Skip to main content

'तेरी केहॆके लुंगा'

लेखक वरुण मोहिते यांनी शनिवार, 08/06/2019 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
अन्वीता.. अन्वीता..अन्वीता '' हा बोलो वरुण'' अन्वीता आप मुझे बोहोत अच्छी लगती हो. ''अच्छे तो सभी होते है"बोलून ही चालायला लागली. परत दुसऱ्या दिवशी तेच मी वर्क शॉप मधून पळत बाहेर आणि ही मला टाळायला. आता मी मनावर घेतले होते. इज्जतीचा सवाल होता. अन्वीता झारखंड ची. ती आणि तिची एक खास मैत्रीण सोमाणी दिल्ली ची कॅम्पस मधल्या सर्वात सुंदर मुली.पण आय टी ला होत्या दोघी. सोमाणी ला आसनसोल च्या एका व्यापारी घरातील मुलाने पटवले होते. अन्वीता मला आवडायची . अन्वीता कुमारी नावातच प्रेम होते. .. त्यात प्रथम आणि द्वितीय वर्षाचा मी अध्यक्ष ( प्रेसिडेंट) मुलांचा सपोर्ट खूप . तृतीय वर्षा आधी जी एस बनता येत नाही.

आशा आणि निराशा .

लेखक Jayant Naik यांनी शनिवार, 08/06/2019 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आशा आणि निराशा . लेखक . ( असे म्हणतात कि लेखक वेगवेगळ्या पद्धतीने तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असतो . म्हणजे त्याला भेटलेली माणसे ,त्याने अनुभवलेले प्रसंग ..त्या वेळी त्याच्या मनात उमटलेल्या भावना तो वेगवेगळ्या कथेत मांडत असतो,सांगत असतो. मी शिकत असताना एका आजोबा आणि त्यांची बायको ..माई . यांच्या बंगल्यात अभ्यास करण्यासाठी खोली घेऊन रहात होतो. . ते दोघेच रहात. त्यांची जगण्यासाठी चाललेली निरर्थक धडपड मला पावलोपावली दिसत होती. मनाला उभारी नव्हती ..शरीर साथ देत नव्हते . पण जगणे संपत नव्हते.

धूपगंध ( ४)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 08/06/2019 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://misalpav.com/node/44537
भांडे पुन्हा लोट्यावर ठेवताना त्याचा किंचीत आवाज झाला. आबांना तो आवाज नाटकाच्या घंटेसारखा वाटला. त्या आवाजासरशी डोळ्यात एक अनामीक चमक आली. ययाती- देवयानी मधील ययातीचा शर्मिष्टेसोबतचा प्रेमालाप ऐकु यायला लागला.
हे प्रिये तुझ्या मुखारविंदाला कमलनयांनी शोभा येते की मग भाळावरच्या कुंकुम तिलकाने पूर्व दिशेला प्रभा फाकते? इंद्रधनुची उपमा मी तुझ्या कमानदार रसशीत ओठांना देवू की मग त्या बाकदार भुवईला?

घडलंय असं आज...

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 08/06/2019 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
आॅफिसला जाण्याची सकाळची गडबड. लवकर कसं पोहचू? ट्रेन उशीर तर करणार नाहीत ना? आजचं काम व्यवस्थित होईल का? असे सगळे प्रश्न डोक्यात ठेवून आपण धावत सुटतो, अगदी आजूबाजूचं जग विसरून. इतकं की आपल्या सभोवती घटणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींकडेही आपलं लक्ष जात नाही इतके आपण यांत्रिकपणे पळत सुटलोय. पण आज समोर घटणाऱ्या दोन घटनांनी या यांत्रिक आयुष्यातून किंचितही का होईना मला बाहेर पडण्यास मदत झाली. सकाळी स्टेशनला आत शिरताना बाहेर ठाणं मांडून बसलेल्या विक्रेत्यांचा अडसर हा रोजचाच.

कवितेपलिकडील कविता - २

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 07/06/2019 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेपलिकडील कवितेची प्रेरणा वेगळी होती - पण आज मी खरेच अश्या काही कविता, मला भावलेल्या आणणार आहे. काही अवांतर विषय पण येतील, पण ते कृपया सहन करून घ्या. ========================================================================================= मे महिन्यात कार ने फिरणे बरेच होते, त्यामुळे अर्थात रेडीओ पण खुप ऐकला जातो. गेल्या वर्षी का आदल्या वर्षी याच सुमारास हेट स्टोरी मधले "आज फिर तुमपे प्यार आया है" हे गाणी ऐकलं होतं.

