DDLJ
#दिलवाले_दुल्हनिया_ले_जायेंगे
टीव्हीवर डीडीएलजे सुरु आहे. राज (शारक्या) नुकताच युरोप टूर वरून परतला आहे. आपण सिमरनच्या प्रेमात आहोत हे त्याला आता कन्फर्म झालंय. तो स्विमिंग पूलजवळ बसलाय. तेवढ्यात त्याचे वडील अनुपम खेर तिथे येतात. शारक्याच्या हातात 'बीयर'चा टिन देतात. आणि मी शेगावचं दर्शन घेऊन आल्यावर वडील ज्या कॅज्युअलतेने मला, "किती वेळ लागला बे दर्शनाले?" असं विचारायचे त्याच कॅज्युअलतेने ते शारक्याला विचारतात, "लडकी का नाम क्या है?"
हातात बीयरचा टिन आणून देणं वगैरे तर कहर आहे. आम्ही शेगावचा प्रसाद वडिलांच्या हातात देताना डाव्या हाताने दिला म्हणूनसुद्धा शिव्या खाल्ल्या आहेत.
लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -२
धर्मराज अपार्टमेंट- हेमसिंगबुट्टा (नावबदलून)- दहा, दहा वर्षांपासून , तिथेच सडत असलेले, इंजिनीरिंग कॉलेजचे जवाई , त्याचा तो अड्डा, कुठलाही फ्रेशर असो, त्याले एकदातरी तिथे हजेरी लावण गरजेचे होत. फक्त लोकलविदयार्थी याले, अपवाद. अमरावतीच्या फ्रेशर्सची वर्दी अजून तिथ लागली नव्हती. आमाच्याच क्लासमधला एक उत्तरभारतीय पोट्ट, रूमवर निरोप घेऊन आल.
"बुट्टा सरकेयाह बुलाया है."
आम्ही तिघही एकमेकांकडे पाहून रायलो.काय कराच काई समजत नव्हत. बाल्यादादाले एवढ्या लवकर भेटणई शक्य नव्हत.
येडा होण्याआधी..
***
ही कथा लिहली होती त्याला आता बरोबर दोन वर्ष झाली. जेम्स वांड यांची मुक्कामी यष्टी अन संगीचा दृष्टांत ही कथा वाचल्यावर खूप आवडलेली. त्यातला येडा हा येडा का झाला असेल असा विचार करता करता, तो आणि ओरिजिनल कथेत कमी फुटेज मिळालेली संगी यांच्यावर सुचलेली ही गोष्ट. जेम्स वांड यांनी ही पात्रं वापरण्याची परवानगी तर दिलीच शिवाय कथा वाचून काही बदलही सुचवले. त्याबद्दल त्यांचे अनेक आभार. पण अनेक कारणांमुळे ही कथा लिहिणे बारगळलेच. ती आता शेवटी नेटाने पूर्ण करून प्रकाशित करीत आहे.
बिबटया....
बिबट्या
मध्यंतरी south africa मध्ये johansburg बसून साधारण 500 km अंतरावर असणारं kruger national park ला जाण्याचा प्लॅन केला.
जरी आंधळी मी तुला पाहते
एव्हाना मन की बात सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे. पण हे गाणं ऐकलं ..जरी आंधळी मी तुला पाहते ...आणि वाटलं अरेच्चा ! हे तर मन की आँख! दिव्यदृष्टीच म्हणा ना!
महाभारतात महर्षी व्यास संजयास दिव्यदृष्टी बहाल करुन जातात; कुरुक्षेत्रावरील वृत्तांत धृतराष्ट्रास कथन करण्यासाठी. गांधारीची दिव्यदृष्टी मात्र तशी बक्षीसपात्र नाही. अंध धृतराष्ट्राशी लग्न होणार समजताच आजन्म डोळ्यावर पट्टी बांधुन घेण्याच्या कठोर प्रतिज्ञेत स्वतःला बद्ध केलं तिने. त्या साधनेतुन, तपश्चर्येतून ती कमावलेली.
केस ऑफ माय ओन मर्डर
जवाहर नगर.गोरेगाव पश्चीम रोड नंबर नऊ , बीट नंबर दोन.
निदान पोलीस स्टेशनच्या बाहेर च्या पाटीवर तरी हेच नाव होते. एरवी ही पाटी नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी पोस्टर होर्डिंग ने च्या मागे लपलेली असते त्यामुळे कोणाला दिसत नाही. लोकल कॉर्पोरेटर आणि गल्लीतील भावी नेते यांची ही तर हक्काची जागा.
मनाचा राजा , राजासारखे मन. गल्लीतील भावी नेते. पप्पू भाऊ . दिनके आगे रात है हम तुम्हारे साथ है. अशा काही घोषणा लिहीलेले बोर्ड दिसायचे. आता कापडी बोर्ड जाऊन फ्लेक्स आले इतकाच काय तो फरक गेल्या दहा वर्षातला.
कधी कधी गम्मत व्हायची.
अनामिका
मला प्रेम करायला तिने शिकवले. तिरस्कार कसा करावा हे ही मी तिच्याकडूनच शिकलो. तिचे डोळे नेहमी सांगायचे, की नजर बोलकी असते. ती रसिका होती अन् मी मनातला भावतरंग. ती दृश्य तर मी अदृश्य. मला माझ्याच शब्दांत पकडून हरवणे फक्त तिचीच मक्तेदारी होती. तिच्यासाठी माझे शब्दही माझ्याशीच दगा करायचे.
आम्ही तासंतास सोबत असायचो. पण मी तिला कधी बोलूच द्यायचो नाही. वाटायचं की तिला असंच जपून ठेवावं. तिच्या जीवाला काही तोशीस नाही पडू द्यावी. मग तिच्या वाट्याचं बोलणं सुद्धा मीच बोलायचो... माझ्याशी. तिच्या नजरेचे वर्णन मी पामराने काय करावे? त्या पाणीदार डोळ्यांत जणू सारा समुद्र सामावलेला असायचा.
हॅरी पॉटरच्या भाषेतलं पत्र!
सर्वांना नमस्कार!
इतकी मुलं सगळं काही बाजूला ठेवून तासन् तास हॅरी पॉटर कसे वाचू शकतात असा प्रश्न मला पडला होता. इतकं त्यामध्ये काय आहे असं वाटायचं. आणि असंही वाटलं की, मुलांसोबत चांगला डायलॉग करायचा असेल तर हॅरी समजून घ्यायला पाहिजे. शिवाय जगामधलं जर सर्वाधिक वाचलं जाणारं साहित्य ते असेल, तर मग तर समजूनच घ्यायला पाहिजे असं वाटलं. त्यातून हळु हळु हॅरी जगाची ओळख झाली. आणि माझ्या हॅरी भक्त परायण बहिणींच्या मदतीने अक्षरश: अखंड हॅरी नाम सप्ताहातील हॅरी पॉटाप्रमाणे सलग आठही दिवस आठ चित्रपट बघितले (लॉकडाउनचा सदुपयोग करून). शिवाय पुस्तकही वाचायला सुरुवात केली. आणि खूप छान जग उलगडत गेलं.
मिसळपाव