Skip to main content

[शशक' १९] - निरोप

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 14/02/2019 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
हातातली तीन नाणी सावरत तिने होस्टेलच्या सार्वजनिक फोनवरून एक नंबर फिरवला. चक्क रॉंङ्ग नंबर! दोनदा!! आपल्या खंद्या स्मरणशक्तीने दगा दिल्याचे दुःख पचवून १९८ फिरवला. नाव पत्ता सांगून नंबर मिळवला. नाणं परत आलं. मैत्रिणीच्या शेजारच्यांनी तत्परतेने तिच्या घराची बेल वाजवली. फोन घेतला तिच्या नवऱ्याने. सांगितला निरोप - तिच्या गाइडनी आज दुपारी साडेबारा वाजता बोलावलंय. तीनही नाणी गेली. दुपारी मेसमधे जेवून मग ती विभागात डोकावली. "सर, आली होती का माधवी?" " हो. आज तसं ठरलं नव्हतं, पण बरं झालं. मी मागवलेलं पुस्तक सकाळीच आलं ते देता आलं तिला." " अरे वा, छान छान." सरांच्या खोलीतून बाहेर पडताना स्वतःच एप्रिल फूल झाल्याचं दुःख दाटून आलं.

वाचने 6070
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

माधविच्या मैत्रिणिने माधविला फोन जो तिच्या नवर्याने उचलला. माधविच्या मैत्रिणिला माधवीला फसवायचे असते पण तिचाच पोपट होतो.

April Fool :)

+१

-१ बुध्यांक वाढवला पाहिजे... नाही झेपत

खूपच सोपी वाटली समजायला

-१