समुद्रच आहे एक विशाल जाळं
ही एक दीर्घ कविता आहे.
एका समुद्रात राहणाऱ्या निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची ही गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. वाचायला लागल्यावर एकसलग वाचत रमून जावे अशी ही गोष्ट.
या मासोळीला सारखे वाटत असते की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तिच्या मते प्रत्येकजण जरी आपापल्या जागी वेगळा असला तरी मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाचे दिसणे वेगळे असते, चाकोरीतले जगणे वेगळे असते. या मासोळीचे मात्र आजूबाजूच्या विश्वात मन रमत नाही. तिला चाकोरी नकोशी झाली आहे. तिचे ठाम मत आहे की आपण चाकोरीत अडकून पडायलाच पुनः पुनः जन्म घेत असतो. तिला या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे.
मिसळपाव
मंडळी
मी आज एक फार मोठा स्टंट केला.
ही कल्पना माझ्या डोक्यात स्वतंत्रपणे चमकली असली तरी पूर्णपणे माझी नाही. असे तुरळक प्रयोग जगात काही ठिकाणी चालु आहेत. या प्रयोगाचे दुरगामी परिणाम एआय २.० च्या स्वरूपात आपल्याला लवकरच दिसतील.
समजा दोन ए०आय०ना विशिष्ट विषयावर चर्चा करायला सांगितलं तर?
या मागचा विचार असा की दोन स्वतंत्रपणे विकसित केलेल्या मॉडेल्सच्या ट्रेनिंग/ज्ञानाचा फायदा मिळून चर्चेत जास्त खोली आणि सजीवपणा येईल.
ही कल्पना मी ए०आय०च्याच मदतीने तात्काळ प्रत्यक्षात उतरवली.
पार्करचे पेन
======
-राजीव उपाध्ये (एप्रिल २०२४)
मी दूसरीत असताना माझा सख्खा मामा अमेरीकेला शिक्षणासाठी गेला. तिकडे गेल्यावर त्याने आपले आईवडील आणि बहीणींसाठी १ली भेट म्हणून पार्कर-४५ ची ४ शाईची पेनं पाठवली होती.
भावाने पाठवलेल्या या १ल्या भेटीचे माझ्या आईला भयानक अप्रूप होतं. आई त्या पेनला कुणाला हात लावू द्यायची नाही. मला तर नाहीच नाही. एकदा-दोनदा चोरून मी ते हाताळले होते. तेव्हा त्यांची चकाकी, नीबचा गुळगुळीतपणा, पेन हातात धरल्यावर वाटलेला भारीपणा या भावना माझ्या मनात खोलवर रूतून बसल्या.
उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले.