लाखाची गादी .
लाखाची गादी .
( कृपया वाचकानी लेखाच्या तांत्रीक बाबी कडे न पहाता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा ही विंनती आहे. )
आज रविवारचा दिवस, म्हणजे सुट्टीचा दिवस. सकाळी उठून बायकोच्या हातचा गरमागरम चहा पीत बसलो होतो . इतक्यातच माझ्या भ्रमणध्वनीतुन पोपट शिळा घालू लागला . मनांत म्हटले आता सकाळी सकाळी कोण हा पोपत आहे कुणास ठाऊक ?
हॅलो बोला , कोण बोलताय !!
"आरे , संजू काय ? गुडमार्निंग ss ,गुडमार्निंग ss आरे!! मी सुरेश बोलतोय ,तुझा शाळेतील बालमित्र" .
"सुरेश ss , कोण?" माझ्या एकदम लक्षात येईना . "आरे !
प्रारब्ध
माझ्या एका मित्राला अर्थाचे अनर्थ करण्याची खूप वाईट खोड आहे. अर्थात माझाच मित्र तो... माझ्यासारखाच असणार... पण असे करताना मी किमान आजूबाजूचे भान तरी बाळगतो... हा पठ्ठ्या मात्र माझ्याही पुढची पायरी...
परवा सम्याच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये गेलो होतो. त्याच्याकडूनच पार्टी मिळणार म्हटल्यावर मी एका पायावर तयार. बरोबर रव्याही होताच. हॉटेलमध्ये तशी बरीच गर्दी होती. एक मोकळे टेबल पाहून त्यावर जाऊन बसलो. वेटरला पंजाबी डिशेसची ऑर्डर दिली आणि गप्पांची सुरुवात झाली. आमच्या टेबलच्या मागे तीन टेबल एकाला एक जोडून १०/१२ मुलींचा घोळका बसला होता.
पाणी-च-पाणी
असा कसा हा पाऊस |
पडला बेधुंद होऊन,
कित्येकांचे संसार ,
गेले पाण्यात वाहून |
शंभर वर्षाचा त्याने,
म्हणे रेकॉर्ड मोडला |
जणु फाटले आकाश,
असा पाऊस पडला |
सरला श्रावण मास,
भाद्रपद सुरु झाला |
तरी ही पावसाचा,
जोर कमी नाही झाला |
किल-बिलती पाखरे,
कशी झाली ओलीचिंब |
परी कधी नाही केली,
त्यांनी कुठे बोंबाबोंब |
मिळेना खेळायला,
मैदाने झाली ओली |
कंटाळुन गेली ती,
शाळेतील मूल-मुली |
पडला पाऊस बेभान,
पिके पाण्यात बुडाली |
शेतकरी बांधवाची,
झोप रात्रीची उडाली |
चारतात गाई दूर,
त्या रानमाळावर |
येती पावसाच्या सरी,
घेती आपल्या अंगावरी |
रानातील पशु-पक्षी,
कापतात थर थर |
थंडी पावसात नाही ,
त्यांना उब
काव्यरस
मिसळपाव