मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

षंढ

चिनार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेरणा : https://www.misalpav.com/node/44145 घटना "ती" ऐकताच आम्ही पेटलो.. कॅण्डल लावुनी आलो...अन मग विझलो..| स्वप्नातही अणुबॉम्ब बघुनी "झिरपलो" असे षंढ आम्ही कैसे निपजलो || घेतला ग्लासात सोडा अन म्हणालो युद्धाच्या बाता सोडा.. जास्तीत जास्त "त्यांच्याशी" क्रिकेट खेळणं सोडा...| बीयर चिल्ल्ड नाही म्हणून ओरडाया लागलो.. असे षंढ आम्ही कैसे निपजलो || म्हणे राजकारण नको ह्या विषयी.. 'युती'च्याच गोष्टीत घेऊ "आघाडी"...| गळ्यात पडून सेल्फ्या लगेच घेऊ लागलो.. असे षंढ आम्ही कैसे निपजलो || नको तिथे "तुका" आम्हाला आठवतो.. उगी राहून मग आम्ही जे होईल ते बघतो..| नाठाळा माथी काठी, हाणणेही विसरलो.. असे षंढ आम्ही कैसे निपजलो || होऊच द्या पुन्हा एकदा सव्हिस अकरा.. बिर्याणीला आहेच पुन्हा तयार बकरा...| अवस्थेला व्यवस्थेचे कोंदण देऊ लागलो.. असे षंढ आम्ही कैसे निपजलो || महाराज..स्वराज्य निर्मिले तरी कशास? इथे घाबरतो आम्ही पाहुनी सश्यास..| घायाळ हरिणी बघून पळू लागलो.. असे षंढ आम्ही कैसे निपजलो || कविता पोस्टवुनी कर्तव्य केले | अन लगेच "लाईक" मोजाया घेतले | कमेंट अन स्मायल्या रोजच्याच आम्हा | हेच आमुचे शस्त्र अन हाच अमुचा बाणा | नेत्यांवर चर्चा हीच आमची भाकर | त्यांनाच देतो शिव्या अन त्यांचेच आम्ही चाकर | काय विचारता आम्हा षंढ कैसे निपजले | जिथे पेरले वेगळे अन रोपटे भलंतेच उगवले ||

वाचने 1761 वाचनखूण प्रतिक्रिया 4

नाखु 19/02/2019 - 14:20
जिथे पेरले वेगळे अन रोपटे भलंतेच उगवले || वैचारिक गाजरगवत निर्मूलन ही सद्य परिस्थितीत एक मूलभूत गरज आहे. मुवि संपादित बाबा वचने प्रकरण सतरा पृष्ठ अठरा. नितवाचक अडाणी नाखु पांढरपेशा