Skip to main content

मराठी गाणे ai चा वापर करून

लेखक स्वरुपसुमित यांनी सोमवार, 30/06/2025 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राने , एक नवीन प्रयोगाची सुरुवात करत आहे ai चा वापस करून मराठी गाणे १) इथे माझ्या तू नळी चा दुवा दिला आहे २) ai विडिओ बनवणे वेळ खाऊ आहे ,५ -५ सेक चा विडिओ एकत्र जोडत आहे ,कृपया सकारात्मक सुधारणा सुचवा ३) एका गाण्यासाठी एक वेगळा प्रतिसाद आहे ,तिकडे थोडे थोडे करून गाणे जोडत जाईन

राडा

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 30/06/2025 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
राडा ______ स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते. आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती.

चारचाकीत घुसलेला उंदीर.

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 29/06/2025 21:53 या दिवशी प्रकाशित केले.

जिम कॉर्बेट नी केनिथ अँडरसन यांच्या वाघ, बिबळ्या शिकारीच्या कथा वाचताना सहज आठवले की आपण शिकार तर नाही, पण एका उपद्रवी उंदराला पकडले होते. उंदीर पकडण्यात कसला आलाय शूरपणा? पण हा उंदीर सतत चार दिवस चारचाकीत धुमाकूळ घालत होता. माणसे आणि वायर याने सोडल्या नव्हत्या. त्याला पकडणे सोपे नव्हते. तसेच चालत्या गाडीत (८०-१०० च्या स्पीडवर) याने जर मला अंगावर चढून किंवा पायात येऊन बिचकावले असते, तर गाडीसह मी कुठेतरी घुसलो असतो. माझ्या मृत्यूचे कारण कुठलाही डिटेक्टिव्ह, शेरलॉक होम्स, गोपीचंद जासूस शोधू शकला नसता. तर या अशा उंदराला मी कसे पकडले, याची ही कथा.

हिंदी सक्तीबद्दल

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 29/06/2025 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या हिंदी सक्तीच्या वाजत गाजत असलेल्या विषयावर आपले दोन आणे टाकण्याचा मोह मला आवरला नाही. माझे सर्व शिक्षण मी महाराष्ट्रात पूर्ण केले. पहिली ते सातवी मराठी माध्यम आणि आठवीनंतर सेमी-इंग्लिश. आम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाचवीपासुन होत्या. हिंदी भाषा हा विषय म्हणुन मी फक्त पाचवी ते सातवी शिकलो. आठवी ते दहावी त्याची जागा संस्कृतने घेतली. अकरावी बारावीमध्ये विज्ञान शाखेत आम्हाला फक्त एकच भाषा होती ती म्हणजे इंग्रजी. इलेक्ट्रॉनिक्स विषय निवडल्यामुळे इतर कोणताही भाषेचा विषय नव्हता. अभियांत्रिकीनंतर अभ्यास केलेली भाषा फक्त संगणकांची, माणसांची नाही.

एक मिशन असेही.

लेखक भागो यांनी शनिवार, 28/06/2025 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने प्रियाला कडेवर घेतले. क्वारंटाईन मध्ये जाण्यापूर्वी त्याने एकदा प्रियाला जवळ घेतले. “बाबा, परत केव्हा येणार?” “प्रिया, जाणाऱ्याला केव्हा येणार असं नाही विचारायचं”. कौमुदी म्हणजे प्रियाची आई आणि राबर्टोची पत्नी. हो ती अगदी मराठी होती. “बरं प्रिया, सांग तुला काय आणू?” “मी मागितलं तर आणाल? तर मग चाँदवा, मुठभर चांदणे घेऊन या. गिव मी माय मूनशाईन.” “डन!.” तो मिशन वरून परत आला तेव्हा त्याला हे सगळे आठवत होते. “प्रिया आहा.

गेले द्यायचे राहून.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 28/06/2025 19:41 या दिवशी प्रकाशित केले.

गेले द्यायचे राहून....., म्हणत आयुष्य Mute केलं 

प्रारब्ध, नशीब म्हणत ..... कण्हत,कण्हतआयुष्य Cute केलं

 जगण्याची मजा काय विचारता? 

स्वतःच्या मनाला mute करून, दुसऱ्यांच्या अपेक्षांना like करत जगतोय... 

Wi-Fi शिवाय चालणाऱ्या मोबाईलवर Google करून बघतोय! 

घे भरारी,स्काय इज द Limit....कुणीतरी greet केलं 

मागे वळून बघता, काय miss न् काय Meet केलं ....

 इच्छा,आकांक्षाना फाट्यावर मारत Telling lies करतोय.... 

worried असलो तरी हॅप्पीली married म्हणतोय. 

काव्यरस

किडकी प्रजा - सायकोपथी

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 28/06/2025 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
 सायकोपथी हा गुंतागुंतीच्या समाजघातक वर्तनाला कारणीभूत ठरणार्‍या व्यक्तीमत्वातील बिघाडांचा समूह मानला जातो. अशा बिघडलेल्या व्यक्तीमत्त्वाच्या लोकांना सायकोपॅथ अशी संज्ञा आहे.

कॉर्बेटचं मृगजळ

लेखक आकाश खोत यांनी शुक्रवार, 27/06/2025 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या मे आम्ही उत्तराखंडला जाऊन आलो तिथे आम्ही नैनीताल आणि जवळपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. शेवटचा दिवस आम्ही जिम कॉर्बेट अभयारण्यसाठी राखून ठेवला होता. पूर्वतयारी जिम कॉर्बेटची सफारी त्यांच्या वेबसाईट वर आधीच बुक करावी लागते. शेकडो एकर परिसर असल्यामुळे तिथे वेगवेगळे झोन आहेत. बिजरानी, झिरना, ढिकाला, ढेला अशी त्या झोन्सची नावे आहेत. अजूनही आहेत. तिथे जाण्यासाठी विमानमार्गे पंतनगर / हल्द्वानी हे विमानतळ आहे. रामनगर हे रेल्वे स्टेशन आहे. ह्याच गावाजवळ बरेच झोन आहेत त्यामुळे इथे बरीच वर्दळ असते. बहुतांश लोक याच गावात मुक्कामाला राहून कॉर्बेटला जाऊन येतात.

कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 27/06/2025 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं. यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे. कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही. सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून.