Skip to main content

अरे महिरावणा

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 19/06/2025 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
(सुधारित आवृत्ती) अरे महिरावणा । विडंबन घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी ॥ अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला ।

कथा एका पीएचडीची...

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 19/06/2025 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
कथा एका पीएचडीची... पूर्वप्रसिद्धी- https://aisiakshare.com/node/1747 http://www.loksatta.com/sampadkiya-news/ph-d-very-easy-20848/ वरील लेख नुकताच वाचला. तो वाचल्यावर मला एका पीएचडी प्रबंधांची आठवण झाली. गोपनीयतेच्या कारणास्तव सर्व तपशील देत नाही पण बाकी सर्व घटना पूर्ण सत्य आहेत. मी संगणकीय संगीतावर काम करत असताना डॉ. किरण रेगे (प्रा. मे. पु. रेगे यांचे चिरंजीव) माझे सहकारी आणि एका अर्थाने माझे बॉस पण होते.

म्हातारा न इतूका....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 19/06/2025 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली.

संगीत देवबाभळी : एक हृदयस्पर्शी नाटक

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 19/06/2025 09:23 या दिवशी प्रकाशित केले.

काल संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात 'संगीत देवबाभळी' नाटकाचा प्रयोग होता. नाट्यगृह संपूर्ण भरलेलं. अनेकांना वेळेवर तिकीट मिळेल या अपेक्षेनेआलेल्या अनेक रसिकांचा हिरमोड झालेला दिसला. गर्दी तुडुंब. २०१८ पासून यानाटकाचे प्रयोग होत आहेत. जवळ जवळ सहाशेच्या आसपासचा हा प्रयोग होता. एकाच दिवशी दोन प्रयोग आमच्या शहरात होते.

<एक मजेशीर आणि हृद्य आठवण >

लेखक महिरावण यांनी गुरुवार, 19/06/2025 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझं बालपण हे साधं होतं – म्हणजे फक्त शेजारी माझं नाव ऐकून मुलांना शाळेत घ्यायचे. मी रडायचो, तेव्हा पावसाळा यायचा. आणि मी हसायचो, तेव्हा उन्हाळा कमी व्हायचा. पण आज मी सांगणार आहे ती मजेशीर, ती हृद्य आठवण – जीने माझ्या आयुष्यात मला एकदा पुन्हा स्वतःची महानता (म्हणजे रोजचंच) अनुभवायला दिली. प्रा. अरुणकुमार यांनी मला प्रोजेक्टवर घेतलं – आणि त्यांनी असं करून खरं तर भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना घडवली. प्रोजेक्ट सुरू झाला, मी २-३ महिने तिथे येत होतो. (येत होतो – म्हणजे येत होतो, जात होतो, काम काहीसं होत होतं, पण थोडंसं नाही होत होतं).

मिश्र पीठांची डाळबाटी

लेखक Bhakti यांनी बुधवार, 18/06/2025 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
१ नाही नाही फुलाला नैवैद्य नाही दाखवला हा पदार्थ मी मुलीला डब्यात (टिफीन) देण्यासाठी खास करून झटपट बनवले. हा पदार्थ गव्हाचे पीठ, रवा, ज्वारीचे पीठ आणि बेसन यांच्यापासून मळून वाफवून आणि तळून बनवला आहे.

चक्र

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 18/06/2025 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
कवीने वाचावे वाचले साचावे वाचले, साचले साचले, सुचले आतल्या आचेच्या प्रखर धगीत प्रज्ञेच्या मुशीत शब्दांच्या साच्यात अल्लाद ओतून पाचही प्राणांची पाखर घालून उत्फुल्ल, उत्कट प्रतिभा शिंपून वाटून टाकावे पुन्हा एकदा कागद कोरा ~ सृजन चक्राचा नवीन फेरा

गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 17/06/2025 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
गीतारहस्य-७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्‌धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्‌धांताला अद्वैत सिद्‌धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे. सांख्य शब्दाचा अर्थ- १.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले. २.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे) असा व्यापक अर्थ बनला. ३.ईश्वरकृष्णाचा (इ.स.

एक मजेशीर आणि हृद्य आठवण

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 17/06/2025 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
 (वरील फोटोतील प्रा० अरूणकुमारांची आठवण... फोटो परत टाकल्याबद्दल क्षमस्व) प्रा० अरूणकुमारांनी मला त्यांच्याकडच्या प्रोजेक्टवर घेतल्यामुळे मला खूप भारी वाटत असे. ते आय०आय०टी०मध्ये अतिशय लहान वयात म्हणजे ऐन तिशीत पूर्ण प्रोफेसर म्हणून रूजू झाले होते. ज्यांना बर्कलेचे विद्वान ही काय चीज असते हे माहित नाही त्यांना सध्या पर्प्लेक्सीटीच्या अरविंद श्रीनिवासनचे उदाहरण अत्यंत उत्तम आहे.