पन्नाशीचा टप्पा
आता आता दादा होते
कसे मग काका झाले
तरुणाच्या यादी मध्ये
बघा किती मागे गेले
दिसते आहे टक्कल
पांढर्या झाल्या मिश्या
हळू हळू मोठ्या होती
कश्या प्रौढत्वाच्या रेषा
शत्रूवर येऊ नये
तो प्रसंग येतो असा
तिशीची बाई म्हणते
काका जागा आहे बसा
पटापट हातातून
आयुष्य जात पळून
पन्नाशीचा टप्पा आला
मागं पहावं वळून
काय काय राहिलंय
केली पाहिजे यादी
काय माहित कधी
धरावी लागेल गादी
तू लक्ष नाही द्यायचे
कुरबुर केली कुणी
ऐकत बसावं मस्त
आवडती गाणी जुनी
कारणाशिवाय एक
टाकून द्यावी रजा
पोरा सोबत आपल्या
खूप करावी मजा
खर आहे घरासाठी
तर झिझल पाहिजे
एकदा सरीत पण
चिंब भिजलं पाहिजे
राहिलं असेल बघ
ते डोंगर
मिसळपाव