Skip to main content

पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल)

लेखक किरण कुमार यांनी गुरुवार, 21/02/2019 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
२७ डिसेंबरची ती संध्याकाळ आम्हा चौघांच्या आयुष्यातील संस्मरणीय सोनेरी किरणांनी सजली , 'वेलकम टू कन्याकुमारी या अक्षरांची कमान पाहताना गेल्या तेरा दिवसाचा सायकल प्रवास नकळत डोळ्यासमोर ओझरता वाहू लागला गेली दोन आठवडे या ठिकाणाची अनामिक ओढ लागली होती , त्या ओढीनेच पॅडेलवर फिरणारे पाय थकले नव्हते कि चार राज्याच्या प्रवासातून शरिर थकले नव्हते , निसर्गाच्या सानिध्यात आधीच ताजेतवाने झालेले मन आता जल्लोष करण्यासाठी आतूर झाले होते .

कायदा

लेखक anandkale यांनी गुरुवार, 21/02/2019 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिवस मी कधी विसरणार नाही. त्या दिवशी खंड्या शाळेत जरा ऊशीराच आला, कपडे सुध्दा चुरगाळलेले होते. मागच्या बाकावर जाऊन एकटाच बसला, कुणाशी काही बोललासुध्दा नाही. मधल्या सुट्टीत पोरांचा गराडा खंड्याभोवती पडला. सगळे नेहमीप्रमाणे खंड्याची टवाळी करू लागले. सुताराचा सुशील त्यात नेहमीप्रमाणे पुढे होता. " काय बाप मेल्यासारखा तोंड करून बसलाय बघा" बाप हा खंड्याचा वीक पाॅईट. खंड्याचा बाप मिलेट्रीत होता. कुठेतरी काश्मीरमधे अतिरेक्यांशी लढत होता. काही शौर्यपदकेही खंड्याच्या बापाच्या नावावर होती. गावातल्या ज्या काही थोड्या लोकांचा पेपरात फोटो आला होता त्यात खंड्याचा बाप एकदम नामचिन होता.

WordPress वर असा बनवा स्वतःचा Blog

लेखक Ramesh Patil यांनी गुरुवार, 21/02/2019 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
blogging साठी खुपसारे Platforms उपलब्ध आहेत. पण या सर्वांमध्ये सगळ्यात चांगले कोणते असा प्रश्न जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा blogger किंवा WordPress ही दोनच नावे डोळ्यासमोर येतात. अर्थात गेल्या काही दिवसात tumbler सुद्धा खूप लोकप्रिय झालेय. पण अजूनतरी tumbler हे Blogger अन WordPress च्या पंक्तीत बसलेले नाहीये.

आंबट-गोड आठवणिंच्या चिंचा

लेखक जागु यांनी गुरुवार, 21/02/2019 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
उरण येथे असलेल्या माझ्या माहेरच्या वाडीत ४-५ मोठ मोठी चिंचेची झाड होती. प्रत्येक चिंच वेगवेगळ्या गुणांनी भरलेली. साधारण तीन प्रकार असायचे. एक अतिशय आंबट एक एकदम गोड तर एक जात आंबट गोड. चिंचेची झाडे दिसायलाही हिरवी गर्द खाली भरपूर सावली देणारी. आमच्या वाडीत राबाच्या शेतावर (म्हणजे तांदुळाचे रोप करण्यापूर्वी पाला टाकून भाजून घ्यायचे शेत) एक उंच बांध होता त्यावर एक अशीच मोठी चिंच होती. ह्या चिंचाही मोठ्या आकोड्याच्या होत्या. अजूनही आठवणीने तोंडाला पाणी सुटत. पाऊस गेला जमीन सुकू लागली की ह्या चिंचेखालच्या बांधाची साफसफाई व्हायची. मग ह्या झाडाखाली गोणता अंथरून अभ्यासाला बसायला मला आवडायचं.

असा बनवा Blogger वर स्वतःचा Blog फुकटात

लेखक Ramesh Patil यांनी बुधवार, 20/02/2019 23:53 या दिवशी प्रकाशित केले.

आपला स्वतःची वेबसाईट कशी बनवाल

website किंवा Blog कशी/कसा बनवायची या आधी वेबसाईट काय असते? आणी website आणी blog मध्ये काय अंतर असते ? हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. जेव्हा आपण एखाद पोर्टल website आहे अस म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात एक कंपनी येते. उदाहरण द्यायचं झाल्यास फेसबुक, तर फेसबुक जगातली सर्वात मोठी social Networking Website आहे. या website च मुख्य काम आहे आपल्या मित्रांशी जोडले जाणे व त्यांच्याशी online chat करणे.

