Skip to main content

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -१

लेखक श्रीकांतहरणे यांनी गुरुवार, 04/06/2020 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीची येळ , जेवण खावन आटपून आमी, नऊ, दहाच्या दरम्यान झोपलो असणं. मायावर, निद्रादेवी लयच खुश असायची, एकदा का मी गादीवर पडलो, की मले बातच ढोरावाणी झोप लागे. झोपाच्या बाबतीत कुम्भकर्णानंतर मायाच नंबर लागत असणं. अजून दुसरा माया याटम म्हणजे, झोपीत असतांना मले जर कोणी मला आवाज दिला, त जरी म्या डोळे मिचकावले, तरी समोरचा कोण, कायच्यासाठी, काय बोलून रायला मले, हे सगळं समजायले, अन होश मदे याले, कमीतकमी दोन चार मिनटं त लागताच असे. त्यातच, "श्रीकांत , श्रीकांत " , "अनुप , अनुप " मच्छरान, कानापाशी येऊन भिनभिन, करावं तशे आवाज याले लागले.

प्रवासी

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 03/06/2020 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
एका दिशेचा भेटला किनारा प्राक्तनाची दौड बाकी वाट दे तू सागरा. नाव माझी हलकी जरी मी खलाशी रानातला. लाटांची वादळे प्रचंड उरात लाव्हा तप्तला. आकाशी दुंदुभी गर्जना करावी वाऱ्यासवे वेगाची स्पर्धा हरावी. उन्मळून पडले गर्ववृक्ष सारे ओहोटीत गेले जीव सर्व प्यारे. पाहुणा मग पाऊस आला भरावया एक रिक्त प्याला. प्याला-होडी ची गल्लत मोठी झाली वल्हवणी आता पाण्यात शांत झाली. हे भास्करा, नको होऊस तू लुप्त लढणाऱ्यांना किती ठेवशील गुप्त. चांदण्यांचे मर्म थोडे वाटून घे निशेस सावलीची साथ दे.

मिश्रफलमधु अर्थात मिक्सफ्रुट जॅम

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 02/06/2020 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- जी मिळतील ती सर्व फळे , साखर , टिकवण्यासाठी सायट्रिक ऍसिड(पावडर) पाव चमचा, रंग व इसेन्स हवे असल्यास. सगळी फळे स्वच्छ धुऊन लोणच्याला कैरीच्या करतो त्या आकारात फोडी करून घ्यावी. (मी 3चिक्कू, 3सफरचंद,4केळी,अर्धे टरबूज,पाव अननस,1पपई,2आंबे अशी फळे घेतली.) जाड बुडाच्या पातेल्यात थोडे पाणी घेऊन सगळ्या फळफोडी त्यात टाकाव्या मंद ते मध्यम आचेवर गॅसवर झाकण टाकून शिजवून घ्याव्या.

बेचव बकवास

लेखक शेर भाई यांनी सोमवार, 01/06/2020 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यात आधी मिसळ-पाव हॉटेलामध्ये आमच्या सारख्या पामरास आपला ठेला लावू दिल्याबद्दल हॉटेल मालकांचे आभार. या हॉटेलात आमचे हे तिसरे पुष्प. पुष्प ते पण हॉटेलात, sounds weird, म्हणून आपण ह्याला तिसरा गार-बकवास-बेचव-वडा म्हणूया. आता या हॉटेलामध्ये जी बरीच गर्दी असते, आणि ती दर्दी पण असते, अस म्हणतात. आम्ही पहिल्यापासूनच बरेच उपदव्यापी. एकदा फिरता फिरता एका “उद्योगी मराठी माणसांच्या उत्थानासाठी आयोजित” होऊ घातलेल्या खाद्य-महोत्सवात गेलो होतो. तिथे आयोजक दादांपैकी एक दादा आमचा मित्र निघाला. त्याने विचारले तुम्ही घेणार का एखादा Food Stall चालवायला? तिथे आमच्या Madam नी आम्हाला लगेच spot-approval दिल.

गाण्यास पावसाच्या...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 01/06/2020 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!

क्षितिजावरती पहाट होता..... !!!

