच आहे

लेखक आकाश५०८९ यांनी शुक्रवार, 10/05/2019 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
केले जोहार जखमांनी, चेहरा हसराच आहे आहेत आसवे नयनी, चेहरा हसराच आहे नको वृथा यत्न नयनबाणास परत फिरवण्याचे काढता येणार नाही, तो असा रुतलाच आहे नको ना राहूस उभी सखे फारवेळ आरशापुढे काच अन पारा सांगती, तो जरा तसलाच आहे झाले नाही दु:ख आकाश देवाघरी जाण्याचे नव्हती सोयरीक देवाशी, देह हा आपलाच आहे - आकाश