दोसतार - ४९
कोण काय म्हणेल त्याला म्हणु देत म्हणत. आपल्या मनातल्या मनात हसण्याने ही ती शांतता मोडायची. ही शांतता डबीत साठवून ठेवता यायला हवी. आपल्याला हवी तेंव्हा बाहेर काढून अत्तरासारखी श्वासात घेता यायला हवी. खूप वेळ गेला सगळे गप्पच होते. कोणालाच ही शांतता मोडावेसे वाटत नव्हते. दरीतून येणार्या वार्यामुळे आमच्या चेहेर्यावर आलेला घामही थंडगार झाला. झेंड्याच्या दगडी बुरुजावरून खाली दरीच्या उतारावर पुढे समोर दरीच्या मधोमध दिसणार जयगड तानुमामाने दाखवला .
मिसळपाव