Skip to main content

युगांतर आरंभ अंताचा भाग १४

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 29/07/2019 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
ऱथ महाली पोचला. भीष्म व्यथित मनाने आपल्या कक्षात जाऊन बसले. 'गुरुंनी केलेले शाब्दिक आघात, त्यांचा अपूर्ण राहिलेला न्याय, आपल्यामुळे दुखावलेली, उधवस्त झालेली अंबा..... ! हस्तिनापूरा, वचनबद्ध नसतो, तर गुरुंवर हत्यार चालवण्याचे महापाप करण्याआधीच इच्छामृत्यू घेतला असता मी!' विचित्रवीर्य तोल सांभाळत भीष्मांच्या कक्षाबाहेर आला, "भ्राता भीष्म...." त्याच्या हाकेने विचारांतून बाहेर पडत भीष्मांनी मागे वळून बघितले. उठून त्याला धरत आसनावर बसायला भीष्मांनी मदत केली,"युवराज, आपण का आलात? मला बोलावले असते....

युगांतर - आरंभ अंताचा भाग १३

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 28/07/2019 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
"भीष्म, सर्व कुशल आहे ना?" "होय राजमाता. काहीवेळा पूर्वीच नगरीत जाऊन येणे झाले. हस्तिनापुरी सर्व स्वस्थ आहे." "नाही भीष्म, मी नगरीबद्दल बोलत नाही." "मग राजमाता?" "विचित्रवीर्य च्या विवाहानंतर मी पाहातेय... तू अस्वस्थ दिसतो आहेस. सर्व ठिक आहे ना?" भीष्म काहीच बोलले नाहीत. सत्यवतीने तलम गुंडाळलेले संदेशवस्त्र त्यांच्या हाती दिले. भीष्मांनी उलगडून ते वाचले. 'अद्य शीघ्रंम् आगच्छतू!' "परशुरामांनी पाठवलेला संदेश दास घेऊन आला होता तू महालात नव्हतास तेव्हा." "आज्ञा असावी राजमाता. माझ्या गुरूंनी मला बोलावलेले आहे." सत्यवतीने मान होकारार्थी हलवली. भीष्माचार्यांचा रथ गुरुनिवासाजवळ थांबला.

४_किलबील किलबील पक्षी बोलती.

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 28/07/2019 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
रंगीत, उठुन दिसणारं ठळ्ळक, शिट्टी सारखं हव?...….. लाल..... हिरवा... पिवळा... नीळा....नील. हां नील. चमकदार , रंगीत उठून दिसणारे ठळ्ळक आहे. लांबून आईने " ए नी.........ल" अशी हाक मारली तर कोणीतरी शिट्टी वाजवतंय असं च वाटेल. " " व्वा काका छान नाव दिलंत मला. मस्त रंगीत नाव " " आणि माझं नाव काय हो काका" मला पण छानसं नाव द्या . पण नुसत्या एखाद्या च रंगांचं नको. सगळे रंग यायला हवेत त्यात" मागील दुवा
मागील दुवा http://misalpav.com/node/44930 रेघवाल्या मुलीचा नावासाठी हट्ट चालूच होता. हीच्यासाठी काहितरी नाव शोधायलाच हवं.

इंद्रधनू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 28/07/2019 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनू (आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.) आकाशी ते इंद्रधनू आले अहा! चला बाबा बघा ते पहा!

युगांतर-आरंभ अंताचा! भाग १२

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 27/07/2019 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
भीष्मांनी रथ नदीकाठी थांबवला. मनातली घालमेल त्यांना महालात बसू देत नव्हती. नदीकाठी बसून गंगामातेशी बोलून त्यांना मन शांत करावेसे वाटू लागले. त्यांनी नमन करून गंगेला आवाहन केले. एकदा.... दोनदा.... तिनदा.... पण गंगामाता कुठेच दिसेनात. भीष्म अस्वस्थ झाले. "माते.... आपण प्रकट का होत नाही?" भीष्म नदीतटावर वाकून हातात जल घेण्याचा प्रयत्न केला, परंतू जल त्यांच्या हातात येईच ना. " त्या रुष्ट झाल्या आहेत वसूदेव...." भीष्मांनी वळून पाहिले. एक सुंदर स्त्री उभी होती. तिचे सौंदर्य दैवी भासत होते. "आपण कोण देवी?" "जिच्या इच्छापूर्ती करता तुम्ही गाय पळवून आणलीत, आर्य!