लेखक अमोल_००३ यांनी सोमवार, 01/06/2020 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजावरती पहाट होता अचानक मज आज ये जागृती | गिरिशिखरांच्या वाटेवरूनि अन् पाऊले मग घेती गती || फिरता फिरता असा थबकलाे पाहुनी सुंदर तो देखावा | मुग्धपणाने अनिमिष नेत्रे तृषार्तापरी पिऊनच घ्यावा || पर्वतराजींमधूनि हिरव्या, सूर्यबिंब ते प्रकटत जाई | झाडे, वेली, फुले, पाखरे, आसमंतही प्रकाशित होई || दूर कपारीतुनि एखाद्या, ये धावत फेसाळत धार | शांत, संयमी, गंभीरपणे अन् विस्तारीतसे तनमनी अपार || स्तब्ध उभ्या त्या वृक्षावरती कुणी एखादा येई पक्षी | दोन क्षणातच अवरोहाची फुलवूनि जाई अद्भुत नक्षी || असाच उभा असता मी तेथे, सृष्टीचे न्याहाळीत रूप | चाहूल लागे मजला काही, व्यक्त करी कोणी अप्रूप || घेऊ

Four fundamental forces बहुत 'लोकां'सी चालवणाऱ्या बलांची चतुरंग सेना 

लेखक अनिकेत कवठेकर यांनी सोमवार, 01/06/2020 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
राजा विक्रमाच्या राज्यात अभूतपूर्व अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रमाच्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण विश्वातच एक भयंकर रोगाची साथ आली होती. नवा रोग, नवी लक्षणे, नवीन उपचार, नवीन लस या सर्वात जगाचं लक्ष तर होतंच पण या रोगामुळे तयार झालेल्या नवीन धोक्यांची नक्की काय काय तयारी करायची आणि धोका नक्की कुठून येईल हे सारंच कळण्यापलीकडे गेलं होतं. संपर्कात येणारा कोणता माणूस आपल्यासाठी तो रोगकारक विषाणू घेऊन येईल आणि त्याने आपण आजारी पडू हे सारंच हाताबाहेर गेलं होतं.

तू ठरव...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 01/06/2020 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही हात घे हातात आधी,आरसा नाही! टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा फायदा नात्यात आता फारसा नाही! एवढा केला खुबीने खूनही माझा वारही केला असा जो वारसा नाही! सांगतो आहे जगाला कोण हा वेडा! मी असा नाही असा नाही असा नाही! कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना एवढीही या मनाला लालसा नाही! तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही... —सत्यजित

प्रेम..

लेखक मन्या ऽ यांनी सोमवार, 01/06/2020 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम.. प्रेम म्हणजे अथांग सागर प्रेम म्हणजे वाळवंटातील मृगजळ ज्याने तहानलेल्याची तहान काहीकेल्या भागत नाही प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आपुलकी जो वेळप्रसंगी माणुसकीला जागलेच असे नाही प्रेम म्हणजे अटी प्रेम म्हणजे बंधन जे माणसाला एक माणुस म्हणुन वागवत नाहीत मुक्तपणे जगु देत नाही तरीही हे प्रेम वाटे मजला हवेहवेसे ते प्रेम जे एकमेकांच्या अबोल गोड शब्दांचे एकमेंकाच्या साथीचे समोरच्याच्या मंद गुढ हास्यातले ते प्रेम जे आयुष्यात देवघरातल्या नंदादिपाप्रमाणे अखंड तेवणारे स्वतः जळून काळोख मिटवणारे -दिप्ती भगत (२०जून,२०१९)
काव्यरस

सुंदर हे जग!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/06/2020 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘मुळात हे जग सुंदर आहेच. पण असे काही वाईट अनुभवही येतात, की वाटतं, आता आहे त्यापेक्षा हे जग कितीतरी पटीनं नक्कीच सुंदर असू शकेल!’ हे अवतरण माझ्या ‘पंख गळून गेले तरी’ या आत्मकथनातील आहे. लाच, भ्रष्टाचार, गरीबी, लाचारी, हिंसा, जातीभेद, वर्गभेद, लिंगभेद, धर्मभेद, रंगभेद, व्यंगभेद, प्रांतभेद, अहंकार, धार्मिक कलह, दुसर्‍याला कमी लेखणं, टवाळी, निंदा, नालस्ती, शोषण, अवास्तव स्तुती, खुशमस्करी, लांगुलचालन, मत्सर, व्देष, भाषाव्देष, पापाच्या कल्पना, लबाडी, लूट, भेसळ, नफाखोरी, कोणाच्या व्यंगांकडे पाहण्याचा दुषीत दृष्टीकोन आदी गोष्टींतून आपण बाहेर कधी पडायचं?