राजमाची २०१९०६०४

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 06/06/2019 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यात सह्याद्री न पाहणे अक्षम्य अपराध आहे. एरवी पावसात धबधबे, हिरवे डोंगर असतात. थंडीत भटकणे सुसह्य होते. पण रानमेवा मे महिन्यातच उधळला जातो. करवंदं, जांभळं, आंबे. आता आणखी एक कारण वाढले ते म्हणजे काजवे पाहणे. हे काय नवीन आहे का? नाही. काजवे होतेच, पण आताच्या camera तून फोटो काढण्याचा छंद वाढलाय. हे फक्त DSLR नाही तर नव्या लो लाईट मोबाईल cameraनेही शक्य होत आहे. पर्यटकांची झुंबड उडते आहे. आगामी ८-९,१५-१६ जूनचे विकांत बुक झाले आहेत. या पर्वणीसाठी राजमाची हे ठिकाण क्रमांक १ वर आहे. इथल्या उधेवाडी गावातील पाचसहा गाववाले हॉटेलींग करतात.

तथाकथित शुद्धलेखनाच्या अवाजवी आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे २

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 06/06/2019 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
*शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे -१ हि धागा मालिका शुद्धलेखनवादी ट्रोलांसाठी नाही. शुद्धलेखन समर्थक चर्चा या धाग्यात टाळून सहकार्य करावे, हि विनंती वाचूनही मनमोकळे करण्याची इच्छा झाल्यास शुद्द्धलेखनप्रियकर मिपाकरांच्या या धाग्यावर जावे. ज्यांना शुद्धलेखन नियमात विधायक सुधारणा व्हाव्यात असे वाटते त्यांनी बिरुटे सरांच्या या धाग्यावर आपली मते नोंदवावीत.

सिग्नल .....!

लेखक फिझा यांनी बुधवार, 05/06/2019 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
सिग्नल ...... आज लाल दिव्याने नाममात्र थांबलेत काही गोंगाट , नाहीतर कोण इथे थांबतं ...... सगळेच घाईच्या लयीत ! इतक्यात ....... धुळीने माखलेल्या चाळीस वर्षांच्या रखरखीत पायाच्या बोटांवर चार वर्षांच एक डोकं ठेवलं गेलं ..! अन् त्या कोमल गालांचा स्पर्श होताच ...... झटकन पाय मागे घेऊन तो ओरडला " ए हट ...... " त्याच्या डोळ्यातली लाचारी पाहायला वेळ नसेल पण, त्या स्पर्शाने काळीज गलबलले असणार नक्कीच ! तरीपण .... "कालच नवीन चप्पल घेतलीये...." असं म्हणेपर्यंत, दिवा हिरवा झाला ! अन पोर ....... परत लाल सिग्नल ची वाट बघू लागलं ! ------------- फिझा .

पारा असा चढला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 05/06/2019 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
१ पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ? नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला सोसायटीचे लोक्स मदतीला आले व सापाला पहाताच त्यांची पण भीतीने गाळण उडाली सोसायटीत नागनाथ

मार्तंड जोशी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 05/06/2019 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
मार्तंड जोशी हे एक विद्वान ज्योतिषी होते. एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना एकदा त्यांना, त्या काळी एका अंत्यज समजल्या जाणार्‍याच्या झोपडीत आसरा घ्यावा लागला. घरात एक म्हातारी आणि तिची मुलगी राहत असे. आपण घरी वेळेवर पोहोचू शकत नाही या विचाराने जोशी अस्वस्थ होते. म्हातारीने कारण विचारले. त्यांनी सांगितले की आजच्या दिवशी ज्या स्त्रीची गर्भधारणा होईल तिला होणारा पुत्र हा मोठा ज्योतिषी होणार आहे; मी जंगलात अडकल्यामुळे ही सुवर्णसंधी हुकणार आहे. म्हातारीने त्यांना आपल्या मुलीबरोबर रात्र घालवायची परवानगी दिली. मार्तंड जोशी यांना त्या अंत्यज मुलीपासून पुत्र न होता कन्या झाल्याने जोशी फार उदास झाले.