Skip to main content

फळांचा नाश्ता

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 01/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
फळांचा नाश्ता , सकाळी जर मसालेदार आणि तेलकट नाश्ता कार्याचा नसेल आणि अगदीच अळणी पण खायचे नसेल तर हा नाश्ता करून बघा - चुरा: रोल्ड ओट भाजून घ्या त्यात पाहिजे तर बदाम / अक्रोड यांचा भरडा चुरा पण भाजा ( काजू नको) भाजून गार करण्याआधी थोडीशी गुळी साखर घालावी आणि दालचिनी ची पूड -फळे: पीच , प्लम, पेअर सफरचंद ,माध्यम आकाराचे चिरून घ्या ( केळं घालता येईल पण ते इतर फळांची चव मारू शकते ) यातील पीच / प्लम पेअर चांगले पिकलेलं असतील तर त्यांना रस सुटेल ) वाडग्यात आधी वरील चुरा ठेवून मग टाय प्रथम रस सुटणारी फळे टाका आणि मग सफरचंद वरती योगर्ट ( साधे, गोड वाले नाही आणि क्रीम / साय पण नको ) घाला ( योगर्ट आणि दही यात नक्की काय फरक आहे हे कोणी तान्या सांगू शकेल काय?) IMG_7472[1]

वाचने 3437
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सँडविच स्पर्धा! यात मोजायला गेलं तर हजारो पाकृ बनविता येतील... आणि सँडविच हे फक्त सपाट चौकोनी पावाचेच असते असे नाही तर अनेक वेगवेगळे पाव/ पावसदृश्य बेगल्स इत्यादी गोष्टींपासून पण बनवता येते..( तुर्किश पाव वैगरे ) तर चला मिपाकर पुढील दोन दिवस वेगवेगळे सँडविच च्या पाकृची मिपावर मांदियाळी करा....( फोटू पाहिजेतच पण) माझे २ सुरवातीला १)उरलेली तांबड्या भोपळ्याची भाजी चे २) बिट आणि अवाकाडो चे दोन्हीत ताजी दळलेली काळी मिरी IMG_7474[1] IMG_7473[1]

" जन्मोजन्मांतरीचे नाते " म्हणजे सफरचंद आणि दालचिनी यांचे .... तुनळीवर अनेक उदाहरण सापडतील