Skip to main content

दोरीवरचे कपडे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/09/2019 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोरीवरचे कपडे दोरीवर कपडे कसेही वाळत असतात कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात? शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो (यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.) पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे साडी घालून घडी बसते वाळत वा-याने तिचा पदर असतो हालत किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय त्यात बाई घातली अ

आमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - १)

लेखक वैभव.पुणे यांनी बुधवार, 04/09/2019 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
७-८ दिवसांची सुट्टी, कपल, फिरायला जायचय, पुण्याजवळ जायचं का कोकणात, का मध्य प्रदेश, का गुजरात, काहीच कळेना. ठिकाणे शोधून हैराण, एप्रिल महिना, थंड ठिकाणी जावे का प्लॅन पुढे न्यावा, नुसता गोंधळ! ७-८ दिवसाचं बजेट काढल, विमानी जावे का ट्रेन नी, चांगल्या हॉटेलात राहावे का साधे, यंदाची ट्रीप चांगलीच करायची होती, २ रूपे जास्त गेले तरी चालतील, पण गैरसोय काही नको! महिना गेला कुठे आणि कधी जायचं... असच विचार आला, पासपोर्ट तर आहे, बघायचं का चक्क फॉरेन! तेही इथल्या काढलेल्या बजेट मध्ये? अबब!!! काय तो विचार आणि काय ते फॉरेन ! शोधाशोध केली, ही एजन्सी, ती वेबसाईट, ते ट्रीप प्लॅनर अॅपस!! अबब!!

सोहळा

लेखक Satyajit_m यांनी बुधवार, 04/09/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
h3 { font-size: 19px; font-family: 'mukta'

पाठवणी

लेखक मिलिंद जोशी यांनी बुधवार, 04/09/2019 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या जीवनात घडणाऱ्या काही घटना खूप छोट्या असतात पण त्यांच्यात सभोवतालचे वातावरण काही वेळासाठी का होईना पण बदलण्याची अफाट शक्ती असते. याचाच अनुभव मी काल घेतला. माझ्या मित्राच्या बहिणीचे लग्न होते. आदल्या दिवशी पासूनच आम्ही लग्नघरी तळ ठोकला होता. काय आहे ना लग्नघर म्हटले की अनेक गोष्टी येतात. बरीच कामे असतात, धावपळ असते आणि घरातील लोकं आलेल्या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात अडकलेले असतात. त्यामुळे कामासाठी जितके जण जास्त तितके चांगलेच. बरे अनेकदा तर मुलगी सासरी गेल्यावरही मित्रांची कामे संपतील असे नाही. असो. लग्न खूपच छान लागले.