किलबील किलबील पक्षी बोलती...
"सुंदर अक्षर हा एक सुरेख दागिना आहे, हा दागीना मिरवायचा की मोडायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे"
फळ्यावर हा सुविचार लिहून डोंगरे सर थाम्बले. फळ्यावरच्या त्या अक्षरांकडे पुन्हा एकदा पाहिलं. ओल्या फडक्याने पुसलेल्या काळ्याकुळकुलीत फळ्यावर ती पांढर्या खडूने काढलेली अक्षरे टिप्पूर चाम्दण्यासारखी दिसत होती.
अक्षरे पहात असताना त्यांना का कोण जाणे रफीचे " फलक पे जितने सितारे है वो भी शरमाये…" हे गाणे आठवले. या फळ्यालाही फलक म्हणतो, आणि त्या आकाशालाही फलक असेच म्हणतो. गंमत आहे ना?
मिसळपाव