Skip to main content

श.श.क. झडप

लेखक सत्य धर्म यांनी सोमवार, 18/02/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
मनात विचारांचे काहूर घेऊन ती रानातून वाट काढत वस्तीवरच्या घरी चालली होती. महिना झाला तरी गण्या तीचा पिच्छा काही सोडत नव्हता, त्यामुळे घरातून बाहेर निघणं तिच्या जीवावर येत होतं. एकुलती एक मुलगी शिकावी या बापाच्या एका इच्छेसाठी सर्व भीती वाऱ्यावर सोडून ती कॉलेजला जात होती. आज गावात "बेटी बचाओ बेटी पढाओ" कार्यक्रमासाठी तालुक्याची माणसे आली होती पुरा गाव तिथंच जमला होता. स्त्री चळवळीने जोर धरला होता. सरपंचाचे भाषण ऐकतच ती चालली होती. बामनाच्या मळ्यापाशी दबा धरून बसलेला तो एका झडपेत समोर आला आनी तिला उसात घेऊन गेला " बेटी बचाओ बेटी पढाओ" च्या जयघोषात एक किंकाळी हवेत विरून गेली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3556
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

दुर्दैव, तिचं, तिच्या गावचं, देशाचं, आपलं.

In reply to by विजुभाऊ

मग झडपेत समोर आला असे वाक्य बरोबर वाटत नाही. झेपेत समोर आला आणि झडप टा़कून तिला घेवून गेला असे चालेल.

छान !

+१

+१