कोकणात सहलीसाठी मार्गदर्शन हवे आहे

लेखक गणेश.१० यांनी बुधवार, 20/02/2019 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर २०१७ मध्ये मी पहिल्यांदा कोकण पाहिले आणि प्रेमातच पडलो. कुणाच्या काय म्हणता, कोकणाच्या ;-) त्या प्रवासावर एकदा निवांत लिहील हे नक्की ('आता उशीर झाला लिहायला फार' असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती ठरेल :-)) आता पुनःश्च कोकणात जाण्याचा बेत आखीत आहे. मागच्या वेळी आम्ही कर्दे ते रत्नागिरी हा परिसर डोळ्यांत आणि आठवणीत साठवून घेतला. अर्थातच यावेळी नवीन ठिकाणी सहलीचा बेत आहे.

[शशक' १९] - एकतीस

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 20/02/2019 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
चिमाजीअप्पा भलतेच खूष होते. बऱ्याच दिवसांनी कंबरेच्या चामडी पट्ट्याची खरेदी करण्यास निघाले. गेली सतत सात वर्षे पोटाच्या उजव्या बाजूचे दुखणे सहन करीत शेवटी महागडी शस्त्रक्रिया करून उजवे मूत्रपिंड व ऍपेंडिक्स काढून घेतले. दुखण्यापोटी बरेच बुवा, साधू, गंडे, गुरु, तांत्रिक, मांत्रिक, वैद्य, डॉक्टर झाले होते. खिशाला चांगलाच चुना लागला पण पोटदुखी आता शस्त्रक्रियेनंतर थांबली होती.

[शशक' १९] - मराठी

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 20/02/2019 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
एकमेकांशी कधीही पटवून न घेणारे आज्जी-आजोबा बऱ्याच वर्षांनी दोघेच तिरुपतीला गेले होते. दर्शनानंतर मंदिरातून कॉटेजला परतताना दमलेल्या आजोबांना जायचे होते रिक्षाने. तरीपण आज्जी चढल्या भरलेल्या बसमधे. आजोबांनाही मग चढावे लागले पाठोपाठ. "दहा रुपयांसाठी मला पळवलेस! दळभद्री कुठली..." आजोबांची वटवट जी सुरु झाली ती काही थांबेना.

[शशक' १९] - आज्जा

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 20/02/2019 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
लहानगा शंकर्‍या आज खुप खुश होता. गणपती विसर्जनाची मिरवणुक त्याच्या बैलगाडीतुन निघणार होती. रात्रभर त्याला गाडी सजवायचेच स्वप्न पडत होते. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठला तर घरात काळजीचे वातावरण दिसले. नेमके कारण त्याला काही कळेना. आज्ज्याला रात्री छातीत दुखत होतं म्हणुन शहरात न्यायचं एवढच त्याला कळालं. तसाच तोंड लटकाउन तो गाडीत बसला . शहरात गेल्यावर ठिकठिकाणी चाललेली मिरवणुकीची तयारी पाहुन त्याला अजुनच कसतरी होत होतं . दवाखान्याच्या खिडकीतुन मिरवणुक पहाताना त्याला त्याचे बैल व गाडी दिसली. गाडी विकली म्हणुन त्याला बापाचा खुप राग आलेला.

[शशक' १९] - आठवणीतली ती

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 20/02/2019 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं कुणाशीच जास्त पटायचं नाही, पण पहिल्याच नजरेत आमच्या दोघांची गट्टी जमली. मी लिहीत असताना ती मला खिडकीतून पाहायची. मी काय लिहितोय याची तिला खूप उत्सुकता असायची. मला उशीर झाला की तिचे डोळे दरवाजाकडे लागलेले असायचे. कॉलेजला गेल्यावर मात्र आमचं भेटणं आणि लहानपणीचा खेळकरपणा कमी होत गेला. पण नात्यातली ओढ मात्र अगदी निरागस, पहिल्या भेटीसारखी. पावसाळ्याचे दिवस. अंधारून आलेलं. सहज खिडकीबाहेर लक्ष गेलं, नजरानजर झाली.