विळखा -३

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 27/07/2019 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
विळखा -३ शनिवारी या डॉक्टरांना भेटून घरी आलो. यानंतर मी माझ्या कर्करोग क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांशी बरीच चर्चा केली. तेंव्हा एक गोष्ट माझ्या ध्यानात आली ती म्हणजे आईची शल्यक्रिया करायची आहे. ते प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. कारण केवळ मानेतच नव्हे तर हा रोग छातीत पण पसरला आहे. एकंदर हा तिसऱ्या स्टेजला आहे हे मला सुरुवातीलाच समजलेले होते.

३_ किलबील किलबील पक्षी बोलती.

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/07/2019 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
या आकृतीत गोलाला दोन छोट्या रेषा जोडून त्या खाली दोन फुल्या मारल्या. मुलाचे आणि मुलीचे अगदी कमीत कमी रेषांमधे. मग जवळंच आणखी काही रेषा जोडून एक कौलारू बैठी इमारत काढली, शाळेच्या इमारती सारखी. खडूच्या आणखी दोनचार जुजबी फरकाट्यात शाळेची इमारत जिवंत व्हायला लागली . दोनचार ठिपके इकडे तिकडे दिले . मैदानात खेळणारी मुले दिसायला लागली.....
मागील दुवा http://misalpav.com/node/44923 अजून काय करता येईल बरे….. खरे तर असा विचार डोंगरे सर चित्र काढताना कधीच करत नाहीत.

विळखा -२

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 26/07/2019 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
विळखा -२ मी शेजारीच असलेल्या माझ्या बायकोच्या दवाखान्यात आईला घेऊन गेलो. बायकोला आईची ती मानेची गाठ दाखवली आणि पुढे तपासणी करायची आहे असे सांगितले. पाच मिनिटे बोलून आई परत घरी गेली. तेंव्हा मी बायकोला म्हणालो कि तिला आता तरी क्षयरोग असण्याची शक्यता बोलून दाखवले आहे पण मला तर हा कर्करोगच आहे याची १०० % खात्री आहे. उद्या सिटी स्कॅन मध्ये काय निघतंय ते पाहू. एवढे बोलून मी परत दवाखान्यात आलो. आपली [पुस्तके काढून पाहीली आणि मनात एक शंका होती कि हा तिसऱ्या तर्हेचा म्हणजे MEDULLARY CARCINOMA OF THYROID (MTC) पण असण्याची शक्यता आहे.

लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 26/07/2019 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?! कशी गम्मत असते बघा.... लग्न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं की तू लग्न करून सुखी आहेस का तर तो/ती नक्कीच म्हणतात की उगाच या फंदात पडलो/पडले. एकटं असणं जास्त सुखाचं असतं.... आणि तरीही या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मुलांनी लग्न करायला हवंच असतं. असे किती पालक असतील जे म्हणतात की बाळा, तू अजिबात लग्न करू नकोस.  अगदी धीट मत मांडायचं तर लग्न हे उमेदीच्या काळात शरीरसौख्यासाठी आणि उतरत्या वयात सोबतीची गरज म्हणून केलं जातं. भावनिक गुंतवणूक - आयुष्य जोडीने जगण्यासाठी - तिचे/त्याचे विचार पटले म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला.......

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ११

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 26/07/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
काशीचा राजमहाल सुवासिक फुलांनी सजला होता. दास दासी येणाऱ्या राजांचे गुलाब पाणी, अत्तरे शिंपडत स्वागत करत होते. स्वयंवरात जमलेल्या राजांनी आसन ग्रहण केले. काशीनरेशने सर्व स्वयंवरात आलेल्या राजांना अभिवादन करून स्थानबद्ध झाले. लाल रंगाच्या पायघड्यांवरून डोक्यावर माळलेल्या सुवर्ण हिरेजडीत शिरोमणी ते पायातल्या बोटात घातलेल्या जोडव्यांचा भार पेलत अंबा, अंबिका, अंबालिका तिथे पुष्पवर्षावात तिथे हजर झाल्या. स्वयंवर सुरु करण्याची घोषणा देत दासांनी तीन सजवलेले पुष्पहार तिन्ही राजकन्यांसमोर धरले. भीष्माचार्यांनी महालात प्रवेश केला आणि थेट काशीनरेश पुढे जाऊन उभे राहिले.