Skip to main content

निसर्ग-शशक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 19/10/2019 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग --------------------------------------------------------------------------------------------------------------- प्रसन्न सकाळ आहे. हवाही आल्हाददायक. बोराच्या झाडावर साळुंक्या बसल्या आहेत. त्या जोडीचा किलबिलाट चालू आहे . पलीकडच्या झुडपांवर छोटी पिवळी फुलपाखरं उडत आहेत. मध्येच हवेची झुळूक येतीये . पानं डोलत आहेत. झाडावर सरडा कळून येत नाहीये. दिवस पावसाचे पण पाऊस नाहीये. मलाही छान वाटतंय ! चहाच्या टपरीपाशी पोरापोरींची गर्दी आहे. ती पोरं मजेत चहा पितात आणि कटिंग चायवाले छोटे थर्माकोलचे कप वाढलेल्या झुडपांमध्ये फेकतात . माणूस निसर्गाचा असा नाश का करतो ? पण- अशाच एका कपामध्ये माती भरलीये… त्यामध्येच मी उगवलोय .आता मी लहान आहे ; पण उद्या मी त्या कपापेक्षा उंच होणारच आहे .त्याच्या कडेवरून बाहेर डोकावणार आहे . त्याला दाखवणार आहे- निसर्ग सगळ्यांपेक्षा मोठाच आहे ! ---------------------------------------------------------------------------------------------------------------- बिपीन सांगळे
लेखनविषय:

वाचने 3357
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आरेवा छान,प्रासंगिक.

निसर्गावर देखील सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याची वेळ आली आता ;)